Vidhanbhawan : विधान भवन मारहाण प्रकरणी दोन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे... ऋषीकेश टकले आणि नितीन देशमुखला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली....21 जुलैला याप्रकरणी पुढील सुनावणी होणार आहे...ऋषीकेश टकले हा आमदार गोपीचंद पडळकरांचा कट्टर समर्थक आहे. तर नितीन देशमुख हा आमदार जितेंद्र आव्हाडांचा कार्यकर्ता आहे.
Rahul Narvekar : अधिवेशन काळात सामान्य नागरिकांना विधिमंडळात प्रवेश बंदी...विधिमंडळात सदस्य, मंत्री, अधिकृत पीए यांनाच प्रवेश....विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची घोषणा... सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश देण्याचा अधिकार सभापती आणि सचिवांना असणार...देशमुख, टकले यांचं वर्तन प्रतिमा मलीन करणारं'
Pune : पुण्यात नागरिकांची सुरक्षा करणारे पोलीसच असुसरक्षित असल्याचं चित्र आहे.. कारण पुण्यात एका सराईत गुंडानं पोलीस स्टेशनची तोडफोड केलीये.. राजू उर्फ बारक्या लोंढे असं या गुडाचं नाव आहे.. सहकार नगर परिसरातील पोलीस स्टेशनमध्ये त्यानं राडा घालत खिडक्यांच्या काचा फोडल्यात.. कोंबिंग ऑपरेशन मध्ये त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.. या घटनेमुळे गुंडांना पोलिसांचा धाक उरला नाही का असा प्रश्न निर्माण होतोय.
Rohit Pawar : आमदार रोहित पवारांचा पोलिसांना दमबाजी करतानाचा एक व्हिडीओ समोर आलाय..... कार्यकर्त्याला ताब्यात घेतल्यानंतर थेट पोलीस ठाण्यात धाव घेत त्यांनी थेट पोलिसांनाच दमदाटी केलीय... यावेळी कार्यकर्तेही आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Raj Thacekray Social Media Post : विधानभवन लॉबीतील राड्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची प्रतिक्रिया आलीय. काय अवस्था झालीय महाराष्ट्राची म्हणत राज ठाकरेंनी या राड्यावर संताप व्यक्त केलाय. भविष्यात आमदारांची खून पडले तर आश्चर्य वाटणार नाही असंही राज यांनी पोस्टमध्ये म्हटलंय..
Sanjay Raut : विधानभवनातील कालचा राडा हा गँगवॉरचा प्रकार होता. अशी टीका खासदार संजय राऊतांनी केलीय. मकोका, खुनातील आरोपींना पक्षात घेतलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तर कालचा राडा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीला लागलेला डाग असून राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी राऊतांनी केलीय.
Latur : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत आता अर्जदार महिलांच्या उत्पन्नाची थेट आयकर विभागाच्या डेटावरून पडताळणी सुरू झाली आहे… शासनाने योजनेतील गैरफायदा रोखण्यासाठी कडक पावलं उचलली जात आहेत…लातूर जिल्ह्यात आतापर्यंत 25 हजार अर्ज आयकर विभागाच्या पडताळणीत अपात्र ठरलेत… त्यामुळे अर्जदार महिलांमध्ये खळबळ उडाली आहे…यापूर्वी वाहनधारक असलेल्या महिलांची चौकशी झाली होती… आता उत्पन्नाचा थेट तपास सुरू असून… आयकर विवरण पत्रात दाखवलेलं उत्पन्न आणि अर्जाच्या माहितीत तफावत असेल, तर अर्ज सरळ बाद केलं जात आहे… दरम्यान, मागील दहा महिन्यांपासून पोर्टल बंद असल्याने नव्या अर्जांना संधी मिळालेली नाही…
Raigad Fort : पावसाळ्याच्या काळात किल्ले रायगडावर जाण्यासाठी पायरी मार्गाच्या वापराबाबत जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सुधारित आदेश जारी केलेत. पावसाचा रेड किंवा ऑरेंज अलर्ट असेल किंवा अतिवृष्टी होत असेल तर पायरी मार्ग बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी 15 ऑगस्ट पर्यंत किल्ले रायगडकडे जाणारा पायरी मार्ग रहदारी साठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले होते. पायरी मार्गावर दरड कोसळण्याचा धोका लक्षात घेता हे आदेश देण्यात आलेत..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Purandar Airport : पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनाचा तिढा सुटला आहे.... शेतकऱ्यांना चौपट मोबदला आणि दहा टक्के जमीन परतावा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.... यासोबतच बाधित शेतक-यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी नोकरी व व्यवसाय प्रशिक्षणही देण्यात येणार आहे.... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विकास महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला....
Petrol-Dizel Price : कच्च्या तेलाच्या किमती 65 डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर पुढील दोन ते तीन महिन्यांत पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे, असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलंय.... दिल्लीत सुरू असलेल्या 'ऊर्जा संवाद 'मध्ये त्यांनी ही माहिती दिली.... जर इराण-इस्रायल तणावासारखा तणाव निर्माण झाला नाही तर तेलाच्या किमती स्थिर राहतील.... सध्या तेलाच्या किमती 65 डॉलर प्रतिबॅरलपर्यंत खाली आल्या असून, सरकारी कंपन्यांचा नफा वाढत आहे... अशा परिस्थितीत, सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करून जनतेला दिलासा देऊ शकते असं त्यांनी म्हटलंय...
Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये अपहरण प्रयत्न प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. झटपट श्रीमंत होण्यासाठी काका-पुतण्याने मिळून गावातीलच श्रीमंत व्यक्तीच्या मुलीच्या अपहरणाचा कट रचला होता. अपहरण करून दीड कोटींची खंडणी मागण्याचा त्यांचा डाव होता. मात्र नागरिक आणि मुलीच्या प्रतिकारामुळे अपहरणकर्त्यांचा डाव फसला. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. या मुलीचं अपहरण करण्यासाठी गेली काही महिने हे आरोपी रेकी करत असल्याचं सुद्धा समोर आलंय.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.