Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Breaking News LIVE: 50 खोके घेऊन सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका

Maharashtra Breaking News LIVE: दिवसभरातील ताज्या घडामोडी एका क्लिकवर जाणून घ्या.

Maharashtra Breaking News LIVE: 50 खोके घेऊन सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका
LIVE Blog

Maharashtra Breaking News LIVE: पुण्यात तरुणीवर झालेल्या अत्याचारानंतर राज्यात संतापाची लाट उसळली आहे. त्यानंतर दिवसभरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील सर्व घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स एका क्लिकवर

27 February 2025
27 February 2025 20:45 PM

50 खोके घेऊन सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका

50 खोके घेवून तिकडे डुबकी मारली म्हणजे गद्दाराची पाप धुतले जात नाही म्हणत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीय.  

27 February 2025 20:02 PM

पोलादपूरच्या लाचखोर तहसीलदारावर गुन्हा दाखल

रायगडमधील पोलादपूरच्या लाचखोर तहसीलदारावर गुन्हा दाखल झालाय. अडीच लाख रूपये लाचेची मागणी केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कपिल घोरपडे असे लाचखोर तहसीलदाराचे नाव आहे. रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ही कारवाई करण्यात आलीय. 

27 February 2025 19:21 PM

स्वारगेट बस बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेची शोध मोहिम थांबवली

पुण्याच्या स्वारगेट बस बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेची शोध मोहिम अखेर थांबवली. अंधार पडल्यानंतर पोलीस कर्मचारी ऊसाच्या फडातून बाहेर. गेली दोन तासापासून पुणे पोलिसांच्या विविध टीमकडून दत्ता गाडेची ऊसाच्या शेतात सुरू असलेली शोध मोहिम अंधार पडल्यानंतर अखेर थांबवली आहे. 

27 February 2025 18:48 PM

परभणीत 10 वर्षीय मुलीवर अत्याचार,  दोन नराधमांना पोलिसांकडून अटक

परभणीत एका 10 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. या प्रकरणी दोघा नराधमांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आलीये. अत्याचार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी नागरिकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढलाय. 

27 February 2025 17:03 PM

नाशिकमध्ये 2027 मध्ये होणा-या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्वतंत्रपणे 'सिंहस्थ प्राधिकरण' स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला त्याबाबत निर्देश दिले आहेत. हा सिंहस्थ कुंभ'डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ' म्हणून ओळखला जावा, यासाठीचे नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले. प्रयागराज व उज्जैनच्या धर्तीवर स्वतंत्र प्राधिकरण झाल्यास महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयावरील ताण कमी होऊन सिंहस्थासाठी स्वतंत्र अमंलबजावणी करणारी यंत्रणाच आता उभी राहणार आहे. या प्राधिकरणावर स्वतंत्र आयएएस दर्जाचा अधिकारी नियुक्त केला जाणार आहे..

27 February 2025 17:00 PM

 बदलापूरच्या शाळेतील लैंगिक अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने शिफारशी सुचवणारा अहवाल दोन निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील विशेष समितीने हायकोर्टात सादर केला आहे. यामध्ये शाळेच्या बसमधून प्रवास करतानाच्या मुलांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी शाळेने घ्यावी यासह अन्य काही सूचना करण्यात आल्या आहेत. अहवालावर दोन आठवड्यांत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले.

27 February 2025 16:57 PM

मंत्रालयातील अग्निशामक यंत्रणा मुदतबाह्य असल्याचं समोर आलं. मंत्रालयाच्या विस्तारित इमारतीतील ६ व्या मजल्यावर असलेल्या अग्निशामक यंत्राची मुदत संपलेली असतानाही ते कार्यान्वित ठेवण्यात आलेत.अग्निशामक यंत्र ९ सप्टेंबर २०२४ रोजी रिफिल करणे आवश्यक होते मात्र ते अद्याप केले गेले नाहीत. त्यामुळे मंत्रालयात येणा-या नागरिकांचा आणि कर्मचा-यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

27 February 2025 15:59 PM

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात 1400 पानांचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं. सीआयडीकडून न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल केलं आहे. 

27 February 2025 14:15 PM

Maharashtra Breaking News LIVE: सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही व जीपीएस बंधनकारक करणार

सर्व बसेस मध्ये सीसीटीव्ही व जीपीएस बंधनकारक करणार.धुळखात भंगारात पडलेल्या बसेस साठी दिड महिन्याचा अवधी दिलाय. अश्या काही घटना घडू नये यासाठी अजून काही करता येतील का याची चर्चा केली, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

27 February 2025 13:49 PM

Maharashtra Breaking News LIVE: स्वारगेट बस मधील तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी CMO कार्यालय आणि महिला आयोग यांना संपूर्ण प्रकरणाचा अहवाल देण्यात येणार आहे. त्यासाठी पुण्यातील वरिष्ठ  पोलीस अधिकाऱ्यांची बैठक सुरू. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आढावा घेत आहेत. स्वारगेट पोलीस स्टेशन मध्ये ही बैठक सध्या सुरू असून या बैठकीला शहरातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.
 

27 February 2025 13:37 PM

Maharashtra Breaking News LIVE: कॉपी देताना नायब तहसीलदारांना रंगेहात पकडलं

नायब तहसीलदाराला कॉफी पुरवताना रंगेहाथ पकडले. अनिल तोडमल यांना रंगेहाथ पकडलेल्या नायब तहसिलदारांचे नाव. बारावी पेपर मध्ये स्वतःच्या पाल्यालाच कॉपी पुरवत असल्याची माहिती. पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी परीक्षा केंद्रावरील घटना..
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल. संबंधित नायब तहसिलदारांवर नेमकी काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष.

27 February 2025 13:08 PM

Maharashtra Breaking News LIVE: मंत्रालयातील अग्निशामक यंत्रणा मुदतबाह्य असल्याचं समोर आलं. मंत्रालयाच्या विस्तारित इमारतीतील ६ व्या मजल्यावर असलेल्या अग्निशामक यंत्राची मुदत संपलेली असतानाही ते कार्यान्वित ठेवण्यात आलेत.अग्निशामक यंत्र ९ सप्टेंबर २०२४ रोजी रिफिल करणे आवश्यक होते मात्र ते अद्याप केले गेले नाहीत. त्यामुळे मंत्रालयात येणा-या नागरिकांचा आणि कर्मचा-यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय.

27 February 2025 13:07 PM

Maharashtra Breaking News LIVE: बीडमधील पोलिसांची ओळख आता नावानचं होणार

गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील जातिवाद समोर आला. पोलीस दलात देखील हा जातीवाद असल्याचं वारंवार बोलंले गेलं. त्यानंतर सरपंच देशमुख हत्या प्रकरणानंतर पोलिसांची प्रतिमा डागाळली. हीच प्रतिमा सुधारण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी पोलिसांना आता पहिल्या नावानचं ओळखलं जाणार असल्याचे आदेश काढले आणि त्याची अंमलबजावणी आता 1 मार्चपासून होणार आहे.

27 February 2025 12:16 PM

Maharashtra Breaking News LIVE: अलिबाग बस स्थानकासमोर भीषण अपघात

अलिबाग बस स्थानकासमोर दोन बसेमध्ये चिरडून एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. जयदीप बना असे मृत तरुणाचे नाव आहे. दुर्घटनेनंतर संतप्त नागरिकांनी बस स्थानकात जोरदार राडा घातलाय. जमावाने एसटीच्या काचा फोडल्या आहेत

27 February 2025 11:44 AM

Maharashtra Breaking News LIVE: गृहराज्यमंत्री योगेश कदमांची स्वारगेट एस टी स्टँडला भेट 

गृहराज्यमंत्री  योगेश कदमांची स्वारगेट एस टी स्टँडला भेट . घटनास्थळाची पाहणी करून गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना देणार सविस्तर अहवाल

27 February 2025 11:38 AM

Maharashtra Breaking News LIVE: पुण्यातील प्रकारानंतर उद्धव ठाकरेंचा वसंत मोरेंना फोन

पुण्यातील प्रकारानंतर उद्धव ठाकरे यांचा वसंत मोरे यांना फोन. पुण्यातील पदाधिकारी आणि वसंत मोरे यांचं उद्धव ठाकरे यांच्याकडून कौतुक. कालचा घाणेरडा प्रकार होता हे बघून जीव जळतोय आपला महाराष्ट्र कुठे चाललाय, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आ

27 February 2025 11:25 AM

Maharashtra Breaking News LIVE: पोलिसांना आरोपी कसा सापडत नाहीः तृप्ती देसाईंचा आरोप

27 February 2025 11:11 AM

Maharashtra Breaking News LIVE: पुणे बलात्कार प्रकरणः स्वारगेट डेपो परिसरात तृप्ती देसाईंचे आंदोलन

पुण्यामध्ये महिला सुरक्षित नसल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ता तृप्ती देसाई यांनी दिली आहे. तरुणीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. स्वारगेट एसटी स्टँड परिसरामध्ये तृप्ती देसाई या आंदोलनासाठी उतरल्या आहेत.

27 February 2025 10:41 AM

Maharashtra Breaking News LIVE: सरपंच देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी कडून आज आरोप पत्र दाखल केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बीडच्या विशेष मकोका न्यायालयात हे आरोप पत्र दाखल केले जाईल. या आरोप पत्रातून नेमके सीआयडीच्या तपासातून काय निष्पन्न झाले ते समोर येईल. या आरोप पत्रात कोणाचे नाव ठेवले जाईल हे समोर येईल 

27 February 2025 10:10 AM

Maharashtra Breaking News LIVE: सहा दिवसानंतर महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा सुरू

सहा दिवसानंतर महाराष्ट्र कर्नाटक बस सेवा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील एसटी बस चालकांच्या तोंडाला कर्नाटक मध्ये काळ फासल्याच्या घटनेनंतर गेली सहा दिवस बंद होती महाराष्ट्र-कर्नाटक बस सेवा बंद होती. अखेर कोल्हापूर आगारातून कर्नाटक साठी बसेस सुरु झाल्या आहेत. 

27 February 2025 10:05 AM

Maharashtra Breaking News LIVE: मुंबईत खासगी शाळा सुरू करण्यासाठी 127 प्रस्ताव प्राप्त झालेत. त्यातील 106 प्रस्ताव हे इंग्रजी माध्यमाचे असून  मराठी माध्यमाचे केवळ 15 आहेत. तर मुंबईत मराठी शाळा सुरू करण्याचे अवघे 2 प्रस्ताव पात्र ठरलेत

27 February 2025 09:58 AM

Maharashtra Breaking News LIVE: आमदार सुरेश धस यांना पुन्हा डावललं?

राज्य विधिमंडळाच्या विविध समित्यांची घोषणा झाली. मात्र यात आमदार सुरेश धस यांना डावललं आहे. धर्मादाय खाजगी रुग्णालय तपासणी समितीच्या अध्यक्षपदी आमदार नमिता मुंदडा यांची नियुक्ती झालीय. बीडच्या केज विधानसभा मतदारसंघाच्या त्या आमदार आहेत. राज्य विधिमंडळात विविध प्रकारच्या समित्या असतात. यात महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला 11 समित्या आल्या आहेत. या समित्यांवर भाजपचं अध्यक्षांची निवड करतं. त्यामुळे सुरेश धस यांना डावलून भाजपानं मुदंडा यांना नेमलं. त्यामुळे भाजपानं धसांना यातून संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे, अशी चर्चा रंगली आहे. अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं समितींवर नेमणुका केलेल्या नाहीत. दरम्यान, यापूर्वी जिल्हा नियोजन समितीवर विधिमंडळ सदस्यांमधून होणा-या नियुक्त्यांमध्ये सुरेश धस यांच्याऐवजी नमिता मुंदडा यांनाच संधी दिली होती.

27 February 2025 09:41 AM

Maharashtra Breaking News LIVE: 29 हजार माथाडी कामगारांचा भाजपमध्ये प्रवेश

29 हजार माथाडी कामगारांचा भाजपमध्ये प्रवेश. भाजप प्रदेश कार्यालयात पार पडला पक्ष प्रवेश सोहळा. चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश 

27 February 2025 09:41 AM

Maharashtra Breaking News LIVE: बिहारच्या मंत्रिमंडळात सात नव्या चेह-यांचा समावेश

राज्यातील एकूण मंत्र्यांची संख्या 26वर. बिहारच्या मंत्रिमंडळात युतीतील घटक पक्षाचं सरकारमध्ये अंतर्गत बदल 

27 February 2025 09:11 AM

Maharashtra Breaking News LIVE: आसामच्या मोरीगाव जिल्ह्यात 5 रिश्टर तीव्रतेचा भूकंप. रात्री 2 वाजून 25 मिनिटांनी भूगर्भात 16 किलोमीटर आत हादरे. 

27 February 2025 09:04 AM

Maharashtra Breaking News LIVE: स्वारगेट बलात्कार प्रकरणः 'ती' बस आता फॉरेन्सिक लॅबकडे

स्वारगेट बस स्थानकात ज्या शिवशाही बस मध्ये तरुणीवर अत्याचार झाला ती बस आता पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे. बसमधील पुरावे आणि हाताचे ठसे तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅब कडे बस नेण्यात आली आहे. काल रात्री ही बस घटनास्थळावरून हलवण्यात आली 

27 February 2025 08:38 AM

Maharashtra Breaking News LIVE: शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुनावणीची शक्यता

केंद्रीय निवडणूक आयोगानं एकनाथ शिदेंना शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिलं होतं. या निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. यावरील अनेक सुणावण्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मागील 17 महिन्यांपासून हे प्रकरण कोर्टात आलं नव्हतं. आज यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

27 February 2025 08:09 AM

Maharashtra Breaking News LIVE: अमोल मिटकरींचा सत्तारांच्या PA वर आरोप

राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा मंत्र्यांचे पीए आणि ओएसडीवर गंभीर आरोप केलेत. त्यांनी थेट तत्कालीन मंत्री अब्दुल सत्तार यांचे पीए मोगल यांच्यावर आरोप केलाय. अकोला येथील कृषी विद्यापीठाच्या सिनेटसाठी मोगल यांनी गैरव्यवहार केल्याचं मिटकरी म्हणाले. मिटकरींच्या या आरोपांमुळे आता मंत्र्यांचे पीए आणि ओएसडी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेत. जेव्हा पैसे मागितले होते तेव्हाच आरोप का केले नाही. याबाबत अमोल मिटकरींना विचारणार, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिलीय. तर मिटकरींनी मुख्यमंत्र्यांकडे लखी तक्रार करावी, अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिलीय.

27 February 2025 08:04 AM

Maharashtra Breaking News LIVE: पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे राजकीय पक्षाचा कार्यकर्ता?

स्वारगेट बस स्थानकावरील बलात्कार प्रकरणातील  दत्तात्रय गाडे हा सराईत आरोपी असल्याचे काही पुरावे तपासादरम्यान समोर आले आहेत. तर काही राजकीय व्यक्ती आणि पोलिसांच्या ही संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

27 February 2025 07:01 AM

Maharashtra Breaking News LIVE: मुंबईच्या ट्रॉम्बेमधून 21वर्षीय तरुणीला शेअर बाजारातील सायबर फसवणुकी प्रकरणी अटक केली..या तरुणीला बेकायदेशीर व्यवहारबाबत तसेच कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यात प्रकरणी गुन्हा दाखल झालाय.

 

27 February 2025 06:59 AM

Maharashtra Breaking News LIVE: सुदानमध्ये लष्करी विमान घरावर कोसळून भीषण अपघात. दुर्घटनेत ४६ जणांचा मृत्यू तर १० जण गंभीर जखमी.

 

27 February 2025 06:59 AM

Maharashtra Breaking News LIVE: नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपकडेच

नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपकडेच राहणार. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रिपद मित्रपक्षाला न देण्याचे केंद्रीय नेतृत्वाचे संकेत. तर रायगडवरून शिवसेना-राष्ट्रवादीतील तिढा कायम

27 February 2025 06:58 AM

Maharashtra Breaking News LIVE: स्वारगेट आगारातील 23 सुरक्षा रक्षकांचं निलंबन

बस स्थानकात सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी तैनात. शिवशाहीतील तरुणीवरील बलात्कारप्रकरणी कारवाई. तर नराधम आरोपी गाडे अजूनही फरारच.

27 February 2025 06:58 AM

Maharashtra Breaking News LIVE: मनसेचं शिवाजी पार्कवर आजपासून तीन दिवस अभिजात पुस्तक प्रदर्शन. ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंच्या हस्ते संध्याकाळी उद्घाटन

27 February 2025 06:57 AM

Maharashtra Breaking News LIVE: आज मराठी भाषा गौरव दिन. भाषेच्या गौरवासाठी काम करणा-या साहित्यिक, प्रकाशकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव.

TAGS

Latest Marathi BatmyaToday's Breaking NewsCurrent Breaking Newslatest news todaytoday newsbreaking news todayLive News MarathiMumbai Pune Latest NewsNational International Latest NewsEntertainment Latest Newsmaharashtra latest news todayलेटेस्ट मराठी न्यूजमहाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडेमराठी ताज्या बातम्यामराठी ब्रेकिंग न्यूज अपडेटमुंबई पुणे ताज्या बातम्याराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्यामनोरंजन ताज्या बातम्यामहाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूजमराठी न्यूज लाइव्हलाइव्ह न्यूजआजच्या ठळक घडामोडीमराठी बातम्याझी 24 तासमराठी ब्रेकिंग न्यूजताज्या मराठी बातम्यामहाराष्ट्रातील आजच्या बातम्याराजकीयसामाजिकक्रीडाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराज ठाकरेउद्धव ठाकरेशरद पवारमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील लाईव्ह बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्यास्वारगेट बस अत्याचारस्वारगेट तरुणीवर अत्याचारswargate rape casePune bus depot sex assaultPu
Read More