Maharashtra Breaking News Today LIVE Updates: राज्यातील पावसाळी अधिवेशनाचा चौथा दिवस असून अधिवेशनातील आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडींचे ताजे अपडेट्स या ब्लॉगच्या माध्यातून तुम्ही पाहू शकता....
चार दिवसांपूर्वी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील एका मोबाईल दुकानाबाहेर घडलेल्या मारहाणीच्या घटनेने स्थानिक पातळीवर तणाव निर्माण केला होता. मोबाईल रिचार्जच्या एका क्षुल्लक वादातून दुकानातील काही कर्मचाऱ्यांनी एका मराठी व्यक्तीला रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करून संबंधित लोकांना सोडून दिल्यामुळे नाराजी व्यक्त करण्यात येत होती.
या प्रकरणानंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे यांनी दुकानाला जाऊन भेट दिली आणि दुकानातील कर्मचाऱ्यांनी मारहाण झालेल्या व्यक्तीची माफी मागावी अशी मागणी केली होती.
या संपूर्ण प्रकरणावर युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे यांनी या घटनेला 'मराठी-अमराठी' वाद मानण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. "आम्ही देखील या घटनेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. ही घटना भाषेवरून झालेली नाही, किंवा हा मराठी-अमराठी वाद नाही," असे त्यांनी म्हटले आहे.
"जो व्यापारी होता, त्याने कुणावर तरी दादागिरी करण्याचा प्रयत्न केला." राजन विचारे यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओचा संदर्भ देत आदित्य ठाकरे यांनी सांगितले की, स्थानिकांना ५ ते ६ लोकांनी फोन चार्जिंगच्या किरकोळ कारणावरून मारहाण केली होती. या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल झाली होती आणि त्यानंतरच ही बाचाबाची वाढली. त्यांनी "कुठेही मराठी-अमराठीचा वाद नाही. मी यापूर्वीही हे स्पष्ट केले आहे."
आदित्य ठाकरे यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, "आमची स्पष्टपणे भूमिका आहे, जी लोक आजही महाराष्ट्रात येतात, त्यांना मराठी भाषा येत नसेल, त्यांच्या विरुद्ध काही भूमिका नाही." मात्र, त्याचवेळी त्यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात आपला लढा सुरूच राहील असेही स्पष्ट केले. "आम्ही हिंदी सक्तीच्या विरोधात लढत आहोत आणि लढत राहू," असे ते म्हणाले.
पक्षाची भूमिका स्पष्ट करताना आदित्य ठाकरे म्हणाले "मराठीचा अभिमान आणि प्रत्येक राज्यातील त्या त्या भाषेचा अभिमान राखला गेला पाहिजे. कोणीही त्याचा अपमान करू नये," मुंबई आणि महाराष्ट्रात वर्षानुवर्षे राहणाऱ्या इतर भाषिक लोकांबद्दल बोलताना ते म्हणाले की, "वर्षानुवर्षे ही लोक आमच्यात राहत आली आहेत. तेही मुंबई प्रेमी आणि महाराष्ट्र प्रेमी आहेत." या विधानामुळे, या घटनेला भाषिक वादाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न फेटाळण्यात आला आहे आणि ही केवळ एका व्यापाऱ्याने केलेल्या दादागिरीचा परिणाम असल्याचे सूचित करण्यात आले आहे.
'तुमचा मृत्यू होणार आहे, देहविक्री करणाऱ्या महिलेसोबत...', पुण्यातील भोंदूबाबा असा अडकला जाळ्यात, 'ते' एक अॅप ठरलं कारणhttps://t.co/uXLwpncMQ0
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 3, 2025
दिल्लीत १ जुलैपासून सुरू असलेली १० ते १५ जुनी वाहने जप्त करण्याची आणि त्यांना इंधन न देण्याची मोहीम आता थांबण्याची चिन्हे दिसत आहेत. दिल्लीतील जुन्या कार मालकांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे. दिल्ली सरकारने एअर क्वालिटी मॅनेजमेंट कमिशन (CAQM) ला पत्र लिहून म्हटले आहे की वाहने जप्त करण्यासाठी तयार केलेली यंत्रणा योग्यरित्या काम करत नाही. दिल्ली सरकारचे मंत्री मनजिंदर सिंग सिरसा म्हणाले की, पेट्रोल पंपांवर बसवलेले कॅमेरे कार्यक्षम नसल्याचे आयोगाला कळवण्यात आले आहे. दिल्लीतील जुन्या कार मालकांसाठी ही मोठी दिलासादायक बाब आहे. अशाप्रकारे, दिल्ली सरकारने १ नोव्हेंबरपासून एनसीआरमध्ये सुरू होणाऱ्या मोहिमेपर्यंत वेळ घेतला आहे.
लक्ष्मण हाके यांनी अजित दादांना शिवीगाळ केल्याच्या विषयावरून राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक झाल्याचा पाहायला मिळत आहे. तुम्ही आज समुद्राच्या पाण्यात जाऊन चड्डी ओली करून घेतली.. राष्ट्रवादी काँग्रेस तुमची चड्डी पिवळी केल्याशिवाय राहणार नाही. पुढच्या काळात लक्ष्मण हाके याने महाराष्ट्रात फिरून दाखवाव भटक्या कुत्र्यासारखी हालत लक्ष्मण हाके ची करू अशा आक्रमक पद्धतीने प्रत्युत्तर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी दिला आहे. पुढच्या आठ दिवसात लक्ष्मण हाके याची चड्डी पिवळी करण्याची जबाबदारी ही राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. भडव्या तुझे लायकी नसताना तू अजित दादांवर बोलला आहे, तुला योग्य जागा दाखवण्याची जबाबदारी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आहे. असा आक्रमक इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी दिला असून लक्ष्मण हाके यांच्यावर कडाडून टीका केली आहे
'नोकराने मालकिणीची केली हत्या, नंतर हत्या पाहणाऱ्या मुलालाही केलं ठार'; कारण ऐकून पोलीस हादरले, फक्त ती त्याच्यावर...https://t.co/8pNORDnoGO#Crime #Delhi #Murder
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 3, 2025
'दोघा भावांमध्ये रक्ताची ओढ,' राज-उद्धव युतीसाठी चळवळ उभे करणारे सतिश वळुंज यांनी व्यक्त केल्या भावना, 'मी बाळासाहेबांसमोर...'https://t.co/phpBpyrg5b#RajThackeray #UddhavThackeray #MNS #Shivsena #Maharashtra #Worli #RajUddhav
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 3, 2025
बदलापुरात आमदार किसन कथोरे यांच्या बंगल्यासमोरील मुख्य रस्त्यावर गोळीबाराची घटना घडलीय. दोन गटातल्या वादातून हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येतीय. या गोळीबारात अल्ताफ शेख हा जखमी झाला असून त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलय. अल्ताफ शेख याचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे बोलले जात आहे. दोन गटातील वादातूनच हा गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येतीय. बदलापूर गावात आमदारांचा निवासस्थान आहे. त्यांच्या घरासमोरूनच बोराटपाडा मुरबाडकडे रस्ता जातो. याच रस्त्यावर हा गोळीबार झाला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,मंत्री प्रकाश अबिटकर, मंत्री गिरीश महाजन, आमदार राजू खरे यांच्यासह अवघे सहा जण दर्शनाला गेले आहेत. उपमुख्यमंत्री दर्शनाला जात असताना व्हीआयपी गेटवर कार्यकर्त्यांची दर्शनाला जाण्यासाठी धडपड पाहायला मिळाली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाविकांच्या सोयीसाठी घेतले विठुरायाचे मुखदर्शन घेतले. पदस्पर्श दर्शन घेतल्यास दर्शन रांग थांबवावी लागते यासाठी मुख दर्शनाला उपमुख्यमंत्री गेले.
तब्बल १ लाख ८२ हजार ४४३ बालकं कुपोषीत असल्याची सरकारची आकडेवारी
सर्वाधिक कुपोषित बालक मुंबई उपनगरात
ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये कुपोषणाच्या आकडेवारीत वाढ
मुंबई उपनगरमध्ये १६ हजार ३४४ कुपोषित बालके
कोल्हापूर शहरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भर पावसात एका व्यक्तीच्या मृत्युदेहाची हेळसांड करण्यात आली आहे. एका अर्थाने मृत्यूनंतरही छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय प्रशासनाने संबंधित मृत व्यक्तीला नरक यातना दिल्याचे समोर आले आहे.. एक तासाहून अधिक काळ मृत्यदेह पावसात ठेऊन कर्मचारी गायब झाला होता.. हा प्रकार ज्या लोकांच्या नजरेस पडला त्यांनी याचे व्हिडिओ समाज माध्यमावर टाकले आहेत..
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासांसाठी रेड अलर्ट
आसनव्यवस्था, पार्किंग अन् बरंच काही... ठाकरे एकत्र येणार गर्दी होणार! असा आहे मेगाप्लान https://t.co/zCWIc96e5M
पार्किंगपासून सर्वकाही ...; दुचाकीचं पार्किंग ते हजारोंची आसनव्यवस्था...पाहा सविस्तर वृत्त... #news #UddhavThackeray #Rajthackeray #morcha #Mumbai— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 3, 2025
धीरेंद्र शास्त्री यांच्या वाढदिवसापूर्वी बागेश्वर धाममध्ये एका मोठ्या अपघाताची बातमी समोर आली आहे. धाममध्ये झालेल्या अपघातात एका भाविकाचा मृत्यू झाला असून सुमारे आठ जण जखमी झाले आहेत.
गेल्या सहा महिन्यांत मुंबईत घरांसाठी ओतला गेला पाण्यासारखा पैसा; आकडा पाहून म्हणाल किती ही श्रीमंती...
https://t.co/rHIQutqs0V
स्टॅम्प ड्युटीचाच आकडा पाहून हैराण व्हाल... #news #Mumbai #realestate— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 3, 2025
गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री पदाचा तिडा लवकरच सुटणार आहे. 15 ऑगस्टच्या आधी पालकमंत्री पद घोषित केले जाणार आहे. भरत गोगावले यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
नाशकात महाविकास आघाडीला मोठा धक्का. ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पदाधिकाऱ्यांचा भाजप प्रवेश. गणेश गीते, सचिन मराठे, प्रशांत दिवे, सीमा ताजने, कमलेश बोडके यांचा भाजप प्रवेश. मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने भाजप प्रवेश. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पक्ष प्रवेश.
लातूरच्या त्या शेतकऱ्याला सोनू सूदची सर्वात मोठी मदत! म्हणाला, 'तुम्ही नंबर पाठवा, मी तुम्हाला...'https://t.co/i2SYdWjnYZ
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 3, 2025
राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही. महाराष्ट्र आता पुढे गेला आहे. रस्त्याने चालणारे, घरात राहणारे आणि पुलावर असणारे सुरक्षित राहिलेले नाहीत. जे आयपीएस अधिकारी आहेत ते आपल्या अधिकाराचा वापर करून गुन्हेगारी थांबवत होते त्यांना बाजूला ठेवले जात आहे.
सूर्यमालेत Interstellar Object ची घुसखोरी; महाकाय वस्तूमुळं वाढली धाकधूक https://t.co/ZVm74OaQwO
सूर्यमालेत बाहेरच्या विश्वातून आलेल्या महाकाय शिळेचा वावर...पृथ्वीपासून ती किती दूर? #news #interstellarobject #Spacenews— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 3, 2025
नाशिकमधील शिवसेना UBTचे नेते मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.त्यांच्या भाजप प्रवेशाला ब्रेक लागला आहे. भाजपवर जोरदार टीका होऊ लागल्याने हा पक्षप्रवेश लांबल्याची माहिती आहे. बागुल आणि राजवाडे यांच्यावर नाशिकमध्ये गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. तेव्हापासून हे दोघे गायब होते.
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी काल अर्बन नक्षलवाद्यांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर विरोधक आक्रमक. वारीत संविधानाचा मुद्दा उपस्थित करत वारीला बदनाम करण्याचा काही मंडळी प्रयत्न करत असून यांच्या माध्यमातून वारीमध्ये अर्बन नक्षलवाददी घुसलेत असा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हातात संविधानाची लाल रंगाची प्रत घेऊन विधानभवनात दाखल झाले. त्यानंतर विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारच्या विरोधात घोषणाबाजीला सुरूवात केली. वारीला बदनाम करणाऱ्या आणि संविधानाचा विरोध करणाऱ्या सरकारचा विरोध आशा घोषणा दिल्या जात आहेत.
नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 20 मधील एका निवासी सोसायटीमध्ये गुरुवारी पहाटे एक मोठा अपघात घडला. सोसायटीची सुरक्षा भिंत अचानक कोसळली, ज्यामुळे जवळच उभ्या असलेल्या चार दुचाकी, बाईक आणि स्कूटर थेट खड्ड्यात पडल्या. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
आज शिवतीर्थ येथे मनसे नेत्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीसाठी मनसेचे नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर, अविनाश अभ्यनकर, संदीप देशपांडे बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत.
शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात रस्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी सांगलीचे खासदार विशाल पाटलांसह 40 ते 50 जणांच्या वर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्ह्यामध्ये प्रतिबंधात्मक आदेश असताना रास्तारोको आंदोलन करून वाहतूक ठप्प करत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्या मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात एक जुलै रोजी सांगलीच्या अंकली येथे कोल्हापूर- सांगली महामार्गावर सामाजिक संघटना व शेतकऱ्यांनी एकत्रित येत रास्ता रोको आंदोलन केले होते. यामध्ये खासदार विशाल पाटलांनी देखील सहभाग घेतला होता.
आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी देणारा टेक्स्ट मेसेज त्यांचे स्वीय सहाय्यकाच्या मोबाईलवर आला आहे. ही घटना बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात रात्री उशिराने तक्रार देण्यात आली आहे.याबाबत सुहास साहेबराव शिरसाठ यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार हे आमदार संग्राम जगताप यांचे स्वीय सहाय्यक आहेत. त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी व्यक्तीने मेसज पाठविला. दो दिन के अंदर आमदार संग्राम जगताप को खत्म करुंगा, अशा आशयाचा हा मेसेज आहे. अधिक तपास कोतवाली पोलिस ठाण्याच्या सहाय्यक फौजदार अमिना शेख करत आहेत. यापूर्वी आमदार संग्राम जगताप व त्यांच्या कुटुंबियांबाबत चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आमदार जगताप सध्या पावसाळी अधिवेशनासाठी मुंबई येथे आहेत.
विधानसभेत पुन्हा कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वादग्रथ वक्तव्याबाबत गदारोळ होण्याची शक्यता. पावसाळ्याधी राज्यभरात पावसाने हजेरी लावल्याने रब्बी हंगामातील पिकांचे झालेलं नुकसान शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिला पाहिजे यासाठी विरोधात होणार आक्रमक.
आषाढी वारीत अर्बन नक्षलांचा शिरकाव झाला आहे त्यांना तत्काळ रोखा अशी मागणी, आमदार मनीषा कायंदे यांची पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सभागृहात सरकारकडे केली. वारीमध्ये सध्या संविधान दिंडी पर्यावरण वारी या नावाखाली, तसंच लोकायत संघटनांचे लोक दिंडीत जाऊन पथनाट्य करतात, भाषणं देतात आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतात असा आरोप मनिषा कायंदे यांनी केला. सरकार आणत असलेले जनसुरक्षा विधेयक अशा प्रवृत्तींना रोखण्यासाठीच आहे असा उल्लेख यावेळी कायंदे यांनी केला. तर याप्रकरणी योग्य कारवाई केली जाईल असं उत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं.
राज्यभर गाजत असलेल्या तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींवर मोक्का लावण्याच्या हालचाली धाराशिव पोलिसांकडून सुरू आहेत. पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे.
पावसाळी पर्यटनात पर्यटकांच्या अतिउत्साहात जीव गमावण्याच्या घटना घडत असतानाच महाडच्या नाणेमाची धबधब्यावर ट्रेकर्सची जीवघेणी स्टंटबाजी समोर आलीय. धो धो वाहणाऱ्या धबधब्याच्या दोन्ही बाजूला दोरखंड बांधुन या चमूने केलेल्या साहसी खेळांचे व्हिडिओ समाज माध्यमांवर पहायला मिळतात. काळजाचे ठोके चुकवणाऱ्या या व्हिडिओतील स्टंटबाजी जीवघेणी ठरू शकते. अशा स्टंटबाजांमुळे पावसाळी पर्यटन बदनाम होत असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
शासकीय जमिनीवर आणि इतर शेतकऱ्यांच्या नावावर बोगस पिकविमा अर्ज दाखल करणाऱ्या 40 सामाईक सुविधा केंद्रावर (CSC सेंटर) नांदेडमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सुविधा केंद्र चालकांनी नांदेड सह परभणी, लातूर, बीड, पुणे आणि उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावावर आणि शासकीय जमिनीवर बोगस पिकविमा भरला होता. एकूण 4453 शेतकऱ्यांच्या नावावर अश्याप्रकारे बोगस पिकविमा भरण्यात आला होता.
शिवसेना भवनासमोर उद्धव - राज ठाकरेंसोबतच आदित्य- अमित ठाकरेंचे फोटो असणारे बॅनर झळकले. "मराठी माणसाने एकजूट व एकत्र व्हावे हीच काळाची खरी गरज व आमची ताकद" अशा आशयाचे बॅनर वरळी, दादर आणि परळ या भागात पाहायला मिळत आहेत. ठाकरे प्रेमी परेश तेलंग यांनी हे बॅनर लावले आहेत.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.