Pune Daund Tanav : दौंडच्या यवतमध्ये सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं दोन गटात तणाव निर्माण झालाय.. संतप्त जमावानं दगडफेक करत रस्त्यावरील दुचाकी पेटवून दिल्यात.. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य बळाचा वापर केलाय... याप्रकरणी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय.. तणावाची परिस्थिती नियंत्रणात आली असून यवतमध्ये जमावबंदी लागू करण्यात आलीये... यवतमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून यवतच्या घटनेचा आढावा... कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका, अजित पवारांचं आवाहन.. परिस्थिती पूर्ण नियंत्रणात असल्याचं उपमुख्यमंत्री म्हणालेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Raj Thacekray & Sanjay Raut Together :पनवेल येथे होणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिन मेळाव्यात पुन्हा एकदा मनसे आणि शिवसेना UBT एकत्र येणारा आहेत. शेकापच्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार तसेच खासदार संजय राऊतही उपस्थित राहणार आहेत. काही दिवसांपूर्वी शेकापच्या जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना आग्रहाचे निमंत्रण दिलं होतं.. जयंत पाटील यांच्या निमंत्रणाचा मान राखून राज ठाकरे शेकापच्या मेळाव्यात मार्गदर्शन करतील.
Mumbai MNS : येत्या सोमवारी म्हणजेच चार ऑगस्टला मनसेचा मुंबईत मेळावा होणार आहे. वांद्रे इथल्या रंगशारदा सभागृहात हा मेळावा होणार आहे. आगामी मनपा, झेडपी निवडणुकांबाबत राज ठाकरे काय मार्गदर्शन करणार याकडं लक्ष लागलंय. तसंच राज ठाकरे उद्धव ठाकरेंशी युतीबाबत काय भाष्य करणार का याचीही उत्सुकता आहे.. यासोबतच मालेगाव स्फोट खटला निकाल आणि मुंबईतील साखळी रेल्वे स्फोट निकाल यावर राज ठाकरे काय बोलणार याचीही उत्सुकता आहे..
Ahilyanagar Fake Currency : अहिल्यानगरमध्ये पोलिसांनी बनावट नोटांच्या छापखान्याचा पर्दाफाश केलाय.. बनावट नोटांचं संभाजीनगर कनेक्शनही पोलिसांनी उघडकीस आणलंय. याप्रकरणी पोलिसांनी संभाजीनगरमधून 7 आरोपींना ताब्यात घेतलंय..या कारवाईत आरोपींकडून 60 लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्यात यात 500 रुपयांच्या नोटांचा समावेश आहे.. आरोपींकडून बनावट नोटांसह कागद, प्रिंटर तसंच इतर साहित्यही जप्त करण्यात आलंय..
Washim : वाशिम जिल्ह्यातुन जाणाऱ्या नागपूर-मुबंई समृद्धी महामार्गावर आत्तापर्यंतची सर्वात मोठी चोरी उघडकीस आलीये...कोलकात्याकडे निघालेल्या एका वातानुकूलित ट्रकमधून तब्बल 46 व्हॅक्सिनचे बॉक्स चोरीला गेल्याची धक्कादायक घटना कारंजा परिसरात उघड झालीये..या बॉक्सची एकूण किंमत 2 कोटी 43 लाख 86 हजार 684 रुपये इतकी असल्याची माहिती समोर आली आहे.ही घटना समृद्धी महामार्गावर कारंजा तालुक्यात घडली असून,याप्रकरणी कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Devendra Fadanvis On Manikrao Kokate : रमी प्रकरणानंतर कोकाटेंबाबत मोठा रोष होता त्यामुळे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलून खातेबदलाचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीये. यानंतर मंत्रिमंडळात आणखी कुठला बदल होणार नाही मात्र बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही तसं केल्यास कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना दिलाय.
Nanded : नांदेडच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात एका वृद्धाच्या पायाला उंदराने कुरतडल्याची घटना ताजी असतानाच आता ग्रामीण रुग्णालयात उंदीर महिला रुग्णाच्या अंगावर फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. कंधार येथिल ग्रामीण रुग्णालयातील हा व्हिडिओ आहे. एक महिला रुग्ण बेडवर झोपलेली असताना उंदीर तिच्या अंगावर फिरत आहे. दुसऱ्या रुग्णच्या एका नातेवाईकाने हा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलाय. या रुग्णालयात एकच उंदीर नाही अनेक उंदीर फिरत असल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे. ग्रामीण रुग्णलयातील महिला वार्डात उंदरांचा सुळसुळाट दिसत असल्याने आरोग्य यंत्रणा किती ढिसाळ झाली आहे याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. आरोग्य यंत्रनाच सलाइनवर असल्याचे दिसून येत आहे. आता आरोग्यमंत्री या प्रकारावर काय उत्तर देतील हे पाहावे लागणार आहे
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगरमधील कचनेर गावाजवळ ट्रकचे ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात झालाय. ट्रक उलटल्यामुळे चालकाचा जागीच मृत्यू झाला. राहुल गायकवाड असं मृत व्यक्तीचं नाव आहे...जालनावरुन लोखंडी सळई घेऊन पुण्याकडे जात असताना ट्रक भरधाव वेगात होता. कचनेरजवळील पुलावर ब्रेक फेल झाल्याने ट्रक उलटला...गायकवाड ट्रकखाली अडकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
Mumbai MD Drugs Seized : मुंबईत 44 लाखांचं एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलंय... पवईतल्या हिरानंदानी भागात पोलिसांनी ही कारवाई केलीये. एका रंगाच्या गोदामात हा ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आलाय. पोलिसांना या ठिकाणी 21 किलो एमडी ड्रग्ज तसंच ड्रग्ज तयार करण्यासाठी लागणारं रसायन आढळून आलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Manikrao Kokate : गेल्या काही महिन्यांपासून माणिकराव कोकाटे वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत होते.. शेतक-यांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणा-या कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. विरोधकासह छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे आणि शेतकरी नेत्यांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली होती. मात्र डॅमेज कंट्रोल म्हणून कोकाटेंवर केवळ कारवाईचा फार्स करण्यात आलाय का असा सवाल उपस्थित होतोय. कारण कोकाटेंचं कृषिमंत्रपद काढून घेण्यात आलं असलं तरी त्यांना राज्य मंत्रिमंडळात कायम ठेवण्यात आलंय. कोकाटेंना क्रीडामंत्रिपद देण्यात आलंय. त्यामुळे अजित पवारांना कोकाटेंची वादग्रस्त विधानं मान्य आहेत का... कोकाटेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी का करण्यात आली नाही असा सवाल विचारला जातोय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Nagpur : बोगस शालार्थ आयडी प्रकरणात अधिकारी व संस्थाचालकांनंतर आता पोलीस यंत्रणेच्या टार्गेटवर थेट लाभार्थी शिक्षक आले आहे. या प्रकरणात पहिल्यांदाच पोलिसांनी प्रत्यक्ष बनावट आयडीच्या मदतीने वेतन मिळविणाऱ्या शिक्षकांनाच अटक केली आहे. नागपुरातील तीन शिक्षक गजाआड झाले यात दोन महिलांचा समावेश आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Dharashiv Attack : खंडणीसाठी हल्ल्याचं बीड जिल्ह्यातील लोण आता धाराशिवपर्यंत येऊन पोहोचला आहे. धाराशिवच्या लोहारा तालुक्यातील पवनचक्कीमध्ये काम करणा-या कर्मचा-यावर खंडणीसाठी जीवघेणा हल्ला करण्यात आलाय... खंडणीसाठी गुंडांच्या टोळक्याने लाट्या काठ्याने या कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला केलाय.. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरूये . लोहारा तालुक्यातील मोगा शिवारात नंदीपाठी ते धानोरी रस्त्यावर पवनचक्की प्रकल्प सुरूये. या प्रकल्पावर काम करणा-या विशाल विश्वनाथ पांचाळ या कर्मचाऱ्यावर लाट्या काठ्याने जीवघेणा हल्ला केला.. एवढेच नव्ह तर त्या ठिकाणी असलेल्या आणखी चार कर्मचाऱ्यांनाही बेदम मारहाण करण्यात आलीये. या प्रकरणी लोहारा पोलिसांनी अजित मुसंडे, शंकर मुसांडे ,सुरत साळुंखे, नरहरी बाबर विशाल जमादार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलं असून त्यांना ताब्यात घेतला आहे... या घटनेमुळे खंडणीसाठी हल्ला केल्याची घटना पुन्हा एकदा समोर आल्यामुळे धाराशिवमध्ये खळबळ उडालीये...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विविध देशांवर लावलेल्या नव्या टॅरिफमुळे अमेरिकन कुटुंबाला दरवर्षी सरासरी सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागू शकते, असा इशारा अर्थतज्ज्ञांनी दिलाय.. अमेरिकेतील सर्वसामान्य नागरिकांवर याचा सर्वाधिक भार पडणार असल्याचेही एका अहवालात म्हटलंय.. येल विद्यापीठातील 'द बजेट लॅब' या संस्थेचे अर्थशास्त्र विभागाचे संचालक एर्नी टेडेस्ची यांनी हा अहवाल मांडलाय.. डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांची किंमत सर्वसामान्य अमेरिकन कुटुंबांना स्वत:च्या खिशातून मोजावी लागणार आहे. हा अहवाल ट्रम्प यांनी भारतावर 25% टॅरिफ जाहीर केल्याच्या दिवशीच प्रसिद्ध करण्यात आलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Commercial Gas Cylinder Price : एलपीजी ग्राहकांना मोठा दिलासा...व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी कपात करण्यात आलीये...ओएमसींनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 33.50 रुपयांनी कमी करण्यात आली आहे...गेल्या महिन्यातही किमती 58.50 रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या...हे नवीन दर आजपासून लागू झाले आहेत...मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलं नाहीये..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.