Eknath Khadse and Girish Mahajan Clash : प्रफुल्ल लोढा कुणाचा यावरुन एकनाथ खडसे आणि गिरीश महाजनांमध्ये सुरु झालेले आरोप आता वैयक्तिक पातळीवर पोहोचलेत... प्रफुल्ल लोढाकडं कोणतं गुपित आहे असा सवाल एकनाथ खडसेंनी केला होता. प्रफुल्ल लोढाकडं कोणतं बटण आहे ज्या बटणामुळं गिरीश महाजन लोढाला शरण गेल्याचा दावा खडसेंनी केला होता. खडसेंच्या या आरोपांना गिरीश महाजनांनी सडेतोड उत्तर दिलंच. पण आता या दोघांमधील आरोप वैयक्तिक पातळीवर येऊन पोहोचलेत... निखिल खडसेंच्या आत्महत्येचा विषय गिरीश महाजनांनी छेडलाय. लोढानेच निखिल खडसेंच्या आत्महत्येवर प्रश्नचिन्हं निर्माण केल्याची आठवण करुन दिली... तर खडसेंनीही निखिल खडसेंच्या आत्महत्येची खुशाल चौकशी करा असं प्रतिआव्हान दिलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Kalyan Marhan : कल्याणमध्ये परप्रांतीय तरुणाची दादागिरी.. परप्रांतीय तरुणाकडून मराठी तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली.. कल्याणच्या नांदिवली परिसरातील ही धक्कादायक घटना आहे.. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली असून. यामध्ये गोपाल झा नावाच्या परप्रांतीय तरुणाकडून मराठी तरुणीला बेदम मारहाण केली जात असल्याची दिसत आहे.. कल्याणच्या खासगी रुग्णालयातील ही घटना आहे. तरुणाविरोधात मानपाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ulhasnagar : उल्हासनगरच्या कॅम्प २ मध्ये रमाबाई टेकडी परिसरात २७ एप्रिलच्या रात्री हंशू बिपिन झा, रोहित झा, सोनमणी झा आणि बिट्टू यादव यांनी एका घराचा दरवाजा तोडून घरात घुसत घरातील दोन तरुणींना बाहेर खेचलं आणि त्यांच्या अंगावरील कपडे फाडून विनयभंग केला, असा आरोप होता. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत आरोपींना उल्हासनगर पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणातील आरोपी दिवाकर यादवला 16 जुलैला जामीन मिळाला तर रोहित झा आरोपीला 17 जुलैला जामीन मंजूर केला. जेलमधून सुटका होताच दोघांचीही मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर आरोपी रोहित झाने पीडित तरुणींच्याच घरासमोर फटाके फोडतस ढोल ताशे वाजवत सेलिब्रेशन करण्यात आलं. ही विकृती आली कुठून..गुन्हा केल्याची जराही लाज या आरोपींना वाटली नाही का ? असे अनेक सवाल उपस्थित होतायत. दरम्यान, आरोपीच्या या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून आरोपी रोहित झावर पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र आरोपी फरार झाला असून उल्हासनगर पोलीस त्याचा शोध घेतायत
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Pune Water : पुण्याच्या भोरमधील भाटघर धरणाचं पाणी हिरवं झालंय...धरणाच्या परिसरातील काही ठिकाणी पाण्याला अचानक हिरवा रंग चढल्यामुळे स्थानिक नागरिक आणि शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे...या प्रकारामुळे पिण्याच्या पाण्याच्या सुरक्षिततेवर, शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या परिणामकारकतेवर आणि नागरिकांच्या आरोग्यावर संभाव्य धोका निर्माण होण्याची शक्यता आहे... पाण्याचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत...
Nashik Manikrao Kokate : रमी व्हिडिओचा विषय छोटा असल्याची मुक्ताफळं कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी उळधलीत.. विधिमंडळाचं कामकाज सुरु असताना ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे वादात सापडलेत. नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत कोकाटे राजीनामा देतील अशी चर्चा होती. मात्र मी विनयभंग केलाय का असा उर्मट सवाल विचारत कोकाटेंनी राजीनामा देण्यास नकार दिलाय... मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्षांनी या व्हिडिओची चौकशी करावी. चौकशीत दोषी आढळलो तर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राज्यपालांकडे स्वतः राजीनामा देणार अशी घोषणा कोकाटेंनी केलीय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Dharashiv : धाराशिव ड्रग तस्करी प्रकरणी तुळजापूरचे माजी नगराध्यक्ष बापू कनेसह दोघांना धाराशिव पोलिसांनी अटक केली आहे... गेल्या साडेतीन महिन्यापासून कने फरार होता.. त्याला पुण्यातुन तर स्वराज उर्फ पिनू तेलंगला सोलापूरमधून ताब्यात घेतलंय.. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामध्ये एकूण 38 आरोपी असून त्यापैकी 12 आरोपी अद्याप फरार आहेत.. यातील 22 आरोपी धाराशिवच्या जिल्हा कारागृह आहेत तर तीन जणांची जामिनावर सुटका करण्यात आलीये.. याप्रकरणी तामलवाडी पोलिसांनी 10 हजार 744 पाणाचे दोषारोपपत्र सादर केलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Sangali : सांगलीच्या बस स्थानकात एका माथेफीरूने दगडफेक करत बसेसेची तोडफोड केली आहे.... या माथेफीरूने सकाळी अचानक बस स्थानकात प्रवेश करत उभ्या असलेल्या बसेसवर दगडफेक केली...यात 2 बसेसच्या काचा फुटल्या....दगडफेक करून पळून जाणा-या माथेफिरूला प्रवासी आणि एसटी कर्मचा-यांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Hasan Mushrif : मंत्री हसन मुश्रीफ कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.. मंत्रिपदामुळे इतर कामकाजाला न्याय देता येत नाही.. तसंच एकाच घरात दोन पदं नकोत असं वक्तव्य त्यांनी सांगलीतील एका कार्यक्रमात केलंय.. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी नावेद मुश्रीफ यांची निवड झाल्यानंतर मुश्रीफांनी कोल्हापूर जिल्हा बँकेचं अध्यक्षपद सोडण्याचा विचार केला होता. गेल्या अनेक वर्षापासून हसन मुश्रीफ बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून येत होते.. मुश्रीफांनी बँकेचा कारभार सुधारून अडचणीत असलेल्या कोल्हापूर जिल्हा बँकेला बाहेरही काढलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
State Rain : हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार, या आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यताय...मुंबईत आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसंच मध्य महाराष्ट्रातील कोकण आणि घाट भागात अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यताय...या काळात विजांसह ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आलीय. या काळात मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आलाय. .
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Praful Lodha : 'हनी ट्रॅप'सह अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या प्रफुल्ल लोढाच्या अडचणी वाढल्यात. लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी आणखी एक गुन्हा बावधन पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. याप्रकरणी कोथरूड येथे राहणाऱ्या 36 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Pune Rape Update : कोंढवा कथित बलात्कार प्रकरणी खोटी माहिती दिल्याने तरुणीवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलाय. दोन जुलैला घरात घुसून एका डिलवरी बॉयने बलात्कार केल्याची तक्रार तरुणीने कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये दिली होती त्यानंतर पोलिसांनी तपास चक्र गतीमान केलं. पोलिसांनी 500 सीसीटीव्ही तपासले...तेव्हा हा डिलिव्हरी बॉय नसून परस्पर सहमतीने दोघांनी स्वतःचे फोटो काढले तसेच ते एकमेकांचे मित्र असल्याचं तपासात समोर आलं. तरुणीने कुठल्या उद्देशाने ही खोटी माहिती दिली त्यामागचा तिचा हेतू काय होता याचा तपास पोलीस करणार आहेत.न्यायालयाच्या निर्णयानंतर तपास सुरू करण्यात येणार आहे.
Nashik : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पत्रकार परिषद घेणार आहे...आज सकाळी 10 वाजता नाशिक येते माणिकराव कोकाटेंची पत्रकार परिषद पार पडणार आहे.. कोकाटे यांचा विधिमंडळातील रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर चोहोबाजूंनी टीका होतेय.. विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय...कोकाटे यांनी मात्र त्यांच्यावरील आरोप फेटाळले होते.. त्यामुळे माणिकराव कोकाटे आज काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Sambhajinagar : संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांचा चालक जावेद यांच्या जमीन हिबानामा प्रकरणात एक मोठी माहिती समोर आलीये.. जावेद याला 3 जुलै रोजी आयकर विभागाने संपत्ती बाबत खुलासा करण्याची नोटीस बजावली.. इतकंच नाही तर 8 जुलैला याबाबत स्पष्टिकरण देण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले होते.. याबाबत जावेद याने तारीख वाढवून घेऊन खुलासा करण्यास मुदत वाढवून मगितल्याची महिती ही मिळतेय... त्यामुळं ही जमीन हिबानमा असली तरी त्यावर जो कर भरावा लागेल त्याबाबत ही नोटीस असल्याचं सांगण्यात येतेय... जावेद शेख याला नवबाच्या सालारजंग याने शहरातील दावूदपुरा भागातील 3 एकर जमीन हिबानामा म्हणजे गिफ्ट दिल्याचं हे प्रकरण आहे.. जावेद हा खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांच्या गाडीचा चालक आहे... आणि चालकाच्या नावाने ही जमीन भुमरे कुटुंबीयांनी हडपल्याचा आरोप आहे.. त्यात या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखा ही चौकशी करत आहे.... शिवाय आयकर विभागाच्या नोटिसने जावेद शेख आणि भूमरे यांच्या अडचणी वाढल्याची शक्यता आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.