Maharashtra Breaking News LIVE: महाराष्ट्रात सध्या विविध मुद्द्यांवरुन वातावरण तापलं आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण तसंच, रायगड्यावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन वाद उफाळून आला आहे. आजच्या दिवसभरातील ताज्या घडामोडी जाणून घेऊयात.
महादेव गीते आणि अक्षय आठवले यांना घेऊन बीड कारागृह पोलीस हर्सूल कारागृहात दाखल झाले आहेत. गीते आणि आठवले यांनी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांना बीड कारागृहात मारहाण केल्याचा आरोप आहे. पुढील वाद टाळण्यासाठी गीते आणि आठवले यांची हरसुल कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
आयात करा बाबत जेव्हा पुन्हा चर्चा होईल त्यावेळी भारत सरकारने लोटांगण घातलं तर देशातील शेतकऱ्याला कोणीही संरक्षण देऊ शकणार नाही असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.आयात निर्यातीचा वाटाघाटी साठी आपले सर्व मंत्री अमेरिकेत जाऊन डोनाल्ड ट्रम्प यांच्या दरबारा मध्ये भीक मागण्याचे काम करतायत.यामध्ये फक्त व्यापार मंत्री जातायत.त्याचा सोबत कृषी आणि उद्योग मंत्री देखील गेले पाहिजेत.त्यामुळे कृषी मंत्री शेतकऱ्यांचा हिताचा संरक्षण करतील ते करतायत का ते माहित नाही.जर अमेरिकेने व्यापार युद्ध सुरू केले तर त्याचे भारतावर अनिष्ट परिणाम होतील याची भारत सरकारने कोणतीही तयारी केलेली नाही.याचा परिणाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर झाल्या शिवाय राहणार नाही असं देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे.
कॉमेडियन कुणाल कॅमेरा यांच्या घरी आज मुंबई पोलिस आले होते.मुंबई पोलिस दोन गाड्यातून कुणाल कामरा यांच्या निवासस्थानी आल्या होत्या कुणाल कामरा यांचे आई वडील दादर माहिम येथे वास्तव्यास आहेत. खार पोलिसांनी याच ठिकाणी त्यांच्या आई-वडिलांना कुणाल रामराव विषयी चौकशी करत 31 तारखेला हजर होण्याचं समजलं होतं आज 31 तारीख आहे आणि कुणाल कामला चौकशीसाठी हजर न झाल्याने या ठिकाणी पोलिसांचं एक पथक येऊन गेल तर आता या ठिकाणी पोलिसांचाही बंदोबस्त लावण्यात आला आहे.
लातूर जिल्ह्यासह बाहेरील जिल्ह्यांतूनही शेतकरी आपल्या जनावरांना चांगला भाव मिळेल या आशेने लातूरच्या बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. मात्र, येथेही त्यांची निराशाच होत आहे.सरकारकडून दुधाचे भाव वाढल्याचे सातत्याने सांगितलं जातंय, पण प्रत्यक्षात त्याचा फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही.
वाल्मिक कराड कथित मारहाणीसंदर्भात बीड कारागृहाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला कोणत्याही प्रकारची मारहाण झाली नसल्याचे बीड कारागृहाने आपल्या स्पष्टीकरणात म्हटलंय.
उल्हासनगर कॅम्प 5 च्या भाटिया पाच दुकान रस्त्यावर ट्रकची उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांना धडक झाली आणि अनेक खांब रस्त्यावर कोलमडून पडले. विद्युत तारा रस्त्यावर पडल्याने अपघात होण्याची शक्यता होती, पण नागरीकांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला. सध्या पाच दुकान रस्त्यावरील विभागातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला असून ट्रक रस्त्यावर उभा आहे. याठिकाणी दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं असून ट्रक चालकावर पुढील कारवाई केली जातेय.
भारताबाहेर आपण इंग्रजी शिकतो मग त्या त्या राज्यात त्या त्या भाषा बोलण्यात या राज ठाकरेंच्या भूमिकेचं समर्थन करतो, असे शिवसेना नेते शंभूराजे देसाई म्हणाले.मराठी भाषा महाराष्ट्रात बोलता आली पाहिजे. खरच मराठी येत नाही ते समजू शकतो पण काही लोकांना मराठी बोलायचे नाही ही मस्ती असेल तर त्याला कायद्याने धडा शिकवला पाहिजे का? आम्ही सत्तेत आहोत त्यामुळे कानाखाली वैगरे बोलू शकत नाही, असेही ते म्हणाले.
मी दर सोमवारी आणि गुरूवारी मी हजेरी लावायला खार पोलीस ठाण्यात येतो. कुणाल कामराचे स्वागत शिवसेना स्टाईलने करु. काय करू हे तुम्ही बघाल तो मुंबईत आल्यावर त्याला उत्तर मिळेल.युट्यूबवर किती पैसे कमवले आर्थिक व्यवहार याबाबत आम्ही युट्यूबला लेटर दिल्याची माहिती शिवसेना नेते राहुल कनाल यांनी दिली.
Maharashtra Breaking News LIVE: झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे तीन रखडलेले प्रकल्प म्हाडामार्फत पूर्ण केले जाणारेत. एसआरए योजना मार्गी लावण्यासाठी हे प्रकल्प म्हाडाला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाये. २१ प्रकल्प म्हाडाकडून पूर्ण केले जाणारे
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे... तमिळनाडूमधील डीएमके सरकार आणि केंद्रातील भाजप सरकार यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे...सोनिया गांधी एका लेखात केंद्र सरकार तमिळनाडूसारख्या राज्यांवर NEP लादण्याचा प्रयत्न करत आहे, जे स्थानिक गरजा आणि भाषिक अस्मिता लक्षात घेता योग्य नाही. तमिळनाडू सरकारने NEP ला विरोध करत स्वतःचे राज्य शिक्षण धोरण (SEP) आणण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे केंद्र आणि राज्य यांच्यातील तणाव वाढला आहे. असा आरोप केला आहे.
देशभरात रमजान ईद साजरी होत आहे. संभाजीनगरात रमजानची पवित्र सामूहिक नमाज इदगाह मैदानावर अदा करण्यात आली. छावणी परिसरात असलेल्याशाही मशीद परिसरात सामूहिक नमाजचं पठण कऱण्यात आलं..यावेळी मुस्लीम बांधवांनी एकमेकांना ईद च्या शुभेच्छा ही दिल्या.
आपण गुढी उभारत नसल्याचं वक्तव्य काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केलंय. छत्रपती संभाजी महाराजांचा खून झाला त्याचा हा दुसरा दिवस त्यामुळे आम्ही का आनंदाची गुढी उभारायची असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. मराठी नववर्ष फक्त महाराष्ट्रातच का? इतर राज्यात का नाही साजरा होत असा सवालही त्यांनी विचारलाय. चंद्रपूर शहरात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
Maharashtra Breaking News LIVE: जम्मू काश्मीरच्या सांबा सेक्टरमध्ये सुरक्षा दलाची शोधमोहीम सुरू. कठुआत दोन दहशतवाद्यांचा खात्मा...कठुआ-सांबा क्षेत्रात हाय अलर्ट जारी..
Maharashtra Breaking News LIVE: अमरावती विमानतळावर पहिल्यांदाच 72 आसनी विमानाचं यशस्वीरीत्या लॅडिंग.... अमरावती विमानतळाचं लवकरच उद्घाटन होणार, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचं आश्वासन
पुढच्या 5 वर्षात प्रत्येक वर्षी वीजदर कमी करणार अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलीये.. वीजदर कमी करण्याबाबतच्या याचिकेला मान्यता मिळालीये. त्यामुळे नागरिकांना स्वस्त दरात वीज मिळेल.. तसंच वीज कंपनीही तोट्यातून बाहेर निघेल असं ते म्हणालेत
स्थापना दिनापूर्वीच भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा होण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान, ज्येष्ठ नेते भुपेंद्र यादव, माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, धर्मेंद्र प्रधान यांची नावं आघाडीवर. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सहमतीनंतरच होणार अध्यक्ष पदाची घोषणा. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाच्या घोषणेबाबतही उत्सुकता
Maharashtra Breaking News LIVE: गोकुळकडून दूध खरेदी दरात प्रति लीटर दोन रुपयांची वाढ...उद्यापासून नव्या दराची अंमलबजावणी...दूध उत्पादक शेतक-यांना मोठा दिलास
महाराष्ट्राला लवकरच आणखी एका नव्या वंदे भारत एक्स्प्रेसची भेट मिळणार आहे... सध्या 11 वंदे भारत एक्स्प्रेस सुरु असून, लवकरच आणखी काही महत्त्वाच्या मार्गांवर ही गाडी सुरु होण्याची शक्यताय....मात्र ही गाडी जर धावली, तर महाराष्ट्रातून धावणारी ही बारावी वंदे भारत असेल
स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची अलोट गर्दी. दर्शनासाठी भक्तांच्या चार ते पाच किलोमीटरपर्यंत रांगा. प्रकट दिनानिमित्त पहाटे पाच वाजल्यापासून भक्तांच्या दर्शनासाठी रांगा . आंध्र , कर्नाटक, मध्यप्रदेश तसंच राज्याच्या कानाकोपऱ्यातून स्वामीभक्त दाखल
आपला आणि प्रशांत कोरटकरचा कोणताही संबंध नाही असं बुकी मालक धीरज चौधरी यांनी पोलिसात जबाब दिलाय. जुना राजवाडा पोलिसांनी तब्बल 3 तास धीरज चौधरी याची चौकशी केली. त्यात कोरटकरला अजिबात ओळखत नसून माझा मित्र प्रशिक पडवेकर याला गाडी हवी होती म्हणून मी गाडी दिली असं स्पष्ट केलंय. प्रशांत कोरटकर पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्या आणि ज्यांनी कोरटकर याला आश्रय दिला अशा सर्वांना कोल्हापूर पोलिसांनी नोटीस बजावलीय. त्यापैकी चंद्रपूर इथल्या बुकी धीरज चौधरी कोल्हापुरात येऊन जुना राजवाडा पोलिसांना जबाब दिलाय. नागपूरच्या प्रशिक पडवेकर सोबत कोरटकर करीमनगरला जात होता, त्याच वेळी त्याची गाडी बंद पडल्याने प्रशिक पडवेकरने माझ्याकडे गाडी मागितली म्हणून मी त्यांना दिली असं पोलिसांना दिलेल्या जबाबात धीरजने स्पष्ट केलंय.
प्रशांत कोरटकरला कळंबा जेलच्या स्वतंत्र अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलं आहे...कोर्ट परिसरात कोरटकरवर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नानंतर कोरटकरच्या वकिलाने स्वतंत्र कोठडीची मागणी केली होती... ती कोर्टाने मान्य केली असून कोरटकरला आता वेगळ्या अंडा सेलमध्ये ठेवलं गेलंय.
Maharashtra Breaking News LIVE: लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचं भाकित राज ठाकरेंनी केलंय. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारवर मोठा आर्थिक बोजा पडतोय. आधीही सांगितलं होतं लाडकी बहिण योजना बंद होणार आताही सांगतो लाडकी बहीण योजना जास्त दिवस राहणार नाही. लाडक्या बहिणांना 2100 रुपये निधी केल्यास सरकारवर वर्षाला 63 हजार कोटींचा बोजा पडणार असल्याचंही राज ठाकरे म्हणालेत.
Maharashtra Breaking News LIVE: पुणे विभागातून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना सातत्याने उशीर होतोय. अनेक विभागात रेल्वे मार्गाचे काम सुरूये. तसंच प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे अनेक जादा गाड्या सोडल्यात. त्यामुळे पुण्यात येणा-या रेल्वे गाड्यांना उशीर होत आहे. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय.
Maharashtra Breaking News LIVE: बिहारच्या नालंदा इथं तेलानं भरलेला टँकर उलटला, चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात, टँकरला भीषण आग, चालक थोडक्यात बचावला
Maharashtra Breaking News LIVE: मणिपूर, नागालँड आणि अरुणाचलमध्ये आणखी 6 महिन्यांसाठी सशस्त्र दल विशेष अधिकार कायदा लागू राहणार
Maharashtra Breaking News LIVE: उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्याचं काम जोरात. मंत्री योगेंद्र उपाध्याय यांनी घेतला परिस्थितीचा आढावा
बिहार निवडणुकांमध्ये नितीश कुमार NDAचा चेहरा. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गृहमंत्री अमित शाहंबरोबर NDAच्या बैठकीत ठरली ऱणनिती
एकनाथ शिंदेंवरील विडंबन गीताप्रकरणी मुंबई पोलिसांनी कुणाला कामराला आज चौकशीला हजर राहण्याचे समन्स बजावले आहे... त्यामुळे आता कुणाल कामरा आज चौकशीसाठी हजर राहणार का याकडे लक्ष असणार आहे.
Maharashtra Breaking News LIVE: लोणावळ्यातील कार्ला एकविरा देवीच्या चैत्र यात्रेसाठी देवस्थान सज्ज झालंय. ही यात्रा चैत्र पौर्णिमेपर्यंत म्हणजेच 12 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. या यात्रेसाठी दरवर्षी राज्यभरातून आणि इतर राज्यांतून लाखो भाविक येत असतात. यादरम्यान त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी विशेष खबरदारी घेतलीय.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यभरात 86 हजार 814 वाहनांची खरेदी झाली आहे. ही वाहन खरेदी गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 30 टक्क्यांनी अधिक आहे. दरम्यान 22 हजार 81 कार तर 51 हजार 756 दुचाकींची खरेदी केली गेलीय.
Maharashtra Breaking News LIVE: इतिहास जातीमधून कशाला पाहता, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय. तर औरंगजेबची ती सजवलेली कबर काढा. त्या ठिकाणी नुसती कबर दिसली पाहिजे. अशी मागणी करत राज ठाकरेंनी आम्हाला संपवायला आला आणि त्याला इथेच गाडला असा बोर्ड लावा, असं विधान केलंय.
Maharashtra Breaking News LIVE: बिहारमध्ये IASअधिका-याच्या घरी कोट्यवधींचं घबाड. तब्बल 11कोटींहून अधिक रोकड जप्त
Maharashtra Breaking News LIVE: म्यानमारनंतर आता टोंगा इथे 7.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. टोंगापासून 1000 किमी अंतरावर भूकंपाचं केंद्र. त्सुनामीचा इशारा जारी
Maharashtra Breaking News LIVE: देशभरात आज रमाजन ईदचा उत्साह. देशभरातील मशिदीत नमाजसाठी मुस्लीम बांधवांची गर्दी.
तीन वर्षात हजाराहून अधिक बांगलादेशींना अटक. घुसखोरांना मदत करणा-या 12 भारतीयांवर कारवाई
Maharashtra Breaking News LIVE: शिर्डी विमानतळावर अखेर नाईट लँडिंग सुरू. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विमानतळ ठरणार महत्त्वाचं केंद्र...
Maharashtra Breaking News LIVE: विडंबन गीताप्रकरणी कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई पोलिसांचं आजच चौकशीसाठीच समन्स. कामरा चौकशीसाठी हजर राहणार का याकडे लक्ष.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.