Uddhav Thackeray :उद्धव ठाकरे 3 दिवसीय दिल्ली दौ-यावर जाणार...6 ते 8 ऑगस्टदरम्यान ठाकरेंचा दिल्ली दौरा...इंडिया आघाडी बैठकीबाबत राहुल गांधींशी चर्चा...दिल्लीत इंडिया आघाडीच्या नेत्यांशी घेणार भेट
Asim Sarode : शिवसेना नाव, पक्ष आणि झेंड्याच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाकडून लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यताय. हा निर्णय कोणाच्या बाजूने जाईल याची चर्चा होत असतानाच आता वकील असीम सरोदे यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय भूवया उंचावल्यात. असीम सरोदे यांनी एकनाथ शिंदे यांची पक्ष म्हणून असलेली कारकीर्द महिनाभरात संपेल असा मोठा दावा केलाय...
Ravindra Chavan : केडीएमसी निवडणूक पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मोठे विधान केलंय. कल्याण डोंबिवलीला विकासाला ग्रहण लागलंय. हे ग्रहण दूर करायचे असेल तर कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपाचा महापौर बसवावा लागेल असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलंय. कल्याणमध्ये अनेक पक्षातील पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्याचा भाजपमध्ये प्रवेश झालाय. यावेळी ते बोलत होते...
MNS : मनसेचा उद्या मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा...मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा...सकाळी १० वाजता रंगशारदा सभागृह वांद्रे इथे मनसेचा मेळावा... मनसेचे नेते,सरचिटणीस, मुंबईतील महत्त्वाचे पदाधिकारी राहणार मेळाव्यासाठी उपस्थित..आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचा उद्याचा मेळावा
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Jalgaon International Drugs Connection : जळगावच्या ड्रग्जचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड...चाळीसगावमध्ये 65 कोटींचं ड्रग्ज जप्त...दिल्ली, हरियाणातून ड्रग्जची तस्करी...श्रीलंकेत ड्रग्जची तस्करी करत असल्याची माहिती...ड्रग्जप्रकरणी आतापर्यंत 12 गुन्हे दाखल...ड्रग्जप्रकरणी तामिळनाडूतून आणखी एका आरोपीला अटक...महालिंगम नटराजन असं आरोपीचं नाव...त्याचा मुलगा योगेश महालिंगम याचा सुद्धा चाळीसगावात जप्त ड्रग्स प्रकरणात सहभाग असल्याचे समोर...आरोपी महालिंगम यांच्या कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Ajit Pawar : कुणी आरे केलं तर त्याला कारे करा पण कुणाला उगीच अंगावर घेऊन नका मात्र कुणी अंगावर आलाच तर शिंगावर घ्यायला मागे पुढं पाहू नका असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना दिला. अलिबाग इथे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. आम्ही कुणाच्या नादी लागत नाही आणि कुणी आमच्याही नादी लागू नये. हे सर्व करत असताना कायद्याची चौकट मोडू नका असंही अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं
Yogesh Kadam on Uddhav Thackeray : 'शिवसेनेत आता कुठलीही घराणेशाही नाही, मक्तेदारी नाही'...'शिवसैनिकांच्या मनातील प्रमुखच पदावर बसणार'...-योगेश कदमांचं वक्तव्य...बाळासाहेबांच्या कारकिर्दीत पक्षांतर्गत निवडणुका व्हायच्या'...उद्धव ठाकरेंनी पक्षांतर्गत निवडणुका बंद केल्या...योगेश कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका
Saina Nehwal : स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल अलीकडेच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे... तिने पती परुपल्ली कश्यपपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतल्याचं जाहीर केलं आणि त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला होता... मात्र अवघ्या 20 दिवसांच्या आता सायना आणि परुपल्ली पुन्हा एकदा त्यांच्या नात्याला दुसरी संधी देत आहेत...
सायना नेहवालने आपल्या या निर्णयाची माहिती सोशल मीडियावर दिली. तिने परुपल्ली कश्यपसोबतची एक फोटो शेअर करत लिहिलं, "कधी कधी अंतर तुम्हाला एखाद्याच्या उपस्थितीचं महत्त्व शिकवतं... घेऊया, पुन्हा एकदा प्रयत्न करू असं तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
IMD Alert : राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले असून पुढील काही दिवस पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे.... मात्र, विदर्भात काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.... पुढील तीन ते चार दिवस विदर्भात जोरदार पावसाची शक्यता आहे....दरम्यान ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यानंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होईल.... त्यानंतर पावसाचा जोर कायम राहील.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Gotya Gitte on Jitendra Awhad : फरार गोट्या गित्तेचा जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल....आव्हाड माझी उगाच बदनामी करतात- गोट्या गित्ते...गोट्या गित्तेची जितेंद्र आव्हाडांना धमकी...जितेंद्र आव्हाड माझ्याकडे तुझे व्हिडिओ आहेत- गोट्या गित्ते...आता तुला महागात पडणार- गोट्या गित्ते
बातमीचा व्हिडीओ पाहा-
T-20 Asia Cup Circular : आशियाई क्रिकेट काऊन्सिलने आशिया कप 2025 बाबतचं परिपत्रक जाहीर केलं आहे.... यानुसार ही स्पर्धा दुबई आणि अबुधाबी या दोन ठिकाणांवर खेळवली जाणार...आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना होणार असल्याचं स्पष्ट झालंय...14 सप्टेंबरला भारत-पाकिस्तानमध्ये हायव्होल्टेज सामना रंगणार आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Gotya Gitte : गोट्या गित्ते याचा नवा व्हिडिओ समोर आला आहे. धनंजय मुंडेंना बदनाम करू नका असा इशारा गोट्या गित्तेनं या व्हिडिओतून दिली आहे. आपण वाल्मिक कराडचे कार्यकर्ते आहोत, मात्र आपण काहीही केलेलं नसून, आपला काही संबंध नसल्याचं गोट्या गित्तेनं म्हंटलंय. तसंच जितेंद्र आव्हाड, संदीप क्षीरसागर, खासदार सोनवणे आणि अंजली दमानिया बिनबुडाचे आरोप करत असल्याचा आरोप त्यानं केलाय. संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे त्यांच्या आरोपींना फाशीच झाली पाहिजे अशी मागणीही गित्तेनं केली. तर धनंजय मुंडेंना टार्गेट करु नये असंही तो म्हणाला.
Panvel MNS : मनसे अध्यश्र राज ठाकरे यांच्या डान्स बारविरोधी वक्तव्यानंतर, मनसे कार्यकर्त्यांनी पनवेलमधील 'नाईट रायडर्स' बारवर हल्ला केला. "आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र भूमीवर डान्स बार चालू देणार नाही!" अशी घोषणा देत, रात्री मनसे समर्थकांनी बारची तोडफोड केली.महाराजांच्या पावन भूमीत डान्सबारला थारा नाही!' असा संदेश देत मनसेने पनवेलमधील 'नाईट रायडर्स' बारवर रुद्रावतार धारण करत जोरदार हल्ला चढवला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी या बारवर धडक देत बार पूर्णपणे उद्ध्वस्त केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, स्थानिकांमध्येही तीव्र पडसाद उमटलेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.