Bacchu Kadu on Strike : बच्चू कडू यांची प्रकृती खालावलीये.. बच्चू कडू यांना रक्ताच्या उलट्या झाल्यात.. मात्र तरिही उपार घेण्यास बच्चू कडू यांनी नकार दिलाय.. कुठलीही सलाईन लावून घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलीये.. शेतकरी आणि दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंनी आमरण उपोषण सुरु केलंय.. यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा सहावा दिवस आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Sanjay Raut : अहमदाबाद विमानदुर्घटनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी केलेल्या वक्तव्यावरुन संजय राऊतांनी टीका केलीये.. हा एक अपघात होता.. आणि अपघात टाळता येत नाही असं वक्तव्य अमित शाह यांनी केलं होतं.. त्यावरुन राऊतांनी अमित शाह यांच्यावर टीका केलीये... यांना विमान अपघात टाळता येत नाहीत.. रेल्वे अपघात टाळता येत नाहीत मग यांना काय टाळता येतं असा सवाल संजय राऊतांनी अमित शाह यांना विचारलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Dombivli Lady Death : अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान दुर्घटनेत डोंबिवलीकर 27 वर्षीय रोशनी सोनघरे हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानामध्ये रोशनी फ्लाइट क्रू म्हणून कार्यरत होती. रोशनी ही डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ परिसरातील नव उमीया कृपा सोसायटी मध्ये आपल्या आई-वडिल आणि भाऊ सोबत राहत होती. तिचे वडील राजेंद्र आई राजश्री आणि भाऊ विघ्नेश हे एकत्रच राहत होते .
Badlapur Deepak Pathak : अहमदाबादमध्ये दुर्घटनाग्रस्त झालेल्या विमानात 242 प्रवासी आणि दहा क्रू मेंबर्स होते. त्यात बदलापूरच्या दीपक पाठक यांचाही समावेश आहे. दीपक पाठक हे गेल्या पंधरा वर्षांपासून एअर इंडियात नोकरीला आहेत. त्यांचं कुटुंब कात्रज भागातील रावल कॉम्प्लेक्स मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहे. सकाळी टेकऑफ करण्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियात अपडेट केलं होतं. आपला देवावर पूर्ण विश्वास असून आम्ही दीपक यांच्या बाबतीत आशावादी आहोत असं त्यांच्या दोन्ही बहिणींनी सांगितलंय.
Ahmedabad Plane Accident Update : अहमदाबाद विमान दुर्घटनेत सर्व प्रवाशांचा मृत्यू झालाय. अहमदाबादहून लंडनच्या दिशनं विमानानं उड्डाण केल्यानंतर काही क्षणात विमान दुर्घटना घडली.. विमान वसतिगृहाच्या हॉस्टेलवर कोसळलं.. या दुर्घटनेत सर्व म्हणजे 242 प्रवाशांचा मृत्यू झालाय.. दुपारी पावणेदोनच्या सुमारास अहमदबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरुन विमानानं उड्डाण केलं. पण उड्डाणाच्या अवघ्या बारा सेकंदात विमान मेघानीनगर भागात कोसळलं, विमान जेव्हा कोसळलं तेव्हा मोठा स्फोट झाला. हे विमान अहमदाबादच्या मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहावर कोसळलं.
Ahmedabad Plane Crashed : अहमदाबादच्या मेघानीमध्ये विमान कोसळलं...सरदार वल्लभभाई विमानतळावरची घटना...विमान एअर इंडियाचं असल्याची माहिती...विमानात 242 प्रवासी असल्याची माहिती..
Sanjay Raut : राज ठाकरेंसोबतच्या युतीचं उत्तर उद्धव ठाकरे देतील'...खासदार संजय राऊत यांची युतीबाबत प्रतिक्रिया...लवकरच सर्व चित्र स्पष्ट होईल- संजय राऊत
Sanjay Shirsat : राज ठाकरे-मुख्यमंत्री भेटीवर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिलीय...भेटीला राजकीय अर्थ असून आमची आजही राज ठाकरेंना ऑफर आहे.
Pimpri Chinchwad : पिंपरीत मॅट्रिमोनियल साईटवरुन महिलेशी लग्न करण्याचे अमिष दाखवत 3 कोटी 16 लाख रुपयांची फसवणूक करणा-या तिघांना अटक करण्यात आलीये..सायबर सेलने या तिघा आरोपींना दिल्ली, हरियाणा सीमेवरुन अटक केलीये...आरोपीने दुबईमध्ये मोठ्या कंपनीत सीईओ असल्याचे सांगत आजारपण आणि विविध कारणांसाठी महिलेकडून तीन कोटी 16 लाख रुपये घेतले होते.. अखेर सायबर सेलने आरोपी आणि त्यांच्या साथीदारांना अटक केलीये...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Sandeep Deshpande : मनसे नेते संदीप देशपांडे मंत्री उदय सामंत यांच्या भेटीसाठी मुक्तगिरीवर दाखल..फडणवीस-राज भेटीनंतर घडामोडींना वेग
Raj Thackeray and Devendra Fadnavis Meet : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट झाल्याची सूत्रांची माहिती..हॉटेल ताज लँडमध्ये दोन्ही नेत्यांची भेट?...दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा?
Thane Shivsena UBT Janta Darbar : एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात शिवसेना UBTचा जनता दरबार...शिवसेना UBT नेते नितीन नांदगावकर घेणार जनता दरबार....चंदनवाडी शाखेत होणार जनता दरबार...थोड्याच वेळात सुरू होणार जनता दरबार
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Nurses Strike : राज्यातील 30 हजार परिचारिका 1 जुलैपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.. विविध प्रलंबित मागण्यांसाठी या परिचारिकांनी थेट संपाचा इशारा दिलाय. त्यामुळे राज्य सरकारच्या सर्व रुग्णालयांतील आरोग्यसेवा कोलमडण्याची शक्यता आहे.. कंत्राटी पद्धतीनं परिचारिकांची नियुक्ती आणि सातव्या वेतन आयोगात स्टाफ नर्सेसकडे दुर्लक्ष झाल्याच्या निषेधार्थ हा संप पुकारण्यात आलाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Maratha Reservation : मराठा आरक्षण कायद्याच्या वैधतेला आव्हान देणा-या याचिकांवर 18 जुलैपासून पुन्हा सुनावणी घेण्यात येईल, असे मुंबई हायकोर्टाने बुधावारी स्पष्ट केलंय.... या कायद्याचा लाभ घेऊन शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणारे आणि सरकारी नोकरी मिळविणा-यांचे भवितव्य या याचिकांच्या अंतिम निकालाशी अधीन राहील, असेही कोर्टाने पुन्हा एकदा स्पष्ट केलंय...'महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षण कायदा, 2024 च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या जनहित याचिकांवर सुनावणीसाठी न्या. रवींद्र घुगे, न्या. एन. जे. जमादार व न्या. संदीप मारणे यांच्या विशेष पूर्णपीठाची गेल्याच महिन्यात स्थापना करण्यात आली होती.. गेल्यावर्षी मुंबई हायकोर्टाचे माजी मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालील पूर्णपीठापुढे या याचिकांवर सुनावणी झाली... मात्र, न्या. उपाध्याय यांची बदली करण्यात आल्याने या याचिकांवरील सुनावणी थांबली होती.
Pikvima : पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7 हजार 600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6 हजार 584 कोटी रुपये अदा करण्यात आलंय... शेवटचा 1 हजार कोटी रुपयांचा हप्ता येत्या दोन ते तीन दिवसात कंपन्यांकडे जमा होणार आहे. कंपन्यांकडून राज्य सरकारला सुमारे 2 हजार 300 कोटींचा परतावा मिळणार आहे.
Ashadi Wari : आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविकांसाठी एसटी महामंडळाने 5 हजार 200 विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे..ग्रुप बुकिंग केल्यास तुमच्या गावातून थेट पंढरपूर अशी सेवाही एसटी महामंडळाकडून दिली जाणार आहे....या प्रवासातदेखील 75 वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास करता येणार आहे... यात्राकाळात पंढरपूर येथे प्रवाशांच्या सोयीसाठी चंद्रभागा, भीमा, पांडुरंग विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती स्थानके उभारण्याचा निर्णयही एसटी महामंडळाने घेतला आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Corona : देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ...कोरोनाचे देशात 7 हजार 121 रुग्ण...दिल्लीत गेल्या 24 तासात 66 जणांना कोरोनाची लागण...कोरोनामुळे देशभरात आतापर्यंत 74जणांचा मृत्यू
MNS Meeting : मनसेचं मिशन मुंबई महापालिका...मनसे पदाधिका-यांची आज शिवतीर्थवर बैठक...राज ठाकरे पदाधिका-यांशी चर्चा करणार...उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबतही चर्चेची शक्यता...शिवतीर्थवर दुपारी 12 वाजता बैठक होणार...मनसे मुंबई शहराध्यक्ष आणि उपशहराध्यक्ष उपस्थित राहणार...मुंबई महापालिका निवडणुकीची रणनीती ठरणार असल्याची माहिती
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Rain Alert : दोन आठवडे उघडीप दिलेला मान्सूनबाबत गुड न्यूज आहे...राज्यात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण तयार होत असून पुढील 3 ते 4 दिवस बहुतांश भागात पावसाचा इशारा देण्यात आलाय....तर 14 जूननंतर राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे...30 जूनपर्यंत राज्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.