Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Today Breaking News LIVE Updates: गुरुवारी सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह श्रीनगरला जाणार

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यासह महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेऊया एका क्लिककर 

Today Breaking News LIVE Updates: गुरुवारी सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह श्रीनगरला जाणार
LIVE Blog

Maharashtra Breaking News LIVE Updates: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नागरिकत्व प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने याचिकाकर्त्याला पुनर्विचार याचिका दाखल करण्याची परवानगी दिली आहे. 

ऑपरेशन सिंदूरनंतर देशभरासह राज्यभरातील घडमोडींना वेग आला आहे.  राज्यभरातदेखील अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर, महाराष्ट्रात राजकीय वातावरणदेखील तापले आहे. दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येणार अशा चर्चा असतानाच मंगळवारी उदय सामंत यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. राज्यातील राजकीय घडामोडींसह इतर क्षेत्रातील बातम्यांचा आढावा एका क्लिकवर जाणून घ्या. 

14 May 2025
14 May 2025 20:40 PM

गुरुवारी सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह श्रीनगरला जाणार
आर्मी आणि वायुसेना बेसचा करणार दौरा 
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तीन ठिकणांना भेट देणार 
भारतीय लष्कराच्या सैनिकांना भेटणार आणि संवाद साधणार

14 May 2025 20:17 PM

सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज! पुन्हा एकदा पाकिस्तानचे दोन तुकडे झाले? एक मोठा भूभाग स्वतंत्र देश म्हणून जाहीर झाला?

 

14 May 2025 19:46 PM

गावगुंडांच्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवलेली अंकिता दहावीत पहिली; डॉक्टर बनण्याचं स्वप्न अधुरंच राहिलं

14 May 2025 18:57 PM

महाराष्ट्रात ५ हजार १२७ कोटींची थेट परकीय गुंतवणूक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ब्लॅकस्टोन समूहासोबत सामंजस्य करार झाला आहे. राज्यात १० हून अधिक आधुनिक औद्योगिक व लॉजिस्टिक्स पार्क्स उभारले जाणार आहेत. नागपूर, भिवंडी, चाकण, सिन्नर, पनवेलमध्ये लॉजिस्टिक पार्क विकसित करणार आहेत. राज्यात २७ हजार ५१० रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहे. तसेच सर्व प्रकल्प पर्यावरणस्नेही, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरयुक्त व रोजगार निर्मितीस प्रोत्साहन देणार आहे. 

14 May 2025 18:53 PM

मेक माय ट्रिप या पर्यटन कंपनीकडून घोषणा 

अझरबैजान आणि तुर्कीयेमध्ये अनावश्यक प्रवास न करण्याचा सल्ला मेक माय ट्रिप देण्यात आला आहे. अझरबैजान आणि तुर्कीये पर्यंटनच्या सर्व जाहिराती आणि ऑफर आधीच बंद केल्या. भारतीय प्रवाशांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. अझरबैजान आणि तुर्कीयेमधील बुकिंगमध्ये ६०% घट झाली आहे. तसेच याच काळात झालेले बुकिंग रद्द  करण्यात २५०% वाढ झाली आहे. आपल्या राष्ट्रासोबत एकता आणि आपल्या सशस्त्र दलांबद्दल आदर बाळगून, आम्ही या भावनेचे जोरदार समर्थन करतो 

14 May 2025 18:52 PM

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या चीनने पुरवलेल्या हवाई संरक्षण प्रणालीला ठप्प केले. केवळ २३ मिनिटांत मोहीम पूर्ण करून भारताची तांत्रिक बाजु दाखवून दिली, असे भारत सरकारने जारी केलेल्या निवेदन स्पष्ट केले

14 May 2025 17:40 PM

मुंबईत भाजपाने 'तिरंगा यात्रा' आयोजित केलं आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कारवाईनंतर तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे. जनजागृती मोहीमे अंतर्गत भाजपाची 'तिरंगा यात्रा' पूर्ण होत आहे. तिरंगा यात्रेत मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार आहेत. 

14 May 2025 17:31 PM

"आकाशतीर: आकाशातील संकटांना नेस्तनाबूत करणारा भारतीय ढाल" 

सिंदूर ऑपरेशनमध्ये आकाशतीरची प्रखर कामगिरी, भारतीय हवाई सुरक्षा अधिक बळकट 

भारताच्या स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणाली ‘आकाशतीर’ने पुन्हा एकदा आपली क्षमता सिद्ध केली आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) च्या या AI-चालित, पूर्णपणे स्वयंचलित हवाई संरक्षण प्रणालीने पाकिस्तानकडून झालेल्या अलीकडील ड्रोन हल्ल्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली, शत्रूच्या कोणत्याही हवाई हल्ल्याला भारतीय हद्दीत शिरण्याआधीच निष्प्रभ केले.

7 मे रोजी झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये, जिथे भारताने पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर निशाणा साधला, त्यानंतर पाकिस्तानने भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आकाशतीर प्रणालीमुळे हे हल्ले भारताच्या हद्दीत येण्यापूर्वीच रोखले गेले.

BEL ने आपल्या अधिकृत निवेदनात सांगितले की, आकाशतीर प्रणालीने वापरकर्त्यांच्या अपेक्षांपेक्षा अधिक कामगिरी केली आहे. या प्रणालीने केवळ ड्रोनच नव्हे, तर क्षेपणास्त्र, मायक्रो UAV आणि लुटणारे दारुगोळाही अचूकपणे नष्ट केले. या अत्याधुनिक प्रणालीमुळे पाकिस्तानच्या हवाई साहसांना तोंड फोडण्यात भारतीय दलांना यश आले.

आकाशतीरची खास वैशिष्ट्ये: 

 AI-आधारित, पूर्ण स्वयंचलित प्रणाली: कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय त्वरित निर्णय क्षमता.
* एकात्मिक हवाई चित्र: आर्मी एअर डिफेन्सच्या सर्वात खालच्या युनिटपर्यंत एकसंध हवाई परिस्थितीची माहिती पोहोचवते.
* मित्रांवर गोळीबार टाळण्याची क्षमता: अग्रिम पंक्तीतील युनिट्सना सुरक्षिततेसह कार्य करण्याची हमी.
* रडार, पर्यवेक्षण साधने आणि कमांड युनिटचे एकत्रीकरण: अखंडित हवाई सुरक्षेसाठी संपूर्ण प्रणाली एकत्रित.

14 May 2025 17:18 PM

पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर करा अशी मागणी मेहबूब शेख यांची पक्षाच्या बैठकीत करण्यात आली. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम असल्याचं मेहबूब शेख यांनी सांगितलं. ही लढण्याची वेळ, आमच्यावर केस टाकल्या गेल्या तरी आम्ही लढलो. आपल्याकडे राज्य मुख्यमंत्री म्हणून पहायचे, दुर्दैवाने अपयश आले. आपण पुन्हा लढू आणि पुन्हा तीच परिस्थिती आणू असं देखील यामध्ये म्हटलं आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांची मागणी

14 May 2025 16:54 PM

MH 59 - महाराष्ट्रातील 'या' तालुक्याला मिळाला नवीन RTO क्रमांक; 'या' जिल्ह्यात आहे हा तालुका

14 May 2025 16:53 PM

61 व्या वर्षी लग्न करणाऱ्या भाजपा नेते दिलीप घोष यांच्यावर दु:खाचा डोंगर; लग्नाच्या काही दिवसांतच...

14 May 2025 16:52 PM

भारतातील 'या' जिल्ह्यांमध्ये मिळतं पाकिस्तानी सीमकार्डचं नेटवर्क; देश वेगळा असूनही सुरु राहतं सीमकार्ड

14 May 2025 16:52 PM

विराट कोहलीच्या निवृत्तीचं खरं कारण आलं समोर! रवी शास्त्रींसोबतचा फोन कॉल, 'ती' मागणी पूर्ण न केल्याने घेतला निर्णय

 

14 May 2025 16:51 PM

पाकिस्तानविरोधात भारताचे ऑपरेशन 'केलर'; सर्वात मोठ्या दहशतावद्याचा खात्मा

14 May 2025 16:47 PM

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर प्रहार संघटनेने आंदोलन केल आहे. शेतकरी कर्जमाफी, शेतमालाला हमीभाव आणि दिव्यांगाना सहा हजार रुपये मानधन मिळावं. या मागणीसाठी हे ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिंदेंनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं.

14 May 2025 16:12 PM

चकमकीत 3 दहशतवादी ठार, मोठा शस्त्रसाठा जप्त 

भारत पाकिस्तान युद्धविरामानंतर 48 तासांत दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक झाली. यामध्ये लश्कर-ए-तोयबाच्या 3 दहशतवाद्यांचा खात्मा झाला. यामध्ये ठार धालेल्या दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. 

14 May 2025 15:37 PM

राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नागरिकत्व प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने याचिकाकर्त्याला पुनर्विचार याचिका दाखल करण्याची परवानगी दिली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 5 मे रोजी याच वादावरील याचिकाकर्त्याची याचिका उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने फेटाळून लावली होती. नवीन याचिका दाखल करताना, काही नवीन पुरावे सादर केल्याचा दावाही करण्यात आला. या याचिकेवर निर्णय होईपर्यंत राहुल गांधींच्या परदेश प्रवासावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.

कोणी दाखल केली याचिका?

ही याचिका कर्नाटकातील एस विघ्नेश शिशिर यांनी दाखल केली होती. शिशिर यांनी राहुल गांधी यांच्या नागरिकत्वावर प्रश्न उपस्थित केले होते आणि या प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) चौकशी करण्याची मागणी केली होती. राहुल गांधींकडे युनायटेड किंग्डम (यूके) चे नागरिकत्व आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला होता. राहुल गांधींकडे ब्रिटिश नागरिकत्व असल्याचे पुरावे त्यांच्याकडे आहेत, असा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे. 

14 May 2025 15:16 PM

चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र, वाघाच्या हल्ल्यात आणखी एक बळी

चंद्रपूर जिल्ह्यात मानव आणि वन्यजीव यामधील संघर्ष दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. मागील तीन दिवसांत वाघाच्या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना. आज सकाळी ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील चिमूर तालुक्यातील करबडा गावालगतच्या जंगलात तेंदूपत्ता तोडत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात अरुणा भरडे या महिलेचा जागीच मृत्यू झाला. सतत घडणाऱ्या वाघाच्या हल्ल्यांमुळे जंगलालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाकडून तातडीने उपाययोजना करून वाघांचा बंदोबस्त करण्याची आणि मानव-वन्यजीव संघर्षावर आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहे

14 May 2025 15:15 PM

केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक 

एचसीएल आणि फॉक्सकॉन यांच्या संयुक्त उपक्रम असलेल्या इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत जेवर विमानतळाजवळ आणखी एका सेमीकंडक्टर युनिटची स्थापना करण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी. 

14 May 2025 15:07 PM

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात 

कार्यकारिणी बैठकीला जयंत पाटील यांच्यासह महत्वाचे नेते उपस्थित 

आगामी पालिका निवडणुका आणि पक्ष बांधणी व दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत बैठकीत चर्चेची शक्यता

14 May 2025 15:05 PM

तलवार हातात घेऊन आमदार सिद्धार्थ खरात यांचा 'वरात डान्स' व्हायरल

14 May 2025 15:01 PM

लग्नात वापरल्या जाणाऱ्या स्मोकमुळे लहान मुलीचा मृत्यू, आरोग्यासाठी किती घातक नायट्रोजन गॅस

हल्ली लग्नात सर्रास स्मोकचा वापर केला जातो. नवरा-नवरीच्या एन्ट्रीला किंवा रिसेप्शनच्या वेळी अनेकदा नायट्रोजन स्मोकचा वापर केला जातो. पण या स्मोकमुळे 7 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला आहे.

14 May 2025 14:19 PM

राज्यात 108 रुग्णवाहिकांची संख्या वाढणार

नोव्हेंबरपर्यंत 1,756 नव्या रुग्णवाहिका येणार आहेत. आपत्कालीन वैद्यकीय सेवा अधिक बळकट होण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागाचा सुमीत एसएसजी आणि बीव्हीजी कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. सुमारे 1600 कोटींची गुंतवणूक असलेल्या या उपक्रमाची अंमलबजावणी पाच टप्प्यांत होणार आहे...
या आधुनिक रुग्णवाहिकांमध्ये बेसिक व अ‍ॅडव्हान्स्ड लाइफ सपोर्ट, निओनॅटल केअर युनिट, दुचाकी आणि बोट रुग्णवाहिका यांचा समावेश आहे. 

14 May 2025 14:15 PM

तलवार हातात घेऊन आमदाराचा वरातीत डान्स 

बुलढाण्यात पुन्हा एकदा तलवारीचा 'जलवा' दिसून आला आहे. मेहकरचे उबाठा पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी लग्नाच्या वरातीत हातात तलवार घेऊन गाण्याच्या तालावर ठेका लावला आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर तलवारीच्या धारेसारखा व्हायरल झाला. माजी प्रशासकीय अधिकारी आणि कायद्याचे  जाणकार असलेले आमदार खरात यांचा हा अवतार पाहून जिल्हावासी चक्रावले. याआधी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी मुलाच्या वाढदिवसाला तलवारीने केक कापला, तेव्हा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. आता खरात यांच्या 'तलवार डान्स' वर प्रशासन काय कारवाई करणार, की हा फक्त 'वरातीतला उत्साह' म्हणून माफ होणार? कायद्याचे रक्षकच जर तलवारीने थिरकले, तर नियमांचे काय होणार? याकडे साऱ्या बुलढाण्याचे लक्ष लागून राहीले आहे. 

14 May 2025 14:08 PM

मी शिवसेना UBT सोबतच - तेजस्वी घोसाळकर 

तेजस्वी घोसाळकर उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर पोहोचल्या आहेत. तेजस्वी घोसाळकर यांच्यावर राजीनामा मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तसेच पत्रात म्हटल्याप्रमाणे माझा जो आक्षेप आहे ते मी साहेबांना सांगितल्याचं तेजस्वी घोसाळकरांनी सांगितलं आहे.   

14 May 2025 14:02 PM

कोल्हापूरच्या अंबाबाई, जोतिबा मंदिरात ड्रेस कोड लागू; 'असे' कपडे घालूनच देवदर्शनाला या...

Kolhapur News : देवदर्शनासाठी घराबाहेर पडणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी. आता अंबाबाई आणि जोतिबा दर्शनाला जाताना घ्यावी लागणार विशेष काळजी. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घेतला मोठा निर्णय. 

14 May 2025 13:45 PM
14 May 2025 12:52 PM

'सितारे जमीन पर' सारखाच आहे 'हा' हॉलिवूड चित्रपट तुम्ही पाहिलात का? 

14 May 2025 12:10 PM

Today Breaking News LIVE Updates: ठाण्यातील पहिली मेट्रो धावली, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मेट्रो 9च्या पहिल्या टप्प्याची चाचणी

पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्याकरता मेट्रो ९ प्रकल्प महत्वाचा. एमएमआरडीएकडून मेट्रो 9 च्या पहिल्या टप्प्याची आज चाचणी करण्यात आली. पहिला टप्पा 4.4 की मी लांबीचा अजून दहिसर पूर्व ते काशिगाव हा पहिला टप्पा असणार आहे. मेट्रो नऊ मध्ये एकूण 8 स्थानक असणार आहेत. मेट्रो 9 च्या पहिल्या टप्प्याचे जवळपास 96 % काम पूर्ण

14 May 2025 11:39 AM

Today Breaking News LIVE Updates: रेल्वेच्या हार्बर मार्गावरील उड्डाणपूल आजपासून वाहतुकीसाठी खुला. वाहतूक कोंडीतून मुंबईकरांची सुटका

14 May 2025 11:32 AM

Today Breaking News LIVE Updates: जवान रेश्मा इंगळे सीमेवर रवाना; चिमुकल्याला सोडून जाताना अश्रू अनावर

अमरावतीच्या बोरगावातील BSAF च्या जावान रेश्मा इंगळे त्यांच्या चिमुकल्याला सोडून देशसेवेसाठी सीमेवर रवाना झाल्या. सुट्टीवर आलेल्या रेश्मा इंगळे यांना  सीमेवर परत बोलवण्यात आलं. त्यामुळे सीमेवर जाताना त्यांच्या मुलाने हंबरडा फोडला. यावेळी   रेश्मा इंगळे यांना ही अश्रू अनावर झाले

14 May 2025 11:26 AM

Today Breaking News LIVE Updates: पाकिस्तानात गेलेला BSF जवान 20 दिवसांनंतर भारतात परतला

चुकून सीमापार गेलेला BSF जवान पूर्णम कुमार भारतात परत आला आहे. 23 एप्रिल रोजी अटारी बॉर्डरवरुन पूर्णम चुकून पाकिस्तानात गेला होता. त्यानंतर आज तो अखेर भारतात परतणार आहे.

14 May 2025 11:25 AM

Today Breaking News LIVE Updates: तुमचा मोबाईल हरवलाय, सावधान!

भाजी खरेदीदरम्यान 63 वर्षीय आजोबांच्या गहाळ झालेल्या मोबाइलमधील सीमकार्डच्या मदतीने बँक खात्यातून साडेसाह लाख काढल्याची घटना घडलीय. याप्रकरणी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवत तपास सुरु केला आहे.

14 May 2025 11:01 AM

अहमदाबादमध्ये पाळीव रॉटवीलरच्या हल्ल्यात चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू, धक्कदायक घटना कॅमेऱ्यात कैद, Video

 

 

14 May 2025 10:54 AM

Today Breaking News LIVE Updates: अरुणाचल प्रदेशात चीननं डोकं वर काढलं

ऑपरेशन सिंदूर राबवत भारतानं पाकिस्तानला धडा शिकवलाय. तर दुसरीकडे चीननं अरुणाचल प्रदेशात डोकं वर काढलंय... अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावे बदलण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चीनकडून करण्यात आला आहे.. चीनकडून अरुणाचल प्रदेशमधील काही ठिकाणांची नावे बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, यावर परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे

14 May 2025 10:25 AM

Today Breaking News LIVE Updates: विद्यार्थी सुरक्षेबाबत कठोर नियमावली जारी

गैरकृत्य लपवल्यास शाळेची मान्यता रद्द होणार. बस प्रवासातही मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळेवरच

14 May 2025 10:14 AM

गजा मारणेमुळे 5 पोलिसांची नोकरी गेली

14 May 2025 10:12 AM
14 May 2025 10:08 AM

Today Breaking News LIVE Updates: जालन्यात खरीप हंगामासाठी 16 हजार मेट्रिक टन खताचा साठा उपलब्ध आहे. जालन्यासाठी कृषी विभागानं 2 लाख 77 हजार 710 मेट्रिक टन खताची मागणी केलीय. उर्वरीत खतं 2 दिवसांत उपलब्ध केलं जाणार आहे अशी माहिती कृषी विभागानं दिलीय.

14 May 2025 09:54 AM

Today Breaking News LIVE Updates: महाराष्ट्राचे सुपूत्र भूषण गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती भवनात शपथविधी सोहळा

14 May 2025 09:52 AM

Today Breaking News LIVE Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील अदमपूर हवाई तळाला भेट दिल्यानंतर एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर ओवैसी यांनी शहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना सवाल विचारला आहे.

14 May 2025 09:52 AM

Today Breaking News LIVE Updates: तुर्की,अझरबैजानसोबतच्या व्यापारासह पर्यटनावर बहिष्कार टाका...CAITचं व्यापा-यांसह नागरिकांना आवाहन...पाकिस्तानला पाठिंबा देणं भोवणार 

14 May 2025 09:25 AM

Today Breaking News LIVE Updates: ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर मुंबईत भाजपची तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. दुपारी 4 वाजता मुंबईत ही तिरंगा यात्रा सुरु होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या यात्रेत सहभागी होणार आहेत. ऑगस्टक्रांती मैदान ते गिरगांव चौपाटीच्या तुकाराम ओम्बळे चौकापर्यंत ही  तिरंगा यात्रा काढली जाणार आहे.

14 May 2025 09:16 AM

Today Breaking News LIVE Updates: पुण्याच्या रायरेश्वर पठारावर शेतक-याच्या जिद्दीने घडवला नवा इतिहास

पुण्याच्या रायरेश्वर पठारावर शेतक-याच्या जिद्दीने नवा इतिहास घडवलाय. सुमारे 4 हजार 600 फूट उंचीवर ट्रॅक्टर नेण्याची
मोहीम यशस्वी करण्यात आलीय. संतोष जंगम या स्थानिक शेतक-याने पठाराच्या पायथ्याशी ट्रॅक्टरचे सुटे भाग केले आणि लोखंडी शिडीच्या साहाय्याने ट्रॅक्टर रायरेश्वर पठारावर नेण्यात आला. या मोहीमेत ग्रामस्थांनीही सहभाग घेतला होता.

14 May 2025 09:15 AM

Today Breaking News LIVE Updates: पुण्यात मे महिन्यातील विक्रमी पाऊस

पुणे शहरासह जिल्ह्याच्या सर्व भागांत सलग दुसऱ्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली... या हंगामातील मे महिन्यातील सर्वाधिक पाऊस मंगळवारी नोंदवला गेला... रात्री साडेआठपर्यंत शिवाजीनगरमध्ये मध्ये 18 तर लवळे येथे 48 मिलीमीटर पावसाची नोंद झाली... शहरात मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाच्या सरी बरसल्या. दुपारपर्यंत अधूनमधून पाऊस सुरू होता. ऐन पावसाळ्यात बघायला मिळणारे वातावरण पुणेकरांनी यंदा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अनुभवले.

14 May 2025 09:14 AM

Today Breaking News LIVE Updates: 'गळती लागेल म्हणून काकांकडून एकत्रीकरणाची भाषा'

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात आता अजित पवारांनी मोठं विधान केलं आहे. आगामी काळात पक्षातील गळती थांबवण्यासाठी शरद पवारांनी तसं वक्तव्य केलं असेल असं अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या बैठकीत नेत्यांना सांगितलं. सध्या दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत वरिष्ठ पातळीवर कोणतीही चर्चा नाही असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं. मंत्री दत्ता भरणे यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडलेल्या आमदारांच्या बैठकीत अजित पवारांनी यावर भाष्य केलं.

14 May 2025 08:43 AM

Today Breaking News LIVE Updates: छत्रपती संभाजीनगरात दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या. मित्रापेक्षा कमी गुण मिळाल्याने गळफास घेऊन संपवलं जीवन

14 May 2025 08:25 AM

Today Breaking News LIVE Updates: ऑपरेशन सिंदूरनंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची सुरक्षा वाढवली

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्या सुरक्षा ताफ्यात बुलेटप्रूफ कारचा समावेश करण्यात आला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील अधिकृत निवासस्थानी सुरक्षा वाढवली. जयशंकर यांना आधीच झेड श्रेणी सुरक्षा उपलब्ध होती, ज्यात ३३ कमांडो होते. आता त्यांच्या सुरक्षेत बुलेटप्रूफ वाहनाचा समावेश करण्यात आला आहे. CRPF कमांडो परराष्ट्र मंत्र्यांच्या सुरक्षा जबाबदारी सांभाळत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

14 May 2025 08:24 AM

Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यात पुढील 4 ते 5 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज

राज्यात पुढील 4 ते 5 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय... विदर्भातील पाच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय.. मराठवाड्यातील काही भागातही वादळी पावसाची शक्यता आहे... तर मुंबई, ठाणे आणि पालघरमध्येही दोन दिवस मध्यम सरींचा अंदाज हवामान विभागाने वर्वतलाय.. ढगाळ हवामानामुळे तापमानातही घट होईल, अशी शक्यता हवामान विभागातर्फे व्यक्त करण्यात आली आहे. राज्यात सुरू असलेल्या वादळी पावसाचा फटका भाजीपाला, आंबा, कांदा आणि डाळींब बागांना बसला आहे. या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे

14 May 2025 08:24 AM

Maharashtra Breaking News LIVE Updates: 'देवस्थान जमिनींची खरेदी विक्री नोंदणी थांबवा'

राज्यात देवस्थान इनाम जमिनी मोठ्या प्रमाणावर असून, या जमीनींचे होत असलेले खरेदी विक्री व्यवहाराबाबत सरकार धोरण ठरवित असल्याने या जमिनींची नोंदणी थांबविण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत.. कोल्हापूर शहर आणि उपनगरे नक्शा योजनेमध्ये बसवून सर्व्हे करण्यात यावा, असा निर्णयही यावेळी घेण्यात आला. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या जमीनीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर हा निर्णय घेण्यात आला. 

14 May 2025 08:14 AM

चक्रीवादळ अन् पावसाचं सावट... पाहा पुढच्या 24 तासांमध्ये काय होणार 

14 May 2025 07:52 AM

Maharashtra Breaking News LIVE Updates: सांगलीमध्ये तरुणाचा पाठलाग करून केलेल्या खुनाचा संजयनगर पोलिसांनी छडा लावलाय. जुन्या वादातून हा खून झाल्याचं उघड झालंय. याप्रकरणी 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय..तर तिघांना अटक झालीय.

14 May 2025 07:52 AM

Maharashtra Breaking News LIVE Updates: नाशिकच्या येवल्यातील सावखेडामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली.   या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय....  त्यामुळे उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला... मात्र पावसामुळे भाजी विक्रेत्यांचे हाल होताय.. 

14 May 2025 07:01 AM

Maharashtra Breaking News LIVE Updates: दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा?

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारिणीची आज बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. विलिनीकरणाच्या चर्चेमुळे पवार गटातले पुरोगामी कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ आहेत.. त्यामुळे या कार्यकारिणीत वरिष्ठांसमोरच हे कार्यकर्ते आपल्या भावनांना वाट मोकळी करून देण्याची शक्यता आहे.. या बैठकीत जयंत पाटील काय भूमिका घेणार याकडं सा-यांचं लक्ष लागलंय.. 

14 May 2025 07:00 AM

Maharashtra Breaking News LIVE Updates: मान्सून अंदमानात डेरेदाखल

2 जूनपर्यंत मोसमी वारे तळकोकणात दाखल होण्याचा अंदाज. अरबी समुद्रात मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती असल्याची माहिती.

14 May 2025 06:59 AM

Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई देशाचे नवे सरन्यायाधीश. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देणार पद आणि गोपनियतेची शपथ.

14 May 2025 06:59 AM

Maharashtra Breaking News LIVE Updates: केंद्रीय मंत्रिमंडळाची आज दिल्लीत महत्त्वाची बैठक...ऑपरेशन सिंदूर, शस्त्रसंधीबाबत बैठकीत चर्चा होण्याची शक्यता...तर कॅबिनेटआधी सीसीएसची बैठक होणार..

14 May 2025 06:58 AM

Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रातील ओबीसींसाठी आनंदाचा क्षण

महाराष्ट्रातील ओबीसींसाठी आनंदाचा क्षण ओबीसींना हक्काचं 27 टक्के राजकीय आरक्षण पुन्हा बहाल, 3 वर्षांपूर्वी कोर्टानं इम्पिरिकल डेटाअभावी स्थगित केलेलं आरक्षण पूर्ववत

14 May 2025 22:08 PM

यंदा ८९ शाळांचा निकाल १०० टक्के  

बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शाळांचा दहावीचा (एसएससी) निकाल ९२.९२ टक्के लागला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने मार्च २०२५ मध्ये घेतलेल्या शालांत माध्यमिक अर्थात दहावी (एसएससी) च्या परीक्षेचा निकाल आज (दिनांक १३ मे २०२५) जाहीर झाला. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २४७ माध्यमिक शाळांमधून एकूण १४ हजार ९६६ एवढे विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १३ हजार ९०७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सरासरी निकाल ९२.९२ टक्के इतका लागला आहे. ८९ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून, ११८ विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळाले आहेत. 

14 May 2025 22:02 PM

कांजुर मार्ग पाइपलाइन गर्डर उतरवण्यासाठी कांजुर मार्ग-भांडुप विभागात विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक

मध्य रेल्वेवर दिनांक १४/१५.०५.२०२५ आणि दिनांक १५/१६.०५.२०२५ रात्री कांजुर मार्ग पाइपलाइन गर्डर उतरवण्यासाठी कांजुर मार्ग-भांडुप विभागात विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. 25/138-140 किमीवरील कांजुर मार्ग पाईपलाईन पुलाचे गर्डर350T रोड क्रेनद्वारे उतरवण्यासाठी कांजुर मार्ग आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर; अप आणि डाऊन जलद मार्गावर आणि पाचव्या मार्गावर विशेष वाहतूक पॉवर ब्लॉक घेण्यात य़ेणार आहे. 

Read More