Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यात पावसाळी अधिवेशनाचा आजचा पाचवा दिवस आहे. तर, एकीकडे मनसे आणि शिवसेनेच्या विजयी मेळाव्याची जय्यत तयारी सुरू आहे. त्याशिवाय दिवसभरात राज्यभरात घडणाऱ्या घडामोडींचे ताजे अपडेट्स जाणून घेऊयात या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून
आपण महाराष्ट्रात राहिल्यानंतर मराठी शिकण्याचा असा आग्रह करु शकतो, पण दुराग्रह करु शकत नाही. मी उद्या तामिळनाडूमध्ये गेल्यानंतर कोणीही मला हा दुराग्रह करु शकत नाही की, मी तामिळ शिकली पाहिजे. मला आवडते तामिळ भाषा, चांगली भाषा आहे. पण मला कोणी दुराग्रह नाही करु शकत. मला मराठीत बोलायची आहे तर मी मराठीत बोलेन. पण मला तिथे कोणी दुराग्रह करेल तर तो योग्य असेल का? आपण एका देशात राहतो भारतात राहतो. हे आपल्या बाजूचे राज्य, भाषा हे काहीपाकिस्तान नाही. एवढी संकुचित मनोवृत्ती मराठी माणूस ठेवू शकत नाही.
Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना आव्हान देणारे सुशील केडिया कोण आहेत?https://t.co/mWbW8jxbdh#Marathi #MNS #RajThackeray #SushilKedia #Maharashtra #Mumbai
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 4, 2025
महाराष्ट्रात मराठीवरुन वातावरण पेटलं असतानाच एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणाhttps://t.co/nWtrj8n3dP#EknathShinde #JaiMaharashtra #JaiGujarat #Shivsena #Maharashtra
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 4, 2025
'मी मराठी शिकणार नाही अशी शपथ घेतो, काय करायचं बोल?,' उद्योजकाचं राज ठाकरेंना जाहीर आव्हानhttps://t.co/2fDuExbwY7#RajThackeray #MNS #Marathi #Shivsena #UddhavThackeray @sushilkedia @mnsadhikrut #Hindi
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 4, 2025
'अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रुप...'; शिंदेंच्या जय गुजरात घोषणेनंतर संजय राऊत म्हणाले, 'हा माणूस महाराष्ट्र...'#maharashtra #marathihttps://t.co/L3BVIpiZnb
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 4, 2025
'एकतर भोंदू आहेत किंवा...', शिंदेंनी 'जय गुजरात' नारा दिल्यानंतर शिवसेनेकडून उद्धव ठाकरेचा व्हिडीओ पोस्ट; करुन दिली आठवणhttps://t.co/NRk4pMICkl#EknathShinde #Shivsena #Maharashtra #Marathi #JaiGujarat #UddhavThackeray
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 4, 2025
'व्यावसायिकाला मराठी येत नाही म्हणून...' मुख्यमंत्री स्पष्टच म्हणाले...#marathi #CMDevendraFadnavishttps://t.co/i8RPmeE4Iw
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 4, 2025
उद्योजक सुशील केडिया यांनी मराठी भाषा शिकणार नाही, जे हवं ते करा असं आव्हानच थेट राज ठाकरे दिलं आहे. त्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी सुशील केडियांच्या वक्तव्याचं समर्थन आहे. केडियांचं वक्तव्य 100 टक्के संविधानिक असून कोणती भाषा बोलावी हे मुलभूत हक्क आहेत, असं सदावर्ते म्हणालेत. राज्यातील शाळांमध्ये हिंदी शिकवण्याच्या निर्णयाला मनसे आणि शिवसेनेकडून झालेल्या विरोधानंतर आता राज्यात मराठी-हिंदी भाषेचा वाद पेटला आहे. महाराष्ट्रात राहूनही मराठीला दुय्यम स्थान दिलं जात असल्याने स्थानिक पक्षांकडून संताप व्यक्त केला जात असून, यामुळे ठिकठिकाणी विरोध होत आहे. या विरोधातूनच काही ठिकाणी हिसक घटना घडत आहे. नुकतंच मनसेच्या कार्यकर्त्यांनी मिरा रोडमध्ये एका उद्योजकाच्या कानाखाली लगावल्यानंतर गुजराती, मारवाडी व्यापारी रस्त्यावर उतरले आहेत. त्यातच आता एका उद्योजकाने थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आपण मराठी शिकणार नाही, जे हवं ते करा असं आव्हानच दिलं आहे.
मराठी हिंदी वाद सुरू असताना महाराष्ट्र सरकारचा नवीन निर्णय. 3 ऑक्टोबर हा अभिजात मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येणार त्यासंदर्भातील शासन निर्णय झाला जाहिर.
गुजरातच्या तुकड्यांवर महाराष्ट्राचे लचके तोडायचा विडा उचलेल्यांनी शेवटी मावशीला आई मानलंच, असं मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी म्हटलं आहे. पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरचा उद्घाटन समारंभाच्या भाषणात एकनाथ शिंदे हे जय गुजरात म्हणाले होते.
Maharashtra Breaking News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावर 'महाभियोग' चालविण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. मोठ्या विरोधी पक्षांना न्यायमूर्ती वर्मा यांना हटविण्यावर तत्वतः सहमती दिलीय. त्यामुळे आता खासदारांच्या सह्या गोळा करणार असल्याचं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितलंय
Maharashtra Breaking News LIVE Updates: अंबरनाथ आणि बदलापूर शहरात काही महिन्यांपासून पूर्णवेळ नगररचनाकार नसल्यानं कामं ठप्प झालीत, अशी तक्रार बिल्डर असोसिएशननं केलीय. विकासकांमांच्या परवानग्या आणि दाखले रखडले आहेत. त्यामुळं पूर्णवेळ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी बिल्डर असोसिएशननं केलीय.
पुण्यातील एका कार्यक्रमात एकनाथ शिंदेंकडून जय गुजरातची घोषणा देण्यात आल्याचे समोर आले आहे.
पहिल्या पतीवर जीवघेणा हल्ला, नंतर लिव्ह-इनमध्ये राहिली आता सासूलाच संपवले...; जेलमधून सुटलेल्या पूजाचा क्रूर चेहराhttps://t.co/GHERyDKUgR
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 4, 2025
राज ठाकरे मी 30 वर्ष मुंबईत राहूनही मला मराठी येत नाही, आणि तुमच्या या कार्यकर्त्यांच्या वागणुकीमुळे मी आता प्रतिज्ञा करतो की, मी आता मराठी शिकणार नाही, काय करायचंय ते बोला?, असं ट्विट त्यांनी केलं आहे.
गोरेगाव येथील ओबेराय स्काय सिटीच्या मागील गोडाऊनमध्ये आग. गोडाऊनमध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग. आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू. कोणतीही जीवितहानी नाही
लोणार तालुक्यातील वढव या गावचे माजी सरपंच अशोक आबाजी सोनवणे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केलये. 11 मे रोजी सोनवणेंची हत्या झाली होती. जमिनीच्या वादातून त्यांची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला होता.यातील दोघांना अटक केली असून अद्याप एक आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
Maharashtra Breaking News LIVE Updates: मनसे विरोधात मीरा भाईंदरमध्ये काढलेल्या मोर्चासा संदीप देशपांडेंनी उत्तर दिलंय.. महाराष्ट्रात कुठली भाषा चालते हे माहिती नाही का असा सवाल त्यांनी विचारलाय.. भाजप आमदार नरेंद्र मेहतांनी दिलेल्या इशा-यालाही त्यांनी उत्तर दिलंय. मराठीचा अपमान केल्यास तिथेच कानाखाली बसेल असं देशपांडे म्हणालेत
अनेक वर्षानंतर उद्धव आणि राज ठाकरे एकत्रित येत असल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष ठिकठिकाणी पाहायला मिळतोय. ठाकरे एकत्रित यावेत हीच जनमानसाची भावना आहे असा मानस बाळगून कार्यकर्ते आपला आनंद व्यक्त करीत आहेत.
उद्धव ठाकरेंमुळे राज ठाकरे देश सोडणार होते असा गौप्यस्फोट शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलाय. आम्ही राज ठाकरेंना थांबवल्याचा दावाही कदम यांनी झी २४ तासशी संवाद साधताना केलाय. रामदास कदमांच्या या दाव्यावर आदित्य ठाकरेंनी जोरदार पलटवार केलाय
Maharashtra Breaking News LIVE Updates: पेशव्यांनी स्वराज्याची मशाल पुढे नेलीः अमित शाह
Maharashtra Breaking News LIVE Updates: थोरले बाजीराव पेशवे यांनी 20 वर्षात 41 युद्ध लढले आणि ते सर्व जिंकले देखील. अशा वीर योद्धाचा पुतळा आज एनडीएत उभारला गेलाय याचा अभिमान वाटतो, असं अमित शहांनी म्हटलं आहे.
Maharashtra Breaking News LIVE Updates: 17व्या शतकात पुण्यातून स्वातंत्र्याचा हुंकारः अमित शाह
Maharashtra Breaking News LIVE Updates: पुण्याच्या धर्तीवरून मी छञपती शिवाजी महाराजांनी नमन करतो. 17 व्या शतकात इथूनच पेशव्यांनी मराठा साम्राज्याने अटकेपार झेंडे लावले.एनडीए हे प्रेरणास्थान हे देशाच्या सुरक्षेचं म्हणूनच पेशवा बाजीरावांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाणं हे सर्वाधिक उचित आहे, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
Maharashtra Breaking News LIVE Updates: पुण्याची भूमी स्वराज्याच्या संस्कारांचे उगमस्थानः अमित शाह
विधानसभेच्या विशेष बैठकीला काही मंत्री आणि काही सदस्य उपस्थित नसल्याने लक्षवेधी पुढे ढकलण्याची वेळ. पणनमंत्री जयकुमार गोरे गैरहजर असल्याने नाराजी. लक्षवेधी मांडणारा सदस्यही अनुपस्थित. मंत्री, काही सदस्य गैरहजर असल्यानं पुढे ढकलली
बंदी असताना तंबाखू, पानमसाला, गुटखा येतो कुठून असा सवाल आमदार विक्रम पाचपुते यांनी विधानसभेत केलाय.. तर मनुष्यबळ कमी असल्याने समस्या आहेत असं उत्तर अन्न औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिलंय..
बहुचर्चित शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांना सुदबुद्धी दे असं साकडं महाविकास आघाडीचे नेते पंढरपूरच्या विठ्ठलाला घालणार आहे. आज सकाळी 11 वाजता पंढरपूर मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील, खासदार विशाल पाटील, खासदार प्रणिती शिंदे , आमदार विजय वडेट्टीवार हे टाळ वाजवत भजन करत संत नामदेव पायरी कडे जातील. तिथे प्रतिकात्मक विठ्ठल मूर्तीला अभिषेक घालणारेत
Maharashtra Breaking News LIVE Updates: मुंबई महापालिकेच्या 55 शाळांच्या इमारतींची दुरुस्ती गेल्या दोन ते तीन वर्षापासून सुरू असून, हे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याची टीका होतेय. 15 शाळांच्या दुरुस्तीसाठी एक वर्षाची मुदत देण्यात आली होती.मात्र अद्याप ही दुरुस्ती झालेली नाही. शाळांची दुरुस्ती रखडल्यामुळे मुलांना शाळेत अडचणींना सामोरं जावं लागतंय
Maharashtra Breaking News LIVE Updates: पुण्याच्या जुन्नरमधील गणेश खिंड परिसरात निसर्ग बहरल्याचं पहायला मिळतंय. हिरवागार निसर्ग , सोसाट्याचा वारा , आणि पाऊस हे नयनरम्य दृश्य पर्यटकांनाही आकर्षित करतंय. त्यामुळे पर्यटकही या वातावरणाचा आनंद घेतायं.
Maharashtra Breaking News LIVE Updates: रायगडच्या पोलादपूर महाबळेश्वर दरम्यान असलेल्या आंबेनळी घाटात रात्री उशिरा दरड कोसळली. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने ही दरड हटवली. दऱड हटवल्यानंतर वाहतूक सुरू करण्यात आली. पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
हिमालयाच्या हाती भारताचं भविष्य; पर्वताची मूळ जागा किंचितही बदलल्यास माजणार त्राहिमाम! https://t.co/QbdkmYnnaE
संकट अटळ! हिमालयाची एकंदर रचना आणि त्याचं स्थान पाहता का सुरुय ही चर्चा? भारतावर सावट? एका क्षणात सर्वकाही बदलणार जर....#news #himalaya #GK— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 4, 2025
Maharashtra Breaking News LIVE Updates: धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांवर नव्या संकटाचं सावट आहे. जिल्ह्यात 15 दिवसांपासून पाऊस गायब झालाय. त्यामुळे तीन लाख हेक्टरवरचं खरिपाचं पीक धोक्यात आलंय. आता शेतक-यासमोर दुबार पेरणीचं संकट आलंय. विशेषतः सोयाबीनचं पीक पाण्याअभावी माना टाकू लागलंय.
6 जुलैला भारतातील 'या' राज्यावर विनाशकारी संकट? वाचण्यासाठी फक्त 2 दिवसांचा वेळ!#Floodwaterhttps://t.co/ZKbFOpFlaF
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 4, 2025
उद्याचा ठाकरेंचा विजयी मेळावा ऐतिहासिक आणि राजकीय बदल घडवणारा असेल असा विश्वास खासदार संजय राऊतांनी व्यक्त केलाय. यावेळी राऊतांनी शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधलाय. शिदेंच्या नेत्यांना भविष्य संपतंय याची भीती आहे असा हल्लाबोलही राऊतांनी केलाय..
Maharashtra Breaking News LIVE Updates: उद्या पुन्हा ठाकरी बाणा, ठाकरी विचार लोकांना कळणारः बाळा नांदगावकर
Maharashtra Breaking News LIVE Updates: नागपूर रेल्वे स्टेशनवरचा प्लॅटफॉर्म क्रमांक 7 आजपासून पुढचे 52 दिवस बंद असणारेय. या प्लॅटफॉर्मवर महत्त्वाची कामं केली जाणारेय. यामुळे अजनी रेल्वेस्थकावरून ३ गाड्या चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलाय.... सोबतच प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर देखील विकासकाम करण्यात येणार असल्याने या प्लॅटफॉर्मवर ५ दिवस २ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे..
Maharashtra Breaking News LIVE Updates: मुंबई महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील बहुतेक शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून काम करण्याचे आदेश देण्यात आले होते.मात्र हा आदेश तातडीने मागे घेऊन निवडणूक कामातून शिक्षकांची मुक्तता करावी, अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेने केलीय. ही मागणी मान्य न कल्यास आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिलाय.
छत्रपती संभाजीनगरच्या सिडको भागात भिषण अपघात झालाय.. एका भरधाव कारनं मॉर्निंग वॉक करणा-या चार ते पाच नागरिकांना चिरडलंय. काळा गणपती मंदिरासमोर हा अपघात झालाय. यात दोघांचा जागीच मृत्यू झालाय तर इतर गंभर जखीमी झालेत.. कारनं एका बाईक आणि सायकलस्वारालाही धडक दिलीये.. दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करत आहेत.
महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला.भाजपच्या वाट्याला 48 टक्के. शिवसेना 29, राष्ट्रवादीला 23 टक्के महामंडळं.समन्वय समितीच्या बैठकीत फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब
Maharashtra Breaking News LIVE Updates: एससीईआरटी'च्या सुधारित वेळापत्रकातून हिंदी हा विषय हटविण्यात आला आहे. SCERTने सुधारित वेळापत्रक जारी केले. त्यामुळे आता मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळामध्ये केवळ या दोनच भाषा शिकवल्या जाणार आहेत. हे सुधारित वेळापत्रक इयत्ता पहिली व दुसरीसाठी यावर्षीपासून बंधनकारक असेल.
अंबरनाथमध्ये मनसे आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिका-यांनी एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत 5 जुलै रोजी होणा-या विजयी मेळाव्याचं नियोजन करण्यात आलं. या विजयी मेळाव्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणारेत.
Maharashtra Breaking News LIVE Updates: दोन्ही ठाकरे बंधूंचं आणखी एक पत्र प्रसिद्ध झालंय. 5 जुलैच्या विजयी मेळाव्यात लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहा, असं आवाहन त्यांनी पत्रातून जनतेला केलंय... ' मराठी माणसाच्या एकजुटीमुळे सरकारला माघार घ्यावी लागली.. चला, हा विजयी क्षण साजरा करूया, आवर्जून उपस्थित राहा', असं पत्रात लिहिलंय. या पत्राच्या शेवटी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं नाव छापलंय.
मुंबईतील कबुतरखान्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. क्षयरोगासारख्या आजाराने अनेकांचा मृत्यूही झाला असून मुंबई महापालिकेने हे कबुतरखाने बंद करण्यासाठी तत्काळ मोहीम राबवावी. त्याचबरोबर कबुतरांमुळे होणाऱ्या आजारांबाबत जनजागृती करावी, असे निर्देश सरकारच्या वतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत मुंबई महापालिकेला दिले. मुंबईत 51 कबुतरखाने असून त्यातील काही कबुतरखाने हे शंभर- दीडशे वर्षे जुने आहेत. यातील काही बंद आहेत तर काही सुरू आहेत.
Maharashtra Breaking News LIVE Updates: 5 जुलैच्या विजयी मेळाव्याची आज रंगीत तालीम. मनसे-शिवसेना UBTनेत्यांच्या बैठकीत रणनीती ठरली .
Maharashtra Breaking News LIVE Updates: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुणे दौ-यावर, विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सहभागी होणार.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.