Badlapur Doctor Arrest : बदलापूर शहरातून उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने एका डॉक्टरला ताब्यात घेतलंय. बंदी घातलेल्या सिमी या संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव ओसामा शेख असे असून तो बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खाजगी रुग्णालयात होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून कार्यरत होता. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. एटीएसने ओसामा शेखला ताब्यात घेतल्यानंतर त्याला उल्हासनगर न्यायालयात कस्टडीसाठी हजर केले. असामी शेख याला उत्तर प्रदेश एटीएस अधिक तपासासाठी उत्तर प्रदेश येथे घेऊन गेली आहे.
Sambhajinagar : घरच्यांनी मोबाईल घेऊन दिला नाही, म्हणून एका 16 वर्षीय मुलाने डोंगरावरून दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलीय... वअथर्व गोपाल तायडे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे...या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, तायडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळले आहे.... अथर्व हा वाळूज येथे राहत होता व पोलिस भरतीसाठी प्रशिक्षण घेत होता... काही दिवसांपासून अथर्वने आईकडे मोबाईल घेण्यासाठी आग्रह धरला होता... मात्र, आईने नकार दिल्याने नाराज झालेल्या अथर्वने रविवारी तिसगाव येथील खवड्या डोंगरावरून दरीत खाली उडी मारली... जखमी अथर्वला नागरिकांनी रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले....
Mahadevi Elephant : नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी रविवारी कोल्हापुरात आंदोलन करण्यात आलं...यावेळी महादेवी परत हवीच अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली...दरम्यान नांदणी मठातून नेलेली महादेवी हत्तीण आनंदात असून तिची प्रकृती हळूहळू सुधारत असल्याचं वनताराने म्हटलंय...सोबतच त्यांनी महादेवीच्या वनतारामधील वावराचा व्हिडिओही जारी केलाय...तसेच कोर्टाच्या आदेशानुसार महादेवीला वनतारात आणलं असून तिचं कल्याण हाच आपला हेतू असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय...महादेवी सध्या वनतारामध्ये रुळत असून लवकरच ती हत्तींच्या कळपामध्ये सहभागी होईल असं सांगण्यात आलंय.....
बातमी व्हिडीओ पाहा-
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने फटकारलं..-चीनने जमीन हडपल्याच्या वक्तव्यावरून खडसावलं..तुम्हाला कसं माहीत चीनने आपली जमीन हडपली?...सुप्रीम कोर्टाचा राहुल गांधींना सवाल...तुमच्याकडे कुठले पुरावे आहेत का?- कोर्ट...आपण संसदेत बोललात, सोशल मीडियावर नाही- कोर्ट...राहुल गांधींना जबाबदारीने बोलण्याचा सल्ला
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Khed : पतीला जबर मारहाण करत 28 वर्षाच्या पत्नीचं अपहरण.. पुण्याच्या खेड तालुक्यातील खरपुडी इथला धक्कादायक प्रकार...सैराट सिनेमासारखा आंतर जातीय प्रेम विवाहातून मारहाण आणि अपहरण झाल्याचा प्रकार...खेड पोलिस स्टेशनमध्ये मुलीचा भाऊ आणि आई सह १५ जणांवर अपहार आणि जबर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल
Raj Thackeray : आगामी निवडणुकीसाठी मनसे अलर्ट मोडवर आहे. आज मुंबईच्या रंगशारदा सभागृहात मनसेच्या पदाधिका-यांचा मेळावा पार पडला. यावेळी राज ठाकरेंनी पदाधिका-यांना मार्गदर्शन करत काही आदेशही दिलेत...आपआपसातले हेवेदावे दूर करा आणि कामाला लागा, महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा असे आदेश राज ठाकरेंनी दिलेत..
Kothrud : पुण्यातल्या कोथरूडमध्ये तीन मुलींना मारहाण प्रकरणाची आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दखल घेतलीय...कोथरुड पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या तीन मुलींना रुपाली चाकणकर यांनी फोन केला. तसंच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती रूपाली चाकणकरांनी दिली.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी आज पत्रकार परिषद घेणारेत.दुपारी साडेबारा वाजता इंदिरा भवन मुख्यालयात राहुल गांधी ही पत्रकार परिषद घेणार आहेत. महाराष्ट्रातील मतदार यादीतील घोळाबाबत राहुल गांधी या पत्रकार परिषदेत बोलणारेत...याआधी राहुल गांधींनी कामठी आणि दक्षिण नागपुरात घोळ झाल्याचा दावा केला होता
Nishikant Dubey : भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्रातील हिंदी-मराठी भाषेच्या वादाची पुन्हा तार छेडली आहे.... तसे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना UBT आणि मनसेवर देखील निशाणा साधला आहे... बिहार विधानसभा निवडणुकीसंदर्भात दुबेंनी मुलाखत दिली.... यावेळी ते म्हणाले की, राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील मनसे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकारण पुढील बीएमसी निवडणुकीत संपणार आहे.... यामुळे आता नवा वाद सुरु होण्याची शक्यता आहे....सोबतच मुंबईत फक्त 30 टक्के लोक मराठी बोलतात. 30 टक्के लोक हिंदी बोलतात.... अडीच टक्के लोक राजस्थानी बोलतात... त्याचप्रमाणे काही लोक गुजराती, तर काही भोजपुरी बोलतात. त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं भाषेवरील हे राजकारण यावेळी पूर्णपणे अपयशी ठरणार आहे.' असे दुबे म्हणाले आहेत...
Mumbai BJP : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची तयारी...मुंबई भाजपच्या कोअर कमिटीची आज दुपारी एक वाजता बैठक...मुंबई अध्यक्ष आशिष शेलारांच्या अध्यक्षतेखाली दादरच्या वसंतस्मृती कार्यालयात बैठकीचं आयोजन... मुंबईतील संघटनात्मक 6 जिल्ह्यांच्या स्वतंत्र बैठकांनंतर मुंबईची स्वतंत्र बैठक होणार...संघटनात्मक आढावा, वॉर्ड निहाय स्थिती आणि इतर बाबींवर बैठकीत चर्चा होणार...शेलारांसह अतुल भातखळकर, प्रविण दरेकर, अमित साटम आणि इतर आमदार उपस्थित राहणार
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Donald Trump : भारताने अमेरिकेच्या धमकीपुढे झुकत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी थांबवल्यास मोठा फटका बसू शकतो...रशियाकडून तेल खरेदी थांबवल्यात इतर देशांकडून ते खरेदी करावे लागेल...त्यासाठी तब्बल 74 हजार कोटी ते 91 हजार कोटी अतिरिक्त मोजावे लागतील...तसा असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे... तसेच या संभाव्य खर्च वाढीमुळे पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांच्या किरकोळ किमतीतही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे....भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल वापरकर्ता आणि आयातदार देश आहे... फेब्रुवारी 2022मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर पाश्चिमात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले होते... त्यानंतर भारताने रशियाकडून स्वस्त दरात तेल खरेदी करून मोठा फायदा मिळवला....मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ आणि रशियाकडून तेल व शस्त्रास्त्रे खरेदी केल्यास दंड लावण्याची धमकी दिल्यानंतर परिस्थिती बदलली आहे...
Dhananjay Munde : मंत्रीपद जाऊन साडेचार महिने लोटल्यानंतरही धनंजय मुंडे यांनी 'सातपुडा' हा शासकीय बंगला सोडलेला नाही. त्यामुळे मुंडेंवरील दंडाची रक्कम 42लाख झालीये.. एकीकडे धनंजय मुंडे बंगला सोडण्यात तयार नसल्यानं मंत्री छगन भुजबळ 'गृहप्रवेशा' च्या प्रतीक्षेत आहेत. दरम्या आजारपणामुळे मुंबईत राहणे
आवश्यक आहे. तसंच मुलीच्या शाळेचाही प्रश्न आहे. असं कारण देत बंगला सोडण्यास धनंजय मुंडेंनी मुदतवाढ मागीतलीये..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Anil Kumar Pawar : वसई विरार महापालिका माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांना आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत...अनिल कुमार पवार आणि त्यांच्या पत्नीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिलेत. तसा समन्स ईडीकडून देण्यात आलाय.
ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या राहत्या घडी धाड टाकली होती. तब्बल 18 तास ईडीचा तपास सुरु होता.... मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA) 2002 अंतर्गत मुंबई, पुणे, नाशिक आणि साता-यातल्या 12 ठिकाणी छापे टाकण्यात आले होते.
MNS : मनसेचा आज मुंबईतील पदाधिकाऱ्यांचा मेळावा...मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा...सकाळी १० वाजता रंगशारदा सभागृह वांद्रे इथे मनसेचा मेळावा...मनसेचे नेते,सरचिटणीस, मुंबईतील महत्त्वाचे पदाधिकारी राहणार मेळाव्यासाठी उपस्थित...आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचा आजचा मेळावा)
Maharashtra Politics : अलमट्टी धरणाबाबत केंद्र सरकारसोबत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचं शिष्टमंडळ आज दिल्लीत जाणारेय...शिष्टमंडळात सर्वपक्षीय 12 लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री सी आर पाटलांसोबत ही बैठक होणारेय...अलमट्टीची उंची वाढवू नये, अशी महाराष्ट्र सरकारची मागणी आहे. 519 वरून 524 फूट धरण करण्याचा कर्नाटक सरकारचा प्रयत्न आहे. धरणाची 15 फूट उंची वाढविली तर पूर येईल आणि नुकसान होईल असं महाराष्ट्रातील आमदार, खासदारांचं म्हणणं आहे. नवीन महाराष्ट्र सदनात १२ वाजता आमदार खासदारांची बैठक होणार आहे
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.