Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 14 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
LIVE Blog
14 July 2025
14 July 2025 22:43 PM

मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरे सकारात्मक

 

Raj Thackeray-Uddhav Thackeray : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक जाहीर झाल्यावर युतीचा निर्णय घेणार-सूत्र...टप्या टप्याने युतीची प्रक्रिया सुरु...उद्धव ठाकरे आणि पक्ष युती संदर्भात सकारात्मक...झी 24 तासच्या विश्वसनिय सुत्रांची माहिती...मेळाव्यानंतर देखील ठाकरे बंधू एकत्र येऊ नये यासाठी अनेकांकडून प्रयत्न झाले....यापूढेही ठाकरे बंधू एकत्र येऊ नये म्हणून प्रयत्न केले जातील, असं मत उद्धव ठाकरेंचं असल्याची माहीती सूत्रांनी दिलीय..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

14 July 2025 19:21 PM

'मंत्रिपदावर असताना हे वर्तन शोभणारं नाही', मुख्यमंत्र्यांकडून शिरसाटांची कानउघाडणी

 

Devendra Fadnavis on Sanjay Shirsat : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची कानउघाडणी केली....मंत्रिपदावर असताना हे वर्तन शोभणारं नाही अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शिरसाटांना खडे बोल सुनावले....संजय शिरसाट यांचा पैशांच्या बॅगसंबंधीचा बेडरुममधला व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्या पार्श्वभूमीवर फडणवीसांनी त्यांना समज दिली.

14 July 2025 18:56 PM

ठाकरेंच्या राजकीय युतीबाबत अजून निर्णय नाही- सूत्र

 

MNS on Shivsena (UBT) : मनसे आणि शिवसेना UBTच्या युतीबाबत एक मोठी बातमी समोर आलीय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या राजकीय युतीबाबत अजून निर्णय झाला नसल्याचं मनसेतून सांगण्यात आलंय. झी 24 तासला सूत्रांनी दिलेल्या खात्रीलायक माहितीनुसार राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं मराठीच्या मुद्यावर एकत्र येण्याचं ठरलं होतं. पण राजकीय युतीचा कोणताही निर्णय झालेला नसल्याचं मनसेतल्या सूत्रांनी सांगितलंय. अजून राजकीय युती झाली नसल्याचं सांगून मनसेनं शिवसैनिकांची अस्वस्थता वाढवलीये.

14 July 2025 18:28 PM

शिवसेना पक्ष, चिन्हप्रकरणी 20 ऑगस्टला सुनावणी

 

ShivSena : शिंदेंच्या शिवसेनेला निवडणूक आयोगानं दिलेलं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात यावं अशी मागणी करणारी याचिका, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सुप्रीम कोर्टात केलीय. या प्रकरणाच्या अंतिम निर्णयापर्यंत शिंदेंच्या शिवसेनेला दिलेलं पक्ष आणि चिन्ह गोठवण्यात यावं अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आलीय. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 20 ऑगस्ट ला होणारेय..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

 

14 July 2025 17:29 PM

पुणे विद्यापीठातील NSUIचं आंदोलन स्थगित

 

Pune : पुणे विद्यापीठातील NSUIचं आंदोलन स्थगित...NSUIचं आंदोलन 2 दिवसांसाठी स्थगित..कॅरीऑनसह विविध मागण्यांसाठी पुकारलेलं आंदोलन...कॅरीऑनचा GR न काढल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

14 July 2025 16:45 PM

चड्डी बनियान गँगचे व्हिडिओ बाहेर येतायत- अनिल परब 

 

Anil Parab : सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या पैशाच्या बॅगेतील व्हिडिओवरुन शिवसेना UBTचे आमदार अनिल परब आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. जनसुरक्षा विधेयकाचं सोडा, मंत्रीच सुरक्षित नाहीत असा हल्लाबोल अनिल परबांनी केला.. मंत्र्यांचे बेडरुममधील व्हिडिओ बाहेर येतायत. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय असं परब यांनी म्हटलं.. सरकारनं शिरसाटांच्या व्हिडिओप्रकरणी चौकशी करावी अशी मागणी परब यांनी केलीय.. 

14 July 2025 16:21 PM

'बाळासाहेब राष्ट्रीय स्मारकाला सरकारचा अडथळा', उद्धव ठाकरेंचा सरकारवर आरोप - सूत्र

 

Balasaheb Thackeray Smarak : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामात राज्य सरकार अडथळा आणत असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुंबईत दादर येथील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे बांधकाम पुर्ण झाले आहे. परंतु दुसऱ्या टप्प्याचे काम ठप्प असल्याची माहिती. या स्मारकाच्या आत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन प्रवासावर आधारित संग्रहालय निर्माण करायचे आहे. मात्र त्यासाठी राज्य सरकार अडथळा निर्माण करत असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

14 July 2025 15:36 PM

इंडिया आघाडीची बैठक व्हावी- उद्धव ठाकरे

 

Uddhav Thackeray : महाविकास आघाडीपेक्षा इंडिया आघाडीची बैठक सद्यस्थितीत होणं महत्वाचं...उद्धव ठाकरेंचे मत - सूत्रांची माहिती...लोकसभा निवडणुकीनंतर एकही इंडिया आघाडीची बैठक झाली नाही...त्यामुळे इंडिया आघाडीची देश पातळीवरील पुढची रणनीती नेमकी काय ? यासाठी इंडिया आघाडीची बैठक होणे आवश्यक असल्याचे उद्धव ठाकरे यांचं मत...आगामी बिहार निवडणुका शिवसेना लढवत...नसली तरी बैठक होणे आवश्यक...स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नेमकं कसं लढायचं हे निवडणुका जाहीर झाल्यानंतर ठरवलं जाईल... महाविकास आघाडीमध्ये कोणता पक्ष आघाडीत लढणार की स्वबळावर लढणार? हे मित्र पक्षाच्या अधिकृत भूमिका जाहीर झाल्यानंतरच शिवसेना ठाकरे गट पुढची रणनीती ठरवेल

14 July 2025 13:24 PM

जयंत पाटील यांनी राजीनामा दिला नाही - सुप्रिया सुळे

Supriya Sule On Jayant Patil : जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही असं स्पष्टीकरम खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलंय.. काही लोक संघर्षासाठी कायम तयार असतात असंही सुळेंनी म्हटलंय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

14 July 2025 13:19 PM

कल्याणमध्ये विद्यार्थ्यांची सुरक्षा रामभरोसे

Kalyan : अंबरनाथमध्ये स्कूल व्हॅनमधून पडून दोन मुलं जखमी झाल्याची घटना ताजी असतानाच कल्याणमध्येही असाच एक धोकादायक प्रकार समोर आलाय...कल्याण शहरात चक्क मालवाहतूक टेम्पोमधून शाळकरी मुलं प्रवास करत असल्याचं समोर आलंय..  या टेम्पोमध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणतीही योग्य आसनव्यवस्था नाही. त्याचे दरवाजेही पूर्णपणे बंद होत नाहीत आणि धक्कादायक म्हणजे, मुलांच्या सुरक्षिततेसाठी एकही अटेंडंट सोबत नाही.... चिमुकले विद्यार्थी केवळ टेम्पोच्या लोखंडी पट्ट्या धरून उभे आहेत.... जर हा टेम्पो भरधाव वेगात असताना थोडासाही असंतुलित झाला, तर ही निष्पाप मुले थेट रस्त्यावर फेकली जाऊन भीषण अपघात होण्याची शक्यता आहे....दरम्यान या प्रकाराकडे वाहतूक पोलिसांचं दुर्लक्ष असल्याचं दिसतंय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

14 July 2025 13:09 PM

'लाडकी'च्या निधीवरुन मंत्री दत्ता भरणेंचा यूटर्न

Datta Bharne : लाडकी बहीण योजनेमुळे विकास निधी येण्यास विलंब होत असल्याच्या वक्तव्यावरुन मंत्री दत्ता भरणेंनी यूटर्न घेतलाय.. आपण तसं बोललोच नाही असं भरणेंनी म्हटलंय.. लाडक्या बहिणींमुळे विकास निधी येण्यास विलंब होतोय असं विधान दत्ता भरणेंनी इंदापुरातील एका कार्यक्रमात केलं होतं. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भरणेंनी हे वक्तव्य कुठल्या हेतूनं केलं ते विचारतो असं म्हटलं होतं.. अजित पवारांनी खडसावल्यानंतर भरणेंनी कोलांटउडी मारलीय..

14 July 2025 12:31 PM

माझ्या हत्येचा प्रयत्न झाला - प्रवीण गायकवाड

Pravin Gaikwad : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काल काळं फासण्यात आलं. झी 24 तासवर बोलताना प्रवीण गायकवाड यांनी गंभीर आरोप  केलाय...  माझ्या हत्येचा प्रयत्न होतो असा आरोप गायकवाड यांनी केलाय... तसेच हल्लेखोर दीपक काटेसाठी बावनकुळेंनी पोलिसांना फोन केल्याचाही आरोप गायकवाड यांनी केलाय...तसेच हल्ल्यानंतर संभाजी ब्रिगेड जशास तसं उत्तर दिलं जाणार असल्याचही इशारा प्रवीण गायकवाड यांनी झी 24 तासवर बोलताना केलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

14 July 2025 11:33 AM

आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेत तरुणीवर अत्याचार

Alandi Rape : आळंदीमधल्या केळगाव रस्त्यावर असलेल्या एका खासगी वारकरी शिक्षण संस्थेत तरुणीला डांबून तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय...या प्रकरणात एका कीर्तनकार महिलेसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलंय...2 जून रोजी पीडित महिला घरी एकटी असताना तिच्या ओळखीच्या एका महिलेने तिला शेताकडे जाण्याचे कारण सांगून घराबाहेर नेले. नंतर तिला आळंदी येथील खासगी मुलींच्या वारकरी शिक्षण संस्थेत नेण्यात आले.. तिथे आण्णासाहेब आंधळे, प्रविण आंधळे, कीर्तनकार सुनिता आंधळे आणि अभिमन्यु आंधळे यांनी तिला खोलीत डांबून ठेवलं..त्यानंतर आण्णासाहेब आंधळे यांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचं पीडित मुलीने सांगितलंय..याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरुये...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

14 July 2025 10:34 AM

जायकवाडीचा पाणीसाठा 75.66 टक्क्यांवर 

Jakiwadi Dam : गेल्या २५ वर्षांत पहिल्यांदाच जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात जायकवाडीत ७५.६६ टक्के पाणीसाठा झालाय. सध्या धरणात ९,४८२ क्युसेकने आवक होतेय. त्यामुळे मराठवाड्यातील ५ जिल्ह्यांतील पावणेदोन लाख हेक्टर सिंचनाचा प्रश्न मिटलाय. तसंच छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यातील शहरांची दोन वर्ष पिण्याच्या पाण्याची समस्या सुटलीय..जायकवाडीच्या वरील भागात झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात, गेल्या १५ दिवसांपासून पाण्याची आवक वाढतेय. १८ दिवसांतच धरणाचा साठा २९ वरून ७५ टक्क्यांवर गेला. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

14 July 2025 10:24 AM

शेतकऱ्याची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक

Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील शिरसगाव इथे ४७ वर्षीय शेतकऱ्याचा घरासमोरच धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची घटना उघड झाली. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवत अवघ्या 24 तासांत आरोपींना बेड्या ठोकल्या. राजाराम ऊर्फ राजू भाउसिंग चुंगडे असं मृत शेतक-याचं  नाव असून, आनंद राजपूत, इरफान शहा, समीर कुरेशी आरोपींची नावं आहेत. यातल्या आरोपी आनंद राजपुत यांना राजाराम यांनी मारहाण केली होती त्याचा राग मनात ठेवून तसंच जमीन प्रकरणातल्या पूर्व वैमनस्यातीन खून केल्याची कबुली आरोपींनी दिली.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

14 July 2025 09:09 AM

पुण्यातील कॅफे गुडलकचा परवाना तात्पुरता निलंबित

Pune Cafe Goodluck : पुण्यातील प्रसिद्ध  गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात करण्यात आला आहे...  बन मस्क्यात काचेचे तुकडे आढळल्या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे...तपासणीत आढळलेल्या त्रुटी दूर होईपर्यंत परवाना निलंबितच राहणार आहे.... 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

14 July 2025 08:55 AM

बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि परुपल्ली कश्यपचा घटस्फोट

Saina Nehwal : भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि ऑलिंपिक पदक विजेती सायना नेहवालने तिच्या वैयक्तिक आयुष्यातील एक धक्कादायक निर्णयाची घोषणा केली.... सायना आणि तिचा पती पारुपल्ली कश्यप यांनी घटस्फोट घेतल्याची बातमी तिने दिली.... सायनाने सोशल मीडिया स्टोरीद्वारे ही माहिती शेअर करून देशभरातील बॅडमिंटन चाहत्यांना धक्का दिला.... सायना आणि भारताचा माजी नंबर-1 पुरुष बॅडमिंटन स्टार पारुपल्ली कश्यप हे दोघे दीर्घ काळ रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी २०१८ मध्ये लग्न केले होते. मात्र आता ७ वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेतला आहे. मात्र त्यांच्या वेगळे होण्याचे खरे कारण अद्याप कळलेले नाही.

बातमी पाहा - Saina Nehwal चा संसार मोडला! लव्ह मॅरेजनंतर घटस्फोट; Insta पोस्ट चर्चेत, म्हणाली, 'आम्ही दोघेही...'

14 July 2025 08:16 AM

लॉर्ड्स टेस्ट रोमहर्षक वळणावर

India Vs England Test : लॉर्ड्स टेस्ट रोमहर्षक वळणावर येऊन ठेपलीय. शेवटच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 135 तर इंग्लंडला 6 विकेट्सची गरज आहे.. टीम इंडियानं चौथ्या दिवशी इंग्लंडला सुरुवातीपासूनच धक्के दिले.. त्यामुळे इंग्लंडला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलंय. टीम इंडियातर्फे वॉशिंग्टन सुंदरनं 4 विकेट्स घेत इंग्लंडच्या इनिंगला लगाम घातलाय. इंग्लंडनं टीम इंडियासमोर विजयासाठी 193 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं.. मात्र इंग्लिश बॉलर्सनी जयस्वाल, गिल, नायर आणि नाईट वॉचमन आकाश दीपला झटपट माघारी धाडत भारताच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण केलंय. विजयासाठी आता अखेरच्या दिवशी टीम इंडियाची संपूर्ण भिस्त सलामीवीर के.एल.राहुल, रिषभ पंत आणि रवींद्र जाडेजावर असेल.. त्यामुळे लॉर्ड्स टेस्टवर कोण कब्जा करणार याकडे क्रिकेटप्रेमींच्या नजरा असतील 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

14 July 2025 08:14 AM

यानिक सिन्नेर नवा विम्बल्डनचा राजा

Wimbledon Champion 2025 : इटलीचा यानिक सिन्नेर नवा विम्बल्डन चॅम्पियन ठरलाय. फायनलमध्ये स्पेनच्या कार्लोस अल्कराझचं कडवं आव्हान सिन्नेरनं मोडीत काढलंय. सिन्नेरनं अल्कराझचा 4-6, 6-4, 6-4, 6-4 असा धुव्वा उडवलाय. सिन्नेरचं करिअरमधील पहिलं विम्बल्डनं ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे.. मात्र अल्कराझचं तिस-यांदा विम्बल्डन जिंकण्याचं स्वप्न भंगलंय.

TAGS

Latest Marathi BatmyaLatest News In marathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking NewsToday's Breaking Newslatest newsCurrent Breaking Newslatest news todaylive newscurrent newstoday newsbreaking news todayLive News MarathiMumbai Pune Latest NewsNational International Latest NewsEntertainment Latest Newsmaharashtra latest news todayलेटेस्ट मराठी न्यूजमहाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडेमराठी ताज्या बातम्यामराठी ब्रेकिंग न्यूज अपडेटमुंबई पुणे ताज्या बातम्याराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्यामनोरंजन ताज्या बातम्यामहाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूजमराठी न्यूज लाइव्हलाइव्ह न्यूजआजच्या ठळक घडामोडीमराठी बातम्याझी 24 तासमराठी ब्रेकिंग न्यूजताज्या मराठी बातम्यामहाराष्ट्रातील आजच्या बातम्याराजकीयसामाजिकक्रीडाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराज ठाकरेउद्धव ठाकरेशरद पवारमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील लाईव्ह बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्या
Read More