Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्राच्या राजकारमात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्यात भेट होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होणार आहे. तर, इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये बैठकांचे सत्र पाहायला मिळत आहे. भाजप युवा मोर्चाची आणि सोशल मीडियाची बैठक होणार आहे. नांदेडचे 10 पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले आहेत. सचिन पत्तेवार या नांदेडच्या युवकाने उतराखंड मधील परिस्थिती बाबत माहिती दिली. उत्तरकाशी प्रशासन हाय अलर्टवर आहे.
महानगर पालिकेच्या निवडणुका 2026 मध्ये ?
जानेवरी किंवा फेब्रुवारी महिन्यात महानगर पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका नोव्हेंबर महिन्यानंतर होण्याची शक्यता आहे. दोन किंवा तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका करण्याचा सरकारचा मानस असल्याची सूत्रांची माहिती आहे.
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर सत्र न्यायालयाने बुधवारी एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. 2024 मध्ये शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे हे नागपूरमध्ये असताना हर्षवर्धन जाधव त्यांना भेटण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी त्यांना अडवले. यामुळे संतापलेल्या जाधव यांनी पोलिसांसोबत वाद घातला होता. या घटनेनंतर त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खालिद का शिवाजी चित्रपटा संदर्भात राज्य सरकारचे केंद्र सरकारला पत्र.राज्य सरकारकडून पुनर्परीक्षणाची विनंती
नवी मुंबईतील घणसोली येथे हिट अँड रन प्रकरण. घणसोली येथे एका पोलीसाने दारूच्या नशेत दुचाकीला धडक दिली. धडक देऊन वाहन चालकाने मदतीसाठी न थांबता पळ काढला. स्थानिकांनी पळून जाणाऱ्या वाहन चालकाला गाठले. वाहनावर पोलीस लिहिलेली पाटी आणि गाडीत दारूची बॉटल सापडली आहे. गाडी मध्ये मुंबई पोलीस दलातील कर्मचारी असल्याची प्राथमिक माहिती. रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु.
पुणे महापालिकेत मनसेचं आंदोलन; मनसे पदाधिकारी आक्रमक
पालिका आयुक्तांच्या बंगल्यात वस्तू गायब झाल्याचा आरोप मनसैनिकांनी केला आहे. याबाबत तक्रार देण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते निवेदन द्यायला गेले असता मनपा आयुक्त आणि मनसैनिकांमध्ये बाचाबाची झाल्याचं समोर आले आहे.
कुर्ला स्टेशवर तरुणाची आत्महत्या
कुर्ला हार्बर मार्गावरील डाऊन दिशेला पनवेल कडे जाणाऱ्या लोकल समोर युवकाची उडी मारून आत्महत्या केली आहे.
उत्तराखंड महाप्रलयात आंबेगाव तालुक्यातील 24 जण अडकले
अवसरी खुर्द येथील भैरवनाथ विद्यालयातील सन 1990 च्या इयत्ता दहावी बॅचच्या 24 वर्गमित्र व मैत्रिणींचा ग्रुप तीर्थयात्राठी आणि फिरण्यासाठी उत्तराखंड येथे गेला होता. उत्तराखंड येथील घटना घडण्यापूर्वी यातील काही लोकांनी "आम्ही गंगोत्री कडे निघालो आहोत" असा स्टेटस ठेवला होता. मात्र हाच त्यांच्याकडून मिळालेला शेवटचा संदेश असून त्यानंतर त्यांच्याकडून कोणताही संदेश मिळालेला नाही व त्यांना कोणताही संपर्क झाला नाही व होतही होत नाहीये. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय व मित्र मंडळी काळजीत पडले असून महाराष्ट्र सरकारने यात पुढाकार घ्यावा व आमच्या माणसांना सुखरूप घरी आणावे अशी मागणी केली आहे
उत्तराखंड राज्यातील उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली परिसरात मुसळधार पाऊस व ढगफुटी झाली. या घटनेमुळे खीरगंगा नदीला मोठा पूर आला व अनेक घरांचे नुकसान झाले आहे. दरम्यान उत्तराखंडमध्ये महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पर्यटक उत्तरकाशीमध्ये अडकले होते. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील ११ व इतर जिल्ह्यांतील ४० अशा ५१ पर्यटकांचा समावेश असून हे सर्व पर्यटक सुखरूप असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज विविध विषयांवर चर्चा केली आणि यामध्ये कोल्हापूरच्या माधुरी हत्तीच्या संदर्भातील मुद्द्यालाही विशेष महत्त्व देण्यात आलं. शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने, कोल्हापूरचे खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत, माधुरीला परत आणण्याच्या मागणीसाठी अमित शहा यांची भेट घेतली.
हिल्या आणि दुसऱ्या वर्गाच्या इंग्रजीच्या पुस्तकात एकच कविता. ‘बर्ड्स कॅन फ्लाय’ ही एकच कविता दोन्ही वर्गात असल्याने पालकांना संभ्रम. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या पुस्तकात घोळ ? पहिल्या वर्गात पान क्रमांक 28, तर दुसरीच्या पान नंबर 16 वर तिच कविता.
कोकण रेल्वेचा मोठा निर्णय! 'कार ऑन ट्रेन' सेवा आता सिंधुदुर्गातील 'या' स्थानकातही थांबणारhttps://t.co/4emuI5M8jP
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 6, 2025
Kabootar Khana History : वाद, समाज आणि कबुतर... काय आहे मुंबईतील कबुतरखान्यांचा इतिहास? https://t.co/RLkuwBscjn
कोणी केली कबुतरखान्यांची सुरुवात, काय आहे कबुतरखान्यांचा वाद? जाणून घ्या A to Z माहिती एका क्लिकवर... #news #dadar #KabootarKhana #Mumbai— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 6, 2025
एकनाथ शिंदे थोड्याच वेळात घेणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट. उपमुख्यमंत्री शिंदे केंद्रीय गृहमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना. आज दुपारी 1 च्या दरम्यान भेटीची वेळ ठरल्याची माहिती. संसदेच्या कार्यालयात होणार भेट. 4 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट होण्याची शक्यता.
'मला येथून काढा, मी अडकलोय,' पालघरमधील तरुणाची युरोपमध्ये नेऊन फसवणूक; मदतीसाठी व्हिडीओद्वारे याचनाhttps://t.co/1GsJ15KYXv
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 6, 2025
Ganeshotsav: सहा फुटांपेक्षा कमी उंचीच्या POP मूर्तीसंदर्भात मोठा निर्णय; कृत्रिम तलावातच होणार विसर्जनhttps://t.co/yH0SkcAJAU#ganeshchaturthi2025 #ganeshotsav #GaneshChaturthi #गणेशचतुर्थी #गणेशोत्सव
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 6, 2025
भाजपाची माजी प्रवक्ता न्यायाधीश होणार? रोहित पवारांचा आक्षेप, 'उद्या आमची केस यांच्याकडे गेली तर...', भाजपाने काढला इतिहासhttps://t.co/nGZ6bkn3kO#RohitPawar #AartiSathe @RRPSpeaks
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 6, 2025
जैन समाजाने दादरमधील कबुतरखाना पुन्हा सुरु केल्यानंतर राज्य सरकारकडून पहिली प्रतिक्रिया; म्हणाले 'चुकीचं झालं, पण...'https://t.co/TX1eE0nu3q#KabutarKhana #Dadar #JainMath Dadar Kabutar Khana
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 6, 2025
'हा जो काही प्रकार घडला तो चुकीचा घडला, खुद्द मुख्यमंत्र्यांनी बैठक घेत सर्वांची बाजू ऐकून त्यानुसार निर्देश दिले होते. घडलेली घटना चुकीची असून ज्यांनी हे काही केलं मी त्यांची भेट घेणार. नागरिकांना कायदा हाती न घेण्याचं आवाहन. शांतता राखा', असं आवाहन मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दादर कबुतरखाना येथून केलं.
विधानसभा निवडणुकीपूर्वी बाबाजानी अजित पावरांकडून शरद पवारांकडे आले होते,आता शरद पवारांच्या पक्षात आहेत,पण त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीने विधानसभेचे तिकीट न दिल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. तेव्हापासून ते शरद पवारांच्या पक्षावर नाराज होते, आता बाबाजानी कॉंग्रेसमध्ये जाणार आहेत.
बीडच्या जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागाला आग लागली. आगीनंतर रुग्ण आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. अपघात विभागात शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याचे निदर्शनास आले आहे. कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली आहे. कर्मचाऱ्यांनी सतर्कता बाळगल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. आग लागल्याचे समजताच रुग्णालयातील नातेवाईकांची मोठी धावपळ उडाली. यावेळी सर्व रुग्णांना बाहेर काढून नातेवाईकांना देखील रुग्णालयाच्या बाहेर काढण्यात आले. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बीड दौरा आहे. यापूर्वीच ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान रुग्णालयाचे काम पुन्हा पूर्ववत सुरू झाले आहे.
मुंबई बंद!.... शेतकऱ्यांसाठी मनसे रस्त्यावर उतरणार? राज ठाकरेंच्या भेटीनंतर काय म्हणाले बच्चू कडू? https://t.co/gwU0fHhO3N
शेतकऱ्यांसाठी मुंबई बंद होणार? बळीराजाला हवीय देशाच्या आर्थिक राजधानीची साथ...#news #politicalnews #rajThackeray #bacchukadu #farmers— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 6, 2025
दादरमधील कबुतरखाना येथे जैन समाजाचा राडा, ताडपत्री फाडले, बांबूही कापले; पोलिसांसोबत हुज्जतhttps://t.co/qoDZiUEMEo#KabutarKhana #Dadar #Jain
— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 6, 2025
कबुतरखाने हटवण्याच्या मुद्द्यावरून दादर येथील कबुतरखाना परिसरात जैन समाजानं गर्दी करत यावेळी एकच तणावाची परिस्थिती पाहायला मिळाली. जिथं समाजाच्या अनेक नागरिकांनी कबुतरखान्यावरील ताडपत्री फाडून, बांबू तोडत तिथं प्रवेश केला आणि कबुतरखान्यात तोडफोड केली.
आरती साठेंची नेमणूक न्यायव्यवस्थेचं दुर्दैव. एखादा प्रवक्ता पक्षाच्या विचारांना बांधील असतो, संजय राऊत स्पष्टच बोलले.
शेतकऱ्यांचे प्रश्न आणि इतर मुद्द्यांवरील चर्चेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीसाठी बच्चू कडू शिवतीर्थावर दाखल.
भाजपचा प्रवक्ता असलेला व्यक्ती न्यायाधीशदी, आरती साठेंची न्यायाधीशपदी नियुक्ती नको, रोहित पवारांचं स्पष्ट वक्तव्य. निवडणूक आयोग म्हणजे सरकारची नियुक्ती. साठेंची नियुक्ती न्यायाधीश म्हणून झाली, तर न्ययाव्यवस्था अर्थात लोकशाहीच्या या स्तंभावरच नागरिकांना संशय व्यक्त होईल. सरकार आणि सरन्यायाधीशांनी हे नाव वगळावं अशी आम्ही विनंती करतो.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दरवेळी शासनाला वेठीस धरणाऱ्या मनोज जरांगेचे सरकार लाड का पुरवतंय? असा परखड सवाल ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी उपस्थित केलाय...पंतप्रधान, मुख्यमंञ्यांना प्रेस घेऊन अपशब्द वापरणाऱ्या जरांगेवर तात्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणीही ससाणे यांनी केलीय...अंतरवालीचे सलाईनयोद्घे असलेले मनोज जरांगे हा काय सुपर सीएम आहे का? असा सवालही ओबीसी उपोषणकर्ते अँड मंगेश ससाणे यांनी उपस्थित केलाय.
सांगलीच्या विटा पोलिसांच्याकडून एका वकीलावर करण्यात आलेल्या कारवाईचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. वकील विशाल कुंभार यांना सात ते आठ पोलिसांनी अक्षरशः त्यांच्या घराच्या दारातून उचल बांगडी करत पोलीस गाडीत नेऊन टाकल्याचा हा व्हिडीओ समोर आला आहे.व्हिडीओ मध्ये अधिकारी आणि कर्मचारी हे रात्रीच्या सुमारास कुंभार यांच्या घराच्या परिसरामध्ये थांबले होते, त्या वेळी कुंभार यांच्याकडून मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्डिंग सुरू करण्यात आले,यातून एक महिला पोलीस अधिकारी आणि वकील कुंभार यांच्यामध्ये वादावाद निर्माण झाली. यानंतर पोलिसांनी अक्षरशः कुंभार यांना एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे उच्चल बांगडी करत पोलीस गाडीत टाकून पोलीस ठाण्यात नेले.दरम्यान कुंभार यांच्याबाबत घडलेल्या घटने प्रकरणी विटा वकील संघटनांच्याकडून निषेध व्यक्त करत विटा ठाण्यावर मोर्चा, काढत संबंधीत अधिकऱ्यांवर कारवाईची मागणी देखील केली आहे. आता या सर्व घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर तो व्हायरल देखील होत आहे.
Uttarakhand cloudburst : उत्तराखंडमध्ये निसर्ग कोपला! महाराष्ट्रातील पर्यटक अडकले, जीव वाचवण्यासाठी 25 किमी पायपीट... https://t.co/156Fdjjzjp
महाराष्ट्रातील पर्यटक उत्तराखंडमध्ये अडकले... आता नेमकं काय करावं? तुमच्या ओळखीतील कोणी तिथं नाही ना? घटनास्थळी सध्या नेमकं काय चित्र?…— ZEE २४ तास (@zee24taasnews) August 6, 2025
दहीहंडी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियमित सुरक्षेच्या दृष्टीने मुंबईत ड्रोन, रिमोट कंट्रोल, मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर्स, पॅरामोटर्स, हँडग्लायडर्स, हॉट एअर बलून यांच्या उड्डाणांना बंदी कायम ठेवण्यात आली. 6 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरदरम्यान हे बंदी आदेश लागू राहणार आहे. अतिरेकी, देशविरोधी विघातक शक्ती मुंबईवर हल्ला करण्यासाठी या साधनांचा वापर करण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी शहरातील हे आदेश जारी केले आहेत. यातून पोलिसांकडून हवाई पाळत ठेवणे किंवा पोलिस उपआयुक्त अभियान यांच्या लेखी परवानगीने करण्यात येणाऱ्या कारवाईंना सूट देण्यात आली आहे. सर्वांनी या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन अभियान विभागाचे पोलिस उपायुक्त अकबर पठाण यांनी केले.
डोळ्यांची शस्त्रक्रियेतील हलगर्जी केल्याने पाच जणांची दृष्टी गेल्याचा ठपका ठेऊन डॉक्टर पितापुत्रावर वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिसेंबमध्ये त्यांनी वाशीतील एका खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रिया केल्या होत्या. मात्र, त्यानंतर संसर्ग झाल्याने संबंधितांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक विभागाच्या अहवालावरून हा गुन्हा दाखल केला आहे. वाशी येथील पंडित आय सर्जरी अँड लेजर हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. डिसेंबर 2024 मध्ये त्याठिकाणी शहराच्या विविध भागातील काही व्यक्तींनी डोळ्यांशी संबंधित आजारावर उपचार घेतले होते. त्यामध्ये काहींच्या डोळ्याची शस्त्रक्रिया केली होती. त्यापैकी पाच जणांना शस्त्रक्रियेनंतर डोळ्यांचा संसर्ग होऊन त्यांची दृष्टी गेली होती.
पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीर येथे नियंत्रण रेषेवर (LOC) आज (मंगळवार) शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची बाब समोर आली आहे. जम्मू- काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराकडून विनाकारण गोळीबार करण्यात आल्याची माहिती, अधिकृत सुत्रांनी दिली आहे.
दरम्यान यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानकडून पूंछमधील कृष्णा घाटी सेटरमध्ये करण्यात आलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनाला सडेतोड उत्तर दिले. यावेळी दोन्ही बाजूंनी 15 मिनिटे गोळीबार सुरू होता, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान आता गोळीबार थांबला असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
महापारेषणमधील विद्युत सहायकांच्या भरती प्रक्रियेत अनियमित कामकाज केल्याचा ठपका ठेवत महापारेषणच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. मानव संसाधनचे मुख्य महाव्यवस्थापक सुगत गमरे, मानव संसाधनचे महाव्यवस्थापक मंगेश शिंदे, मानव संसाधनचे उपमहाव्यवस्थापक अभय रोही आणि मानव संसाधनचे वरिष्ठ व्यवस्थापक संदीप धाबर्डे अशी या निलंबित अधिकाऱ्यांची नावे आहेत.
पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कबुतरांना नियंत्रित खाद्यपुरवठा करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिकेला दिल्यानंतर आता पालिका त्याची अमंलबजावणी कशी करणार याकडे लक्ष लागले आहे. दुसरीकडे 13 जुलै ते 3 ऑगस्टदरम्यान कबुतरांना खाद्य देणाऱ्यांना 68 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कबुतरखाने बंद करण्यासाठी पालिकेकडून होत असलेल्या कारवाईला प्राणी संघटना, जैन समाज आणि काही नेत्यांकडून विरोध झाला. दुसरीकडे अनेक सामाजिक संघटनांनी या कारवाईला पाठिंबा दिला. मात्र, मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पालिकेला या कारवाईवर निर्बंध आणावे लागणार आहेत. या मुद्यावर पालिकेला 7 ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयातही बाजू मांडावी लागणार आहे.
खरा भारतीय कोण हे ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तीना नाहीत असे काँग्रेसच्या सरचिटणीस खा. प्रियांका गांधी यांनी मंगळवारी म्हटले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत व चीनसंदर्भात केलेल्या विधानांसंदर्भात त्यांना सर्वोच्च न्यायालयाने सुनावले होते. त्यावर त्या म्हणाल्या की, राहुल गांधी
राहुल विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी पार पाडताहेत. सर्वोच्च न्यायालयाचा मान राखून म्हणावेसे वाटते की, सच्चा भारतीय कोण हे ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तीना नाहीत. राहुल यांच्या विधानांचा विपर्यास करण्यात आला.
वाढवण बंदर आणि समृध्दी महामार्ग यांना फ्रेट कॉरिडॉर या शीघ्रसंचार द्रुतगती महामार्गाने भरवीर (ता. इगतपुरी, जि. नाशिक) येथे जोडण्यात येणार आहे. या 104 किलोमीटरच्या महामार्गास मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. प्रकल्पामुळे विदर्भ व मराठवाड्यातील औद्योगिक तसेच कृषी माल थेट समुद्रमार्गे जाण्यास मदत होईल. तसेच मुंबई व आसपासच्या गर्दीच्या रस्त्यांवरून वळसा घ्यावा लागणार नाही.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.