Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 23 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.
Buldhana : बुलढाणा जिल्ह्यातील मोहेगाव येथे अतिक्रमण काढण्याच्या कारवाईदरम्यान ग्रामस्थांनी पोलिसांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात एसआरपीएफ जवान नंदकिशोर उदावणे आणि पोलीस कॉन्स्टेबल राजेश मानकर हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून चिघळलेला अतिक्रमण प्रश्न आणि गावकरी-प्रशासन यांच्यातील तणाव यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असली तरी, जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे...
Vice Presidential Election in September? : सप्टेंबरमध्ये उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे.. पंतप्रधान परदेश दौ-यावरून परतल्यानंतर उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर चर्चा होईल, पक्ष नेतृत्व संभाव्य उमेदवारांची अंतरिम यादी तयार करेल.. यामध्ये कायदेविषयक कामात पारंगत असलेल्या वरिष्ठ नेत्यांना प्राधान्य दिले जाईल अशी माहिती आहे.. उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचे नाव दक्षिण भारत, पश्चिम बंगाल, ईशान्येकडील राज्यांमधून पुढे येऊ शकते अशी माहिती सुद्धा आहे..
Shirdi Sai Baba Temple : शिर्डीच्या साईबाबांविषयी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं आहे. यावेळी हिंदू सेनेचे संत युवराज महाराज यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. देशभरातील हिंदू मंदिरांमदील साईबाबांची मूर्ती हटवा असं आवाहन, युवराज महाराज यांनी केलं आहे. याबाबतचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी साईबाबा संस्थानकडून शिर्डी पोलीस ठाण्यात युवराज महाराजांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Ganeshotsav : मोठ्या गणेशमूर्तींच्या समुद्रात विसर्जनाचा मार्ग अखेर मोकळा होणार आहे...आज मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकारने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मोठ्या गणेशमूर्ती समुद्रात विसर्जन करण्याबाबत आपली सकारात्क भूमिका असलेले प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलंय..न्यायालयाने ही भूमिका ऐकून घेतल्याच्या माहितीचं ट्विट सांस्कृतिमंत्री आशिष शेलार यांनी केलं आहे...गणेशमूर्ती विसर्जन ही संपूर्ण परंपरा अखंड राहील आणि पर्यावरणाच्या दृष्टीने जागृत राहून काही उपाययोजना ही करणार असल्याचं आशिष शेलार यांनी ट्विट करत म्हटलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Tuljabhavani Temple : महाराष्ट्राची कुलस्वामीनी अर्थात तुळजाभवानी देवीच्या मंदिराचं मुख्य कलश खाली उतरवण्याची शक्यता आहे.. तुळजाभवानी मंदिरातील शिळांना तडे गेलेत.. त्यामुळे मंदिराचा गाभारा आणि शिखराला धोका निर्माण झालाय. सध्या देवीच्या गाभा-याला लोखंडी खांबांचा आधार देण्यात आलाय.. मात्र राज्य पुरातत्त्व विभागानं मंदिराचा कळस उतरवण्याबाबत अहवाल सादर केलाय. तर केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून दिलेल्या अहवालात तात्पुरती डागडुजी करण्याच्या सूचना देण्यात आल्यात.. मात्र केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अहवालावर मंदिर संस्थान समाधानी नाहीये.. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी मंदिर संस्थाननं केलीये..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Nashik : नाशिकच्या मालेगावात नशेसाठी वापरण्यात येणा-या कॉरेक्स बाटल्यांचा साठा जप्त करण्यात आलाय. पवारवाडी पोलिसांनी छापा टाकत 100 कोडीनयुक्त बाटल्या जप्त केल्यात. शहरात कोडीनयुक्त कॉरेक्स बाटल्यांची अवैध विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आलीय. याप्रकरणी दोन आरोपींना अटक केलीय. तर या दोन्ही आरोपींविरोधात पवारवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खाते काढून घेतले जाणार अशी माहिती सुत्रांनी दिलीय. मकरंद पाटील यांच्याकडे कृषी खाते दिले जाणार, तर मकरंद पाटील यांच्याकडील मदत-पुनर्वसन खाते माणिकराव कोकाटेंना दिले जाणार असल्याचं समजतंय.. खातेबदल करून कोकाटेंवरील नाराजी कमी करण्याचा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय.. वादग्रस्त माणिकाराव कोकाटेंचे मंत्रिपद काढून न घेता त्यांच्या खात्यात बदल करून त्यांना अभय दिले जाणार आहे. विधानपरिषदेत रमी खेळणे,शेतकऱ्यांसंदर्भात वारंवार वादग्रस्त वक्तव्य करणे यामुळे माणिकराव कोकाटेंविषयी नाराजी वाढलेली आहे. परंतु पहिल्यांदाच त्यांना मंत्री केले असल्याने लगेच त्यांचे मंत्रीपदावरून काढणे योग्य ठरणार नसल्याचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे मत आहे अशी माहिती सूत्रांनी दिलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Tanushree Datta : बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता पुन्हा एकदा तनुश्री चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर रडतानाचा एक व्हिडीओ शेअर केला असून तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. तनुश्रीने व्हिडीओ शेअर करून तिला घरात होणाऱ्या त्रासाबद्दल सर्वांना सांगितलंय.स्वतःच्या घरातचा छळहोत असल्याचा आरोप तनुश्रीनं या व्हिडिओमध्ये केलाय... गेल्या 5 वर्षांपासून हा छळ होत असल्याचा आरोप तनुश्रीनं केलाय... या संदर्भात पोलिसांनाही संपर्क केल्याचं तनुश्रीनं म्हटलंय... उशीर होण्याआधी मदत करा असंही तनुश्रीनं आवाहन केलंय.. त्यामुळे तनुश्री दत्ताला कोण छळतंय असा सवाल उपस्थित होतोय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Marathwada Rain : मराठवड्यात 20 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने सोमवारपासून जवळपास सर्व जिल्ह्यांत कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावत ३० मंडळांत दाणादाण उडवलीय.. सकाळपर्यंत २६.१ मिमी पावसाची नोंद झाली. सर्वाधिक ४३.८ मि.मी पाऊस परभणी जिल्ह्यात, तर सर्वात कमी ९.१ मिमी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झाला. अतिवृष्टी झालेल्या मंडळांमध्ये जालन्यातील ६, बीडमधील ६, लातुरातील १, धाराशिव २, नांदेड २, परभणी ९, हिंगोली ४ मंडळांमध्ये ६५ पेक्षा अधिक पाऊस बरसला.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Pune : पुण्यातील धनकवडी परिसरात मध्यरात्री तीन अज्ञात व्यक्तींनी दहशत माजवण्यासाठी 15 रिक्षा, 3 कार, 2 स्कूल बसची तोडफोड केलीये...तसेच दोघांवर वार देखील करण्यात आलंय...हे गुन्हेगार वाहनांच्या रस्त्यावर असलेल्या पार्किंगवर तुफान हाणामारी करत फिरत होते. त्याचवेळी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन नागरिकांना देखील मारहाण करून जखमी करण्यात आले. या दोघांना तत्काळ उपचारासाठी कामे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय..याप्रकरणी सहकारनगर पोलीस अधिक तपास करत आहेत...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Surat Airport : सूरत विमानतळावर CISF च्या जवानांनी मोठी कारवाई करत २८ किलो सोनं जप्त केलं. याप्रकरणी एका जोडप्याला पोलिसांनी अटक केली. दुबईहून सूरतला हे दोघंही जात होते. जोडप्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांची झडती घेतली. त्यावेळी शरीराच्या विविध भागांमध्ये त्यांनी 28 किलो सोन्याची पेस्ट आढळली . सूरतमधल्या एका सराफाला हे सोनं दिलं जाणार होतं. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येतेय,
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Mumbai Airport Ganja Seized : मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाने चार स्वतंत्र प्रकरणांत तब्बल १९ कोटी १३ लाख रुपयांचा गांजा पकडला. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली असून हे पाचही प्रवासी बँकॉक इथून मुंबईत दाखल झाले. यांपैकी एका प्रकरणात दोन भारतीय नागरिकांनी उशीच्या खोळीमध्ये ११ कोटी ८८ लाख रुपयांचा गांजा लपवलेला. अन्य तीन प्रकरणांत ट्रॉली बॅगेच्या चोर कप्प्यांत सव्वा सात कोटी रुपयांचा गांजा लपविल्याचं आढळलं
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Bandra Crime : मुंबईतल्या वांद्रे भागात भर दुपारी रिक्षात एका अनोळखी इसमाने रिक्षात शिरून 16 वर्षाच्या महाविद्यालयीन तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली....रिक्षा सिग्नलला थांबलेली असताना अचानक ही अनोळखी व्यक्ती रिक्षात शिरली आणि रिक्षा चालकाला शस्त्राचा धाक दाखवत रिक्षा सुरू करायला सांगितलं. त्यानंतर त्याने धावत्या रिक्षात बसलेल्या महाविद्यालयीन तरूणीचा विनयभंग केला.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळी पथकं तैनात करण्यात आलीय. सीसीटीव्ही कॅमेराचं फुटेज तपासलं जात असून तरुणीने सांगितलेल्या वर्णनावरून आरोपीचं रेखाचित्र तयार करण्यात आलंय
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Mulund Rape : मुलुंडमध्ये एका 14 वर्षांच्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडलीये.. याप्रकरणी पीडित मुलीचे वडील, दोन भाऊ यांच्यासह आणखी एका व्यक्तीला अटक करण्यात आलीये.. त्यांच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर एका आरोपीला बालसुधारगृहात पाठवण्यात आलंय. तब्बल अकरा महिने हे तिघे पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करत होते असा आरोप मुलीनं केलाय.. न्यायालयाने तिन्ही आरोपींना २८ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावलीये..
Kalyan Crime : कल्याणमध्ये मराठी तरुणीला बेदम मारहाण करणारा माजोरडा गुंड गोकुळ झा आता पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. मनसेचे पदाधिकारी योगेश गव्हाणे यांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. रुग्णालयातील रिसेप्शनिस्टने गोकुळ झा नावाच्या तरुणाला थांबण्यास सांगितल्याने त्याने ही मारहाण केली होती. या घटनेनंतर गोकुळ झा फरार झाला होता. आता त्याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकूण चार जणांना ताब्यात घेतलं आहे. यातील मुख्य आरोपी गोकुळ झा सह त्याचा भाऊ रणजीत झाला अटक केल्यानंतर आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. मारहाण करणारा रेकॉर्डवरचा हा आरोपी 22 तासांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. शेवटी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनीच त्याला पकडलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.