Maharashtra Breaking News Today LIVE Updates: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणासंदर्भातील घडामोडींबरोबरच महाराष्ट्राचं लक्ष दिल्लीकडेही असणार आहे. आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असल्याने दिल्लीत नेमकं काय घडतंय हे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. दिवसभरातील या आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींचा धावता आढावा आपण या ब्लॉगमधून घेत आहोत.
बातमी सविस्तर वाचा - EPFO च्या 7 कोटी ग्राहकांसाठी मोठी अपडेट! आता PF वर मिळणार 'इतके' टक्के व्याज
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स जगभरात डाउन झाला आहे. यामुळे वापरकर्त्यांना अडचणी येत आहेत. सध्या X का बंद आहे याचे कारण उघड झालेले नाही.
मनोज जरांगेंनी छगन भुजबळांवर केलेल्या टिकेला 'टु द पॉइंट' मधून सडेतोड उत्तर.
'कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही'; जरांगेंच्या टीकेला छगन भुजबळांचं सडेतोड उत्तरhttps://t.co/GePR9ZgTpS#ManojJarange #ChhaganBhujbal #AjitPawar
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 24, 2025
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून हुंडा, हुंडाबळी या शब्दाचा प्रयोग केला जात आहे. पण हुंडा या शब्दाचा मूळ काय? हा शब्द कुठून आला अन् त्याचा अर्थ काय?
हुंडा हा शब्द मूळ कुठचा, तो कुठून आला अन् त्याचा नेमका अर्थ काय?https://t.co/MmvlTMT6UR#Hunda #VaishnaviHagawane #vaishnavihagawanecase #VaishnaviHagawanesuicide
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 24, 2025
सर्वोच्च न्यायालयाने कलम १४२ अंतर्गत मिळालेल्या विशेष अधिकारांचा वापर करून बलात्कारी व्यक्तीची शिक्षा कमी केली. नेमकं असं झालं तरी काय?
14 वर्षाच्या मुलीवर 25 वर्षीय तरुणाचा अत्याचार; 20 वर्षांची शिक्षा झाली नंतर त्याच मुलीमुळे शिक्षा रद्द कारण...https://t.co/peZzQFhfpU#SupremeCourt #POSCO #Convit #RapeCase
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 24, 2025
पक्षात होणाऱ्या कोंडीबद्दल खंत भुजबळ यांनी बोलून दाखवली. तसंच शरद पवार-अजित पवार कामासाठी एकत्र..., 'राष्ट्रवादीचं मनोमिलन होणार की नाही, कायम म्हणाले छगन भुजबळ?#Maharashtra #Politics #ChhaganBhujbalhttps://t.co/kTVj7awu4J
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 24, 2025
निलेश चव्हाणचा पिस्तूल परवाना रद्द करण्यात आला आहे. पोलिस आयुक्तांकडून तातडीने प्रस्ताव मंजूर करण्यात आला. वैष्णवी आत्महत्येप्रकरणी निलेश चव्हाणही आरोपी असून निलेशने पिस्तूलने कस्पटे कुटुंबीयांना धमकावलं होतं. कस्पटे कुटुंबीय बाळाचा ताबा घेण्यासाठी गेले असता निलेशने त्यांना पिस्तूल दाखवत धमकावलं होतं.
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकलेला निलेश चव्हाणच्या घरावर मध्यरात्री पुणे पोलिसांनी झाडाझडची घेतली. यावेळी निलेश चव्हाणचा लॅपटॉप आणि इतर वस्तू पोलिसांनी जप्त केल्यात. निलेशच्या लॅपटॉपमध्ये अनेक अश्लील व्हिडीओ असल्याची माहिती आहे. निलेश चव्हाणविरोधात दोन दिवसापूर्वी पुण्यातील वारजे माळवाडी पोलिसात कस्पटे कुटुंबांना धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय.
पिस्तुलबाज निलेश चव्हाण कुठे लपला? याचा शोध सुरु आहे. पोलिसांनीकडून आरोपी निलेश चव्हाणच्या कुटुंबियांची चौकशी सुरु आहे. निलेशनचे वडील आणि भावला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वारजे पोलिसांकडून दोघांची कसून चौकशी करण्यात आली आहे. निलेश चव्हाण मात्र पोलिसांना अद्याप सापडलेला नाही.
आनंद'घना'! 8 दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल; वादळवाऱ्यांना चकवा देत मोसमी वारे अखेर धडकलेच https://t.co/VbAG4ZDwg5
केरळमध्ये मान्सून आठ दिवस आधीच पोहोचल्यानं आता महाराष्ट्रातही त्याच्या आगमनाची तारीख बदलली आहे. पाहा आताच्या क्षणाची मोठी बातमी... #news #monsoon #kerala…— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 24, 2025
कोरोनाच्या धोका वाढतोय! मुंबईत एकाचा मृत्यू; 24 तासांमधील नव्या रुग्णांची संख्या...#Mumbai #corona #Covid19https://t.co/d0yhXPWrJL
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 24, 2025
बावधन पोलीस स्थानकात वैष्णवीचा पती शशांक, सासरा राजेंद्र आणि सासू या हगवणे कुटुंबीयांची चौकशी सुरू. काही वेळापूर्वीत्यांना इथं आणण्यात आलं.
भारताच्या मिठाई बाजारात 'मैसूरश्री'ची चर्चा; समोर आलं पाकिस्तान कनेक्शन#MysorePak #india #indiansweetshttps://t.co/BhGjmgHSSy
— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 24, 2025
खासदार संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या युतीसंदर्भात केलेल्या 'दिलसे' आवाहनाला मनसेकडून उत्तर देण्यात आलं आहे. "युतीच्या चर्चा मध्यमांसमोर होत नसतात. जर खरच युती हवी असेल तर ज्याप्रमाणे उदय सामंत 'शिवतीर्था'वर राज ठाकरेंना भेटून चहा घेऊ शकतात तर संजय राऊत का चहा घेऊ शकत नाहीत? माध्यमांसमोर पुड्या सोडण्यापेक्षा संजय राऊतांनी 'शिवतीर्थ'वर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली तरच तुम्ही याबाबत गंभीर आहात याबाबत विश्वास वाटेल," असं विधान मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी केलं आहे. योगेश यांनी एकप्रकारे राऊतांना 'शिवतीर्थ'वर चहासाठी आमंत्रणच दिले आहे.
Ladki Bahin Yojna Latest News : सरकारची दमछाक? लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विकास विभागाचे 357 कोटी 70 लाख रुपये वळते https://t.co/72PyMmW3Rg
लाडक्या बहिणींसाठी वळवला आदिवासी विकास विभागाचा निधी; आर्थिक जुळवाजुळव करताना सरकारची दमछाक? आता महिन्याला... #news #LadkiBahinYojna…— ZEE २४ तास (@zee24taasnews) May 24, 2025
सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या 24 तासांत करोनाचे 45 रुग्ण आढळून आले. त्यात मुंबई 35, पुणे महापालिका 4, रायगड 2, कोल्हापूर महापालिका 2, ठाणे महापालिका 1 आणि लातूर महापालिका 1 अशी रुग्णसंख्या आहे. या महिन्यात करोनाचे एकूण 177 रुग्ण आढळले आहेत.
धनंजय मुंडेंच्या खाते आणि दालनानंतर शासकीय बंगलाही छगन भुजबळांना देण्यात आला आहे. मंत्री छगन भुजबळ यांना मलबार हिल येथील 'सातपुडा' बंगल्याच्या चाव्या सोपवण्यात आल्या आहेत. मंत्री असताना धनंजय मुंडेंना हा 'सातपुडा' बंगला देण्यात आला होता आता मंत्री छगन भुजबळ यांनी अन्न व नगरी पुरवठा खात्याचा चार्ज घेतल्यावर 'सातपुडा' बंगला वास्तव्यासाठी देण्यात आला आहे.
पुण्यातील खराडी परिसरात सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकला आहे. दीडशे ते दोनशे पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांना मोठा फौजफाटा सद्या या ठिकाणी आहे. खराडी-मुंढवा बायपास रस्त्यावर प्राईड आयकॉन नावाची ही इमारत आहे. त्या इमारतीमधून हे बनावट कॉलसेंटर चालवीले जात असल्याची माहिती आहे. दरम्यान या कॉल सेंटरमधून नेमके काय प्रकार चालत होते त्या अनुषंगाने पोलिस तपास करत आहेत.
पुढील 48 तासांत नैर्ऋत्य मौसमी वारे (मान्सून) केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. शिवाय अरबी समुद्राच्या दक्षिण भागातील काही भाग, मालदीव, लक्षद्वीप, कर्नाटकातील काही भाग, तामिळनाडू तसेच दक्षिण आणि मध्य बंगालच्या उपसागरातील काही भागापर्यंत मान्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा चार ते पाच दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. पुढील चार दिवसांत कोकण व गोव्यात मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडू शकतो.
अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यभरात तीन ते चार दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणने यंत्रणेसाठी 'हाय अलर्ट' जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासूनच महावितरणचे मुख्यालय व राज्यातील अन्य ठिकाणी आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षांचे कामकाज सुरू झाले आहे. आपत्कालीन नियोजनानुसार प्रत्येक परिमंडल स्तरावर विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर, वीजतारांसह इतर यंत्रसामग्री उपलब्ध ठेवावी, दुरुस्तीसाठी अभियंते, कर्मचारी, तसेच सर्व एजन्सींनी मनुष्यबळ, वाहनांसह युद्धपातळीवर तयार राहावे, असे आदेश महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी दिले आहेत.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या परिस्थितीत सुरळीत वीजपुरवठ्याच्या उपाययोजनांबाबत लोकेश चंद्र यांनी शुक्रवारी आढावा घेतला.
राज्यभरात यंदा केंद्रीभूत अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाड झाल्यानंतर शिक्षण क्षेत्रातून ग्रामीण भागात प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन घेण्यास विरोध होऊ लागला आहे. अडचणी लक्षात घेऊन ग्रामीण भागात अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन घेण्यात यावी, अशी मागणी राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने केली आहे. प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी संकेतस्थळामध्ये झालेल्या बिघाडामुळे विद्यार्थांना मानसिक ताणाला सामोरे जावे लागले. ही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया तत्काळ थांबवून पूर्वीप्रमाणे ऑफलाइन पद्धतीने प्रवेश देण्याची मुभा महाविद्यालयांना देण्यात यावी, अशी विनंती करत राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने ऑनलाइन पद्धतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची होणारी कोंडी पत्राद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय सैन्य दलातील संदिप पांडुरंग गायकर या जवानाला वीरमरण आलं आहे. संदीप हे अहिल्यानगरच्या अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावचे भूमिपुत्र होते. या घटनेने ब्राम्हणवाडा गावासह जिल्ह्यावर शोककळा पसरली असून ब्राम्हणवाडा गाव पूर्णतः बंद ठेवण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज जुन्नर तालुक्यात दौऱ्यावर आहेत. सकाळी 9 वाजता नारायणगाव पोलिस स्टेशनचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते होणार आहे. सकाळी 10 वाजता बोरी येथे विद्युत सबस्टेशनचे उद्दघाटन ते करतील. त्यानंतर सकाळी 11 वाजता ओतूर येथील कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दक्षिण कोकण-गोवा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आणि तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि घाट भागात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये ताशी 50-60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि मुसळधार पाऊस, मराठवाडा जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी ताशी 50-60 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत होणाऱ्या नीती आयोगाच्या बैठकीला फडणवीस उपस्थित राहणार आहेत. हा दौरा दोन दिवसांचा असणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 10 वाजता निती आयोगाची दहावी वार्षिक बैठक गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे या बैठकीत सर्व मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे लेफ्टनंट गव्हर्नर तसेच अनेक केंद्रीय मंत्री यांचा समावेश आहे. भारत मंडपम मध्ये ही बैठक होणार आहे. 2047 पर्यंत विकसित भारत चे लक्षापर्यंत पोहचण्यासाठीच्या रोडमॅप वरचर्चा होणार आहे.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.