Kolhapur : अनेक वर्षांची खंडपीठाची प्रलंबित मागणी अखेर पूर्ण होणार...कोल्हापूरमध्ये होणार मुंबई हायकोर्टाच खंडपीठ होणार...सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कार्यकाळातच कोल्हापुरात खंडपीठ होणार...गवई हे येत्या नोव्हेंबर महिन्यात होणार आहेत निवृत्त...पुढील महिन्यात मुंबई हायकोर्टाकडून सुप्रीम कोर्टात प्रस्ताव पाठवला जाणार...खंडपीठाबाबतची मुंबई हायकोर्टाकडून प्रक्रिया सुरू, सूत्रांची माहिती
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा टीझर जारी...उद्धव ठाकरेंची 19,20 तारखेला मुलाखत...संजय राऊतांनी घेतली मुलाखत... राज आपल्यासोबत आलाय - उद्धव ठाकरे...मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचे अनेक विषयांवर भाष्य
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Shashikant Shinde : शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष...शिंदे राष्ट्रवादी SPचे नवे प्रदेशाध्यक्ष...जयंत पाटलांचा प्रदेशाध्यपदाचा राजीनामा...शशिकांत शिंदेंच्या नावाची घोषणा...राष्ट्रवादी SPच्या बैठकीत शशिकांत शिंदेंच्या नावाची घोषणा कऱण्यात आलीय...भाषण करताना जयंत पाटील भावुक...जयंत पाटील यांच्या डोळयात अश्रू
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Shubhanshu Shukla : AXIOM-4 मोहिमेअंतर्गत अंतराळात गेलेले कॅप्टन शुभांशू शुल्का पृथ्वीवर परतलेत.. कॅलिफोर्नियाच्या समुद्रात चार अंतराळवीरांचं आगमन झालंय.. शुभांशू शुक्ला पृथ्वीवर आल्यानंतर भारतात जल्लोष साजरा करण्यात आलाय.. शुभाशू शुक्लांचं कुटुंबीय भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.. तसेच भारतीयांनाही जल्लोष केल्याचं पाहायला मिळालंय...
Chandrapur : भरारी पथकातील पोलीस असल्याची बतावणी करून अवैध दारू व्यावसायिकाकडून खंडणी उकळणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केलीय. चंद्रपूरच्या मूल तालुक्यातील ही घटना आहे. या कारवाईत 13 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या तिघांनी मूल तालुक्यात दोघांना गंडवल्याचे समोर आले आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Pune : पुण्यातील तळजाई टेकडीवर पोलीस भरतीचा सराव करणा-या तरुण-तरुणींवर गावगुडांनी हल्ला केलाय...तसेच मुलींकडे पाहून अश्लील कमेंट करत शिवीगाळ करण्यात आलीये...त्यानंतर काही मुलांना मारहाण करत तुमची लायकी नाही पोलीस होण्याची असं म्हणत मारहाण केलीये... मागील काही दिवसांपासून हे गावगुंड पोलीस भरतीचा सराव करणा-या मुलीचा पाठलाग करत होते...याप्रकरणी पोलीस भरतीचे शिक्षक मुले आणि मुली सहकारनगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यासाठी दाखल झालेत...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Mira Bhayandar : मिरा-भाईंदर शहरात कचरा संकलन करण्यासाठी 70 हजार रुपये प्रतिनग किमतीचे 500 डबे खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. याशिवाय साडेनऊ लाख रुपये प्रतिनग किमतीचे 21 स्वयंचलित डबेही घेतले जातील. एकूण 3 हजार 889 डब्यांच्या खरेदीसाठी 19 कोटी रुपयांचा खर्च होणार असून, महापालिकेने यास नुकतीच मंजुरी दिली आहे. शहरातील स्वच्छता राखण्यासाठी महापालिकेने विविध ठिकाणी कचराकुंड्या उभारल्या आहेत. तसेच, गृहसंकुलांतून कचरा गोळा करण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या क्षमतेचे कचरा डबे बसवण्यात आले आहेत. मिरा-भाईंदर महापालिका कचऱ्याच्य 3 हजार 889 डब्यांसाठी 19 कोटी खर्च करणार आहे. एका डब्याची किंमत 70 हजार रुपये आहे. महापालिकेने याबाबतची मंजुरीही दिली आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
NDA : राज्यपालांच्या नियुक्त्यांमध्ये तेलुगू देसमचे नेते व माजी केंद्रीय मंत्री अशोक गजपती राजू यांची गोव्याच्या राज्यपालपदी सोमवारी नियुक्ती करण्यात आली. त्याच वेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची अवहेलना सुरूच आहे. तीन राज्यांच्या राज्यपालांची नव्याने नियुक्ती करण्यात आली. त्यात गोव्याच्या राज्यपालपदी माजी हवाई वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांचा समावेश आहे. राजू हे तेलुगू देसमचे नेते असून, मागील सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषविले होते. लोकसभेत 16 खासदार असलेल्या तेलुगू देसमला भाजपकडून नेहमीच झुकते माप मिळते. केंद्रीय अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशसाठी विशेष आर्थिक तरतूद करण्यात आली होती. राज्यपालांच्या नियुक्तीत मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांची शिफारस मान्य करण्यात आली. तसेच 12 खासदार असलेल्या बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या संयुक्त जतना दलाच्या मागण्या मान्य करण्यात येतात. यंदाच्या अर्थसंकल्पात बिहारवर विशेष भर देण्यात आला. तेलुगू देसम वा संयुक्त जनता दलाच्या तुलनेत तिसऱ्या क्रमांकावरील सात खासदार असलेल्या शिवसेना शिंदे गटाला भाजपकडून फारसे महत्त्व दिले जात नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Kolhapur Rahi Sarnobat : जागतिक स्तरावर देशाचा झेंडा उंचावणाऱ्या नेमबाज राही सरनोबत गेल्या आठ वर्षांपासून पगारापासून वंचित आहेत. शासनाकडून फक्त आश्वासन दिल जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय.. ओलंपियन नेमबाज राही सरनोबत यांची 2014 मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून नेमणूक केली होती. त्यांना सुरुवातीला तीन वर्षे पगार मिळाला. मात्र नंतर प्रशिक्षणार्थी कालावधी पूर्ण केला नाही म्हणून सरकारने आतापर्यंतचा पगार सरकारने दिलेला नाही. यासंदर्भात आमदार अमित गोरख यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Bacchu Kadu : यवतमाळच्या महागांव पोलिसात बच्चू कडू यांच्यासह बारा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. काल बच्चू कडूंनी त्यांच्या सातबारा कोरा या पदयात्रेचा समारोप सभा नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर केला..त्यामुळे तब्बल तीन तास दोन्ही बाजुची वाहतुक ठप्प झाली होती. सभेचा मंच रस्त्यावरच उभा करण्यात आला. शिवाय अनेक ट्रॅक्टर आणि वाहने रस्त्यावर ठेवून ही सभा घेण्यात आली. त्यामुळे रस्ता अडविल्या प्रकरणी बच्चू कडून सह 12 जण आणि इतरांवर महागाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
Nashik Hemant Godse : नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे शहरातील काही माजी नगरसेवकांसोबत ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत मोठी स्पर्धा निर्माण झालीय. आता लोकसभेच्या उमेदवारीवर डोळा ठेवून गोडसे आपली रणनीती आखत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पसरलीय. त्यामुळे महायुतीत नेमकं चाललंय काय असा सवाल उपस्थित होतोय.. दरम्यान हेमंत गोडसे मात्र मी सध्या शिंदे पक्षातच असल्याचं सांगत याबाबत वृत्त फेटाळले आहे
Sambhaji Brigade : संभाजी ब्रिगेड या आमच्या संघटनेच्या नावात कसलाही बदल करणार नाही. संघटनेच्या नावात कानामात्राचाही बदल करणार नाही असं संभाजी ब्रिगेडनं स्पष्ट केलंय.. मुद्याला मुद्यानं उत्तर देण्याचा संभाजी ब्रिगेडचा इतिहास असल्याचं मनोज आखरे म्हणालेत.. हल्ला कऱणा-यांना संभाजी महाराजांबद्दल प्रेम असेल तर त्यांनी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर प्रकरणात भूमिका का घेतली नाही असा सवाल संभाजी ब्रिगेडनं उपस्थित केलाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Badlapur : बदलापूरजवळील चिंचवली आणि कोपऱ्याची वाडी या दोन गावांजवळ असलेल्या दगड खाणीला मुंबई उच्च न्यायालयानं 190 कोटींचा दंड ठोठावलाय. इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये ही दगड खाण सुरू होती. या दगड खाणीमुळे भूस्खलन आणि दरड कोसळून गावं उध्वस्त होण्याच्या भीतीनं गावकरी भयभीत झाले होते. नियमांचं उल्लंघन आणि परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्यानं कोर्टानं दगड खाणीवर दंडात्मक कारवाई केलीय. राज्यातील दगड खाणीला इतक्या मोठ्या प्रमाणात दंड ठोठावण्याची ही पहिलीच वेळ आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Vaishnavi Hagawane case : वैष्णवी हगवणेच्या हुंडाबळी प्रकरणात दोषारोपपत्र सादर झालं आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी 1 हजार 676 पानांचा दोषारोपपत्र तयार केलं आहे. आत्महत्येच्या 59 दिवसांनी हे दोषारोपपत्र बावधन पोलिसांनी पुणे सत्र न्यायालयात सादर केलं. वैष्णवीने 16 मे 2025 रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हगवणे कुटुंबातील सासरा राजेंद्र, पती शशांक, सासू लता, नणंद करिष्मा आणि दिर सुशील यांनी तिला जीव देण्यास भाग पाडले. हुंड्यासाठी हगवणे कुटुंबीयांनी वैष्णवीचा अमानुष छळ केला. त्यानंतर हगवणे कुटुंबियांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या.तर वैष्णवीच्या दहा महिन्याच्या बाळाची हेळसांड प्रकरणी निलेश चव्हाणही अटकेत आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Mahayuti Samanvay Meeting : महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक पार पडणारय. महायुतीच्या समन्वय समितीचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करणार आहेत. महामंडळाचे वाटप, शासकीय नियुक्त्या, समित्यांचे वाटप आणि इतर मुद्द्यांवर शिक्कामोर्तब होणारय. तसेच महायुतीतील काही नेत्यांच्या वादग्रस्त विधाने आणि आक्षेपार्ह वर्तनामुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी, डॅमेज कंट्रोलसाठी काही निर्णय होण्याची शक्यता.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
NCP SP Meeting : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला आज नवीन प्रदेशाध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. आज दुपारी होणाऱ्या कोअर कमिटीच्या बैठकीत पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून शशिकांत शिंदे यांच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात येणार असल्याचं समजतंय.. दुपारी 2 वाजता YB सेंटर येथे कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली असून बैठकीत मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शशिकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करतील असं बोललं जातंय... कोअर कमिटीच्या बैठकीपूर्वी आज दुपारी 1 वाजता शरद पवार यांच्यासोबत पक्षाच्या नेते चर्चा करतील. तसेच पक्षातील आमदार रोहित पवार यांच्यावर देखील नवीन जबाबदारी देण्यात येईल. अशी माहिती मिळतेय.
गरीब व गरजू लोकांना हेरायचे. त्यांना कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली मोबाइल खरेदी करायचा. पुढे हे मोबाइल विकून पैसे मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवत फसवणूक करणाऱ्या सोनू बाबा पीर मोहम्मद (36) याला धारावी पोलिसांनी अटक केली आहे.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.