Maharashtra Breaking News LIVE Updates: उपराजधानी नागपुरात दोन गटात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सोमवारी दोन गटात दगडफेक झाल्याच्या घटना घडली. त्यानंतर शहरात तणावपूर्वक शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आली आहे. आज दिवसभर याचे पडसाद राज्यभरात उमटण्याची शक्यता आहे. राज्यातील ठळक घडामोडींचा आढावा या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून
वरळीतील मेळाव्यात राज ठाकरे यांनी पक्षाची नवी रचना करणार भूमिका मांडली होती
मनसे पक्षाची नवी रचना तयार
23 मार्चला मनसेच्या पक्षाची नवी रचना समोर येणार
मंत्री नितेश राणेंकडून राज्यातील कायदा, सुव्यवस्था आणि सामाजिक शांतता बिघडवण्याचे काम सुरु आहे अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या कारभारावर टीका, माफी मागण्याचा प्रश्नच नाही!. सरकारचे अपयश लपवण्यासाठी सत्ताधारी पक्षाला औरंगजेबाची कबर आठवते का? अशी विचारणाही त्यांनी केली आहे.
आर्टिकल 326 नुसार मतदानाचा अधिकार भारतीय नागरिकाला आहे. शिवाय आधार कार्ड हे व्यक्तीची ओळख निश्चीत करते. म्हणून EPIC नंबर आधार शी जोडला जाणार.
भारतीय निवडणूक आयोग, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली, निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंह संधू आणि डॉ. विवेक जोशी यांच्यासह, आज नवी दिल्लीतील निर्वाचन सदन येथे केंद्रीय गृहसचिव, विधी विभागाचे सचिव, MeitY सचिव, UIDAI चे CEO आणि निवडणूक आयोगाच्या तांत्रिक तज्ञांसोबत बैठक घेतली...निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, मतदार ओळखपत्र (EPIC) आणि आधार लिंकिंग केवळ भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 326 च्या तरतुदींनुसार केले जाईल.
वांद्रे कुर्ला संकुलात साडेतीन ऐकर हून अधिक जागेवर भव्य वास्तू उभी राहणार
सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांची विधानसभेत मोठी घोषणा
कसं असेल सांस्कृतिक भवन?
भव्य ऑडिटोरियम, कला दालने व रिसर्च सेंटरचा समावेश
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी महत्त्वाचा दुवा
महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रदर्शन देशी-विदेशी पर्यटकांसाठी आकर्षण
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कलाकारांसाठी एक व्यासपीठ म्हणून सदर केंद्र कार्यरत राहील.
राज्य वस्तू संग्रहालयामार्फत प्राचीन भारतीय वारशाचे जतन करून पुढील पिढ्यांना ते दाखवण्याचे महत्वाचे काम आहे.
विविध उत्खनने आणि शोध कार्यक्रमातून उजेडात आलेल्या कलाकृती, महत्वाच्या ऐतिहासिक वास्तू, शस्त्रे आणि विणकाम, कपडे आणि पोशाख, शिल्पे आणि कलावस्तू, कलाकृती, शिलालेख, ताम्रपट, प्राचीन मध्ययुगीन रचनात्मक अवशेष आणि थोर कलाकारांच्या दुर्मिळ चित्रकृती जतन केलं जाईल
वांद्रे येथील बिकेसीता १४४१८ चौरस मीटर हा भूखंड महसूल विभागाकडून सांस्कृतिक कार्य विभागास विनामूल्य हस्तांतरीत करण्यात येईल व त्या ठिकाणी भव्य असे राज्य सांस्कृतिक केंद्र व राज्य वस्तुसंग्रहालय उभारण्यात येईल.
प्रशांत कोरटकरला मोठा दणका बसला आहे. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने कोरटकर याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. कोरटकर याला अटकपूर्व जमीन नाहीच.
मुंबई महापालिका निवडणूकीची तयारी ऑक्टोबरनंतरच होणार असल्याची सूत्रांची माहिती
महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांची आणि राज्य निवडणुक आयोगाची नुकतीच बैठक पार पडली यावेळी निवडणुकी संदर्भात चर्चा झाली
४ मे रोजी सुप्रीम कोर्टात मुंबई महापालिकेच्या निवडणूक संदर्भानं ओबीसींचं राजकीय आरक्षण आणि वॉर्ड पुर्नरचना बाबत सुनावणी होणार आहे
या सुनावणी नंतर सुप्रिम कोर्टानं निकाल दिला तरी
पावसाळ्याआधी निवडणूक होणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार निकाल लागल्यानंतर जवळपास 100 दिवस प्रशासकांना निवडणुकीची तयारी करायला वेळ लागणार आहे...
कोर्टाने निकाल दिल्यानंतर पालिकेला जवळपास 100 दिवस आढावा आणि तयारीसाठी लागणार असल्याची माहिती
यामध्ये वॉर्ड रचना, यादी तपासणी, हरकती मागवणे, आरक्षण सोडत या बाबींचा समावेश असणार आहे.
केंद्रीय मंत्र्यांच्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी हजर राहणार
दुपारी 4.30 पर्यंत मुख्यमंत्री दिल्लीला रवाना होणार
दरम्यान, कुटुंबिक कार्यक्रमाला हजेरी लावल्यानंतर लगेच परतणार असल्याची माहिती
- अनधिकृत बांधकाम प्रकरणी माजी न्यायमुर्तीच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती
- अधिकारी दोषी आढळल्यास अढळतील निलंबनाची कारवाई करणार
- उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा
- अनधिकृत बांधकाम प्रकरणांची विधान परिषदेत चर्चा
- अनधिकृत बांधकामांना आश्रय देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा
- विरोधी आमदारांची मागणी
नाशिक सत्र न्यायालयाच्या आदेशाला तातडीची स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
सर्व प्रतिवादींना नोटीस जारी करत प्रकरणाची सुनावणी 21 एप्रिलपर्यंत तहकूब
नागपुरात दगडफेकीत जखमी झालेल्या पोलिसांपैकी एका पोलीस कर्मचाऱ्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला.
Maharashtra Breaking News LIVE Updates: काही जण अफवांचे बळी ठरले आणि ही घटना घडली. सकाळी पोलिसांनी दोन्ही समूहांना समजावून सांगितलं होतं आणि वातावरण शांत झाला होतं. हा प्रकार जाणीवपूर्वक असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
होळीच्या दुसऱ्या दिवशी देशभरामध्ये धुळवड साजरी केली जाते. मात्र नाशकात होळीच्या पाचव्या दिवशी रंगपंचमी सादर केले जाते. या रंगपंचमीला नाशिक मध्ये वेगळे महत्त्व आहे. नाशिकच्या अनेक भागात पेशवे कालीन रहाड आहे. या सगळ्या राड रंगपंचमीच्या दिवशी उघडल्या जातात. नाशिकच्या जुने नाशिक परिसरात असलेल्या शिवाजी चौकामध्ये तब्बल साठ वर्षानंतर पहाड खुली करण्यात आले आहे. मात्र नागपूर मध्ये घडलेल्या घटनेमुळे या रहा डीची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे.
पोटनिवडणुकीत 6 पैकी 5 उमेदवारांचे अर्ज वैध. अपक्ष उमेदवाराने भरलेला अर्ज बाद.
सुप्रीम कोर्टाने संवैधानिक संस्थांवर विश्वास ठेवण्याची गरज अधोरेखित केली आणि नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) ची नियुक्ती करण्याची शिफारस करण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली भारताचे सरन्यायाधीश (सीजेआय) यांच्या सदस्यांसह "तटस्थ" निवड समितीची मागणी करणाऱ्या नवीन याचिकेवर चिंता व्यक्त केली, केंद्र सरकारला नोटीस जारी करून सर्वोच्च न्यायालयाने मागितले आहे.
Maharashtra Breaking News LIVE Updates: गेल्या काही दिवसांत औरंगजेबाचे उदात्तीकरण सुरूय. हे कुणी व का सुरू केले. या औरंग्याचे उदात्तीकरण करणं म्हणजे देशद्रोह आहे.देशभक्त मुसलमानही औरंगजेबाचे समर्थन करणार नाही, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
ठराविक घरांवर हल्ले करण्यात आले आहेत. कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई होणारच. घटनास्थळावरुन शस्त्र जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांवरील हल्ला सहन केला जाणार नाही, असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
नागपूरच्या घटनेत 33 पोलिस जखमी झाले आहेत. अनेक वाहनांचे नुकसान झाले असून एका पोलीस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला आहे.
Maharashtra Breaking News LIVE Updates: नागपूर घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे विधानसभेत निवेदन सुरू
नागपूर मध्ये जमावाने काही घरांना लक्ष केले जाळपोळ केली. मोठ्या प्रमाणात मालमत्तेचं नुकसान केलं. काही लोकं जिवानीशी वाचली.पोलिसांवर दगडफेक झाली. ही घटना पूर्व नियोजित होती असे दिसतंय, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
नागपुरची घटना दुर्दैवी असून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावं, असं अवाहन चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.
छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून ड्रोन बंदीचे आदेश. सुरक्षेच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक यांचा निर्णय. नागपूरच्या हिंसाचाराच्या घटनेनंतर पोलिसांकडून उपाययोजना
नागपूर शहरातील परिस्थिती हळूहळू पूर्वपदाव येतीये.. सध्या शहारातील परिमंडळ 3, 4 आणि 5 मध्ये संचारबंदी लागू आहे.. आतापर्यंत पोलिसांनी 50 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तसंच दगडफेक आणि जाळपोळ करणा-यांची धरपकड पोलिसांकडून सुरू आहे.. एका गटानं आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनाविरोधात दुस-या गटानंही आंदोलन केलं. त्यानंतर या आंदोलनादरम्यान काही समाजकंटकांनी पोलिसांवर हल्ला केला. काही वाहनांवर दगडफेक केली. शिवाय जाळपोळ केली. समाजकंटकांनी केलेल्या दगडफेकीत काही पोलिसही जखमी झालेत.
विधिमंडळ परिसरा सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. औरंगजेब कबरीच्या मुद्द्यावरून दोन्ही आमदार भिडल्याचं दिसलं. विधिमंडळ पाय-यावर दोन्ही आमदार भिडल्याचं दिसलं..सुरुवातीला औरंगजेबाच्या कबरीच्या विरोधात सत्ताधा-यांनी विधमंडळ पाय-यांवर बॅनर घेऊन आंदोलन सुरू केलं होतं. हे आंदोलन सुरू असतानाच विरोधकही तिथे आले आणि त्यांनी नितेश राणेंच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन सुरू केलं.
Maharashtra Breaking News LIVE Updates: नागपूर घटनेची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करणार, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती. कट रचून हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज, योगेश कदमांचं वक्तव्य
माथेरानमध्ये येणा-या पर्यटकांच्या फसवणुकीचे, लुटीचे प्रकार गेले काही दिवस समोर येत होते. त्यामुळे माथेरानची बदनामी होतेय.... या बदनामीचा माथेरानच्या पर्यटन व्यवसायावर विपरीत परिणाम होतोय. त्यामुळे पर्यटकांची होणारी लूट तातडीने थांबवा अन्यथा माथेरान बंद करू, असा इशारा माथेरानकरांनी दिला होता. याबाबत कोणतीही दखल न घेतल्यानं अखेर आजपासून माथेरानकरांनी बेमूदत बंदची हाक दिलीय
-महिनाभरापासून एकही नवीन रुग्ण नाही
--पुणे महापालिका आरोग्य विभागाची माहिती
--9 जानेवारीला पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील नांदेड गाव परिसरात जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले होते.
दिव्यांगांसाठी केलेल्या एका आंदोलन प्रकरणात बच्चू कडू यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. याच प्रकरणाचा फायदा घेत बँकेतील विरोधकांनी न्यायालयात धाव घेत बच्चू कडू यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेतून अपात्र करत त्यांचं अध्यक्षपद काढून घेण्याची मागणी केली होती. मात्र विरोधकांची ही याचिका मुंबई हाय कोर्टाने फेटाळून लावली. त्यामुळे बच्चू कडू यांचं जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अध्यक्षपद कायम राहणारेय.
Maharashtra Breaking News LIVE Updates: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी टॅक्स भरण्यात शाहरुख खानलाही मागे टाकलं.२०२४-२५ वर्षात अमिताभ यांची कमाई 350 कोटी. अमिताभ बच्चन भरणार 120 कोटींचा टॅक्स
Maharashtra Breaking News LIVE Updates: गेल्या 24 वर्षात पश्चिम विदर्भात 49हजार शेतकरी आत्महत्या. यवतमाळ, अमरावतीत सर्वाधिक शेतकरी आत्महत्या. नापिकी, शेतमालाला भाव नसल्यानं संपवली जीवनयात्रा
चांद्रयान-5 मोहीमेला केंद्राची मंजुरी, चंद्राच्या पृष्ठभागाचा अधिक अभ्यास करण्यासाठी मोहीम, इस्रो 250 किलो वजनाचा रोव्हर पाठवणार, 'इस्रो'चे अध्यक्ष व्ही. नारायणन यांची माहिती
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटेने देशमुख हत्या प्रकरण होण्यापूर्वी काही दिवस आधीच शस्त्र परवानासाठी अर्ज केला होता. विष्णू चाटे हा अजित पवार गटाचा केज तालुकाध्यक्ष होता. मात्र देशमुख हत्या प्रकरणात अटक झाल्यानंतर चाटेची हकलपट्टी करण्यात आली होती. मात्र विष्णू चाटेने देशमुख यांची हत्या होण्यापूर्वीच शस्त्र परवाना मागितल्याचे समोर आले आहे
साता-यातील बाजार समितीच्या आवारात देवगड हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीला व्यापा-यांनी बोली लावलीय. यावेळी एका व्यापा-याने 20 हजार रुपयांच्या उच्चांकी भावाची बोली करून देवगड हापूस आंब्याच्या मानाची पहिली पेटी घेतली. त्यानंतर व्यापा-यांनी फटाके वाजवत जल्लोष साजरा केला.
नागपूरच्या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंमध्ये मुंबईत बैठक झाली. रात्री उशिरा दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे तातडीनं नागपूरला जाणार आहेत.
Maharashtra Breaking News LIVE Updates: मुंबई विद्यापीठाची 'बीकॉम'ची परीक्षा आजपासून सुरू होतेय. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांतील संलग्नित परीक्षा महाविद्यालयांतील एकूण २८४ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाणारेय. या परीक्षेसाठी 83 हजार विद्यार्थ्यांची नोंद झालीय.
मुख्यमंत्री फडणवीस, नितीन गडकरींकडून नागपूरकरांना शांततेचं आवाहन. तर विधिमंडळातही नागपूरमधल्या तणावाचे पडसाद उमटण्याची शक्यता
औरंगजेब कबरीच्या आंदोलनावरून नागपूरच्या महाल परिसरात दोन गटांत तणाव.जमावाकडून दगडफेक आणि जाळपोळ. 50 जणांना घेतलं ताब्यात. धरपकड सुरू.
बीडच्या आष्टीतील विकास बनसोडे हत्या प्रकरणातील आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. या प्रकरणात सहा आरोपी अटकेत असून इतर चार जण अद्याप फरार आहे
तब्बल नऊ महिने अंतराळात अडकलेले अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मर यांच्या परतीचा मुहूर्त अखेर ठरला असून ते भारतीय प्रमाणवेळेनुसार बुधवारी पहाटे पृथ्वीवर परत येतील.
मुलुंड पूर्वेकडे एका नाल्याखालील जलवाहिनी फुटल्याने रविवारपासून या भागात पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असून पालिकेने सोमवारी संध्याकाळी या भागात टँकरने पाणी पुरवठा केला आहे.
नागपूरच्या महाल परिसरात दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणानंतर नागपुरातील परिमंडळ 3, 4 आणि 5 मध्ये लावण्यात आली संचारबंदी लागू करण्यात आली. यात परिमंडळ 3 मधील कोतवाली, गणेशपेठ, तहसील, लकडगंज, पाचपवली, शांती नगर तर परिमंडळ 4 मधील सक्करदरा, नंदनवन आणि इमामवाडा आणि परिमंडळ 5 मधील यशोधरा नगर, कपिल नगर पोलीस स्टेशन हद्दीचा समावेश आहे.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.