Today Maharashtra Breaking News LIVE : मनोज जरांगेंची आजपासून मराठवाड्यात मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढणार आहे. तरदुसरीकडे दूध दरवाढीच्या घोषणेनंतरही अहमदनगर जिल्ह्यातील शेतक-यांचं आंदोलन सुरुच असून गणोरमध्ये उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. तर देशात हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी मुख्य आरोपीने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं.
"गेली अनेक वर्ष मी या पक्षात राहिलो, परिवारात राहिलो. मात्र परिवारात राहून इतका संघर्ष कुठे असतो का? इतका संघर्ष मी केला. कार्यकर्त्याचं किंवा पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्यायचं आणि भाजपाचे काम चांगलं असून सुध्दा जर आम्हाला दुय्यम वागणूक दिली जात असेल आणि ज्यांचं काम ग्राउंड लेवलला काहीच नाही आणि तेच आम्हाला ज्ञान शिकवत असतील तर अश्या लोकांचे काम करून फायदा काय? कुठपर्यंत आम्ही अश्या लोकांचे ओझे वहायचे? असा सवाल भाजपा पक्ष सोडताना छत्रपती संभाजीनगरमधील नेते राजू शिंदेंनी उपस्थित केला आहे. शिवाय पक्ष्याबद्दल आमची कोणतीही नाराजी नाही. त्यामुळं कार्यकर्त्यांशी चर्चा करुन पुढील निर्णय ठरवणार आहे. मात्र पक्ष सोडण्याच्या माझ्या निर्णयावर मी ठाम आहे, असंही राजू शिंदेंनी सांगितलं.
जवळपास 2 ते अडीच तास छत्रपती संभाजीनगरमधील भाजपाचे नेते राजू शिंदे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र राजू शिंदे यांच्या नाराजीचा सूर कायम असून त्यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाबरोबरच पदाचाही राजीनामा दिला आहे. उद्या ते ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
ओबीसी आरक्षणासंदर्भात सोमवारी सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आलं आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. मागील आठवड्यात ही बैठक होणार होती. सह्याद्रीवर सोमवारी संध्याकाळी 6 वाजता ही बैठक होणार आहे.
संत सोपान देव महाराजांच्या पालखीचं सोमेश्वरनगर इथं पहिलं गोल रिंगण पार पडलं. टाळ मृदंगाच्या गजरात लाखो वारकऱ्यांनी रिंगण सोहळ्याला हजेरी लावली. ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषणा संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
आषाढी वारीच्या काळात पंढरपुरात मांस मटण विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत. या आदेशानुसार 16 जुलै ते 20 जुलै या काळात पंढरपूरमध्ये मद्य, मांस, मासे आणि मटण विक्री करू नये असं सांगण्यात आलं आहे.
वाल्मीक ऋषींच्या वाल्हे गावातून पाहुणचार घेऊन श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. पिंपरी खुर्द विहीर इथं विसावा घेऊन माऊलींची पालखी नीरा इथे दाखल होईल. माऊलींच्या पादुकांना निरास्नान करण्याचा अनोखा सोहळा आज होणार आहे. श्रींचे निरास्नान आटोपून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोणंद इथं दाखल होईल आणि तिथं आजचा मुक्काम असेल.
पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आज धडक कारवाई केली. कोथरूड परिसरात आज महापालिकेचा बुलडोझर चालला. पौड रोडवरील अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्यात आली. 'एल थ्री' बारमधील वादग्रस्त पार्टीनंतर महापालिकेने ही अतिक्रमणविरोधी मोहीम हाती घेतली आहे.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे होणाऱ्या वारीतील भाविकांच्या नियोजनासाठी मध्य रेल्वेने 64 विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर-मिरज-नागपूर (4 फेऱ्या), नवी अमरावती-पंढरपूर (4), खामगाव-पंढरपूर (4), लातूर- पंढरपूर (10), भुसावळ-पंढरपूर (2), मिरज-पंढरपूर (20), मिरज- कुडूवाडी (20) या मार्गावर विशेष फेऱ्या धावणार आहेत. 7 जूलैपासून विशेष फेऱ्यांचे आरक्षण सुरू होणार आहे. फेऱ्यांच्या सविस्तर माहितीसाठी मध्य रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर संपर्क साधता येईल.
तर आम्ही फ़ोडाफोडीचे राजकारण करत नाही...मात्र भाजपचे काही लोक येत असतील तर त्यांचं स्वागत आहे...महिनाभरात तुम्हाला कळेल भाजपमधून किती लोक येतील...असं वक्तव्य अंबादास दानवेंनी केलंय.
पुण्यात वाहतूक पोलिसांना पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. ही धक्कादायक घटना पुण्यातील बुधवार चौकातील घडलीय. यातून महिला पोलीस थोडक्यात बचावलीय. वाहतूक नियमन करत असताना पोलिसांनी एका वाहन चालकाला थांबवलं. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. यावेळी संजय साळवे या व्यक्तीनं महिला पोलीस आणि कर्मचा-यावर पेट्रोल ओतले. मात्र, लाईटर पेटू न शकल्यानं मोठी दुर्घटना टळली. संजय साळवेविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
मराठा आंदोलक मनोज जरांगे हिंगोली शहरात दाखल झालेयत...जरांगे पाटलांची हिंगोलीत आजपासून मराठा आरक्षण जनजागृती रॅली होतेय...या रॅलीची मराठा समाजाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आलीय...भव्य दिव्य रॅली होणार असल्याने दीड हजार मराठा स्वयंसेवक यासाठी तैनात आहेत...यात तीनशे महिलांचाही समावेश असणार आहे...छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन रॅली निघणार आहे...हिंगोली शहरातील बळसोंड भागातील शिवनेरी चौकात जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करून जरांगे पाटलांचे भव्य स्वागत केलं जाणाराय...रॅलीच्या बंदोबस्तासाठी 55 अधिकारी,450 पोलीस तैनात करण्यात आले असून लातूरवरून 150 कर्मचारी पोलीस बंदोबस्तासाठी मागवण्यात आलेयत...
पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवारांच्या पक्षाला घरघर लागलीय...अजित पवारांचे अनेक माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते शरद पवारांकडे परत येणार असल्याची माहिती अंकुश काकडेंनी दिलीय...राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची 20 जुलैला पिंपरी चिंचवडमध्ये सभा होणार आहे...यासभेमध्ये पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाचे माजी नगरसेवक आणि अनेक पदाधिकारी पक्षप्रवेश करणार आहेत...यावेळी मात्र, अजित पवारांच्या माजी नगरसेवकांना प्रवेश देताना अडचणीच्या काळात साथ देणा-या कार्यकर्त्यांचा विचार केला जाणार आहे...दरम्यान पिंपरी चिंचवडमधील शरद पवारांचे समर्थक माजी महापौर आझम पानसरे यांनी आज शरद पवार यांची पुण्यात भेट घेतली. यावेळी पिंपरी चिंचवडमधील राजकारण आणि नियोजित सभेविषयी चर्चा झाली...
शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकरांना क्लीन चीट दिल्यानंतर संजय राऊत यांनी भाजप सरकारवर टीका केलीय. खोटे गुन्हा दाखल केल्याचं भाजपनं मान्य करावं असे ते म्हणाले आहेत.
कसारा स्टेशनजवळ पंचवटी एक्स्प्रेसची कपलिंग तुटली. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. दरम्यान कपलिंक जोडून गाडी नाशिककडे मार्गस्थ झाली आहे.
मुंबईत मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. मात्र पश्चिम मार्गावरील लोकांना रविवारी दिलासा मिळाला आहे. त्यामुळे रविवारची सुट्टी म्हणून तुम्ही घराबाहेर पडणार असाल तर लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या.
काँग्रेसने विधानसभेसाठी स्वबळाची तयारी सुरू केलीय...288 मतदारसंघासाठी इच्छुकांचे अर्ज मागवण्यात आलेयत...10 ऑगस्टपर्यंत इच्छुकांना अर्ज जमा करावा लागणार आहे...अर्जासोबत 20 हजारांच्या पक्ष निधी देखील जमा करावा असं सांगण्यात आलंय...त्यामुळे काँग्रेसने स्वबळाची तयारी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे...
साता-याच्या फलटणमध्ये दोन गटांत झालेल्या वादाला राजकीय वळण आलंय. याप्रकरणात अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे निंबाळकर यांनी आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी माजी खासदार रणजीत सिंह निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली. तर रणजीत सिंह यांनीही काही व्यक्तींच्या बाजूनं उभ राहून गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.
मुंबईत आज महायुतीचा मेळावा पार पडणारेय. षण्मुखानंद हॉलमध्ये हा मेळावा आयोजित करण्यात आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार आहेत. सरकार योजना आणि त्यांची अंमलबजावणी यावर मार्गदर्शन केलं जाणारेय. या मेळाव्यातूनच विधानसभा निवडणुकीच्या रणशिंग फुंकलं जाणारेय. आमदार, खासदारांसह महायुतीच्या पदाधिका-यांना उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय.
मनोज जरांगेंचा भुजबळांवर गंभीर आरोप केलाय...येवल्याचे भुजबळ खोडसाळ माणूस असून, लोकांना आमिष दाखवून आमच्या रॅलीत काहीतरी गडबड करायला लावतील असा गंभीर आरोप जरांगेंनी केलीय...त्याला जबाबदार भुजबळ आणि सरकार असतील असं जरांगेंनी म्हटलंय...
मनोज जरांगे पाटील यांची 6 जुलै ते 13 जुलै अशी मराठवाड्यात जनजागृती शांतता रॅली होणाराय...हिंगोलीमधून या शांतता रॅलीचा आज श्रीगणेशा होणार असून या रॅलीची मराठा समाजाच्या वतीने जय्यत तयारी सुरू आहे...मागील वीस दिवसापासून मराठा समनव्यक गावा गावात जाऊन या रॅलीची जनजागृती करीत होते...ही भव्य दिव्य रॅली होणार असल्याने दीड हजार मराठा स्वयंसेवक यासाठी तैनात असणार आहेत...यात तीनशे महिलांचा ही समावेश असणार आहे...छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन रॅली निघणार आहे...हिंगोली शहरातील बळसोंड भागातील शिवनेरी चौकात जेसीबीच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करून जरांगे पाटलांचे भव्य स्वागत केलं जाणाराय...रॅलीच्या बंदोबस्तासाठी 55 अधिकारी,450 पोलीस तैनात करण्यात आले असून लातूर वरून 150 कर्मचारी पोलिस बंदोबस्तासाठी मागवण्यात आलेयत...
शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळालाय...कथित जोगेश्वरी भूखंड प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात सी समरी म्हणजेच तपास बंद करण्याचा क्लोजर रिपोर्ट दाखल केलाय...मुंबई मनपाकडून गैरसमजुतीतून आणि चुकीच्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय...
मनोज जरांगे पाटलांची आजपासून मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली सुरू होणाराय...हिंगोलीतून या रॅलीला सुरुवात होईल. रॅलीसाठी अंतरवाली सराटीमधून जरांगे हिंगोलीकडे रवाना झालेयत...सकाळी 11 वाजता हिंगोलीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात होणारेय. पहिल्यांदाच या रॅलीत महिला स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. रॅलीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.