Pankaja Munde : पर्यावरण खात्याकडे निधीची कमतरता असल्याची खंत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी व्यक्त केलीये.. सरकारनं पर्यावरण खात्याला निधीची व्यवस्था करावी, अशी मागणी देखील त्यांनी केलीये..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी शिवालयात कोळी बांधवांशी संवाद साधला. यावेळी अन्याय तोडून टाका, सहन करू नका, आपली लढाई अजून संपलेली नाही. पुढच्या लढाईसाठी एकजूट मजबूत ठेवा असं आवाहन ही उद्धव ठाकरे यांनी कोळी बांधवांना केलं.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Raj Thacekray : जनसुरक्षा विधेयकावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी थेट सरकारला इशारा दिलाय...आंदोलन केल्यास तुम्हाला अर्बन नक्षल ठरवले जाईल..अर्बन नक्षल ठरवून एकदा काय ते अटक कराच, असे आव्हान राज ठाकरेंनी सरकारला दिलंय... राज ठाकरेंच्या आव्हानला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदार प्रत्त्युत्तर दिलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Raj Thacekray : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लहान मुलांना हिंदी कशी येईल याचा प्रयत्न करतात पण महाराष्ट्रात येणा-यांना मराठी कशी येईल याचा प्रयत्न करत नाहीत अशी टीका राज ठाकरेंनी केलीये.. गुजरातमध्ये हिंदी सक्ती नाही... मग महाराष्ट्रातच हिंदी सक्ती का असा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय.. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही उत्तर दिलंय.. महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य केलीच आहे.. मात्र त्यासोबत दुसरी एखादी भारतीय भाषा शिकण्यास वावगं काय असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केलाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Raj Thackeray : 'सर्वाधिक डान्सबार रायगड जिल्ह्यात सुरु आहेत'...'डान्सबार बंद झाले, मग आता कुठून आले'...स्वराज्याची राजधानी रायगडमध्ये काय सुरू आहे?'...मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सवाल...आपल्या राज्यात कोण येतंय याकडे लक्ष द्या'...मनसे अध्यक्ष राज ठाकरें यांचं जनतेला आवाहन
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Raj Thackeray : 'जयंत पाटलांनी रायगडची जबाबदारी घ्यावी'...'शेतकरी बरबाद होऊ नये यासाठी काम व्हावं'...'रायगडमधल्या शेतक-यांच्या जमिनी जातायत'...'शेतक-यांनी जमिनी देऊ नयेत'...'जर दिल्या तर कंपन्यांमध्ये पार्टनरशीप मागा'... राज ठाकरे यांचं वक्तव्य
Sharad Pawar Call To Devendra Fadnavis : यवत प्रकरणी शरद पवारांचा थेट मुख्यमंत्र्यांना फोन...-धार्मिक तेढ निर्माण करणा-यांवर कारवाईची मागणी..-राज्यात सामाजिक सलोखा राखला जावा-शरद पवार...यवत प्रकरण संवेदनशीलपणे हाताळलं जावं, अशी अपेक्षा शरद पवारांनी मुख्यमंञ्यांकडे व्यक्त केलीय
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Solapur : सोलापुरातील श्रेयश नर्सिंग होम महापालिकेकडून सील...पालिका हॉस्पिटलचे रुग्ण पळवल्याप्रकरणी कारवाई...रुग्ण पळवण्यात मदत करणा-या 49 आशासेविकांना नोटिसा....आशा सेविकांना कमिशन देऊन मनपा प्रसूतिगृहातील रुग्ण पळवण्याचा गोरख धंदा आरोग्य विभागाने आला होता उजेडात...गेल्या वर्षभरापासून 259 अशा सेविकांचा व्हाट्सअप ग्रुप तयार करून...मनपा रुग्णालयातील गर्भवती रुग्णांना पळवण्याचा चालला होता प्रकार...महापालिका हॉस्पिटलचे रुग्ण पळवणारे हॉस्पिटल सील....महापालिका डॉक्टर, नर्सिंग अधिकारी आणि कर्मचा-यांचीही होणार चौकशी
Local Election In 3 Phases : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 3 टप्प्यात-सूत्र..-पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका...दुस-या टप्प्यात नगरपालिका, नगरपरिषदांच्या निवडणुका...तिस-या टप्प्यात मुंबईसह इतर मनपांच्या निवडणुका...डिसेंबर 2025 अखेर निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न...दिवाळीनंतर आचारसंहिता लागू होण्याची शक्यता
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Dadar Kabutar Khana : मुंबईच्या दादर परिसरातील कबुतरखान्याला जाळी लावण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या पथकाला विरोधाचा सामना करावा लागला...गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील दादरमधील कबुतरखाना हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे... कबुतरांना खायला धान्य टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणात पक्षीप्रेमी या ठिकाणी येतात मात्र कोणीही धान्य टाकू नये यासाठी पालिकेकडून कबुतरखान्याला जाळी लावण्यात येणार आहे... मात्र ही जाळी लाऊ नये यासाठी काही स्थानिक नागरिकांनी प्रचंड विरोध केला.... काही स्थानिकांनी विरोध केल्यामुळे आता ही कारवाई लांबणीवर पडली आहे.....
महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी दाखल झाल्यानंतर मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी दाखल झाले अन् जाळी लावण्यास विरोध केला.... नागरिकांचा विरोध झाल्यानंतर या परिसरात पोलिस बंदोबस्त लावण्यात आला..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
ED On Mithi River : मिठी नदीशी संबंधित गाळ काढण्याच्या घोटाळ्याच्या चौकशीचा भाग म्हणून ईडीने पाच कंत्राटदार आणि बीएमसीच्या उपमुख्य अभियंत्याशी संबंधित अंदाजे ६ कोटी रुपयांची बँक आणि डीमॅट खाती गोठवलीत. या घोटाळ्यात बनावट कागदपत्रं, बनावट निविदा आणि कधीही न केलेल्या कामासाठी फसवे पैसे देण्यात आले होते.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Tuljabhavani Temple : तुळजाभवानी मंदिरातील शस्त्र पूजनाची तलवार गहाळ झाल्याचा आरोप पुजा-यांनी केलाय.. मंदिर संस्थांच्या खजाना खोलीत ही तलवार होती मात्र ती तलवार गायब झाली असून तलवार मंदिराच्या बाहेर असल्याचा दावा पुजा-यांनी केलाय..तुळजाभवानीच्या आठ आयुधातील शास्त्राची तत्व आणि शक्ती तलवारीमध्ये काढून तलवार गायब केल्याचा या पुजा-यांचा आरोप आहे.. मंदिरात सुरू असणा-या कामाला व्यत्य येऊ नये म्हणून पद्मश्री गणेश द्रविड यांच्या हस्ते मंदिरात विधीवत पूजा करण्यात आली होती... या पूजंद्वारे शस्त्रातील तत्त्व आणि शक्ती तलवारीमध्ये टाकल्यांचा आरोपही पुजा-यांनी केलाय.
भक्तांना दर्शन घेण्यासाठी, गहाळ झालेली तलवार तुळजाभवानी देवीजवळ किंवा मंदिरात कुठेही ठेवावी अशी मागणी पुजा-यांनी केलीये.
BJP : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचा आता गुजराती मतांवर डोळा ठेवून आहे. मुंबईत उत्तर भारतीय आणि गुजराती मतं सर्वाधिक असल्यामुळे ही मतं आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपचं नियोजन सुरु असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्यावतीने कांदिवलीत आज गुजराती साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी संध्याकाळी एका गुजराती नाटकाचा प्रयोग सादर करण्यात येणार आहे. या नाट्यप्रयोगातून महिला संवेदनाचं चित्रण करणात येणार आहे. सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित करणाऱ्या या नाट्यप्रयोगानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Nandani Mahadevi Elephant : नांदणी मठाच्या हत्तीणीला वनतारामधून परत आणण्यासाठी आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया करू, त्यासाठी वनताराही सकारात्मक आहे असं जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटलंय. तर मठाची हत्तीण वनतारामध्ये नेण्यामध्ये आपली कोणतीही भूमिका नाही, जे काही झालं आहे ते सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर झाल्याचं वनताराच्या सीईओंनी स्पष्ट केलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Karnataka : कर्नाटकमधील एका माजी क्लार्कच्या घरावर लोकायुक्त अधिका-यांनी टाकलेल्या छाप्यात कोट्यवधींचं घबाड सापडलंय. लोकायुक्ताने केलेल्या या कारवाईत तब्बल 24 घरं, 4 प्लॉट आणि 4 आलिशान गाड्या तसंच कोट्यवधींचं सोनं जप्त करण्यात आलंय.. हा क्लार्क कर्नाटक रूरल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लिमिटेड अर्थात KRIDLमध्ये काही वर्षांपासून काम करत होता. त्याला केवळ 15 हजार रुपये एवढाच पगार होता.. मात्र त्याच्याकडून 30 कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आलीये. लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या मते ही मालमत्ता फक्त या माजी लिपिकाच्या नावावर नाही, तर त्याची पत्नी आणि तिच्या भावाच्या नावावर देखील आहे. लोकायुक्ताच्या अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. KRIDLमधील आणखी एक माजी अभियंत्यावर वेगवेगळ्या 96 प्रकल्पांसाठी बनावट कागदपत्रे तयार करून आणि बनावट बिले तयार करून 72 कोटी रुपयांपेक्षा जास्त रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
PMC Bank Scam : PMC बँकेच्या घोटाळ्यात आणखी एक मोठा प्रकार समोर आला आहे. PMC बँकेत कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचं उघडकीस आलंय.. PMC बँकेनं 21 हजारांहून अधिक फसवी कर्ज नोंदणी करुन 5 हजार कोटींचा बनावट व्यवहार केल्याची माहिती RBIच्या ऑडिट रिपोर्टमधून उघडकीस आलीये..आवास डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला 135 कोटींपर्यंतचे कर्ज मंजूर झाले होते, मात्र प्रत्यक्षात कंपनीला फक्त 30 कोटीच मिळाले. आश्चर्य म्हणजे, बँकेने कंपनीकडून 170 कोटींची वसुली करण्याचा दावा केला आहे. कंपनीने हा दावा चुकीचा आणि बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळणार आहे...महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत हि माहिती दिली...रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात, सन्मान निधीचे 1500 रुपये जमा होणार आहेत..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Maharashtra Politics : पनवेलमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा 78वा वर्धापनदिन सोहळा होतोय. शेकाप नेते जयंत पाटलांकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना निमंत्रण देण्यात आलंय. तसंच शिवसेना UBT पक्षाचे खासदार संजय राऊतही या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. त्यामुळे राज ठाकरे आणि संजय राऊत पुन्हा एकदा एकाच मंचावर येणार आहेत. त्यामुळे मनसे आणि शिवसेना UBT पक्षाची जवळीक वाढत असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित होतंय
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.