Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा झटपट आढावा

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 16 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.  

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा झटपट आढावा
LIVE Blog
16 July 2025
16 July 2025 20:19 PM

मला काही बोलायचं असेल तर पत्रकार परिषद घेईन- राज ठाकरे

 

Raj Thackeray : युतीवरून राज ठाकरेंनी सुनावलं... एक्स पोस्ट करत राज ठाकरेंनी सुनावलं..मला काही बोलायचं असेल तर पत्रकार परिषद घेईन...कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर मी अधिकृत पत्रकार परिषद घेईन...राज ठाकरेंची एक्स पोस्ट करत माहिती

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

16 July 2025 19:12 PM

सोन्याच्या चमचावरुन शिंदे आणि ठाकरेंमध्ये जुंपली

 

Maharashtra Politics : विधानपरिषदेत सोन्याच्या चमच्यावरून उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालंय.. अंबादास दानवें सोन्याचा जन्म सोन्याचा चमचा घेऊन झाला नाही असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं..तोच धागा पकडून उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर पलटवार केलाय.... अंबादास दानवेंनी भरलेल्या ताटाशी कधीच प्रतारणा केली नाही.. भरलेलं ताट तुम्ही कधीच हिसकावून घेतलं नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले तर सोन्याच्या चमचातून तुम्हाला ज्यांनी वाढलं त्यांच्या घराचे वासे तुम्ही मोजले नाहीत असं अनिल परब सांगत शिंदेंना टोला लगावलाय...  

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

16 July 2025 18:25 PM

भ्रष्टाचाराच्या भुतांचा रेशनिंगवर डोळा

 

Ration Scam : स्वस्त धान्य दुकानं ही गरिबांसाठी आधार आहेत... रेशनिंग यंत्रणा अधिक पारदर्शक व्हावी यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या गेल्या. पण काहीही केलं तरी रेशनिंग यंत्रणेतला भ्रष्टाचार संपता संपत नाहीये. रेशनिंग दुकानातून मरण पावलेल्या लोकांच्या नावे रेशनिंग उकळलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. झी 24 तासच्या एसआयटी टीमनं रेशनिंग यंत्रणेतल्या भ्रष्टाचाराच्या या भुतांचा पर्दाफाश केलाय..
 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

16 July 2025 17:24 PM

उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसणं टाळलं

 

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टाळलं..उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या बाजूला बसणं टाळलं

 

16 July 2025 16:06 PM

 मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंना ऑफर

 

Devendra Fadnavis ON Uddhav Thackeray : मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंना ऑफर...आम्हाला विरोधी पक्षात जाण्याचा स्कोप नाही... 2029 पर्यंत विरोधी पक्षात जाण्याचा स्कोप नाही...ठाकरेंना इकडे येण्याचा स्कोप- फडणवीस...... इकडे यायचं असेल तर बघा तुम्हाला स्कोप आहे

16 July 2025 14:12 PM

हनीट्रॅपमध्ये राज्यातील मंत्री आणि अधिकारी?

Nana Patole : राज्यातील मंत्री आणि अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकल्याचा दावा करण्यात येतोय.. हनीट्रॅपच्या माध्यमातून गोपनीय कागदपत्रं बाहेर येतायत. यांत अनेक आयएएस अधिकारी आणि काही मंत्री सहभागी आहेत. त्यामुळे सरकारनं यावर स्पष्टीकरण द्यावं अशी मागणी काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत केलीय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

16 July 2025 13:09 PM

GST प्रणालीत मोठ्या बदलाची शक्यता

GST New Slab : GST व्यवस्थेत मोठा बदल होण्याची शक्यता आहे.. GSTमध्ये 12% स्लॅब काढण्याची सरकारनं तयारी दाखवल्याची माहिती सूत्रांनी दिलीये..GSTतील बदलासाठी पंतप्रधान कार्यालयानं हिरवा कंदील दिल्याचीची माहिती सूत्रांनी दिलीये. GST लागू झाल्यानंतर 8 वर्षात बदल करण्याची पहिलीच वेळ आहे.. या बाबतचा निर्णय हा GST परिषदेच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे..संसदेच्या पावसाळी अधिवेशनानंतर ऑगस्ट महिन्यात GST परिषदेची ही बैठक होण्याची शक्यता आहे..

16 July 2025 12:38 PM

तुमचं फेसबुक अकाऊंट ब्लॉक?

Facebook Account : कंटेंट चोरी करणाऱ्यांना दणका यूट्यूबपाठोपाठ आता मेटानेही मोठी कारवाई करत तब्बल एक कोटी फेसबुक अकाऊंट्स ब्लॉक केले. अनओरिजिनल, स्पॅम कंटेंट किंवा कंटेंट चोरी करणाऱ्या अकाऊंट्सवर कारवाईचा बडगा उगारला. याशिवाय बनावट अकाऊंट्स, रिपिटेटिव्ह पोस्ट आणि व्ह्यूज किंवा पैशासाठी सिस्टममध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न करत होते, अशा पाच लाख खात्यांवर दंड ठोठावला आहे. मेटा आता डुप्लिकेट व्हिडीओ शोधण्यासाठी आणि ते हटवण्यासाठी अॅडव्हान्स डिटेक्शन टूल्सचा वापर करत आहे. याद्वारे ओरिजिनिल कंटेट क्रिएटर्सना त्यांचे श्रेय आणि रिच मिळेल. आता वारंवार कंटेट चोरी करणाऱ्या अकाऊंट्सच्या रिचवर परिणाम होणार नाही, तर अशा अकाऊंट्सना फेसबुक मोनेटायझेशन प्रोग्रॅमद्वारे पैसे कमविण्याची संधीदेखील मिळणार नाही. मेटा सध्या एका वेगळ्या फीचरची चाचपणी करत आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

16 July 2025 12:32 PM

पीएफच्या नियमांमध्ये मोठा बदल

New PF Rules : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे epfoने पीएफ काढण्याच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. याचा पगारदारांना मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकेल. स्वतःचे घर घ्यायचे ज्यांचे स्वप्न आहे, त्यांच्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. नव्या नियमांनुसार, कर्मचारी त्यांच्या पीएफ खात्यातून 90 टक्के इतकी रक्कम काढू शकतात. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

16 July 2025 12:29 PM

नर्सिंगची प्रॅक्टीस करणा-या मुलीवर अत्याचार

Malegaon Crime : मालेगावात एका डॉक्टरनं अल्पवयीन परिचारिकेवर अत्याचार केलाय. पीडित आदिवासी मुलगी मालेगावच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये नर्सिंगची प्रॅक्टिस करीत होती. 12 जुलैच्या रात्री 8 वाजता नेहमीप्रमाणे सदर तरुणी हॉस्पिटलमध्ये नर्सिंग प्रॅक्टिससाठी गेली असता, पहाटे 03.30 वाजण्याच्या सुमारास मोहम्मद अथर खुर्शिद अहमदने तिला हॉस्पिटलच्या मागील लिफ्टजवळ बोलावलं आणि तिच्यावर अत्याचार केला.. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्या आली असून आरोपी मोहम्मद अथर खुर्शिद अहमद याच्यावर पोलिसांनी पॉस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

16 July 2025 11:23 AM

मुंबईकरांना डेंग्यू, मलेरियाचा 'ताप'

Mumbai : मुंबई शहरासह उपनगरात मुसळधार पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही.... परंतु या वातावरणात मुंबईकरांच्या डोक्याला ताप झाला आहे.... कारण, मलेरियाच्या रुग्णांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रचंड वाढली आहे.... 6 महिन्यांत मुंबईत मलेरियाचे 3490 रुग्ण सापडले आहेत... तर 14 हजार 233 ठिकाणी आढळल्या डेंग्यूच्या अळ्या आढळल्या आहेत.....मुंबई महापालिकेने वारंवार परिसर स्वच्छ ठेवा, ड्रम तसेच अडगळीच्या सामानांसह घरातील आणि परिसरातील कुंड्यांमध्ये पाणी साचू देऊ नका, पाणी वारंवार बदला, असे आवाहन केले आहे. तरीही अनेक भागात डेंग्यू आणि मलेरियाच्या अळ्यांची पैदास मोठ्या प्रमाणावर झाल्याचे पालिकेच्या आकडेवारीवरून समोर आले आहे....

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

16 July 2025 10:07 AM

पारधी समाजाच्या घरावर प्रशासनाचा बुलडोझर

Beed : बीडच्या पाटोदा शहरात एक हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. पारधी समाजातील दिव्यांग पवार कुटुंबाच्या घरावर अचानक बुलडोझर फिरवण्यात आलाय.. त्यांचा संपूर्ण संसार काही क्षणांत उद्ध्वस्त करण्यात आलाय. घर तुटत असताना दिव्यांग तरुण पोलिस अधिका-यांच्या पायावर लोळण घालत विनवणी करत होता. मात्र पोलिस प्रशासनाला कसलीच दया आली नाही. काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ आता समोर आला आहे. एवढंच नव्हे तर परिसरातील 25 ते 30 झाडांचीही कत्तल करण्यात आलीये.. पाटोदा शहरातील सरकारी रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या गायरान जमिनीवर हे आदिवासी पारधी कुटुंब गेल्या 30 वर्षापासून वास्तव्यास आहे. मात्र काल तहसील आणि पोलिस प्रशासनाकडून घरावर जेसीबीच्या सहायाने तोडक कारवाई करण्यात आली. ऐन पावसाळ्यात डोक्यावरील छत तोडल्यानं हे कुटुंब उघड्यावर आलंय.  आम्हाला कोणी वाली नाही का? असा सवाल त्यांनी प्रशासनाला विचरलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

16 July 2025 09:56 AM

पंढरपूर दुहेरी हत्याकांडानं हादरलं

Pandharpur Murder : पंढरपूर शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे.... कुंभार गल्लीमध्ये रात्री साडेनऊच्या सुमारास आई आणि मुलाची राहत्या घरी निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.... या घटनेमुळं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.... या घटनेनंतर तातडीने पोलीस पथके घटनास्थळी दाखल झाली असून तपास सुरू आहे... 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

16 July 2025 09:53 AM

अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

Beed  Rape : सामूहिक अत्याचाराच्या घटनेनं बीड जिल्हा हादलाय.. बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची घटना समोर आली आहे. याप्रकरणी 4 आरोपीं विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.  आरोपींनी ओळखीचा गैरफायदा घेत बळजबरीने शारीरिक अत्याचार केल्याचा आरोप पीडित मुलीनं केलाय.. त्यानंतर आरोपींनी या मुलाला धमकावलं.. तसंच मुलगी गर्भवती राहील्यांनतर आरोपींच्या नातेवाईकांनी गर्भपातासाठी दबाव टाकल्याची तक्रारही पीडित मुलीनं केलीये.. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. 

16 July 2025 09:23 AM

लातूर शिक्षणाचं शहर की ड्रग्जचा बाजार?

Latur Drugs : लातूर हे शिक्षणासाठी देशभर ओळखलं जाणारं शहर… पण या शिक्षणाच्या गाभाऱ्यात आता अंमली पदार्थांचं विष झिरपतंय… मुंबई आणि हैदराबादहून लातुरात पोहोचणाऱ्या ड्रग्जचा पसारा एवढा वाढलाय की, गेल्या तीन महिन्यांत पोलिसांनी तब्बल २ कोटी १० लाख रुपयांचं ड्रग्ज जप्त केलं…लातूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने तीन ठिकाणी मोठी कारवाई करत अकरा जणांना अटक करण्यात आलं होतं.त्यानंतर आता पोलीसांनी आणखीन तिघांना अटक केली आहे. तरीही या ड्रग्ज सिंडिकेटच्या मुळापर्यंत पोलीस अजून पोहोचले नाहीत. एकूणच पालकांमध्ये चिंता वाढलीय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

16 July 2025 09:08 AM

राज्यात 'कृषी समृद्धी' योजना राबवणार

Peek Vima : जुन्या पीक योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे.. त्यामुळे त्यात सुधारणा करून नवीन पीकविमा योजना लागू केली आहे.... या योजनेखेरीज शेतक-यांच्या विकासासाठी आणि शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी 'कृषी समृद्धी' योजना राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी विधान परिषदेत दिली....सुधारित पीकविमा योजनेमध्ये शेतक-यांना विमा भरपाई मिळत नसल्यामुळे विविध जिल्ह्यांतील शेतक-यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.... राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य सरकार वेगळी योजना आणणार आहे का, असा प्रश्न आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना कृषिमंत्री कोकाटेंनी ही माहिती दिलीय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

16 July 2025 08:53 AM

मुंबईतील कबुतरखान्यांवरील कारवाईस मज्जाव

Mumbai Kabutar Khana : मुंबईतील कबुतरखान्यांवर पाडकाम कारवाई करण्यापासून हायकोर्टाने महापालिकेला मज्जाव केला.... त्याचवेळी महापालिकेच्या कारवाईविरोधातील याचिकेत न्यायालयाने केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना पक्षकार म्हणून समाविष्ट करण्याचे आदेश देताना महापालिका आणि भारतीय प्राणी कल्याण मंडळाला याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले.. कबुतरखान्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे, हे कबुतरखाने बंद करण्यासाठी तात्काळ मोहीम राबवावी, असे आदेश विधान परिषदेत सरकारच्या वतीने मुंबई महापालिकेला देण्यात आले होते.... त्यामुळे दादरसह मुंबईतील कबुतरखाने बंद करा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर, लगेचच महापालिकेने दादर पश्चिम येथील कबुतरखान्यावर कारवाई करून अनधिकृत बांधकाम हटवले.... मुंबईतील अन्य कबुतरखान्यांवरही अशीच कारवाई महापालिकेने सुरू केली होती....या कारवाईविरुद्ध पल्लवी पाटील, स्नेहा विसरारिया आणि सविता महाजन या तीन पक्षीप्रेमींनी हायकोर्टात धाव घेतली होती... तसेच, महापालिकेने 3 जुलैपासून कायदेशीर अधिकाराशिवाय कबुतरखाने पाडण्याची मोहीम सुरू केल्याचा दावा केला. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. युक्तिवाद ऐकल्यानंतर कबुतरखान्यांवर तूर्त कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला दिले. तसेच, प्रतिवादींनी याचिकेवर २३ जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचेही स्पष्ट केले.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

16 July 2025 08:50 AM

आंबेनळी घाट रस्ता अवजड वाहनांसाठी बंद

Raigad Ambenal Ghat : रायगडमध्ये जात असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे कारण रायगडला जाणारा आंबेनळी घाट रस्ता अवजड वाहनांसाठी पूर्णपणे बंद कऱण्यात आलाय. 15 ऑगस्टपर्यंत अवजड वाहनांना बंदी असणार आहे. हवामान विभागानं रायगड जिल्ह्यासाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट दिल्यानं अवजड वाहतूक बंद कऱण्याचा निर्णय घेण्यात आलाय.. दरड कोसळण्याच्या घटना लक्षात घेऊन सावधगिरीचा उपाय म्हणून अवजड वाहनांसाठी आंबेनळी घाट रस्ता बंद करण्यात आलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

TAGS

Latest Marathi BatmyaLatest News In marathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking NewsToday's Breaking Newslatest newsCurrent Breaking Newslatest news todaylive newscurrent newstoday newsbreaking news todayLive News MarathiMumbai Pune Latest NewsNational International Latest NewsEntertainment Latest Newsmaharashtra latest news todayलेटेस्ट मराठी न्यूजमहाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडेमराठी ताज्या बातम्यामराठी ब्रेकिंग न्यूज अपडेटमुंबई पुणे ताज्या बातम्याराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्यामनोरंजन ताज्या बातम्यामहाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूजमराठी न्यूज लाइव्हलाइव्ह न्यूजआजच्या ठळक घडामोडीमराठी बातम्याझी 24 तासमराठी ब्रेकिंग न्यूजताज्या मराठी बातम्यामहाराष्ट्रातील आजच्या बातम्याराजकीयसामाजिकक्रीडाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराज ठाकरेउद्धव ठाकरेशरद पवारमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील लाईव्ह बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्या
Read More