Maharashtra Breaking News LIVE Updates: मुंबईसहीत महाराष्ट्रामध्ये सक्रीय झालेला मान्सून, पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल पडून झालेली दुर्घटना याबरोबरच दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या एकाच ठिकाणी...
सुधाकर बडगुजर यांचा उद्या भाजपमध्ये प्रवेश होईल. उद्या दुपारी मुंबईत भाजप कार्यालयात प्रवेश सोहळा पार पडणार आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार आहे. नाशिकमध्ये स्थानिक आमदारांसह भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध डावलून बडगुजर यांची भाजपमध्ये एन्ट्री होणार आहे. सुधाकर बडगुजर यांच्यासह गणेश गीते ,बबनराव घोलप यांच्यासह अनेक दिग्गज नेते तसंच नाशिकमधील ठाकरे गटाच्या काही माजी नगरसेवकही प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.मुंबईत सुधाकर बडगुजर जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून बडगुजर यांची ओळख होती. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती.
वारकऱ्यांना टोलमाफी देण्याचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय. 18 जून ते 10 जुलै दरम्यान टोलमाफी मिळणार आहे. 10 मानाच्या पालख्या जाणाऱ्या मार्गांवर टोलमाफीचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने जारी केला. टोल नाक्यावर वारकरी, मानाच्या पालख्या व भाविकांना टोलमाफी दिली जाईल. जड व हलक्या वाहनांना मिळणार टोलमाफीचा फायदा होईल.
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी जुना लोखंडी पूल तुटून घडलेल्या दुर्घटनेत ४ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तथापि, घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, स्थानिक पोलीस, शिवदुर्ग संस्था, आपदा संस्था तसेच स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने गतीने बचावकार्य केल्यामुळे 51 पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश मिळाले. घटनेची माहिती मिळताच बचावकार्यासाठी या ठिकाणी 25 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या. स्थानिक लोकप्रतिनिधींनीदेखील जागेवर पोहोचून काही हायड्रा मशीन जागेवर मागवल्या. सर्व पथकांनी ने एकत्रित येऊन काम चालू केले. स्थानिक नागरीकांनीही जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली. या ठिकाणी किमान 250 स्वयंसेवक काम करत होते.
IND VS ENG Test : BCCI टीम इंडियात अचानक करणार बदल? गंभीरच्या लाडक्या वेगवान गोलंदाजाला मिळणार संधी? GautamGambhir INDVSENG cricket MarathiNewshttps://t.co/9a24zopvlN
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 16, 2025
डीएनए मॅचिंग प्रक्रियेत 114 जणांचे डीएनए मॅच झाले आहेत.गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांनी ट्विट करून माहिती दिली. आज दुपारी 4 वाजेपर्यंत 114 जणांचे डीएनए मॅच झाल्याचे ते म्हणाले.
शिवसेना ठाकरे गटाची येत्या 20 तारखेला शिवसेना भवनमध्ये बैठक होणार आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल. या बैठकीला खासदार,आमदार, जिल्हाप्रमुख तसेच महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. संघटनात्मक बांधणी तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक मानली जात आहे.
कुंडमळा पूल दुर्घटनेतील दुसऱ्या दिवसाची शोध मोहीम थांबवण्यात आली आहे. 25 तासानंतर इंद्रायणी नदीतील रेस्क्यू ऑपरेशन संपलं आहे.
प्रवर्तन संचालनालयाने (ED) रॉबर्ट वाड्रा यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. त्यांना 17 जून रोजी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मात्र वाड्रा यांची ED समोर हजर होण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांकडून समजते.
पुर्व विदर्भानंतर मुंबईतही शिवसेनेत अंतर्गत धुसफुस सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. विभाग प्रमुखांचे हक्क कमी होत असल्याच्या चर्चेनंतर मुंबईत नाराजीचा सुर उमटू लागलाय.
प्रत्येक विधान सभेसाठी एक विभाग प्रमुख नेमला जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या अनुशंघाने पक्षातंर्गत सुरूवातीपासून असेलेले जूने पदाधिकारी पक्ष श्रेष्टींवर नाराज आहेत.येत्या काही दिवसात शिवसेनेत मोठे फेरबदल होणार असल्याचे संकेत आहेत.
बॅटरीचा स्फोट झाल्याने विमानाचा अपघात? बोईंगने नफ्यासाठी लपवल्या घातक त्रुटी? जाणून घ्या!#AhmedabadPlaneCrashhttps://t.co/3ibHOUQaHy
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 16, 2025
कुंडमळा दुर्घटनेनंतर राज्याच्या मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. जिल्ह्यातील धोकादायक पुलांची तपासणी केली जाणार आहे.धोकादायक असणारे पूल तात्काळ पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कुंडमळा दुर्घटना नेमकी का घडली यासाठी 5 सदसिय समिती नेमण्यात आली आहे.पुढील सात दिवसात या समितीने अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
चॅम्पियनशिप जिंकूनही दक्षिण आफ्रिकेला मिळालं नाही नंबर 1 चं स्थान, ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम ICCTestRanking MarathiNews ICC Cricket WTCFinal https://t.co/sTFXtBj5zU
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 16, 2025
जनगणनेबाबत गृह मंत्रालयाच्या अधीनस्थ भारताच्या महा निबंधक कार्यालयाकडून अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जनगणना कायदा 1948 च्या कलम 3 अन्वये ही जनगणना 2027 मध्ये घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
> भारत सरकारने 16 जून 2025 रोजी अधिकृत अधिसूचना जारी केली
> संपूर्ण भारतात जनगणना वर्ष 2027 मध्ये घेण्यात येणार
> देशातील बहुतेक भागांसाठी जनगणनेची संदर्भ तारीख – 1 मार्च 2027
> हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लडाख आणि जम्मू-काश्मीरमधील बर्फाच्छादित/गैर-सामायिक भागांसाठी संदर्भ तारीख – 1 ऑक्टोबर 2026
> 2019 मधील अधिसूचनेची रद्दबातल घोषणा, मात्र त्याअंतर्गत आधी केलेली कार्यवाही वैध राहील
> अधिसूचना भारताच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नात सून जयश्री पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपाचे ज्येष्ठ नेते व उच्चतंत्र शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत जयश्री पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. जयश्री पाटील या जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष व स्वर्गीय माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी आणि खासदार विशाल पाटील यांच्या वहिनी आहेत. मंत्री चंद्रकांत पाटलांनी, जयश्री पाटील यांच्या घरी जाऊन भेट घेत, चर्चा करत पक्षप्रवेश केला. बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अधिकृत पक्ष प्रवेश होणार असल्याचे चंद्रकांत पाटलांनी जाहीर केले. विधानसभा निवडणुकीमध्ये जयश्री पाटील यांनी बंडखोरी करत लढवली निवडणूक होती. काँग्रेस पक्षाकडून जयश्री पाटील यांना पक्षातून निलंबित करण्यात आला होते.
ऑस्ट्रेलियाला सरळ जिंकता येईना म्हणून टेम्बा बावुमासोबत काय केलं पाहिलं का? टेम्बा स्वत: केला खुलासा#WtcFinal2025 #WTC2025 #SAvsAUS #marathinews #Cricket https://t.co/GefbFzmMTv
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 16, 2025
मुंबईच्या गिरगाव मेट्रो स्टेशनच्या बाजूला बेस्टची बस पाच फूट खोल खाली खड्ड्यात गेली. मुंबई मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणाहून जात असलेली बेस्ट बस रस्ता खचल्याने खड्ड्यात अडकली. गिरगाव ठाकूरद्वार सिग्नल जवळ मेट्रोचे काम सुरू आहे. जिथे काम सुरू आहे त्याच्या अगदी जवळ असलेल्या रस्त्यावरून ही बेस्ट बस जात असताना बेस्ट बसचे मागचे चाक रस्ता खचल्याने त्या खड्ड्यात अडकले. सुदैवाने कोणीही प्रवासी या अपघातामध्ये जखमी झालेला नाही.
हाँगकाँगहून दिल्लीला येणारे एअर इंडियाचे AI315 बोईंग 787 ड्रीमलाइनर त्याच्या मूळ मार्गावरून हाँगकाँगला परत पाठवण्यात आले. वैमानिकाला तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय आला होता. ज्यामुळे विमान मूळ विमानतळावर परत पाठवण्यात आले.
संगमेश्वरमधील गोळवली येथे डोंगराचा भाग थेट नदीत कोसळला. कोणतीही जीवित हानी नाही. मात्र शेजारी असलेल्या तीन घरांना धोका. ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मुसळधार पावसामुळे उत्तर रत्नागिरीत भूस्खलनाचे प्रमाण वाढले.
मावळ कुंडमळा पूल दुर्घटनेत आता ड्रोनच्या सहायाने पाहणी केली जाणार आहे. पुणे जिल्हा प्रशासनाकडून ड्रोन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. पावसाचा जोर कमी झाला की दुर्घटना पुलापासून इंद्रायणी नदीकाठचा परिसराचे सर्वेक्षण केलं जाणार आहे.
दौंड - पुणे डेमू ट्रेन मध्ये 7.05 च्या शटलमध्ये गाडी दौंडवरून सुटून पुण्याला येत असताना ट्रेनच्या टॉयलेटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. त्या टॉयलेटमध्ये एक व्यक्ती अडकली. दरवाजा लॉक झाल्यामुळे उघडत नव्हता, त्याने आरडा ओरड केल्याने तसेच तिथून धूर ही येत होता काही विचित्र घटना घडू नये म्हणून काही लोकांनी टॉयलेटचा दरवाजा तोडून त्या व्यक्तीला बाहेर काढून त्या व्यक्तीचा जीव वाचवला.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान तीन हिंदुस्थानची राफेल लढाऊ विमाने पाडल्याचा पाकिस्तानचा दावा दसॉल्ट एव्हिएशनने फेटाळला आहे. दसॉल्ट एव्हिएशनचे सीईओ एरिक ट्रॅ पियर यांनी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी पाकड्यांच्या दाव्यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत इंजिनीअरिंग, कृषी, फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी परीक्षेचा पीसीएम ग्रुपचा निकाल आज सोमवार, 16 जूनला जाहीर केला जाणार आहे. तर पीसीबी ग्रुपचा निकाल मंगळवार, 17 जून रोजी जाहीर केला जाणार आहे. सीईटी सेलने त्याची तारीख जाहीर केली आहे. सीईटी सेलच्या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येईल.
मुंबईत पावसाचा जोर वाढणार
महाराष्ट्रात मान्सून सक्रीय! 'या' जिल्ह्याला रेड अलर्ट, तर मुंबईसाठी पुढचे काही तास धोक्याचे, घाटमाथ्यावर... https://t.co/bv5T04XkyG
— ZEE २४ तास (@zee24taasnews) June 16, 2025
भारतीय हवामान खात्याकडून मुंबई महानगरात (मुंबई शहर आणि उपनगरे) पुढील 3 तासांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी किंवा अधिकृत माहितीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या 1916 या मदत सेवा क्रमांकावर संपर्क साधावा.
रात्रीपासून मुंबई आणि उपनगरांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. मात्र असं असलं तरी रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर याचा कोणताही परिणाम झालेला नाही.
शाळांना 16 जून रोजी सुट्टी जाहीर केली आहे. आज जोरदार पावसाचा इशारा असल्याने कन्नूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अंगणवाडी आणि शिकवणी केंद्रांसह शैक्षणिक संस्थांना 16 जून रोजी सुट्टी जाहीर केली आहे.
कर्नाटकमध्ये आजपासून बाईक टॅक्सी चालणार नाहीत कारण हायकोर्टाने त्यांचे कामकाज स्थगित करण्याच्या सिंगल-बेंचच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.
बेंगळुरू चेंगराचेंगरी सुनावणी 16 जूनपर्यंत स्थगित करण्यात आली. केएससीएचे अध्यक्ष रघुराम भट, सचिव ए शंकर आणि कोषाध्यक्ष ई एस जयराम यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी करत न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायमूर्ती एस आर कृष्ण कुमार यांनी केएससीए अधिकाऱ्यांना अंतरिम दिलासा दिला. सुनावणी 16 जूनपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. या प्रकरणात आज महत्त्वाची सुनावणी होणार आहे.
विजय रुपानी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 16 जून रोजी राज्य शोक जाहीर केला आहे. अहमदाबाद विमान अपघात - गुजरात सरकारने माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 16 जून रोजी राज्य शोक जाहीर केला आहे.
गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्यावर राजकोटमध्ये अंत्यसंस्कार होणार. आज दुपारी 4 वाजता पूर्ण राज्य सन्मानाने अंत्यसंस्कार होणार आहेत.
एअर इंडियाच्या विमान अपघाताची चौकशी करणाऱ्या उच्चस्तरीय समितीची सोमवारी पहिली बैठक होण्याची शक्यता आहे.
अहमदाबादमध्ये विमान दुर्घटनेतील दुसरा ब्लॅक बॉक्स सापडला.
पंतप्रधान 16 ते 17 जून दरम्यान काननास्किस येथे होणाऱ्या G7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी कॅनडाला जणार आहेत. G7 मध्ये मोदींचा हा सलग सहावा सहभाग असेल. ते G7 नेते, आमंत्रित भागीदार राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रमुखांशी ऊर्जा सुरक्षा, उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि क्वांटम तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करून एआय-ऊर्जा संबंध यासारख्या महत्त्वाच्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा करतील अशी अपेक्षा आहे.
लोकायुक्तांपुढे धनंजय मुंडे यांच्या कृषी घोटाळ्याची ऑनलाइन सुनावणी होणार आहे. या मीटिंगमध्ये अंजली दमानियांबरोबर प्रधान सचिव, कृषी सचिव आणि डीजी महाराष्ट्र पोलिस देखील ऑनलाइन उपस्थित असणार आहेत. सकाळी सव्वा अकरा वाजता ही सुनावणी होणार आहे.
मुंबई -समविचारी लोकांशी बसून जागांची वाटणी करण्यासाठी आमची सहमती असेल- शरद पवार
सिंधुदुर्ग -मालवण राजकोट येथील नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूला भेगा! महाराजांचा पुतळा किंवा चबुतऱ्यावर काहीही परिणाम झालेला नाही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्पष्टीकरण
मावळ पुल दुर्घटनेच्या पार्श्वभुमीवर सर्व जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना दिल्या सूचना
Maharashtra Breaking News Live Updates: माथेरानच्या शार्लोट लेकमध्ये बुडून बेपत्ता झालेल्या तिन्ही पर्यटकांचे मृतदेह सापडले, पाण्याचा अंदाज न आल्यानं तिघे बुडाले, तीनही पर्यटक नवी मुंबईतील असल्याची माहिती
इंद्रायणी नदी पूल दुर्घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली दखल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनद्वारे संवाद, आवश्यक ती सर्व मदत करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आश्वासन
मावळ पूल दुर्घटना- आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाल्याचं प्रशासनाकडून घोषित, 1 जण बेपत्ता आणि 38 जखमी, 3 पुरुष आणि 6 वर्षाच्या बाळाचा मृत्यांमध्ये समावेश आहे.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.