Maharashtra Breaking News Today LIVE Updates: महाराष्ट्रात एकीकडे पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्याना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा धोका वाढला आहे. देशभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. यासह पुण्यातील वैष्णवी मृत्यू प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहेत. जाणून घ्या राज्यासह, देश-विदेशातील दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी एका क्लिकवर.
आषाढी वारीनिमित्त वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येईल, तसेच त्यांना दरवर्षीप्रमाणे यावर्षीही वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतील असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. आषाढी वारीनिमित्त केलेल्या उपाययोजना आणि वारकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक पार पडली होती. त्याविषयीची अधिक माहिती प्रसार माध्यमांना आज देतांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे वारी मार्ग कुठेही खराब झाला असल्यास मुरूम, खडी आणि डांबरीकरण करून त्याची तातडीने डागडुजी करावी, वारकऱ्यांना मुबलक पाणी, विजेची जोडणी, पालखी तळावर वॉटरप्रूफ तंबू उपलब्ध करून घ्यावे तसेच वारीसाठी जाणाऱ्या गाड्यांना दरवर्षीप्रमाणे टोल मध्ये सवलत दिली जाईल असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
गतवर्षीप्रमाणे याहीवर्षी आषाढी वारीनिमित्त राज्याच्या आरोग्य विभागाकडून भव्य आरोग्य शिबिरे आयोजित केली जातील, वारकऱ्यांसाठी कार्डीएक रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून दिली जाईल, पंढरपुरात तात्पुरती आयसीयू सुविधा उपलब्ध करून दिली जाईल, या सर्व सोयी उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी स्वतः पंढरपूरला जाऊन आढावा घ्यावा असे निर्देश शिंदे यांनी यावेळी त्याना दिले. तसेच प्रत्येक जिल्ह्यातून निघणाऱ्या मोठ्या दिड्यांना वारीच्या काळात पूर्णवेळ सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यासोबतच गतवर्षी वारीदरम्यान झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वारकऱ्यांना शासनाद्वारे मदत केली जाईल, पोलिसांशी व्यवस्थित समन्वय व्हावा यासाठी नोडल ऑफिसर नेमण्यात येईल. वारकऱ्यांचे भोजन आणि इतर प्रथा परंपरा वेळच्या वेळी पार पाडाव्यात यासाठी वारी कुठे जास्त वेळ खोळंबणार नाही यासाठी प्रयत्न केला जाईल, यंदाची वारीही स्वच्छ वारी, निर्मल वारी हरित वारी म्हणून आपल्याला पार पाडायची असल्याने त्यासाठी लागेल ते सर्व सहकार्य शासनाकडून केले जाईल असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
हृतिक रोशनची साऊथ सिनेमात एन्ट्री! निर्मात्यांनी केली घोषणा, लवकरच 'या' चित्रपटात दिसणार#HrithikRoshan #KGF3 https://t.co/vUXRVs5USK
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 29, 2025
Vaishnavi Hagawane Death: '...तर मी जाळून टाकेन, शशांक हगवणेने दिली होती धमकी', वैष्णवीच्या वडिलांनी केला धक्कादायक खुलासाhttps://t.co/n5PJu0imab#VaishnaviHagawane #RajendraHagawane #Pune #Maharashtra वैष्णवी हगवणे
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 29, 2025
कॅनडा-अमेरिका सीमेवर बर्फात गोठून मृत पावलेल्या भारतीय कुटुंबाबद्दल धक्कादायक खुलासा; -37.8 तापमानात कुटुंब...https://t.co/r9CYj2pfTz
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 29, 2025
वैष्णवी मृत्यूप्रकरणी सरकारी वकील म्हणून आर आर कावेडिया यांची नियुक्ती. कस्पटे कुटुंबीयांनी राज्य सरकारकडे तशी मागणी केली होती.
हगवणेंच्या बैलाच्या वाढदिवसाला नाचणाऱ्या गौतमी पाटीलने अखेर केलं भाष्य, म्हणाली 'मी आवर्जून वैष्णवीच्या...'https://t.co/Xc6mSYtWeM#Vaishnavi #VaishnaviHagawane #VaishnaviHagwane #वैष्णवी_हगवणे Gautami Patil #GautamiPatil #RajendraHagawane
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 29, 2025
हेरगिरीच्या संशयावरुन मुंबईतून तिघांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवत असल्याचा त्यांच्यावर संशय आहे. दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच ATSनं मुंबईत धडक कारवाई केली आहे.
शशांक हगवणे याने जेसीबी व्यवहार प्रकरणी 11 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रशांत येळवंडे यांचा आरोप. महाळुंगे चाकण इथं गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 25 लाख रुपयात जेसीबी खरेदी ठरली. त्यानुसार प्रशांत एलवंडे यांनी सुरुवातीला 5 लाख रुपये शशांक याला दिले. बँकेचे हफ्ते भरण्यासाठी दरमहा 50 हजार रुपये शशांकला देत होता. शशांक ने हफ्ता भरला नसल्याने बँकेने जेसीबी जप्त केला. शशांक हा जेसीबी सोडवून आणला मात्र प्रशांत यांनी दिलेले पैसे परत केले नाहीत. ही रक्कम 11 लाख 70 हजार रुपये होती. बंदुकीचा धाक दाखवून धमकावल्याचा आरोप ही प्रशांत एळवंडे यांनी केला आहे.
रवींद्र जडेजाला CSK च्या कर्णधारपदावरून का हटवण्यात आलं होतं? 3 वर्षांनी जडेजाने केला खुलासा#RavindraJadeja #csk #MarathiNews #ipl2025 #Msdhoni https://t.co/4d8eRRXD0G
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 29, 2025
लाडक्या बहिणीसाठी आदिवासी विभागाचा निधी वळवला? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'पैशांची तरतूद...'#maharashtra #DevendraFadnavishttps://t.co/h1rkvTIiF4
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 29, 2025
पुण्यातील बावधन पोलीस लता हगवणे, करिष्मा हगवणे आणि शशांक हगवणे यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आलं आहे. या तिघांना वाढीव पोलीस कोठडी मिळते की न्यायालयीन कोठडी दिली जाते याकडे लक्ष लागलं होतो. वैश्नवी हगवणे प्रकरणात शशांक, लता आणि करिष्मा या तिन्ही आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. वैष्णवी मृत्यू प्रकरणी संपूर्ण हगवणे कुटुंब सध्या कोठडीची हवा खात आहे.
हगवणे यांच्या गाड्या कोणाच्या नावावर आहेत हे दाखवणारी कागद पत्रे अनिल कस्पटे यांनी दाखवली. मुलीचा छळ करून फॉर्च्युनर गाडी घेतली. गाडी न दिल्यास लग्न करणार नसल्याचं हगवणे कुटुंबीयांनी म्हटलंय. एमजी हेक्टर गाडी बुक केली होती. पण त्यांनी ती गाडी घेण्यास नकार दिला आणि फॉर्च्युनर गाडीवरच अडून बसल्याचा आरोप अनिल कस्पटेंनी केलाय... हगवणे कुटुंबीयांकडे दुसरी कोणतीही गाडी नसल्याचा दावाही कस्पटेंनी केला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीनीकरणावरुन मतभेद निर्माण झाल्याची माहिती मिळतेय. राष्ट्रवादी (SP)ला सोबत घेण्यास पक्षातील दोन वरिष्ठ नेत्यांचा विरोध असल्याची माहिती मिळतेय. पक्षात दोन सत्तास्थानं नको अशी पक्षातील दोन वरिष्ठ नेत्यांची भूमिका आहे.
अर्थसंकल्पात आदिवासी विभागासाठी राखीव निधी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
वडिलांसोबत भाजी खरेदी करण्यास गेलेल्या 19 वर्षांच्या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. 4 जणांच्या टोळक्याने चाकूने वार करत ही हत्या केली. पैशांची मागणी केली असता पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपीने तरुणाच्या पोटात चाकू मारला. यात तो गंभीर जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आलं.
देशात आणि राज्यात सत्ताधारी छत्रपती शिवाजी महाराजांचे गोडवे गातात. शिवरायांच्या नावानं राज्य करु असंही नेतेमंडळी सांगतात. मात्र, नव्या पीढीला छत्रपती शिवराय कळणार कसे? असा सवाल उपस्थित होतोय. कारण सीबीएसई बोर्डाचा कद्रूपणा समोर आलाय. सीबीएसईच्या अभ्यासक्रमात एक धडा आणि 68 शब्दांत शिवरायांचा इतिहास सांगण्यात आलाय आहे. एक धडा आणि 68 शब्दांत नव्या पीढीला छत्रपती शिवराय कळणार कसे? शिवरायांचा प्रेरणादायी इतिहास नव्या पीढीला कळणार कसा असा सवाल उपस्थित होतोय. याच प्रकारावरुन मराठा संघटना आक्रमक झाल्यात. पुण्यातील मराठा संघटना पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहेत.
इराणमध्ये 3 भारतीय तरुणांचं अपहरण झाल्याची माहिती समोर आली असून पाकिस्तानने अपहरण केल्याचं त्यात म्हटलं आहे. कुटुंबीयांकडे कोट्यवधी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. तर ते तिघे तरुण कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी निघाले होते.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सर्वात मोठी बातमी. पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीर हाच या पहलगाम हल्ल्याचा खरा सूत्रधार होता. या हल्ल्यामागे केवळ पाकिस्तानी लष्करप्रमुखच नव्हे, तर पाकिस्तानी लष्कराचे 4-5 उच्च अधिकारीही सहभागी होते. हा खळबळजनक गौप्यस्फोट पाकिस्तानी लष्करात काम केलेल्या एका अधिकाऱ्याने केला आहे. आदिल राजा असं या अधिका-याचं नाव आहे. पाकिस्तानी लष्कराचे माजी मेजर आदिल राजा यांनी पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांना कसे पाठिंबा देते आणि पाकिस्तानात बसलेल्या त्यांच्या हँडलर्सद्वारे भारतात हल्ले खडून आणतात, हे सांगत पाकिस्तानचा बुरखा फाडलाय.
CBSE चा कद्रूपणा! पहिली ते बारावीत शिवरायांवर 68 शब्दांचा फक्त एक धडा; नव्या पिढीला महाराज कळणार कसे? https://t.co/5xcRy9rwQS
सव्वादोन हजार पानांच्या पुस्तकात मराठ्यांच्या इतिहासाला फक्त दोन पानांचंच महत्त्वं देत तो अक्षरशः गुंडाळून टाकण्यात आला आहे.#news #education…— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 29, 2025
विध्वंसापासून जग किती दूर? एकाच वेळी येणार पूर, दुष्काळ, चक्रीवादळं.... चिंताजनक आकडेवारी समोर https://t.co/QqzQVal4aB
हे जग नेमकं कोणत्या दिशेनं जात आहे? प्रगतीच्या की विनाशाच्या? पृथ्वीवर मिळच आहेत विध्वंसाचे संकेत... आताच्या क्षणाची मोठी बातमी #news #earth #latestupdate…— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 29, 2025
बदलीसाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील 21 शिक्षकांची आता विभागीय चौकशी होणार आहे. या चौकशीत दोषी शिक्षकांच्या विरोधात दोष निश्चिती करण्यात येणार आहे. यानंतर बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या शिक्षकांवर थेट कारवाई होणार आहे. धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी विभागीय चौकशीचे पत्र काढले आहे. आजपासून या शिक्षकांची धाराशिव जिल्ह्यातील गटशिक्षण अधिकाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष चौकशी होणार आहे. झी 24 तासने या प्रकरणाचा भांडाफोड केला होता, त्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने अखेर या शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारला.
'ती' एक बातमी आली अन् सोनं झालं स्वस्त! भारतात 24 कॅरेट सोन्याचे दर किती? वाचा आजचे भावhttps://t.co/ut7nH4TBNu
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 29, 2025
छत्तीसगड राज्यात नक्षलवाद्यांचा मोठा प्रभाव आहे. यासह देशातील आणखी काही राज्यांत नक्षलवाद्यांचं नेटवर्क आहे. हे नेटवर्क उद्धवस्त करून देश नक्षलमुक्त करण्याचं उद्दीष्ट केंद्र सरकारनं ठेवलं. या दिशेने काम करत असताना केंद्र सरकारला मोठं यश मिळालं आहे. छत्तीसगडमधील बस्तर जिल्हा नक्षलवाद मुक्त झाला आहे. लेफ्ट विंग इक्स्ट्रिमिझम (LWF) यादीतून बस्तर जिल्ह्याचं नाव हटवण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर आता अधिकृतपणे बस्तर जिल्हा नक्षलवाद मुक्त घोषित करण्यात आला आहे. छत्तीसगड राज्य आणि वर्षानुवर्षे नक्षल्यांचा उत्पात सहन करणाऱ्या बस्तरसाठी ही घटना मोठा दिलासा देणारी ठरली आहे. मागील काही वर्षांत सुरक्षा दल, राज्य सरकार आणि स्थानिक नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे बस्तरमध्ये शांतता नांदू लागली आहे. या ठिकाणी सरकारने विकासकामांचा वेग वाढवला होता. रस्ते निर्माण, शिक्षण, आरोग्य सेवांची उपलब्धता तसेच प्रशासनाची गतिमानता या काही गोष्टींमुळे बस्तरमधून नक्षलवाद्यांचं उच्चाटन होण्यास मदत झाली.
Mumbai Accident News: कारच्या बोनेटवरून तरुणाला फरफटत नेले असल्याची घटना मुंबईत घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
कॅब चालकांमध्ये मुंबई Airport वर राडा; थोड्याच वेळात सुसाट Eritga च्या बोनेटवर...; Video Viralhttps://t.co/c0o0n8uSbr
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 29, 2025
अरे देवा! मोसमी वारे दडी मारणार? 6 जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट असतानाच हवामानात का होणार इतका मोठा बदल? https://t.co/QW8hfkblZQ
मराठवाड्यापर्यंत पोहोचला मान्सून, पाऊस येणार, पाऊस जाणार आणि एकाएकी मान्सून म्हणे दडी मारणार.... असं नेमकं का? जाणून घ्या सविस्तर वृत्त... #news…— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 29, 2025
पुणे महानगरपालिका स्लीपर मशीन द्वारे रस्ते झाडणार, 43 कोटीच्या निवेदला मान्यता. महात्मा फुले वाडा आणि भिडे वाडा स्मारक एकीकरणासाठी बाधित घरांचे सर्वेक्षण सुरू सरकार बाधितांना योग्य मोबदला देणार. नवीन बस मार्गासाठी पीएमपी ने प्रवाशांकडून मागवला अभिप्राय दोन हजार पेक्षा जास्त प्रवाशांनी केल्या ऑनलाइन सूचना. पावसामध्ये झाडाच्या फांद्या पडून पुण्यात दोन बळी, किती बळी गेल्यावर फांद्या तोडणार पुणेकरांचा पालिकेला प्रश्न. नाल्यावरील अतिक्रमणामुळे उंड्रीत पूरस्थितीचा धोका पालिकेने अतिक्रमण काढून घ्यावे नागरिकांची मागणी. पालखी मार्गावरील स्वागत मंडपाचा अडथळा दूर करा मुख्यमंत्र्यांचे आदेश पालखी सोहळा प्रमुखांनी स्वागत मंडप काढून टाकण्याची केली होती विनंती.
'माझं 72 तासाचं मुख्यमंत्रिपद...', 'त्या' एका चुकीमुळे फडणवीसांना आठवला पहाटेचा शपथविधीhttps://t.co/lyMkQ5HMp5 < येथे वाचा सविस्तर वृत्त...#Maharashtra #DevendarFadnavis #Mumbai
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 29, 2025
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.