Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा झटपट आढावा

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 21 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा झटपट आढावा
LIVE Blog
21 July 2025
21 July 2025 22:21 PM

विरोधकांनी प्रबळ पुरावे द्यावेत, हवेत आरोप करू नये- फडणवीस

 

CM Fadanvis on Prafull Lodha : प्रफुल्ल लोढाचे सर्व नेत्यांसोबत फोटो आहेत... विरोधकांनी प्रबळ देऊन आरोप करावेत. असं आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना दिलंय.. तर पुरावे नसताना विरोधकांनी हवेत आरोप करू नये, असंही फडणवीसांनी म्हटलंय.

 

21 July 2025 18:42 PM

प्रफुल्ल लोढा सर्वपक्षीय कार्यकर्ता, गिरीश महाजनांनी फोटो दाखवले

 

Girish Mahajan on Prafull Lodha : प्रफुल्ल लोढा सर्वपक्षीय कार्यकर्ता असल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय.. त्यांनी प्रफुल्ल लोढा यांचे शरद पवार, उद्धव ठाकरे, जयंत पाटलांसह सुप्रिया सुळे यांच्यासोबतचे फोटो दाखवलेत.. तर एकनाथ खडसेंची मानसिक स्थिती खराब झाल्यानं ते आरोप करत असल्याचं त्यांनी म्हटलंय.. प्रफुल्ल लोढाशी कोणतेही संबंध नसल्याचा गिरीश महाजनांचा दावा.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

21 July 2025 14:21 PM

प्रफुल्ल लोढाचा 'तो' व्हिडिओ समोर

 

Prafull Lodha on Mahajan : प्रफुल्ल लोढाचा वर्षभरापूर्वीचा व्हिडिओ व्हायरल.. प्रफुल्ल लोढाचा 'तो' व्हिडिओ समोर.. व्हिडिओमध्ये लोढांची महाजनांविरोधात तक्रार.. गिरीश महाजनांपासून धोका असल्याचा लोढाचा आरोप.. एक वर्षापूर्वीचा व्हिडिओ असल्याची माहिती.. 'झी २४ तास' या व्हिडिओची पुष्टी करत नाहीया व्हिडिओमध्ये आपल्याकडे अनेक पुरावे असल्याचा प्रफुल्ल लोढाने दावा सुद्धा केलाय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

21 July 2025 13:58 PM

सरकार विरोधकांचा आवाज दाबतंय - राहुल गांधी

Delhi Rahul Gandhi : सरकार विरोधकांचा आवाज दाबतंय असा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलाय.. लोकसभाध्यक्ष विरोधकांना बोलू देत नाहीत असा आरोपही राहुल गांधींनी केलाय.. 'सत्ताधा-यांना जितका वेळ, तितका विरोधकांना मिळावा' असंही त्यांनी म्हटलंय.. 

21 July 2025 12:58 PM

उद्धव ठाकरेंचा ऑगस्टमध्ये दिल्ली दौरा

Uddhav Thacekray Visit Delhi : ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. या दिल्ली दौऱ्यादरम्यान इंडिया आघाडीतील नेत्यांची ते भेट घेणारेत...उद्धव ठाकरे मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय. अधिवेशन काळात ठाकरेंचे खासदार गेल्या अधिवेशनात  शिंदेंच्या संपर्कात होते त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याला महत्त्व आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 July 2025 12:36 PM

सूरज चव्हाण, माणिकराव कोकाटेंविरोधात कारवाईचे संकेत

Sunil Tatkare On Suraj Chavan & Manikrao Kokate : सूरज चव्हाण, कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात राष्ट्रवादीकडून कारवाई होण्याची शक्यता आहे...तुळजापुरात छावा संघटनेबाबत झालेल्या बैठकीत तटकरेंनी तसे संकेत दिले आहेत...दोघांचंही वर्तन चुकीचं असल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलंय...

21 July 2025 12:22 PM

वाशिम जिल्ह्यात रेशनचा काळाबाजार

Washim :  वाशिम जिल्ह्यातील कारंजामध्ये रेशनचा काळाबाजार होत असल्याचं समोर आलंय... पुरवठा विभागाने टाकलेल्या छाप्यात 650 बॅग रेशनचा तांदूळ जप्त करण्यात आलाय... दोन गोडाऊन सील करण्यात आले असून अधिकचा तपास सुरू आहे...हा सर्व तांदूळ रेशन दुकानांमधून काळ्या बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आला असल्याचा संशय आहे...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 July 2025 12:16 PM

2006 रेल्वे साखळी बॉम्बस्फोट प्रकरण, सर्व 12 आरोपींची निर्दोष मुक्तता

Mumbai 2006 Railway Blast : मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आलीय.  मुंबईत 2006 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाने हा महत्त्वाचा निकाल दिला. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटात 209 जणांचा मृत्यू झाला होता. तर 800 हून अधिकजण जखमी झाले होते. मात्र, उच्च न्यायालयाने याप्रकरणातील सर्व 11 आरोपींना निर्दोष सोडल्याने तपास यंत्रणांना मोठा झटका बसलाय. यातल्या 12आरोपींपैकी एका आरोपीचा कोरोनात मृत्यू झाला होता. त्यामुळे उर्वरीत 11 आरोपींची आज कोर्टान निर्दोष मुक्तता केलीय, या पाच जणांची फाशीतून तर सात जणांची जन्मठेपेतून सुटका झालीय. न्यायालयात योग्यप्रकारे पुरावे सादर न करता आल्यामुळे  हायकोर्टाने हा निकाल दिलाय  

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 July 2025 12:07 PM

'यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त आणि भयमुक्त, पुणे पोलीस आयुक्तांची ग्वाही

Pune Police : पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी यंदाच्या गणेशोत्सवासाठी नागरिकांना मोठा दिलासा दिलाय... यंदाचा उत्सव कोणत्याही निर्बंधांशिवाय आणि भयमुक्त वातावरणात साजरा होईल, अशी ग्वाही त्यांनी दिलीये. प्रशासन किंवा पोलिसांकडून एकतर्फी निर्बंध लावले जाणार नाहीत. मागील वर्षीची परवानगी वैध राहणार असून नव्याने परवानगीची गरज राहणार नसल्याचं अमितेश कुमार यांनी म्हटलंय..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 July 2025 12:05 PM

मुंबईतील 3040 दुकानांना महापालिकेच्या नोटिसा 

BMC Notice : मराठी भाषेची अस्मिता जपण्यासाठी शिवसेना-मनसेने आवाज उठवताच पालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे.... मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर बृहन्मुंबई महापालिकेने कठोर कारवाईचे पाऊल उचलले आहे.... प्रशासनाने आतापर्यंत मराठी पाट्या न लावलेल्या 3040 दुकानांना नोटिसा धाडल्या असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.... संबंधित दुकानदारांना न्यायालयात हजेरी लावावी लागणार असल्याचे पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय... 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 July 2025 11:53 AM

मद्रास हायकोर्टाचे ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे

Madras High Court On ED : कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात स्वनर्जीने कारवाई करण्यासाठी ईडी हा काही ड्रोन नाही किंवा दिसणाऱ्या प्रत्येक प्रकरणात तपास सुरू करणारा सुपरकॉपही नाही, अशा कडक शब्दांत मद्रास उच्च न्यायालयाने ईडीच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढलेत... दोन सदस्यीय खंडपीठाने म्हटले की ईडी हा फिरता बॉम्ब नाही जो त्याला पाहिजे तिथे स्फोट करेल. त्याला प्रत्येक गोष्टीत उडी घेण्याचा अधिकार नाही असंही कोर्टानं नमूद केलंय.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 July 2025 10:11 AM

सूरज चव्हाणांना तातडीनं अटक करा - अंजली दमानिया

Anjali Damania On Suraj Chavan : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सूरज चव्हाण यांना अटक करण्याची मागणी केलीय.. मारहाण करणं संवैधानिक आहे का असा सवाल दमानियांनी विचारलाय... गुंडगिरी खपवून घेणार नाही असा इशारा दमानियांनी दिलाय... 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 July 2025 09:28 AM

मुंबईत अ‍ॅप अधारित बाईक टॅक्सी सुरूच

Mumbai Bike Taxi :  बंदी असूनही मुंबईत 'अ‍ॅप' द्वारे बेकायदा 'बाइक टॅक्सी' वाहतूक सेवा सुरूच आहे.... याप्रकरणी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या तक्रारीनुसार अंबोली पोलिसांनी रॅपिडो कंपनी आणि त्याच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे....मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 93 नुसार, कोणत्याही प्रवासी वाहतूक सेवेच्या संचालनासाठी आवश्यक परवानगी घेणे बंधनकारक आहे...मात्र, काही 'अ‍ॅप' कंपन्या व चालक हे नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीररित्या सेवा देत असल्याचं समोर आलंय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 July 2025 08:59 AM

राजमाता जिजाऊंच्या वाड्याची दुरवस्था 

Raigad : किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाडमधील राजमाता जिजाऊंच्या राजवाड्याची पुरती दुरवस्था झालीय... ज्या मातेने महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान राजा दिला... त्याच  जिजाऊ साहेबांच्या वास्तव्याचे ठिकाण असलेल्या वाड्याकडे पुरातत्व विभागाचं दुर्लक्ष झालंय...  सर्वत्र वाढलेलं गवत, जंगली वनस्पती, झाडझुडपे यांनी हा परिसर व्यापून टाकलाय.... वाड्यात शिवकाळातील घरांची दगडी जोती, दगडी भिंतीचे अवशेष, तटबंदी, एक विहीर आणि तलाव आजही इतिहासाची साक्ष देत शेवटच्या घटका मोजत उभ्या आहेत.... जिजाऊंचा हा वाडा दुर्लक्षित राहिलाय. येथे भेट देणाऱ्या शिवप्रेमी आणि स्थानिकांकडून याबाबत खंत व्यक्त केली जात आहे.... या ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनाकडे भारतीय पुरातत्व विभागाने पूर्णपणे पाठ फिरवली आहे.... गेल्या अनेक वर्षांपासून या राजवाड्याच्या देखभालीसाठी किंवा दुरुस्तीसाठी कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही.... त्यामुळे या वास्तूचे अवशेष काळाच्या ओघात नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.... गड किल्ल्यांप्रमाणे प्रेरणादायी या वास्तुचे जतन व्हावे अशी मागणी येथे भेट देणारे शिवप्रेमी आणि स्थानिक नागरीकांकडून केले जात आहे

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 July 2025 08:56 AM

संसदेचं आजपासून पावसाळी अधिवेशन

Delhi Sansad Adhiveshan : संसदेचं पावसाळी अधिवेशन २१ जुलै ते २१ ऑगस्टदरम्यान होणार असल्याचे केंद्रीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी घोषित केलं. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार या अधिवेशनाला त्यांच्या कायदेविषयक अजेंड्याने सुरुवात करण्यास उत्सुक असल्याचे दिसून येतंय... मात्र, विरोधक अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान युद्धबंदीत मध्यस्थी केल्याचा दावा, निवडणूक आयोगाने बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदार यादीच्या एसआयआरपर्यंत अनेक मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदी  माध्यमांशी संवाद साधणार आहेत.आयकर विधेयक, नवीन उत्पन्न कर विधेयक, २०२५ वरील संसदीय समितीचा अहवाल लोकसभेत सादर केला जाणार आहे. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

21 July 2025 08:53 AM

छावा संघटनेकडून लातूर बंदची हाक

Latur : छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज सर्वपक्षीय लातूर शहर बंदचे आवाहन करण्यात आलंय. मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि राज्याचे कृषिमंत्री कोकाटे यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा, या मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली... या सर्व मारहाणीची सखोल चौकशी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.दरम्यान, अजित पवारांनी या कार्यकर्त्यांना आवरावे, अन्यथा छावा संघटना जशास तसे उत्तर देईल, असा इशारा छावा संघटनेचे नानासाहेब जावळे पाटील यांनी दिला आहे....दरम्यान, मारहाण झालेले विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर लातुरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये सध्या उपचार सुरू आहेत... या घटनेची माहिती कळल्यानंतर छावाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तसेच विविध पक्ष आणि संघटनांतील पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांनी हॉस्पिटलमध्ये भेट देऊन विजयकुमार घाडगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

TAGS

Latest Marathi BatmyaLatest News In marathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking NewsToday's Breaking Newslatest newsCurrent Breaking Newslatest news todaylive newscurrent newstoday newsbreaking news todayLive News MarathiMumbai Pune Latest NewsNational International Latest NewsEntertainment Latest Newsmaharashtra latest news todayलेटेस्ट मराठी न्यूजमहाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडेमराठी ताज्या बातम्यामराठी ब्रेकिंग न्यूज अपडेटमुंबई पुणे ताज्या बातम्याराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्यामनोरंजन ताज्या बातम्यामहाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूजमराठी न्यूज लाइव्हलाइव्ह न्यूजआजच्या ठळक घडामोडीमराठी बातम्याझी 24 तासमराठी ब्रेकिंग न्यूजताज्या मराठी बातम्यामहाराष्ट्रातील आजच्या बातम्याराजकीयसामाजिकक्रीडाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराज ठाकरेउद्धव ठाकरेशरद पवारमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील लाईव्ह बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्या
Read More