Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्राच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अर्थसंकल्पही अधिवेशनात मांडण्यात आला आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यात अनेक घडामोडींना वेग आला आहे. आरक्षणाचा तापलेला मुद्दा असो किंवा विरोधकांच्या मागण्या याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिले आहे. राज्यातील व देशातील राजकीय व इतर घडामोडींचा आढावा घेऊया या लाइव्ह अपडेटमधून
मध्य रेल्वेच्या कसारा स्थानकाजवळ मालगाडीचे इंजिन बंद. अप डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत..मध्य रेल्वे कल्याण कसारा मार्गावरील वाहतून विस्कळीत..डाऊन मार्गावर मालगाडीचे इंजिन फेल..उंबरमाळी ते कसारा दरम्यान मालगाडीचे इंजिन फेल..एकामागोमाग लोकल उभ्या, एक तासापासून रेल्वे सेवा विस्कळीत
माजी आमदार भीमराव धोंडे यांना एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडी.
पत्रकार इस्माईल दर्याणी उर्फ भैय्या बॉक्सर सह एका महिला आरोपीलां केल होत न्यायालयात हजर...
याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात झाला होता गुन्हा दाखल.
या गुन्ह्यातील एक महिला अद्यापही फरार
कोतवाली पोलिसांकडून या महिलेचा शोध सुरू
शिवसेना शिंदे गटाचे बीडचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. आज कुंडलिक खांडे यांना अटक केल्यानंतर पक्षाकडून कारवाई करण्यात आली.
काही दिवसापूर्वी कुंडलिक खांडे यांचं कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाला आणि त्यानंतर खळबळ उडाली. ऑडिओ क्लिपमध्ये पंकजा मुंडेंच्या पराभवासह धनंजय मुंडे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पक्षविरोधी कार्य केल्याबद्दल कुंडलिक खांडे यांची हाकालपट्टी करण्यात आली.
कोर्टाने अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. केजरीवाल यांना 12 जुलै रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सादर केले जाणार आहे.
- अंतरिम अर्थसंकल्प मांडला अजून तो मंजूर झालेला नाही
- बजेट मंजूर झाल्यावर तो राज्यपालांकडे जातो, त्यानंतर योजना लागू होतात
- असं असताना आज मुख्यमंत्र्यांनी थेट जीआर पटलावर ठेवला
- हा सभागृहाचा हक्कभंग होतो
- बजेटला मान्यता मिळाली नसताना जीआर काढता येत नाही
- भीमा नदीवरून येणारी इंद्रायणी नदीला लौकिक मिळालं आहे
- 60 हुन जास्त कारखाने त्यांच्या बाजूला असून ग्रामस्थांनी पण तक्रार केली आहे
- सेंट्रल ट्रीटमेंट प्लॅन त्यात नाही आहे
- असे उत्सव असतात तेव्हादेखील साफसफाई केली जात नाही
- वारकऱ्यांना अनुदान देण्याची घोषणा केली आहे
- पण पाण्याचं स्रोत दूषित निघालं, त्याची दखल घेतली जात नाही
- शासनाला निर्देश द्या की इंद्रायणी नदीच्या साफसफाईला काय निर्देश दिले आहेत त्याची माहिती द्यावी
- चार साडेचार तास यशस्वी बैठक झाली.
- या बैठकीत येणाऱ्या विधानसभा निवडणुका महायुती म्हणून जिंकणार
- रोडमॅप तयार केला
- सर्व मित्र पक्ष सोबत घेऊन महायुतीचे सरकार बनेल असा विश्वास आहे
- काल एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी जो आर्थसंकल्प मांडला त्यात सर्व नागरिकांना केंद्रबिंदूला ठेवलं आहे
- शेतकऱ्यांना वीजबिल माफ
- महिलांना 3 सिलेंडर मोफत देणार
- येणाऱ्या 288 विधानसभा मध्ये भरीव कार्यक्रम घेऊन सहकारी पक्षाला घेऊन जाणार आहोत
आत्मविश्वास घेऊंन निवडणुकीत पुढे जाणार आहे
राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी चारधाम यात्रेसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करावी, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली होती. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आम्ही लागू करू. योजना सुरू करताना नियमावली करू. रोटेशन पद्धतीने ठराविक संख्या ठरवूया, असं शिंदे म्हणाले आहेत.
Maharashtra Breaking News LIVE: लाडकी बहिणसोबत लाडक्या भावांसाठीही योजनाः शिंदे
छत्रपती संभाजी नगरच्या करोडी टोलनाक्यावर किरकोळ वादातून प्रवाशी आणि टोल कर्मचाऱ्यात प्रचंड हाणामारी झाली, फास्ट टॅग मध्ये पैसे नव्हते त्यावरून हा राडा झाल्याचं सांगण्यात येताय त्यात दोन्ही गटात प्रचंड राडा झाला हा सगळा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय.
लडाखच्या दौलत बेग ओल्डी भागात शुक्रवारी नदी ओलांडण्याच्या टँकच्या व्यायामादरम्यान सेक्टरमधील पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्यामुळे एक दुर्घटना घडली. लष्कराच्या 5 जवानांचा मृत्यू झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
मुख्यमंत्र्यांनी २९ जून रोजी सर्व पक्षीय बैठकित ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा करण्याचे दिले होते आश्वासन. आरक्षणाबाबत सर्व पक्षीय बैठक पुढे ढकलण्यात आली, बैठकिचं करण अद्याप अस्पष्ट. या आठवड्यात बैठक होण्याची शक्यता.
राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. सत्ताधाऱ्यांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. किस्सा कुर्सी का अशी पोस्टरबाजी करत आंदोलन करण्यात आले.मुख्यमंत्रीपदावरुन माविआला डिवचण्याचा प्रयत्न.
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आज देहूकरांचा निरोप घेऊन आकुर्डी कडे मार्गस्थ होणार आहे. त्यासाठी पालखी रथाला जुंपण्यासाठी मानाच्या बैलजोडी देहू नगरीत दाखल झाल्या आहेत. लोहगाव येथील सूरज खांदवे आणि पुण्यातील नांदेड गाव येथील निखिल कोरडे यांच्या बैलजोडी देहू नगरीत दाखल झाल्या आहेत. या बैलजोडीला दर्शनासाठी देहूतील मुख्य मंदिराजवळ आणण्यात आले. त्यानंतर या बैलजोडीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.
देवगिरी बंगल्यावर अनेक आमदार येऊन गेलेत ,त्यांना निधी पाहिजे ,एकीकडे तुम्ही निधी मागता आणि दुसरीकडे अजित दादा याना विरोध करायचे हे चालणार नाही, असं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे. तसंच, जयंत पाटील यांनी पाहावे की आमच्या संपर्कात कोण कोण आहे, असंही मिटकरी यांनी म्हटलं आहे.
Maharashtra Breaking News LIVE: अजित पवार गटाचे के.पी.पाटील यांनी घेतली शरद पवार यांची भेट
पुण्यात झिका व्हायरसचे रुग्ण आढळल्यानंतर पुणे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर. रुग्णांच्या संपर्कात आलेल्या वीस जणांची होणार रक्त तपासणी.रुग्ण आढळलेल्या भागात महापालिकेकडून 3000 घरांचे सर्वेक्षण
ठरलेलं पैसे न दिल्याच्या कारणावरून बारामती तालुक्यातील निंबुत गावात गोळीबार झाला होता. रणजित निंबाळकर या शेतकऱ्यावर गोळीबार झाला होता. या घटनेत त्यांचा आज मृत्यू झाला आहे. गौतम काकडे यांच्या भावाने केला होता गोळीबार. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे आणि त्यांचा मुलगा गौरव काकडे यांना पोलिसांनी केली अटक.
Maharashtra Breaking News LIVE: प्रत्यक्षात येणार नाहीत अशा गोष्टी अर्थसंकल्पातः शरद पवार
Maharashtra Breaking News LIVE: निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पः पवार
ज्येष्ठ नेते शरद पवार हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा मोदी सरकार व विरोधकांवर निशाणा साधला आहे. मोदींची गॅरंटी राज्यात चालली नाही, असा घणाघात त्यांनी केला आहे.
वानवडी येथे भरधाव टँकरने सकाळी व्यायामासाठी बाहेर पडलेल्या मुलांना धडक दिली. तसेच, एका दुचाकी चालक महिलेला देखील धडक दिली. हा अपघात सकाळी साडे सहाच्या सुमारास घडला. या अपघातात काही मुले आणि महिला जखमी झाली आहे. विशेष म्हणजे या अपघाताला कारणीभूत ठरलेला टँकर अवघ्या १४ वर्षांचा मुलगा चालवीत होता.
झोपड्यांवरील कारवाई विरोधात पवईतील जयभीम नगरचे रहिवाश्यांनी उच्च न्यायालयात तोडलेल्या झोपड्या पुन्हा बांधून देण्याच्या मागणीसाठी याचिका दाखल केली.गेल्या महिन्यात पवईतील जयभीम नगर येथील अतिक्रमण केलेल्या जागेवरील झोपड्यांवर महानगरपालिकेने कारवाई केली होती.
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आज प्रस्थान होत आहे. या प्रस्थान सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी लाखो भावी आळंदीत दाखल झालेत. मंदिर परिसरातील इंद्रायणी घाट वारकऱ्यांनी भरून गेलाय. लाडक्या माऊलींच्या दरशणापूर्वी भाविक पवित्र इंद्रायणी मध्ये स्नान करत आहेत
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आज प्रस्थान होत आहे. या प्रस्थान सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी लाखो भावी आळंदीत दाखल झालेत. मंदिर परिसरातील इंद्रायणी घाट वारकऱ्यांनी भरून गेलाय. लाडक्या माऊलींच्या दरशणापूर्वी भाविक पवित्र इंद्रायणी मध्ये स्नान करत आहेत
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात घडला असून यात सात जणांचा जागेवरच दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना घडलीय.या घटनेत 7 जण जखमी झाले असून 4 जण गंभीर आहेत
जोगेंद्र कट्यारे यांनी निवडणूक आयोगासह राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रामुळे निवडणूक आणि प्रशासकिय कामात गल्लत करत शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. या प्रकरणी कट्यारे यांची चौकशी होऊन दोषी धरण्यात आले. कट्यारे यांच्या लेटरबॉम्ब मुळे महाराष्ट्र नागरी सेवेचे उल्लंघन केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.