Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Breaking News LIVE: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

Maharashtra Breaking News Today LIVE Updates: महाराष्ट्राबरोबरच देश आणि जगभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा तुम्हाला या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेता येईल.

Breaking News LIVE: राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला
LIVE Blog

Maharashtra Breaking News Today LIVE Updates : आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दिल्ली दौरा आहे. तसेच बच्चू कडू विविध मागण्यांसाठी आंदोलन पुकारणार आहेत. राजकीय घडामोडींबरोबरच दिवसभरातील महत्त्वाच्या अपडेट्स आपण या लाइव्ह ब्लॉगमधून पाहणार आहोत.

 

 

24 July 2025
24 July 2025 21:23 PM

नागपूर मेट्रोन 10 कोटी प्रवासी संख्या टप्पा पार केलाय

नागपूर मेट्रोन 10 कोटी प्रवासी संख्या टप्पा पार केलाय.मार्च 2019 मध्ये नागपूर मेट्रोने सकाळ-संध्याकाळ मर्यादित वेळेत सेवा सुरू केली होती. त्यामुळे सुरुवातीला अल्प प्रतिसाद मिळणाऱ्या नागपूर मेट्रोवर हळूहळू नागपूरकरांनी मेट्रोवर विश्वास दाखवला आहे. यामुळे दरवर्षी प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ होत गेली. आता दैनंदिन एक लाख ते एक लाख पंधरा हजार प्रवासी नागपूर मेट्रो ने दोन्ही मार्गांवर प्रवास करतात. मैलाचा दगड ठरलेली कामगिरी नागपूरमधील सार्वजनिक वाहतुकीवरील वाढते अवलंबित्व आणि मेट्रोच्या माध्यमातून अधिक सुसंगत, सुलभ आणि पर्यावरणपूरक शहर उभारण्याच्या दिशेने टाकलेले भक्कम पाऊल अधोरेखित करते. वर्षानुसार मेट्रो प्रवासी संख्या पुढीलप्रमाणे होती: • ५५,००० (२०१८-१९) • ९ लाख (२०१९-२०) • १९ लाख (२०२०-२१) • ६७ लाख (२०२१-२२) • २.४३ कोटी (२०२२-२३) • २.५५ कोटी (२०२३-२४) • ३.१६ कोटी (२०२४-२५) आणि • ९२ लाख (२०२५-२६ – १५ जुलैपर्यंत). GFX out

24 July 2025 20:16 PM

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. राज्याचे कृषिमंत्री मानिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व आलं आहे. 

24 July 2025 20:15 PM

उद्या मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा 

हवामान विभागाने उद्या मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. रायगड रत्नागिरीत रेड अलर्ट तर मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. उद्या समुद्रात १२.४० ला ४.६६ मीटरची मोठी भरती येण्याची शक्यता आहे. 

24 July 2025 20:14 PM

मॉर्गन स्टॅन्लीच्या अहवालात महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचं कौतुक 

मॉर्गन स्टॅन्लीच्या अहवालात महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचं कौतुक करण्यात आलं आहे. सिंगापूर देशाच्या तोडीची महाराष्ट्राची अर्थव्यवस्था असा माॅर्गन स्टन्लीचा अहवाल आहे.  महाराष्ट्र जगातील २८ व्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. महाराष्ट्र हा भारतातील सर्वात मोठा आर्थिक राज्य असून त्याने सातत्याने देशाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचं मत व्यक्त केलंय. मॉर्गन स्टॅन्लीच्या ‘India Economics and Strategy’ या अहवालानुसार, महाराष्ट्रची जीएसडीपी सध्या सुमारे US$ ५३६ अब्ज इतकी असून, ती २०३० पर्यंत US$ १ ट्रिलियन पर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. 

24 July 2025 19:36 PM

लवकरच दिसणार 2025 चं शेवटचं चंद्रग्रहण; भारतावर याचा काय परिणाम होणार?

24 July 2025 19:35 PM

प्रहारचे चांदवड येथे महामार्गावर चक्का जाम आंदोलन

शेतकऱ्यांना कर्जमाफी,शेतमालाला हमीभाव ,दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन, या प्रमुख मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाची घोषणा केल्यानंतर राज्यात ठीक ठिकाणी आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या चांदवड येथे मुंबई-आग्रा महामार्गावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले सुमारे एक तास हे चक्काजाम आंदोलन सुरू होते.  या आंदोलनामुळे महामार्गावर दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. तर यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी पत्ते खेळत कृषी मंत्र्यांचा निषेध केला तर आंदोलन संपल्यानंतर आंदोलनात सहभागी झालेल्या प्रहार कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

24 July 2025 19:35 PM

'बंद करायची आहे ना? बंद करुन टाका'; छगन भुजबळ सत्कार कार्यक्रमात संतापले

24 July 2025 19:33 PM

दौंड मधील गोळीबार प्रकरणातील आरोपींना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी

दौंड तालुक्यातील न्यू अंबिका कला केंद्रात झालेल्या गोळीबार प्रकरणातील भोर मुळशीचे आमदार शंकर मांडेकर यांचे भाऊ बाळासाहेब हिरामण मांडेकर, गणपत बाजीराव जगताप आणि रघुनाथ शंकर आव्हाड या तिघांना आज दौंड न्यायालयात हजर करण्यात आलं असता या तीनही आरोपींना सोमवार पर्यंत म्हणजे 28 जुलै पर्यंत चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. तर चौथा फरार असलेला आरोपी चंद्रकांत मारणे हा देखील यवत पोलिसात स्वतःहून हजर झाला असल्याची माहिती आरोपींचे वकील प्रशांत गिरमकर यांनी प्रसार माध्यमांना दिले आहे. 

24 July 2025 19:32 PM

मुलुंडमधील धक्कादायक बातमी - 14 वर्षांच्या मुलीवर शेजाऱ्याकडून बलात्कार, समुपदेशन करताच समोर आलं आणखी भयानक सत्य, बाप-भावानेही...

24 July 2025 19:01 PM

बच्चू कडू अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल

बच्चू कडू अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल झाले असून त्यांचं राहाता तालुक्यातील पुणतांबा गावात आगमन झालं. शेतकरी संपाचे गाव म्हणून पुणतांबा गावाची ओळख असून 2017 साली कर्जमाफीसाठी पुणतांबा गावात ऐतिहासिक शेतकरी संप झाला होता. शेतकरी संपानंतर फडणवीस सरकारने दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी केली होती. बच्चू कडूंनी गावात आल्यावर पुणतांबा येथील तत्कालीन आंदोलक आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला. कडू यांची शेतकऱ्यांसोबत बैठक सुरू असून सरसकट कर्जमाफीसाठी पुणतांबा गावातून पुन्हा मोठे आंदोलन उभे राहणार का...? याकडे लक्ष आहे. 

24 July 2025 18:59 PM

पुणे मेट्रोचा 'वन पुणे विद्यार्थी पास' आता मोफत

पुणे मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून यामधील २९ स्थानके प्रवासी सेवेत दाखल झाली आहेत. पुणे मेट्रो पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील एक प्रमुख सार्वजनिक व्यवस्था बनण्याकडे वाटचाल करीत आहे. पुणे मेट्रोची दैनंदिन प्रवासी संख्या १ लाख ९० पेक्ष्या जास्त असून त्यात निरंतर वृद्धी दिसत आहे. या प्रवासी संख्येमध्ये एक मोठा वाटा विद्यार्थी समूहाचा आहे.

 

24 July 2025 18:28 PM

Ajit Pawar on Kokate: कृषिमंत्री कोकाटेंसंदर्भात सोमवारी निर्णय होणार? अजित पवार देणार राजीनाम्याचा आदेश? म्हणाले 'जरा भान...'

24 July 2025 18:11 PM

माथेरान इको पॉइंट येथे अडकलेल्या कुत्र्याची यशस्वी सुटका

माथेरान येथील प्रसिद्ध इको पॉइंट परिसरात गेल्या दोन दिवसांपासून एक कुत्रा डोंगरात अडकलेला होता. स्थानिक नागरिकांनी कुत्र्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून प्रशासन आणि सामाजिक संस्थांकडे याची माहिती दिली. परंतु पावसाळी अडथळ्यांमुळे मदत कार्य लगेच सुरू होऊ शकले नाही. आज सह्याद्री मित्र आपत्कालीन सामाजिक संस्थेच्या रेस्क्यू टीमने त्वरित प्रतिसाद देत अत्यंत काळजीपूर्वक आणि सुरक्षित पद्धतीने त्या कुत्र्याची यशस्वी सुटका केली. हे ऑपरेशन खडतर होते. कारण कुत्रा साधारण दीडशे दोनशे फूट खोल दरीत अडकला होता आणि पोहोचणे अत्यंत धोकादायक होते.

24 July 2025 17:45 PM

परभणी- वसमत रोडवरील तीन मजली शेटे बंधू यांच्या प्रसिद्ध साईबाबा इम्पोरियमला भीषण आग

परभणी शहरातील वसमत रोडवर असलेल्या तीन मजली दुकानाला भीषण आग लागलीय,शेटे बंधू यांचे साईबाबा एम्पोरियमला आग लागली आहे. अग्निशामकच्या दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत, शेटे यांचे हे दुकान वसमत रोडवर खूप प्रसिद्ध असून गुरुकुल मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलांना लागणाऱ्या सगळ्या वस्तू साहित्य मिळण्याची सुविधा एकाच छताखाली शेटे यांनी उपलब्ध करून दिल्या होत्या,या तीन मजली दुकानात कोट्यवधी रुपयांच्या वस्तू होत्या, पण आग नेमकी कशी लागली हे अद्याप समजू शकली नसून या परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

24 July 2025 17:45 PM

देवगड निपाणी राज्य मार्गावर भगदाड

देवगड निपाणी राज्य मार्गावरून मोठी वाहतूक सुरू असते. तोंडवळी-बावशी दरम्यान तीन ते चार फुटांच भल मोठं रस्त्याला भगदाड पडलं आहे. रस्त्याच्या मध्यभागी हे भगदाड पडले असून असं असताना देखील या मार्गावरून वाहतुकच आहे.  या राज्य मार्गाचे काँक्रिटीकरणाच काम सुरू आहे मात्र पडलेल्या भगदाडाकडे कॉन्ट्रॅक्टरच दुर्लक्ष होतय.

24 July 2025 17:23 PM

स्वातंत्रवीर सावरकर यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्ही वक्तव्य प्रकरणी राहुल गांधी यांना नाशिक कोर्टात जमीन मंजूर

स्वातंत्रवीर सावरकर यांच्या बद्दल केलेल्या आक्षेपार्ही वक्तव्य प्रकरणी राहुल गांधी यांना नाशिक कोर्टात जमीन मंजूर. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली. 
राहुल गांधी स्वतः होते VC द्वारे उपस्थित होते. श्रीमती नरवडे यांच्या कोर्टाने जामीन मंजूर केला. 15 हजारांच्या जात मूचलक्यावर जमीन मंजूर झाला असून याचिकाकर्ता देवेंद्र भुतडा यांच्या तर्फे ऍडव्होकेट मनोज पिंगळे यांनी केला होता दावा दाखल.

24 July 2025 16:31 PM

 टेंडरदाराचं आत्महत्येमुळे खळबळ, निधी न मिळाल्याने घेतला टोकाचा निर्णय

सांगली जिल्ह्यात हर्षल पाटील या तरुण कंत्राटदाराने शासनाच्या निधी अभावी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. आता तरी ठेकेदारांची बिल द्यावी म्हणून नाशिक जिल्ह्यातील ठेकेदारांनी आज नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले. हर्षल पाटील यांनी जल जीवन मिशन अंतर्गत 65 लाखांचं काम केलं होतं, पण शासनाकडून 1.40 कोटींचं बिल थकवण्यात आलं. पैसे न मिळाल्यामुळे कर्जबाजारी झाले आणि अखेर त्यांनी टोकाचा निर्णय घेतला. या घटनेमुळे इतर ठेकेदारांमध्येही भीतीचं वातावरण आहे. एक वर्षाहून अधिक काळ निधी मिळत नसल्यामुळे अनेक ठेकेदार आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे शासनाने तातडीनं निधी मंजूर करून अशा घटना टाळाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे

24 July 2025 16:29 PM

गुजराती पाट्यांच्या संदर्भात मनसे आक्रमक 

गुजराती पाट्यांच्या संदर्भात मनसे आक्रमक झाली आहे. पालघरच्या मनसे पदाधिकाऱ्यांनी मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील हालोली येथील फूड च्या पाट्यांची तोडफोड केली.

24 July 2025 16:28 PM

आता सर्पमित्रांना मिळणार 10 लाखांचा अपघात विमा 

ग्रामीण भागात वन्यजीव आणि मानवी संघर्ष कमी करण्यासाठी, विशेषतः सर्पांपासून होणारे धोके टाळण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणाऱ्या सर्पमित्रांना आता लवकरच अधिकृत ओळखपत्र आणि १० लाख रुपयांचा अपघात विमा मिळणार आहे. त्यांना 'अत्यावश्यक सेवा' आणि 'फ्रंटलाइन वर्कर' म्हणून दर्जा देण्याबाबतही सकारात्मक विचार सुरू असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस करण्यात येईल अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

24 July 2025 16:22 PM

बेळगाव महानगरपालिकेत  मराठी भाषिक नगरसेवक आक्रमक

बेळगाव महानगरपालिकेत  मराठी भाषिक नगरसेवक आक्रमक झाले आहेत. कानडी सक्तीच्या विरोधात  नगरसेवकांनी  सर्वसाधारण सभेत  आवाज उठवला 
असून यात कानडी सक्तीच्या विरोधात मराठी भाषिक नगरसेवकांनी सभा त्याग केला. महापौरांच्या गाडीवरील मराठी बोर्ड का हटवला असा सवाल सुद्धा मराठी भाषिक नगरसेवकांचा भाजपच्या महापौरांना केला. कानडी सक्ती खपून घेणार नाही - बेळगाव मधील मराठी भाषिक नगरसेवकांची आक्रमक भूमिका मांडली आहे. 

24 July 2025 15:05 PM

परळी-बीड महामार्गावर प्रहार संघटनेचे चक्काजाम आंदोलन

बीड-परळी महामार्गावर प्रहार संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन केले जात आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांसह परिसरातील शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जावी अशी प्रमुख मागणी या दरम्यान करण्यात आली. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध करत महामार्गावरच पत्त्यांचा डाव मांडण्यात आला. तर भर चौकात मेंढ्या आणून चक्काजाम करण्यात आला. यामुळे बीड परळी महामार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती.

24 July 2025 15:03 PM

50 प्रवाशांसह रशियन प्रवासी विमान बेपत्ता 

50  प्रवाशांसह रशियन प्रवासी विमान बेपत्ता झाल्याची माहिती आहे. रशियाच्या पूर्वेकडील भागात सुमारे 50 जणांना घेऊन जाणाऱ्या An-२४ प्रवासी विमानाशी हवाई वाहतूक नियंत्रकांचा संपर्क तुटला. प्राथमिक माहितीनुसार विमानाचा अपघात झाला असून यातील सर्वजण ठार झाले आहेत, असे रशियन आपत्कालीन सेवा अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

24 July 2025 15:03 PM

गायमुख घोडबंदर परिसरातील रस्त्याची ठाणे पालिका आणि सार्वजनिक बांधकाम प्रशासन करणार पाहणी 

मनसे नेते अविनाश जाधव ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना अल्टिमेटम दिला होता. घोडबंदर गायमुख या ठिकाणी खड्डे बुजवले गेले नाही तर आम्ही अधिकारी यांना खड्ड्यात घालू असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला होता. आज गायमुख घोडबंदर परिसरातील रस्त्याची पाहणी ठाणे पालिका आणि सार्वजनिक बांधकाम प्रशासन करणार आहे. यावेळी मनसे आणि प्रशासना बरोबर रस्त्यावरून खडा जंगी पाहायला मिळणार आहे. 

24 July 2025 14:21 PM

नाशिकच्या पंचवटी परिसरात दोन गटात तुफान राडा

नाशिकच्या पंचवटी परिसरात दोन गटात तुफान राडा झाला आहे. वर्चस्वच्या वादातून दोन गट समोर समोर भिडले. परिसरात दोन्ही गटाकडून तुफान दगड फेक करून हवेत गोळीबार. संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद. पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

24 July 2025 12:22 PM

नाशिकमधील महिरवणी गावाजवळ शेतकऱ्यांचं चक्का जाम आंदोलन

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवेळी सरकारने कर्जमाफीचं दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नसल्याने सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन. ट्रॅक्टर आणि बैल घेऊन शेतकऱ्यांचं चक्काजाम आंदोलन. रस्त्यावर पत्त्ते टाकून शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध. कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची जोरदार घोषणाबाजी. शेतकऱ्यांच्या चक्का जाम आंदोलनामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील वाहतूक ठप्प.

24 July 2025 11:50 AM

सरसंघचालक मोहन भागवत मुस्लिम धर्मगुरूं, बुद्धिजीवींशी घेणार बैठक

संघ प्रमुख मोहन भागवत आज मुस्लिम धर्मगुरूं आणि बुद्धिजीवींशी बैठक घेणार आहेत. ही बैठक आज सकाळी ८ वाजल्यापासून हरियाणा भवन येथे होणार आहे. या बैठकीला सर कार्यवाह दत्तात्रेय होसबाळे, सह सरकार्यवाह कृष्ण गोपाल, रामलाल आणि इंद्रेश कुमार हजर राहणार आहेत. ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख उमर इलियासी यांच्यासह अनेक मुस्लिम धर्मगुरूही या बैठकीचा भाग असतील.

24 July 2025 11:39 AM

अनिल अंबानींच्या घरावर ईडीचे छापे

अनिल अंबानींच्या घरावर ईडीचे छापे.  मुंबई आणि दिल्लीत ईडीची कारवाई.50 ठिकाणी ईडीची कारवाई सुरु. 

24 July 2025 11:31 AM

मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

24 July 2025 11:14 AM

2006 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात 12 आरोपींची मुक्तता स्थगित, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

2006 साली मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणात बॉम्बे उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयात 12 आरोपींना निर्दोष घोषित करत मुक्त केलं होतं. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयावर अंतरिम स्थगिती दिली आहे.

24 July 2025 11:07 AM

पुण्यात प्रहार संघटनेचं चक्काजाम आंदोलन 

-पुण्यात प्रहार संघटनेचं चक्काजाम आंदोलन. शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहार आक्रमक.  शहरातील गुडलक चौकात आंदोलन सुरू. 

24 July 2025 10:35 AM

गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटीची तिकीट दरवाढ 

राज्य परिवहन महामंडळाने ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर गट आरक्षणाच्या भाड्यात 30 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी गट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनी एसटीच्या या निर्णयाबाबत नाराजीचा सूर आळवण्यास सुरुवात केली आहे.

24 July 2025 10:10 AM

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दुकानांवर गुजराती पाट्या

मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पालघर जिल्ह्याच्या हद्दीतील घोडबंदर ते अच्छाड पर्यंतच्या बहुतांश हॉटेलांच्या पाट्या गुजराती भाषेत असल्यामुळे महामार्गावरून पालघर जिल्ह्यात प्रवेश करताना गुजरातमध्ये आल्याचा भास होत आहे.महामार्गा लगतच्या मीरा रोड मध्ये हिंदीच्या सक्ती विरोधात आंदोलने होत असताना महामार्गाच्या गुजरातीकरणाकडे दुर्लक्ष केले जात आहे. गुजराती पाट्याविरोधात पालघर जिल्ह्याच्या कामगार आयुक्त कार्यालया कडून कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे.रात्री या मार्गावरून प्रवास करताना उजेडात या पाट्या त्यावर केलेल्या रोषणाई मुले प्रकाशने दिसतात.

24 July 2025 09:43 AM

शिर्डीच्या साई मंदिराला धमकीचा मेल 

शिर्डीच्या साई मंदिराला धमकीचा मेल. मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी. पोलिसांकडून साई मंदिर परिसरात तपास सुरू. साई संस्थानची सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर. दोन महिन्यांत दुस-यांदा धमकीचा मेल. भगवंत मन नावाने साई संस्थानला धमकीचा मेल.

24 July 2025 09:39 AM

बच्चू कडू यांच्या आंदोलनाला हिंसक वळन लागण्याची शक्यता 

अमरावती ,चांदूरबाजार, संभाजीनगर, लातूर आणि नांदेड मधील चक्काजाम आंदोलनात बच्चू कडू सहभागी होणार आहेत. बच्चू कडूंच्या आंदोलनाला शेतकरी संघटना, महाविकास आघाडीतील अनेक आमदारांनी खासदारांचा पाठिंबा दिलाय मनसेनेही  बच्चू कडू यांच्या चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. 

24 July 2025 09:19 AM
24 July 2025 09:08 AM

रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

2006 रेल्वे ब्लास्ट प्रकरणी महाराष्ट्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अपीलावर आज सुनावणी. उच्च न्यायालयाने ब्लास्टमधील आरोपींची निर्दोष मुक्तता केली  होती. याविरोधात महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.

24 July 2025 08:31 AM

श्रावणात त्र्यंबकेश्वराचं व्हीआयपी दर्शन बंद

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराच्या भाविकांसाठी महत्वाची बातमी. श्रावणात त्र्यंबकेश्वर मंदिर पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी खुलं राहणार. तर प्रत्येक श्रावण सोमवारी पहाटे 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी उघडं राहणार. श्रावणात भाविकांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता गर्भगृह दर्शन सर्व भाविकांसाठी बंद. तर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी वातानुकूलित दर्शनबारीची व्यवस्था. 25 जुलैपासून 23 ऑगस्टपर्यंत त्र्यंबकेश्वराचं व्हीआयपी दर्शन राहणार बंद.

24 July 2025 08:28 AM

शेतकऱ्यांपाठोपाठ आता राज्यात कंत्राटदारांवर आत्महत्येची वेळ; सरकारने 1.40 कोटी थकवल्याने त्याने स्वत:ला संपवलं

24 July 2025 08:13 AM

पूर्व विदर्भात 25 आणि 26 जुलैला पावसाचा ऑरेंज अलर्ट

 पूर्व विदर्भात 25 आणि 26 जुलैला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शुक्रवार आणि शनिवारी मुसळधार पावसाचा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज. आज संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. सात ते नऊ जुलै दरम्यान नागपुरात दमदार पाऊस झाला होता. यादरम्यान विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील पर्जन्यमानाची तुट जवळपास भरून निघाली. तर काही जिल्ह्यात अतिरिक्त पर्जन्याची नोंदही झाली. आता पुढील दोन दिवस मुसळधार पावसाच्या शक्यतेने नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याच आवाहन प्रशासनाने केल आहे

24 July 2025 07:39 AM

पुणे जिल्ह्यात पुन्हा लम्पी आजाराने डोकं वर काढलं 

-पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा लम्पी आजाराने डोकं वर काढलं आहे.  सर्वच तालुक्यांमध्ये लम्पी चर्मरोगाची बाधा वाढली. आतापर्यंत 906 जनावरांना या रोगाची लागण झाली असून यातील 591 जनावरे औषधोपचाराने बरी झाली आहेत तर 15 जनावरांचा मृत्यू झालाय.सद्यःस्थितीत जिल्ह्यामध्ये 300 जनावरांवर उपचार सुरू आहेत. 

24 July 2025 07:03 AM

मुंबईसाठी 4 दिवस धोक्याचे, समुद्रात मोठी भरती, 4.67 मीटर उंच लाटा उसळणार

मुंबईसाठी 4 दिवस धोक्याचे असल्याचा इशारा हवामान  विभागानं दिला असून, 24 जुलैपासून चार दिवस समुद्रात मोठी भरती येणार असल्याचा इशारा जारी करण्यात आला आहे. 26 जुलैला समुद्रात 4.67 मीटर उंच लाटा उसळणार असल्यानं नागरिकांना आणि मासेमारांना सावध करण्यात आलं आहे.

24 July 2025 06:24 AM

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी बच्चू कडू यांचं चक्का जाम आंदोलन

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी प्रहारचे राज्यभरात चक्का जाम आंदोलन बच्चू कडू स्वतः चक्का जाम आंदोलनात सहभागी होणार बच्चू कडू छत्रपती संभाजीनगर शहरात करणार चक्का जाम आंदोलन जालना रोडवरील दूध डेअरी चौकात केले जाणार चक्का जाम इम्तियाज जलील, काँग्रेस खासदार कल्याण काळेही आंदोलनात सहभागी होणार आहेत. 

24 July 2025 06:15 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर. दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची घेणार भेट. महाराष्ट्रात विधानसभा काळात अनेक मंत्र्यांवर झालेले घोटाळ्याचे आरोप. तसेच कथितरित्या समोर आलेले हनी ट्रॅप प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्याला महत्त्व. देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता. 

TAGS

Latest Marathi BatmyaLatest News In marathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking NewsToday's Breaking Newslatest newsCurrent Breaking Newslatest news todaylive newscurrent newstoday newsbreaking news todayLive News MarathiMumbai Pune Latest NewsNational International Latest NewsEntertainment Latest Newsmaharashtra latest news todayलेटेस्ट मराठी न्यूजमहाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडेमराठी ताज्या बातम्यामराठी ब्रेकिंग न्यूज अपडेटमुंबई पुणे ताज्या बातम्याराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्यामनोरंजन ताज्या बातम्यामहाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूजमराठी न्यूज लाइव्हलाइव्ह न्यूजआजच्या ठळक घडामोडीमराठी बातम्याझी 24 तासमराठी ब्रेकिंग न्यूजताज्या मराठी बातम्यामहाराष्ट्रातील आजच्या बातम्याराजकीयसामाजिकक्रीडाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराज ठाकरेउद्धव ठाकरेशरद पवारमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील लाईव्ह बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्या
Read More