Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत गृहमंत्री योगेश कदम अ‍ॅक्शन मोडवर, बोलावली महत्त्वाची बैठक

राज्यातील राजकीय घडामोडींसह इतर क्षेत्रातील बातम्यांचा आढावा एका क्लिकवर जाणून घ्या

Maharashtra Breaking News LIVE: राज्यातील वाढत्या गुन्हेगारीबाबत गृहमंत्री योगेश कदम अ‍ॅक्शन मोडवर, बोलावली महत्त्वाची बैठक
LIVE Blog

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यातील राजकीय घडामोडींसह इतर क्षेत्रातील बातम्यांचा आढावा एका क्लिकवर जाणून घ्या

24 June 2025
24 June 2025 21:45 PM
शरद पवारांच्या बड्या नेत्याला अजित पवारांच्या राष्ट्रवादीत घेण्यास शिदेंच्या शिवसेनेचा कडाडून विरोध; कारण धक्कादायक
 
 
24 June 2025 21:03 PM

'ब' वर्ग सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्था व पणन 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार स्वतः अजित पवार यांना 91 मते तर तावरे यांच्या  सहकार बचाव पॅनलचे भालचंद्र देवकते यांना 10 मते ब वर्ग गटात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 81 मतांनी विजयी 

अनुसूचित जाती जमाती 

एकूण मतदान झाले 8614 यापैकी 298 मते बाद करण्यात आली आहेत 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार रतनकुमार भोसले यांना 4117 मते तर तावरे यांच्या सहकार बचाव पॅनलचे बापूराव गायकवाड यांना 3717 मते

अजित पवार गटाचे उमेदवार रतनकुमार भोसले 400 मतांनी आघाडीवर 

 इतर मागास प्रवर्ग 

एकूण मतदान झाले 8611 यापैकी 258 मते बाद करण्यात आली आहेत 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलचे नितीन शेंडे यांना 4120 मते तर तावरे यांच्या  सहकार बचाव पॅनलचे रामचंद्र नाळे यांना 3644 मते तसेच राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाच्या बळीराजा सहकार बचाव पॅनलचे भरत बनकर  यांना 437 मध्ये तर यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार नितीन शेंडे 476 मतांनी आघाडीवर 

 भटक्या जमाती प्रवर्ग 

एकूण मतदान झाले 8616 यापैकी 342 मते बाद करण्यात आली आहेत 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलचे विलास देवकाते   यांना 4269 मते तर तावरे यांच्या  सहकार बचाव पॅनलचे सूर्याजी देवकाते यांना 3288 मते तसेच राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाच्या बळीराजा सहकार बचाव पॅनलचे ज्ञानदेव बुरुंगले यांना 566 मध्ये तर यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनल ची उमेदवार विलास देवकाते 981 मतांनी आघाडीवर 

 महिला राखीव प्रवर्ग 

एकूण मतदान झाले 8754 यापैकी 155 मते बाद करण्यात आली आहेत 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलच्या संगीता कोकरे  यांना 2161 मते तर तावरे यांच्या  सहकार बचाव पॅनलच्या राजश्री कोकरे यांना 2022 मते तसेच राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाच्या बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या शकुंतला कोकरे यांना 461 मध्ये तर यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलच्या उमेदवार संगीता कोकरे 149 मतांनी आघाडीवर

24 June 2025 19:21 PM

राज्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी व सार्वजनिक सुरक्षा तसेच कायदा व सुव्यवस्थेबाबत गृहराज्यमंत्री योगेश कदम अँक्शन मोडवर. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची CCTV वाढवण्यासंदर्भात बैठक बोलावली. उद्या सह्याद्रि अतिथिगृह येथे सकाळी १० वाजता बैठकीचे आयोजन केली आहे. राज्यातील सार्वजनिक सुरक्षा वाढवण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यात पोलिसांना मदत होण्यासाठी CCTV कॅमेऱ्यांची संख्या वाढवणे बाबत बैठक. बैठकीला अनेक विधानसभा सदस्य,गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव, नगरविकास विभागाचे अप्पर मुख्य सचिव, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव,राज्याचे पोलिस महासंचालक, मुंबई पोलीस आयुक्त, व इतर बडे अधिकारी उपस्थित राहणार

24 June 2025 19:18 PM

श्रीकांत शिंदे यांच्याकडून मुंबई महानगरपालिकेसाठी आढावा बैठक बोलवण्यात आली . थोड्याच वेळात मुक्तागिरी बंगल्यावरती या आढावा बैठकीला सुरुवात होणार आहे. शिवसेनेचे काही महत्त्वाचे आणि निवडक नेते, उपनेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. ज्या प्रभागात शिवसेनेचे नगरसेवक होते त्या ठिकाणची सद्यस्थिती काय याचा आढावा श्रीकांत शिंदे घेणार आहेत. 

24 June 2025 17:32 PM

 मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर बसावा ही आमची इच्छा, मंगल प्रभात लोढांचे वक्तव्य

 मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर बसावा ही आमची इच्छा असल्याचं कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढां यांनी जाहीरपणे म्हटलं आहे. महापौर कोण होणार ? हे मुख्यमंत्री व महायुतीचे नेते ठरवतील असंही मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं. मुंबई महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आक्रमक असल्याचं दिसून येत आहे. 

24 June 2025 17:31 PM

माजी आमदार महादेव बाबर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पक्षात जाहीर प्रवेश केला

24 June 2025 16:52 PM

'देशद्रोही...' ईशान किशनचा पाकिस्तानी क्रिकेटर सोबत 'भाईचारा', विकेट पडताच घेतली गळाभेट, नेटकरी संतापले

24 June 2025 16:19 PM

 परभणी जिल्ह्यात 61 गावात पाणी टंचाई

महाराष्ट्रातील विविध भागात पावसाचा चांगलाच जोर असतांना मराठवाड्यातील परभणी आणि हिंगोली जिल्ह्याकडे मात्र पावसाची वक्रदृष्टी पडलीय,परभणीकरांना आज ही पाणी टंचाईचे चटके सहन करावे लागत आहेत. परभणी जिल्ह्यातील 56 गावातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी 66 विहिरींचे प्रशासनाने अधिग्रहण केले आहे,तर जिंतूर तालुक्यातील चार गावांना तर पालम तालुक्यातील एका गावाला 8 टँकरव्दारे पाणी पुरवठा करावा लागत आहे, वरून राजाची मराठवाडा वगळता इतर भागात कृपादृष्टी दिसून येतेय. आता पंढरीच्या सावळ्या वीठ्ठला इतर भागाप्रमाणेच मराठवाड्यावर तुझी कृपा पडू दे अण शेतकऱ्यांचं रान चिंब भिजून भूगर्भातील पाणी पातळी वाढू दे असच काहीसं साकडं येथील नागरिक घालू लागली आहेत.

 

24 June 2025 15:36 PM

हिंदी भाषेची सक्ती नको- शरद पवार 

हिंदी भाषेची सक्ती नको असं म्हणत शरद पवार यांनी हिंदी भाषा शिकणं महत्वाच आहे असं म्हटलं आहे. देशात ५५ टक्के हिंदी भाषा बोलणारे लोक त्यामुळे हिंदी भाषेचा विरोध देखील नको असंही यावेळी शरद पवार म्हणाले. १ ली ते ४ हिंदी सक्ती नको सध्या पाचवी पासून पुढे हिंदी भाषा शिकवली जाते, असं शरद पवार म्हणाले आहेत. 

24 June 2025 14:17 PM

शक्तीपीठ महामार्गाची कोल्हापूर जिल्ह्यापुरती रद्द केलेली अधिसूचना परत जारी करण्यासंदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा

विरोध होत असल्याने स्थानिक आमदारांच्या सूचना मागवणार आहेत. तसेच शेतकऱ्यांचा विरोध असल्याने विधानसभा निवडणुकीपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यापुरती अधिसूचना रद्द केली होती. मात्र आजच्या बैठकीत स्थानिक आमदारांच्या सूचना मागवण्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. 

24 June 2025 14:02 PM

शिवसेनेच्या मंत्र्यांची एकनाथ शिंदे यांच्याबरोबर तातडीची बैठक

मंत्रिमंडळ बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या दालनात बैठकीला सुरुवात झाली आहे. आज सायंकाळी होणाऱ्या समन्वय समितीच्या बैठकीपूर्वी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील समन्वय समितीचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत करणार चर्चा

24 June 2025 13:57 PM

महानिर्मिती राज्यात उभारणार १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करून कार्बन उत्सर्जन घटवून शेतक-यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा देवून शेतीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. राज्यात शाश्वत विकासास चालना  देण्यासाठी  महानिर्मिती तर्फे १,०७१ मेगावॅट क्षमतेचे  सौर ऊर्जा प्रकल्प मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प २.० अंतर्गत लवकरच कार्यान्वित होणार आहेत.या प्रकल्पांमुळे राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

24 June 2025 13:21 PM

विठ्ठल मंदिरात बनावट टोकनसहीत दर्शनाला पोहोचलेले 7 भाविक सापडले

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बनावट टोकन दर्शन पास घेऊन जाणारे 7 भाविक आढळले. टोकन पास स्कॅन करताना सर्व पास वर एकच क्यू आर कोड आढळला आणि वेगवगेळे फोटो दिसून आले. हिंगोली जिल्ह्यातील सात भाविकांकडे बनावट पास आढळले 

24 June 2025 12:57 PM

वेळ मिळताच शिक्षणमंत्री राज ठाकरेंची भेट घेऊन...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची वेळ मिळताच शिक्षणमंत्री दादा भुसे त्यांची भेट घेणार. हिंदी भाषा निणर्याबाबत सरकारची भूमिका ते राज ठाकरेंना समजावून सांगणार आहेत. मनसेने सरकारच्या निर्णयाला तीव्र विरोध केलाय.

 

24 June 2025 11:49 AM

विदर्भ, कोकण आणि खानदेशात पुढील 5 दिवस काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज

विदर्भातील अकोला, बुलडाणा, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवसांत काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या काही भागांत जोरदार ते अतिजोरदार सरी कोसळण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यांवर देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर, मध्य महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

24 June 2025 10:33 AM

माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ब प्रवर्ग संस्था प्रतिनिधी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार विजयी

ब प्रवर्ग संस्था प्रतिनिधी मधून 102 मतापैंकी  91 मते अजित पवार यांना मिळाली आहेत. शरद पवारांचा पाठिंबा असलेलया सहकार  बचाव पॅनलचे  भालचंद्र बापूराव  देवकाते यांना केवळ 10 मते मिळाली आहेत.

24 June 2025 09:47 AM

ब वर्ग गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार आघाडीवर

बारामती: माळेगाव  सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये संस्था प्रतिनिधी  ब प्रवर्गातून उपमुख्यमंत्री अजित पवार निवडणूक लढवीत आहेत. प्राथमिक मतमोजणीमध्ये आघाडीवर आहेत. 

24 June 2025 09:24 AM

'तुझ्या नवऱ्याला सांग इंग्लंडविरोधात सगळे...', सुनील गावसकर यांनी संजनाला स्पष्टच सांगितलं, बुमराह म्हणाला 'मी त्यांना...'

24 June 2025 09:23 AM

Iran Israel War: '12 दिवसांपासून सुरु असलेलं युद्ध संपलं', इराण-इस्त्रालयचं अखेर झालं एकमत, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

24 June 2025 08:55 AM

ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज जेजुरीत मुक्कामी; स्वागतासाठी जोरदार तयारी

आज मंगळवार दि. 24 जून 2025 रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज माऊली पायी पालखी सोहळा आज तीर्थक्षेत्र जेजुरी येथे मुक्कामी येत असून, त्यानिमित्ताने न्यासाकडून श्री खंडोबा मंदिर मुख्य गाभारा व गडकोट आवारामध्ये फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली.

24 June 2025 08:54 AM

वारीमुळे मेट्रोला 16 लाखांचा फायदा; वाहतुकीवर निर्बंध असल्याने नागरिकांची मेट्रोला पसंती

पालखीच्या दोन दिवसांत पुणे मेट्रोला मोठा फायदा झाला असून, दोन्ही मार्गिकेची एकत्रित कमाई 16 लाखांच्या तर प्रवाशी संख्या 5 लाखांच्या पार गेली. शुक्रवार आणि शनिवार रोजी पुणे आणि पिंपरी-चिंचवड दोन्ही शहरात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा होता. या काळात दोन्ही शहरात वाहतुकीवर अनेक निर्बंध लादले होते, परिणामी मेट्रोच्या प्रवाशी संख्येत आणि उत्पन्नात मोठी वाढ झाली.

24 June 2025 08:52 AM

नाशिकमध्ये सलग सहाव्या दिवशी गोदावरीची पूर परिस्थिती

- नाशिकमध्ये सलग सहाव्या दिवशी गोदावरीची पूर परिस्थिती कायम

- धुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत गोदावरीच्या पुराचे पाणी 

- रामकुंड आणि गोदा घाटाचा परिसर पुराच्या पाण्याखाली 

- गोदा घाटावरील अनेक मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा तर अनेक लहान मंदिर पुराच्या पाण्याखाली 

- गंगापूर धरणातून करण्यात येतोय 6000 क्यूसेकपेक्षा जास्त वेगाने पाण्याचा विसर्ग

- रात्रीपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी संततधार पाऊस 

- नाशिकला आज पावसाचा यलो अलर्ट 

- पावसाचा जोर वाढल्यास धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला जाण्याची शक्यता

24 June 2025 08:52 AM

6 हजार टन भाजीपाल्यांची आवक; दर नियंत्रणात

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी 513 ट्रक, टेम्पोमधून तब्बल 6 हजार टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. यामध्ये सर्वांत जास्त 1531 टन टोमॅटोचा समावेश आहे. आवक वाढल्यामुळे काही वस्तूंचे दर कमी झाले आहेत. पावसामुळे गेल्या आठवड्यात भाजीपाल्याच्या किमती 15 ते 20 टक्के वाढल्या होत्या. पाऊस वाढल्यास भाजीपाला खराब होण्याच्या भीतीमुळे शेतकऱ्यांनी सोमवारी मोठ्या प्रमाणात कृषिमाल मुंबईत विक्रीसाठी पाठविला. आवक वाढल्यामुळे टोमॅटो सर्वांत स्वस्त झाले आहे. होलसेल मार्केटमध्ये 12 ते 22 व किरकोळ मार्केटमध्ये 40 रुपये किलो दराने विकला जात आहे. फरसबी, गवार, घेवडा, फ्लॉवर या भाज्यांचे दरही कमी झाले आहेत.

24 June 2025 06:52 AM

आजपासून दहावी, बारावीची पुरवणी परीक्षा 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा आजपासून सुरू होणार आहे. त्यासाठी दहावीच्या 34 हजार 562, तर बारावीच्या 68 हजार 98 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, दरवर्षीच्या तुलनेत यंदा पुरवणी परीक्षा लवकर होत आहे.

24 June 2025 06:49 AM

बच्चू कडू अध्यक्ष राहणार की नाही? कोर्ट आज ठरवणार

अमरावती जिल्हा बँकेचे अध्यक्ष व संचालक पदावरून बच्चू कडू यांना अपात्र केल्यानंतर नागपूर हायकोर्टामध्ये आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे. बच्चू कडू अध्यक्ष राहणार की नाही याबाबत उद्या निकाल येण्याची शक्यता आहे. विभागीय सहनिबंधकांनी बच्चू कडू यांना अपात्र केल्यानंतर बच्चू कडू यांनी त्यांच्या निर्णयाला आव्हान देत हायकोर्टात धाव घेतली आहे. बच्चू कडू यांची आज सकाळी 11 वाजता अमरावती विश्रामगृहामध्ये महत्त्वाची पत्रकार परिषद आयोजित केली आहे.

24 June 2025 06:47 AM

मंत्रिमंडळाची मंत्रालयात बैठक

आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची मंत्रालयात बैठक होणार आहे.

24 June 2025 06:47 AM

भाजपच्या प्रमुख नेत्यांची वर्षावर बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावली बैठक 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप अॅक्शन मोडवर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावली भाजप नेत्यांची बैठक आज वर्षा निवासस्थानी सायंकाळी 7 वाजता प्रमुख नेत्यांची बैठक  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे उपस्थित राहणार . स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींसाठी धोरणं ठरण्याची शक्यता आहे.

24 June 2025 06:47 AM

महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक; शंभुराज देसाई यांच्या निवासस्थानी होणार बैठक

महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक पार पडत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ही महत्त्वाची बैठक असून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते उपस्थित  राहणार आहेत. सायंकाळी 6 वाजता शंभुराज देसाई यांच्या पावनगड या निवासस्थानी बैठक होणार आहे.

 

24 June 2025 06:42 AM

माऊलींची पालखी जेजुरीत होणार दाखल; पालखीवर करण्यात येणार भंडा-याची उधळण

सासवडमधून पालखी सकाळी जेजुरीकडे प्रस्तना ठेवेल. दुपारनंतर ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जेजुरीच्या वेशीवर येते या ठिकाणी देवस्थान आणि गावक-यांकडून पालखीवर भंडा-याची उधळण होते माऊलींची पालखी जेजुरीत मुक्कामी असेल.

24 June 2025 06:42 AM

नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील नाव देण्यासाठी रॅली 

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळाला दि बा पाटील यांचे नाव द्यावे यासाठी वाशी ते नवी मुंबई विमानतळपर्यत रॅलीचे आयोजन नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय दि .बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी दोन वर्षांपूर्वी विधीमंडळ तसेच कॅबिनेट मद्ये प्रस्ताव मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला परंतू आता विमानतळ लवकरच सुरू होणार असून केंद्र सरकारने दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा केली नाही यामुळे स्थानिकांमध्ये नाराजी आहे. म्हणूनच आज रॅलीचे अयोजन करण्यात येणार आहे.

24 June 2025 06:42 AM

सेनेच्या बाबरांचा जाता जाता पवार गटाला धक्का, पवार गटाचे तीन नगरसेवक घेऊन निघाले राष्ट्रवादीत

हडपसरचे माजी आमदार महादेव बाबर करणार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश. विधानसभेला हडपसरची जागा सुप्रिया सुळेंनी प्रतिष्ठेची करून प्रशांत जगताप यांनी तिकिट दिलेलं पण उद्धव ठाकरेंच्या सेनेच्या नाराज बाबर यांनी विरोधात काम केल्याने मविआचा उमेदवार पडला होता तेच माजी आमदार महादेव बाबर सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करत आहेत. महादेव बाबर यांच्या सोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नगरसेवक निलेश मगर,योगेश सासणे , माजी उपमहापौर बंडू गायकवाड करणार राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेला मोठा धक्का मानला जात आहे. मुंबईत दुपारी  4 वाजता अजित पवार यांच्या उपस्थितीत करणार प्रवेश.

24 June 2025 06:37 AM

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बार दिवाळीनंतर उडणार, नगर विकास विभागाचा सुधारित जीआर जारी

6 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या असे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ऑक्टोबर महिन्याच्या पंधरवड्यात निवडणुका होणे अपेक्षित होते. मात्र प्रभाग रचनेचे सुधारित आदेश जारी करत 6 ऑक्टोबरपर्यंत मुंबई महानगरपालिका, ड वर्गाच्या महापालिकांनी 13 ऑक्टोबरपर्यंत व नगर परिषदेच्या प्रभाग रचना अहवाल 30 सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश नगर विकास विभागाने मुंबई महापालिका आयुक्त व जिल्हाधिकारी, नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांना दिले आहेत. नगर विकास विभागाने सोमवार 23 जून रोजी पुन्हा एकदा सुधारित आदेश जारी केले आहेत. यानुसार आता दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

24 June 2025 06:37 AM

माळेगाव साखर कारखान्यावर कोणाची सत्ता? तावरे की पवार आज मतमोजणी; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठापणाला

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी निवडणूक झाली. आज सकाळी 9 वाजल्यापासून शहरातील प्रशासकीयभवनात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, कारखान्याचे माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे यांच्यात ही लढत होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठापणाला लागलेल्या या निवडणुकीत कोणाला पसंती मिळते हे आज ठरणार आहे. रविवारी सुमारे 88.48 टक्के मतदान झाले. एकूण 90 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून मतदानासाठी 67 केंद्रे होती. माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडले. 19 हजार 549 मतदारांपैकी सुमारे 90 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

24 June 2025 22:40 PM

आरे कॉलनीतील कचराकुंडी जवळ सापडलेल्या वृद्ध महिलेच्या नातवाचा शोध लागला आहे.  सत्तर वर्षीय महिलेचा नातू कुरारच्या हनुमान नगरचा राहणारा आहे. शनिवारी सागर शेवाळे आणि त्याची पत्नी कामावर गेले असता आजी यशोदा गायकवाड कोणालाही न सांगता बाहेर गेल्याचा नातवाने दावा केला आहे. आसपासच्या परिसरात शोधून देखील आजी सापडली नाही असा जबाब नातवाने पोलिसांना दिला. त्वचेचा कॅन्सर वृद्ध महिलेला कचराकुंडीत टाकून देण्याचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी आजीच्या कुटुंबीयांना शोधण्यासाठी सुरू केली होती. रवींद्र पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आरे कॉलनी पोलीस ठाणे यांनी तपास केला. 

24 June 2025 22:36 PM

 एकीकडे नाराजीच्या चर्चा... तर दुसरीकडे भास्कर जाधव यांच्या चिपळूण मधील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन. भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उद्या होणार आहे. कार्यालयाच्या बोर्डावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाव अधोरेखित पक्षातील नाराजीच्या चर्चेवर भास्कर जाधववांकडून पूर्णविरामाचे संकेत दिले आहेत. चिपळूण मधील कार्यालयाचे नूतनीकरण झाल्यानंतर पुन्हा एकदा नव्याने उद्घाटन होणार आहे. जनसंपर्क कार्यालयावर पक्षाच्या नेत्यांसह दोन्ही मुलांचे फोटो आहेत. 

24 June 2025 22:34 PM

बातमी क्रिकेट प्रेमींसाठी 

भारत वि. इंग्लंड लीड्स टेस्ट रंगतदार स्थितीत आहे. भारतानं इंग्लंडसमोर ठेवलं 371 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. उद्याच्या दिवसाचा खेळ बाकी आहे. शेवटच्या दिवशी भारतीय गोलंदाजांचा कस लागणार आहे. इंग्लंडला नमवण्याची भारताकडे नामी संधी. 

24 June 2025 22:32 PM

महत्त्वाची बातमी

इराणने कतारमधील दोहा येथील अमेरिकन तळावर हल्ला केला, ६ क्षेपणास्त्रे डागली. अमेरिकेने इराणमधील तीन ठिकाणी केलेल्या हल्ल्यामुळे, इराणने कतारमधील दोहा येथील अमेरिकन तळावरही हल्ला केला.

TAGS

Read More