Todays Breaking News Live Updates : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेतलं आहे. या मोहीमनंतर भारत पाकिस्तानमधील वातावरण तणावपूर्ण आहे. भारताचे शेजारी देश चीन आणि तुर्की पाकिस्तानला मदत करणार असल्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेक घडामोडींना वेग आला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलंय. अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र येणार अशी चर्चा रंगली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी पक्ष कामाला लागले आहेत. तर गरमीने हैराण झालेल्या महाराष्ट्रातील जनतेला आनंदाची बातमी आहे. राज्यासह देशविदेशातील घडामोडींचा प्रत्येक क्षेत्रातील बातम्यांचा आढावा क्षणाक्षणाला घ्या एका क्लिकवर...
India Pakistan Tensions : सिंधू पाणी करारबद्दल मोठी अपडेट; भारत सरकारने घेतला मोठा निर्णय#India #bignewshttps://t.co/zUY5CNMwdO
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 16, 2025
'मला आधी आईचे दागिने द्या,' मुलाने आपल्याच आईचा अंत्यविधी रोखला, नंतर थेट चितेवरच झोपला, पाहा VIDEOhttps://t.co/md8YVm3geQ
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 16, 2025
'मी तुरुंगात असताना राज ठाकरेंनी....', संजय राऊतांनी पुस्तकातून जाहीरपणे सांगून टाकलं, 'आमच्यात...'https://t.co/imJuMoHbB3#MNS #RajThackeray #Shivsena #SanjayRaut Narkatla Swarg नरकातला स्वर्ग
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 16, 2025
Operation Sindoor ची माहिती पाकिस्तानला लीक? काँग्रेसच्या प्रश्नाला सरकारने काय उत्तर दिलं?#OperationSindoor #viralvideoシhttps://t.co/QGMB1iFGqT
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 16, 2025
मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून वानखेडे स्टेडियम येथील स्टँडसला ज्येष्ठ नेते शरद पवार, क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि क्रिकेटपटू अजित वाडेकर यांची नावे देण्यात आली. या सोहळ्याच्या वेळी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शरद पवार यांनी काही आठवणी सांगितल्यात. ते म्हणाले की, मी राज्यात क्रीडामंत्री होतो तेव्हा जागा देण्यापासून ते स्टेडियम उभारण्यात अनेकजण सोबत होते. या स्टेडियमला एक इतिहास आहे. काही सहकाऱ्यांचे स्मरण होणे आवश्यक आहे. सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, रवी शास्त्री यांचे योगदान नोंदणीय आहे. काही ठिकाणी या मंडळींची नाव देण्याचा निर्णय झाला, मला आनंद झाला. यशस्वी कॅप्टन रोहित शर्माचे नाव घराघरात पोहोचले, महाराष्ट्राचे हे वैभव घराघरात पोहोचले, याची जाणीव ठेऊन रोहित शर्माचे नाव स्टँडला दिले, त्यासाठी असोसिएशनचे आभार मानतो असंही ते म्हणालेत.
मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून वानखेडे स्टेडियम येथील स्टँडसला ज्येष्ठ नेते शरद पवार, क्रिकेटपटू रोहित शर्मा आणि क्रिकेटपटू अजित वाडेकर यांची नावे देण्यात आली आहेत. तसेच एमसीएच्या लाऊंजला माजी अध्यक्ष दिवंगत अमोल काळे यांचे नाव देण्यात आले असून याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
महाराष्ट्राच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. एकनाथ शिंदेंचा पुन्हा महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होणार आहे. संध्याकाळी मुक्तगिरीवर अनेकांचे पक्षप्रवेश होणार असून एकनाथ शिंदेंचा पुन्हा महाविकास आघाडीला धक्का बसणार आहे.
Pune Crime : महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे. भररस्त्यात 18 वर्षांच्या मुलीला चाकू हल्ला करुन तिची हत्या करण्यात आली.
पुणे - 18 वर्षांची तरुणी अन् 45 वर्षांचा प्रियकर, प्रेमात आकंठ बुडाले पण...; शेवट पाहून पोलीसही हादरलेhttps://t.co/n94d45Bpow#Pune #PuneCrime #Crime #KomalJadhav
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 16, 2025
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी शिवसेना ऍक्टिव्ह मोडवर आलीय. मुंबईतील काल दिवसभरातल्या मॅरेथॉन बैठकांनंतर आज खासदार श्रीकांत शिंदेंनी नवी मुंबईत युवासेना मेळावा आयोजित केलाय. संध्याकाळी पाच वाजता वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात युवासेना मेळाव्याचे आयोजन आहे. आगामी महापालिका निवडणुकासाठी श्रीकांत शिंदे कार्यकर्त्यांना आणि पदाधिका-यांना मार्गदर्शन करणारेत.
वाशिम जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे मनोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतक-यांनी विक्रीसाठी आणलेला शेतमाल वाहून गेला. मोठ्या कष्टानं पिकवलेले भुईमूग डोळया देखत वाहून जाऊ लागला. मोठ्या कष्टानं पिकवलेला भुईमूग वाचवण्यासाठी शेतकरी थेट रस्त्यावर आडवा झाला. जमेल तेवढ्या भुईमूगाच्या शेंगा हा शेतकरी आडवत होता. मनोरा कृषी उत्पन्न बाजारातील या दृश्यांनी सर्वांचेच डोळे पाणावले. निदान ही दृश्य पाहून तरी बळीराजाला शासनाकडून मदत मिळावी ही अपेक्षा.
महाराष्ट्रातील अनेक भागात जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावलीये. जेजुरी, वाशिम, अंबरनाथमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे वाशिममध्ये शेतक-यांचं मोठं नुकसान झालंय. तर अहिल्यानगर, सोलापूर आणि पुण्यातील शिरुरमध्येही पावसाने हजेरी लावलीये. अवकाळी पावसाचा शेतीला फटका बसल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय.
कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांच्या याचिकेवरील आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आलीय. याप्रकरणाची आता सोमवारी सुनावणी होणार आहे. काही कागदपत्रे सादर करायची आहेत अस शाह यांच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टाला सांगितल. त्यामुळे कागदपत्र सादर करण्यासाठी त्यांना तारीख देण्यात आलीय.. त्यामुळे आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आलीय. पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकनंतर कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत विजय शाह यांनी वादग्रस्त विधान केलं होतं . त्यांच्या या विधानाची दखल कोर्टानं घेतली.
Ex Army Man Murder Case : मंगळवारी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपला प्रेमी आणि दोन लोकांच्या मदतीने पत्नीने निवृत्त सैनिकाची हत्या केली. काय आहे हा प्रकार?
Ex Army Man Murder Case : आईने बाबांना मारलं... लेकीने दिलेल्या जबाबामुळे सगळा प्रकार उघडकीस; पत्नीने सेवानिवृत्त सैनिकाची हत्या करुन तुकडे फेकले...https://t.co/Mmk4rj2g8H#WifekilledHusband #Murder #ExArmyManMurderCase
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 16, 2025
Maharashtra Politics : अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात महायुतीला ब्रेक? CM फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले…#Zee24Taas #maharashtra #Pune #politics https://t.co/EkVqBIZAKI
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 16, 2025
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या कारवाईने पाकिस्तानला धक्का बसला आहे. आता पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना शांततेची आठवण झाली आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी भारतासोबत चर्चेचा प्रस्ताव दिला आहे.'
भारताच्या कुटनितीपुढे पाकिस्तानची शरणागती! म्हणजे आता शांतता हवीय... पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचं विधान चर्चेतhttps://t.co/GQqb1FAyyh#PahalgamTerroristAttack #Pakistan #PakistanPM #ShahbazSharif
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 16, 2025
भारतातील 'या' ठिकाणी राहतात उंचीने छोटी लोकं! आहे बुटक्यांसाठीचे पहिले विशेष गावhttps://t.co/ExvFNs6XH7#unique #Village #India #Assam
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 16, 2025
बंगळुरुतील हरे कृष्ण हिल मंदिर इस्कॉन बंगळुरुकडेच. सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल. इस्कॉन मुंबईचे अधिकारही कोर्टाकडून रद्द. सुप्रीम कोर्टाने कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. कनिष्ठ न्यायालयाने इस्कॉन मुंबईचे अधिकार नाकारले होते आणि म्हटले होते की इस्कॉन बंगळुरू ही इस्कॉन मुंबईची शाखा नाही तर एक स्वतंत्र संस्था आहे. जेव्हा हे प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयात पोहोचले तेंव्हा उच्च न्यायालयाने सांगितले की बंगळुरू इस्कॉन मुंबईच्या मालकीचे असेल. न्यायमूर्ती अभय एस ओक आणि न्यायमूर्ती उज्वल भुयान यांच्या पीठाने दिला निकाल.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान गुडघ्यावर आलाय. शस्त्रसंधीनंतर पाकिस्ताननं भारताशी चर्चेची तयारी दर्शवलीय. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी भारताला चर्चेचं निमंत्रण दिलंय.. काश्मीर वाद आणि पाणीवाटपासह द्विपक्षीय मुद्द्यावर व्यापक चर्चेसाठी शरीफ यांनी तयारी दर्शवलीय.. भारतानं याबाबत अद्याप कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही.
पाकिस्तानला मदत म्हणजे दहशतवादाला मदत आहे.. त्यमुळे IMFनं पाकिस्तानला केलेल्या मदतीचा विचार करावा असं राजनाथ सिंह यांनी ठणकावून सांगीतलंय.. भुज मध्ये त्यांनी भारतीय जवानांची भेट घेत ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल आभार व्यक्त केले.. पाकिस्तान मौलाना मसूद अझहला 14 कोटी रुपये देणार असल्याचंही ते म्हणाले.. त्यामुळे ऑपरेशन सिंदूर संपलं नसून हा केवळ ट्रेलर होता.. पिक्चर अजून बाकी आहे असा इशारा त्यांनी पाकिस्तानला दिलाय.
---राजनाथ यांचा गुजरातमधल्या भुजमध्ये 2दिवसांचा दौरा
---भुज एअरबेसला राजनाथ सिंह भेट देणार
---भारतीय सशस्त्र दलाच्या कार्यक्षमतेची पाहणी करणार
----लष्कर अधिका-यांशी राजनाथ सिंह संवाद साधणार
भारताने मार्च २०२५ मध्ये दररोज ५४ लाख बॅरल कच्च्या तेलाची आयात करून नवीन विक्रम केलाय.... २०२५ आणि २०२६ मध्ये भारतातील कच्च्या तेलाची मागणी सर्वात वेगाने वाढण्याची अपेक्षा असून ही मागणी चीनच्या मागणीच्या दुप्पट असेल, असे ओपेकने म्हटलंय... वाढत्या ऊर्जेच्या गरजांमुळे ही मागणी वाढत आहे. मागणीतील ही वाढ २०२५ मध्ये चीनच्या तेलमागणीतील १.५ टक्के आणि २०२६ मध्ये १.२५ टक्के वाढीच्या अंदाजापेक्षा जास्त आहे, असे 'ओपेक'ने म्हटलंय.... भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान भारत सरकारने इंधनाच्या बाबतीत कोणतीही टंचाई निर्माण होणार नाही, अशी ग्वाही दिली होती. त्यालाही याच आयात केलेल्या तेलाच्या विक्रमी साठ्याचा संदर्भ असल्याचं तज्ज्ञांचे मत आहे.
" सीरियस आहे.." दीपिकाच्या आजारपणाविषयी सांगताना पती हतबल; 9 मिनिटांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल...https://t.co/wmJnILZyDS#DipikaKakar #shoaibibrahim #tumor #HealthyLifestyle
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 16, 2025
नायर दंत महाविद्यालयात बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी या पदवी अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची संख्या ६७ वरून ७५ करण्यात आलीय.रुग्णालयात अधिक क्षमतेने सेवा देण्यासाठी पदवी अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याला मान्यता देण्यात आलीय. दंत वैद्यकीय परिषदेने ही मान्यता दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर अंबाजोगाईमध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत स्वतंत्र सैनिक, महिला ,पुरुष, विद्यार्थी मोठया संख्येने सहभागी झाले होते. यावेळी राष्ट्रगीताने तिरंगा रॅलीचा समारोप करण्यात आला.
'ठाकरे बंधूंची युती लांबणीवर पडलेली नाही असा दावा संजय राऊतांनी केलाय.. पडद्यामागे वेगळीच पटकथा लिहिली जाते... ती पटकथा नंतर सर्वांना कळेल... सगळं काही सुरळीत होऊ द्या नंतर बोलू असं ते म्हणालेत... दरम्यान ठाकरे बंधूंची युती कधिही होणार नाही असा दावा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांनी केलाय.
शिवसेना UBTचे खासदार संजय राऊत यांचे नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं उद्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना UBTचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. या पुस्तकांमध्ये संजय राऊत यांनी असे अनेक गौप्यस्फोट केलेत.. यांत त्यांनी शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांच्याबाबत अनेक दावे केलेत.. ईडीच्या अटकेच्या भीतीनं रवींद्र वायकर आणि त्यांचे कुटुंब मातोश्रीवर येऊन रडल्याचा दावा राऊतांनी केलाय.. जेलमध्ये जायचं बळ नाही.. मी मरुन जाईल किंवा मला आत्महत्या करावी लागेल अशी विनवणी वायकरांनी उद्धव ठाकरेंकडे केली असा दावाही राऊतांनी केलाय.. शिवसेनेनं दबाव टाकल्यानं आणि भीतीनं वायकरांनी पक्ष सोडला असा दावा राऊतांनी नरकातला स्वर्ग पुस्तकात केलाय.
शिवसेना-मनसे युतीला ब्रेक? मराठीजनांचे 'ठाकरे पर्वा'चे स्वप्न अधुरेच; पडद्यामागे नक्की घडतंय काय?#Maharashtra https://t.co/YFAWOnjKgP
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 16, 2025
'जेलमध्ये जायचं बळ नाही, मी मरेन... म्हणत वायकर मातोश्रीवर रडले' राऊतांच्या 'नरकातला स्वर्ग' पुस्तकात मोठा दावाhttps://t.co/pT6FanTE8E
खासदार रविंद्र वायकर याच्याबाबत संजय राऊतांनी केले मोठे गौप्यस्फोट. राजकीय वर्तुळात राऊतांच्या पुस्तकाचीच सर्वदूर चर्चा... #news #Maharashtra…— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 16, 2025
- दोन्ही ठाकरेंकडून युतीची बोलणी नाहीच
- राज ठाकरेंना पुन्हा पुढाकार घेण्याचं आवाहन
- संजय राऊतांच्या आवाहनाला केराची टोपली?
- राज ठाकरेंचे मनसैनिकांना कामाला लागण्याचे आदेश
- युतीच्या भरवशावर राहू नका- राज ठाकरे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या निवडणुका येत्या चार महिन्यांत घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यानंतर निवडणूक आयोगानं सरकारला फेर प्रभाग रचना करा असे निर्देश दिलेत. प्रभाग रचना, आरक्षण व मतदार याद्यांचे काम पूर्ण केल्यावर मगच पावसाचा अंदाज घेऊन निवडणुका कधी घ्यायच्या याचा निर्णय घेतला जाणार आहे.
मध्य रेल्वेच्या धिम्या मार्गावरील ठाणे-कळवा स्थानकांदरम्यान बुधवारी रेल्वे रुळावर सिमेंटचा खांब (फाऊलिंग मार्क) ठेवण्यात आला होता, अशी माहिती समोर आली आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घातपात घडविण्याच्या उद्देशाने हा खांब रुळावर ठेवण्यात आल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. कल्याणच्या दिशेने जाणारी धिमी लोकल ठाणे-कळवा रेल्वे स्थानकांदरम्यान गोपाळनगर परिसरात रात्री साडेदहा वाजता आली असता, रेल्वे रुळावर ठेवण्यात आलेल्या सिमेंटच्या पोलला तिची धडक बसली. या घटनेची माहिती गार्डने वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर तेथे पाहणी करण्यात आली. रेल्वेचे अधिकारी, रेल्वे सुरक्षा दल आणि पोलिसांनी पाहणी केली असता, तेथे फाऊलिंग मार्कचा सिमेंट खांब आढळून आला. खांबाचे तुकडे रेल्वे रुळावर पडले होते. घटनेनंतर सात ते आठ मिनिटांनी लोकल कल्याणच्या दिशेने रवाना करण्यात आली. या घटनेत रेल्वेचे नुकसान झाले असून, प्रवासी सुखरूप असल्याची माहिती देण्यात आली. हा सिमेंटचा खांब कोणी ठेवला किंवा रुळावर कसा आला, याचा तपास सुरू असल्याचेही पोलिसांनी सांगितले
पुण्यातील दत्तवाडी परिसरात एका तरुणावर कोयत्याने वार करण्यात आले. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पूर्ववैमस्यातून तिघांकडून हातात कोयता घेत दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात आला ही सर्व घटना सीसीटीव्हीत चित्रित झालीय. दत्तवाडी पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.
नीरज चोप्राने अर्शद नदीमबद्दल केलं धक्कादायक विधान, म्हणाला- 'आम्ही कधीही...'https://t.co/t2ivqKNfM1#NeerajChopra #ArshadNadeem #indiavspakistanwar #SportsNews #Zee24Taas #PahalgamAttack
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 16, 2025
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. सपकाळ मातोश्रीवर जाऊन ठाकरेंची भेट घेणार आहेत.. दोन दिवसांपूर्वीव सपकाळ यांनी शरद पवारांची भेट घेतली होती.. सध्या राज्यात राष्ट्रवादीचं विलीनीकरण आणि ठाकरे बंधू एकत्र येतील अशी चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर मविआ एकसंध ठेवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचं पाहायला मिळतंय..
भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी पहिल्यांदाच तालिबानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी अधिकृत संवाद साधला. हा संवाद ऐतिहासिक ठरलाय.. कारण भारताने तालिबान प्रशासनाशी केलेला हा पहिला मंत्रीस्तरीय संपर्क आहे.. जो बदलत्या भू-राजनैतिक परिस्थितीचे स्पष्ट संकेत देतो.
'ही' आहे खरी इन्साईड स्टोरी! निवृत्तीपूर्वी कोहलीने केली होती रवी शास्त्रींशी चर्चा, मोठा खुलासाhttps://t.co/vddM8YZPo3#ViratKohliretirement #ViratKohli #RaviShastri
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 16, 2025
आज सकाळी 11 वाजता म्हाडाकडून जनता दरबाराचं आयोजन करण्यात आलय. नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी मुख्य अधिकारी रेवती गायकर यांच्या अध्यक्षतेखाली दरबार पार पडणार आहे.
-दिल्लीत मुंडका परिसरात भीषण आग
-केमीकलच्या गोदामाला भीषण आग
-अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल
-आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थिचे प्रयत्न
तुर्कीए भूकंपाने हादरलं आहे. तुर्कस्तानमध्ये 5.2 रिस्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. तुर्कीएची जमीन पुन्हा एकदा हादरली आहे. तुर्कस्तान वारंवार भूकपाने हादरत आहे. तुर्कस्थानमध्ये कधी सौम्य तर कधी प्रचंड तीव्रतेचे भूकप यापूर्वी देखील आले आहेत. काही भूकंपांची तीव्रता एवढी प्रचंड होती की, त्यामुळे तुर्कस्तानचं जनजीवन विस्कळीत झालं.
-भारत-पाक शस्त्रसंधीवरून डोनाल्ड ट्रम्प यांनी घुमजाव केलाय.
--भारत-पाक तणावात मध्यस्थी नाही- ट्रम्प
-- भारत-पाकिस्तानमधील तणाव निवळण्यासाठी केवळ मदत केली
--अमेरिकेच्या डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य
भारताने तुर्कीएला मोठा दणका दिलाय. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ड्रॅगन पासची सेवा स्थगित करण्यात आलीये.. ड्रॅगन पास ही तुर्कीएची कंपनी आहे... पाकिस्तानला तुर्कीएने मदत केल्याप्रकरणी भारताने तुर्कीएविरुद्ध ही मोठी कारवाई केलीय.
भारत-पाकिस्तान यांच्यात 18 मेपर्यंत शस्त्रसंधी करण्यावर एकमत झालंय. असं वक्तव्य पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी केलंय.
भारत पाकिस्तान यांच्यात लष्करी पातळीवर चर्चा झाल्यानंतर सीमेवरील तणाव निवळला. दोन्ही देशात शस्त्रसंधी करण्यावर सहमती झाली. अशी माहिती इशाक दार यांनी पाकिस्तानच्या संसदेत दिली.
"...सिंधू पाणी करार स्थगित आहे आणि पाकिस्तानकडून होणारा सीमेपलीकडून होणारा दहशतवाद थांबेपर्यंत स्थगित राहील... काश्मीरवर चर्चा करायची असलेली एकमेव गोष्ट म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमधील बेकायदेशीरपणे व्यापलेल्या भारतीय भूभाग रिकामी करणे; आम्ही त्या चर्चेसाठी खुले आहोत," असे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणतात.
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था म्हणजेच IAEA ने पाकिस्तानच्या आण्विक सुविधांवर निरीक्षण प्रणाली लागू करण्याची मागणी संरक्षणमत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे. पाकिस्तानकडून नुकतीच आण्विक हल्ल्याची धमकी दिल्याकडेही राजनाथ सिंह यांनी लक्ष वेधलंय.
दक्षिण-पश्चिम मॉन्सून 2025 ने आज दक्षिण-पूर्व अरबी समुद्र,दक्षिण बंगालच्या उपसागर,अंदमान बेटे आणि अंदमान समुद्राचा काही भाग व्यापला आहे. या भागांमध्ये मॉन्सून नेहमीच्या आगमनाच्या तुलनेत 7 दिवस आधी पोहोचला आहे. हवामान विभागाच्या (IMD) विस्तारित कालावधीच्या अंदाजानुसार दुसऱ्या आठवड्यात मान्सूनच्या प्रवाहाची गती जलद राहण्याची शक्यता आहे. ज्यामुळे 27 मे रोजी केरळमध्ये (आणि कदाचित ईशान्य भारतातही) मान्सूनचे आगमन होण्याची शक्यता आहे. मेच्या अखेरीस मान्सून गोवा,दक्षिण महाराष्ट्र (गंगेच्या पश्चिम बंगाल) पर्यंत पोहोचू शकतो. सध्या महाराष्ट्र मुंबई, पुणे सहित मध्य प्रदेश,दक्षिण भारत आणि पूर्व भारतात पूर्व-मान्सून पाऊस, विजांसह आणि गडगडाटासह सुरू राहण्याची शक्यता वर्तविण्यात आला आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज, शुक्रवार, 16 मे 2025 रोजी गुजरातमधील भुज एयरबेसला भेट देणार आहेत. 16-17 मे या दोन दिवसांच्या दौऱ्यात ते तिथे तैनात भारतीय सशस्त्र दलांच्या कार्यक्षमतेची पाहणी करणार आहेत. त्यासोबतच लष्करी अधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.