Maharashtra Breaking News LIVE Updates: महाराष्ट्रसहीत देशभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या एकाच ठिकाणी
शिवरायांच्या अवमानाप्रकरणी आणि इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर झाला आहे. कोल्हापूर सत्र न्यायालयानं कोरटकरला जामीन दिला आहे. मात्र, संभाजी ब्रिगेडनं आक्रमक पवित्रा घेतला आहे. प्रशांत कोरटकरला जोड्यानं मारल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या संतोष शिंदेंनी दिला आहे.
घरगुती सिलेंडरमध्ये झालेल्या दरवाढी विरोधात उद्धव ठाकरे पक्षाने केंद्र सरकारची तीरडी यात्रा काढत आंदोलन केलं आहे.
धनंजय मुंडे आणि करुणा शर्मा यांच्यातील संबंध हे वैवाहिक स्वरुपाचे आहेत. त्यामुळे करुणा या घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत दिलासा मिळण्यास पात्र आहेत- सत्र न्यायालय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्रीवरील झालेल्या विविध बैठकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची गैरहजेरी.
स्साजोग चे सरपंच संतोष देशमुख खुन खटल्याची उद्या बिड न्यायालयात सुनावणी होणार आहे. या खटल्यातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड सह इतर सात जणांवर उद्या न्यायालयात चार्ज फेम करण्यात येणार आहे.
पुणे जिल्हा प्रशासनाकडून बनेश्वरचा रस्ता 2 मे रोजी सुरू करण्याबाबत लेखी आश्वासन. सुप्रिया सुळे यांनी आंदोलन सोडलं. ग्रामस्थांकडून जल्लोष.
शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर. जिल्हा सत्र न्यायाधीश डी.व्ही कश्यप याचा निर्णय. कोरटकरला जिल्हा सत्र न्यायालयाचा दिलासा.
खासदार अरविंद सावंत आणि वर्षा गायकवाड यांच्याविरोधात मुंबईत बॅनरबाजी. संसदेत वक्फ बोर्डविरोधात भूमिका घेणाऱ्या खासदारांचा मुंबईत बॅनर लावत निषेध व्यक्त करण्यात आला आहे. बॅनरबाजीमुळे मुंबईतील राजकारण तापण्याची शक्यता आहे.
गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने वरळी येथे आंदोलन. मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी.
छत्रपती शिवरायांच्या अवमानप्रकरणी जेलमध्ये असलेल्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर थोड्याच वेळात निकाल येणार आहे. कोल्हापूर सत्र न्यायालय जामीन अर्जावर निकाल देणार आहे. कोरटकरचा कोठडीतील मुक्काम वाढणार की बेल मिळणार याकडे लक्ष असणार आहे.
डॉ घैसासांविरोधात दोन दिवसात कारवाई होणार असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी दोन अहवाल सादर करण्यात आले आहेत. डॉ घैसास यांनी राजीनामा दिल्यानंतर आता शासन कारवाईची टांगती तलवार त्यांच्यावर आहे.
शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून प्रखर विरोध होत असतांना सरकार शक्तीपीठ महामार्ग पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे...त्याच्याविरोधात राजू शेट्टी आक्रमक झाले असून त्यांनी हिंगोलीच्या कळमनुरीत शक्तिपीठचं काम बंद पाडलंय... जमीन तपासणीसाठी आलेल्या पथकाला रोखलं आहे..
--कुणाल कामराच्या समर्थनातील याचिका निकाली
--कामरा प्रकरण कोर्टात प्रलंबित असल्याने नव्या याचिकेची गरज नाही
--मुंबई हायकोर्टाचं महत्त्वपूर्ण निरीक्षण
पोलिस सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेणारे माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे आता राजकारणात उतरले आहेत. त्यांनी बिहारमध्ये हिंद सेना नावाच्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. बिहारमध्ये या वर्षाअखेरीस होणारी विधानसभा निवडणूक हा पक्ष लढविणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना बेशिस्त वागणुकीवरुन झापलं असल्याची माहिती आहे. सातत्याने माध्यमांमध्ये पक्षाला अडचणीची ठरणारी वक्तव्य करणे, जनता दरबारला पक्ष कार्यालयात हजर न राहणे यावरून अजित पवारांनी झापलं असल्याची सूत्रांची माहिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काल नियमित मंगळवारची बैठक देवगिरी निवासस्थानी पार पडली यावेळी सुनावल्याची माहिती आहे.
कोल्हापुरातील शिवाजी चौकात गॅस सिलेंडर समोर ठेवून महागाईच्या विरोधात आंदोलन केले जात आहे. लाडक्या बहिणींना फसवणाऱ्या सरकारचा निषेध म्हणून देखील हे आंदोलन केले जात आहे.
मुंबईतील 26/11 हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला आज रात्री भारतात आणलं जाणार असल्याची माहिती आहे...त्यासाठी NIAची एक टीम अमेरिकेत गेली आहे...राणाच्या प्रत्यापर्णाची प्रक्रिया पूर्ण करून त्याला आजच रात्री भारतात आणलं जाण्याची शक्यता आहे... दरम्यान त्याला नेमकं मुंबईत की दिल्लीत आणलं जाईल याबाबत अजून कुठलीही स्पष्टता नाही...
अज्ञात व्यक्तीकडून देशपांडेंना धमकीचे फोन
देशपांडेंकडून दादर पोलिसात तक्रार दाखल
मराठी विरुद्ध अमराठी वादाच्या पार्श्वभूमीवर धमकी आल्याची माहित
सातबारा कोरा करण्याची क्षमता नव्हती तर आश्वासन का दिले, अजित पवार या आधीही अर्थमंत्री होते, त्यांना खडा न खडा माहिती होती तर का गंडवले, त्यांनी केलेली फसवणूक महागात पडेल अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी नांदेडमध्ये दिली
सोलापूरला अवकाळी पावसाचा फटका बसलाय.. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात वादळी वा-यासह तुफान गारपीट झालीये.. आंदेवाडी खुर्द, शावळ, कुंभार वस्ती, वादगरी, शिरवळ, बादोले या गावांमध्ये गारांचा पाऊस पडला.. या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय.. तर वादळीवा-यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली असून घरांचं पत्रेही उडालेत.. या अवकाळी पावसामुळे अनेक गावांतील वीज पूरवठा खंडीत झालाय..
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी पुण्या ठिय्या आंदोलन सुरू केलंय. मतदारसंघातील एका रस्त्याच्या कामासाठी त्यांनी आंदोलनाचा हत्यार उपसलंय. बनेश्वर रस्त्याचं काम वारंवार मागणी करुनही पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे सुप्रिया सुळेंनी आंदोलन सुरू केलंय. दीड किलोमीटरचा रस्ता का होत नाही असा सवाल करत सुळेंनी विचारलाय. अनेकदा पत्र व्यवहार करून आणि मंत्र्यांची भेट घेऊनही रस्त्याचं काम केलं जात नसल्याचं सुळे म्हणाल्यात..
गोदावरी मधील प्रदूषण मनसे आक्रमक. गोदा पत्रात उतरून मनसेची घोषणाबाजी
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आज उपोषणाला बसणार आहेत. सुप्रिया सुळे त्यांच्याच मतदारसंघातील एका रस्त्याच्या कामासाठी आज उपोषण आंदोलन करणार आहेत. बनेश्वर रस्त्याचं काम वारंवार मागणी करुनही पूर्ण झालेलं नाही. यासंदर्भात आंदोलनाचा इशारा याआधी सुप्रिया सुळे यांनी दिला होता. मात्र त्यावेळी PMRDAचे प्रमुख योगेश म्हसे यांनी तातडीनं रस्त्याचं काम पूर्ण करण्याची ग्वाही दिली होती. त्यामुळे सुळे यांनी आपलं नियोजित आंदोलन रद्द केलं होतं. मात्र त्यानंतही काम अपूर्णच असल्यानं अखेर आज पुन्हा एकदा सुप्रिया सुळे उपोषणाचं हत्यार उपसणार आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरण समितीची 2025-26 या आर्थिक वर्षातील पहिली द्वैमासिक बैठक आज, बुधवारी, 9 एप्रिल रोजी आपला निर्णय जाहीर करणार आहे. या बैठकीत रेपो दरात 25 बेसिस पॉईंट्स कपात होऊन तो 6 टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
राज्य सरकारने आरोग्य कर्मचा-यांना बायोमेट्रीक फेसरीडींग हजेरीची सक्ती केलीय. मात्र याला रायगडमधील कर्मचा-यांनी विरोध केलाय. या निर्णयामुळे अनेक समस्या उद्भवण्याची भिती कर्मचा-यांनी व्यक्त केलीय.
Maharashtra Breaking News LIVE Updates: सिडकोकडून 24 तासांत 12 भूखंड विक्रीच्या निविदा काढल्यात. नियमांचे उल्लंघनकरणा-या 16 भूधारकांचे भूखंड सिडकोने ताब्यात घेतलेत. विशेष म्हणजे त्यानंतर अवघ्या चोवीस तासांत यापैकी 12 भूखंडांच्या विक्रीसाठी निविदाही काढल्यात.
Maharashtra Breaking News LIVE Updates: वांद्रे, वरळीतील म्हाडा इमारतींचा एकत्रित विकास केला जाणारेय..मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विकासकामाला मंजुरी देण्यात आलीय... आता 51 टक्के संमतिपत्र सादर करणं बंधनकारक असणारेय..याअंतर्गत वांद्रे रिक्लमेशन, वरळीतील आदर्शनगर इमारतींचा पुनर्विकास होणारेय
मुंबई पोलीस, आमदार मुरजी पटेलांना न्यायालयाची नोटीस बजावलीय. 16 एप्रिलपर्यंत कुणालला अटकेपासून संरक्षण मिळालंय..तर कामराच्या याचिकेवर पुढील सुनावणी 16 एप्रिलला होणारेय..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वय झालं असलं तरी ते स्ट्रॉंग आहेत. त्यामुळं ते चौथ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं. विरोधकांना वादंग उठवल्याशिवाय दुसरं काही काम राहिलेलं नाही. त्यांच्यामध्ये आता एकजूट राहिलेली नाही असेही आठवले म्हणालेत.
पिंपरी-चिंचवड शहराची ऐतिहासिक ओळख असणाऱ्या क्रांतिकारी चापेकर बंधूंचे चिंचवडगावातील स्मारक. यासह चापेकर वाडा अर्थात क्रांतीतीर्थाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८ एप्रिल रोजी होणार आहे... चिंचवडमधील चापेकरवाडा हा भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा वारसा आहे. चापेकर बंधूंनी इंग्रजांविरोधात लढा देत बलिदानाने स्वातंत्र्याच्या लढ्याला प्रेरणा दिली होती. या पार्श्वभूमीवर, चापेकर स्मारक निर्मिती आणि त्याचे उद्घाटन हा शहरासाठी ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.
--रुग्णालयाच्या 100 मीटर आवारात प्रतिबंधात्मक आदेश
---पुणे पोलिसांकडून आदेश जारी
--रुग्णालय आवारात मोर्चे, आंदोलनांना बंदी
--आजपासून 19 एप्रिलपर्यंत आदेश लागू असणार
Maharashtra Breaking News LIVE Updates: नवी मुंबईतल्या बेलापूरमध्ये अंगणवाडी कर्मचा-यांनी 1 दिवसीय धरणं आंदोलन केलंय. अंगणवाडीत पूर्वीप्रमाणेच पाकीट बंद आहार वाटप करावा, फेस रेकग्नेशन प्रणाली सुरू करावी या मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन केलं.
Maharashtra Breaking News LIVE Updates: पश्चिम बंगालमध्ये वक्फ दुरुस्ती कायद्याला विरोध होतोय. वक्फ दुरुस्ती कायद्याविरोधात हिंसक आंदोलन होतायत. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केलीय...
पोलिसांच्या वाहनांची जळपोळ झाल्याचीही माहितीय. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केलाय..
Maharashtra Breaking News LIVE Updates: पुण्यात मध्यरात्री एका घरात सिलिंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागी. आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. वारजे माळवाडी परिसरात ही घटना घडली.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर मंगळवारी, व्हाईट हाऊसने चीनवर तब्बल १०४% टॅरिफ (जशास तसा) कर लादला असून, तो बुधवारपासून म्हणजेच ९ एप्रिलपासून लागू होणार आहे. जर चीनने अमेरिकेवर लादलेला ३४% कर मागे घेतला नाही तर चीनवर अतिरिक्त ५०% कर लादला जाईल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली होती. ती धमकी ट्रम्प यांनी खरी करून दाखविली आहे.
Maharashtra Breaking News LIVE Updates: बेस्ट उपक्रमाला नव्या आर्थिक वर्षात मुंबई महापालिकेकडून 1 कोटी रुपये निधी दिला जाणारेय...त्यापैकी पहिला 100 कोटींचा हप्ता प्रशासनाने बेस्ट उपक्रमाला दिलाय... या अनुदानातून कर्मचा-यांना, सेवा निवृत्तीची थकबाकी द्या, असे आदेश उच्च न्यायालयाने दिलेत..
Maharashtra Breaking News LIVE Updates: अंबरनाथच्या कोहोजगावातील जतीन उमेश पाटील हा ठाणे जिल्ह्यातील सर्वात तरुण पायलट बनलाय... जतीनने वयाच्या 20 व्या वर्षी वैमानिकाचं प्रशिक्षण पूर्ण केलं.... या जतीनच्या कामगिरीबद्दल त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय
Maharashtra Breaking News LIVE Updates: नवी मुंबईतील APMC मार्केटमध्ये हापूस आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात झालीय...तब्बल 1 लाख हापूस आंब्याच्या पेट्या बाजारात दाखल झाल्या ... त्यामुळे आंब्याच्या दरात ही मोठी घसरण झालीय...4 डझन आंब्याच्या पेटीचा दर दिड हजार ते 3 हजारांपर्यंत खाली आलाय...
Maharashtra Breaking News LIVE Updates: वर्षभरात मुंबईतून 87 बालकामगारांची सुटका करण्यात आली. आत्तापर्यंत बालमजुरीविरोधात 40 गुन्हे दाखल केलेत. सुटका करण्यात आलेल्या मुलांमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारमधील मुलं असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
प्रभादेवीमधील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. वरळी-शिवडी उन्नत मार्गिकेसाठी प्रभादेवी रेल्वे स्थानकावरील पुलाचं पाडकाम केलं जाणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी रोखण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.
वक्फ सुधारणा कायद्याची देशभरात अंमलबजावणी सुरू झाली आहे. केंद्र सरकारने मंगळवारी त्याबाबत अधिसूचना काढली आहे..केंद्र सरकारने 8 एप्रिल 2025 हा दिवस वक्फ कायद्यातील तरतुदी लागू होण्यासाठी नियुक्त केला आहे.
महागाईचा भडका सुरूच आहे. सिलेंडर, पेट्रोल आणि डिझेल दरवाढीनंतर आता सीएनजीच्या दरातही वाढ झालीय. सीएनजीच्या दरात आजपासून दीड रुपयांनी वाढ तसंच, पीएनजीच्या दरातही वाढ. मुंबईसह उपनगरातील ग्राहकांना दरवाढीचा फटका बसणार असून घरगुती वापरासाठीचा नैसर्गिक वायूच्या दरातही वाढ झालीय. विशेषतः सीएनजीवर चालणाऱ्या टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनचालकांना याचा थेट फटका बसणार आहे. आधीच इंधन व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्याने नागरिकांवर आर्थिक ओझे वाढणार आहे.
- स्कायमेटचा पावसासंदर्भात अंदाज
- जून ते संप्टेबरमध्ये सरासरीच्या 103 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज
- चार महिन्यात 868 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता
छत्रपती शिवरायांच्या अवमानप्रकरणी जेलमध्ये असलेल्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज निकाल येणार आहे.. कोल्हापूर सत्र न्यायालय जामीन अर्जावर निकाल देणार आहे... कोरटकरचा कोठडीतील मुक्काम वाढणार की बेल मिळणार याकडे लक्ष असणार आहे.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.