Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा झटपट आढावा

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 23 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा झटपट आढावा
LIVE Blog
24 July 2025
24 July 2025 18:19 PM

ठाण्यात दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले

 

Thane Rada : ठाण्यात दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते भिडले.. वागळे इस्टेटच्या नेहरुनगरमध्ये राडा.. तलवार घेऊन एकमेकांवर धावले.. पार्किंगच्या वादातून आकाश भालेराव आणि सुरज हजारे यांचे भांडण अगोदर झाले होते.

 

24 July 2025 18:11 PM

पालघरमधील मनसे कार्यकर्ते आक्रमक, गुजराती पाट्यांची तोडफोड

 

Palghar MNS on Gujrati Patya : पालघरमधील गुजराती पाट्यांच्या संदर्भात मनसे आक्रमक झाली आहे. पालघरच्या मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील हालोली इथे अनेक हॉटेलांच्या पाट्या गुजरातीमध्ये आहेत. या पाट्यांची मनसेकडून तोडफोड करण्यात आली.  दरम्यान 'झी २४ तास'नं बातमी दाखवताच मनसेनं पाट्यांची तोडफोड केलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

 

24 July 2025 14:13 PM

गणपती विशेष ट्रेनचं आरक्षण फुल

 

Ganpati Special Train Full : रेल्वे प्रशासनाने गणपतीसाठी सोडलेल्या विशेष ट्रेनचं आरक्षण काही सेकदांत फुल झालं आहे..सीएसएमटी आणि एलटीटी वरून सुटणा-या चार स्पेशल ट्रेनचे तिकीट एका मिनिटात फुल झालंय...वेबसाईटर रिग्रेटचा मेसेज येऊ लागल्याने कोकणात जाणा-या प्रवाशांनी नाराजी व्यक्त केलीय.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

24 July 2025 13:29 PM

'गांधीगिरी संपली भगतसिंगगिरी सुरू', बच्चू कडू यांचा इशारा

 

Bacchu Kadu  : 'आता गांधीगिरी संपली भगतसिंग गिरी सुरू'....'कर्जमाफीची तारीख सांगा अन्यथा तीव्र आंदोलन करू'...बच्चू कडू यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा...'आता वेळ न सांगता शेतक-यांना घेऊन मंत्रालयात घुसू'...चक्काजाम आंदोलनादरम्यान बच्चू कडूंचा इशारा

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

24 July 2025 13:08 PM

 पालघरमध्ये मराठी पाट्यांची सक्ती नाही?

 

Palghar : मुंबई अहमदाबाद महामार्गावर पालघर जिल्ह्याच्या हद्दीत सर्वच दुकानं आणि हॉटोलांवर गुजराती नावांच्या पाट्या लागल्यात.. ठाण्यातील घोडबंदर रोड ते अचाड पर्यंत अनेक दुकानावर या पाट्या आहेत.. राज्यात मराठी नावाच्या पाट्यांची सक्ती असताना या भागात मात्र सर्रास गुजराती पाट्या दिसत आहेत.. त्यामुळे पालघर महाराष्ट्रात आहे की गुजरातमध्ये असा प्रश्न विचारला जातोय..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

 

24 July 2025 12:12 PM

हर्षल पाटीलची आत्महत्या नव्हे खून- संजय राऊत

 

Sanjay Raut : जलजीवन योजनेतला भ्रष्टाचार गंभीर...हर्षल पाटीलची आत्महत्या नव्हे खून-राऊत..सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा'...हर्षल पाटील आत्महत्येवरून राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

24 July 2025 11:41 AM

अनिल अंबानींच्या घरावर ईडीचे छापे 

 

ED Raids Anil Ambani's House : अनिल अंबानींच्या घरावर ईडीचे छापे टाकण्यात आले आहेत...   50 ठिकाणी ईडीनं कारवाई केलीये...मुंबई आणि दिल्लीत ईडीनं कारवाई केलीये

24 July 2025 11:17 AM

 मुंबईतील लोकल बॉम्बस्फोट प्रकरणी 11 आरोपींच्या सुटकेला स्थगिती

 

2006 Mumbai Local Bomb Blast Case : 2006 मुंबईतील लोकल बॉम्बस्फोट प्रकरणी 11 आरोपींच्या सुटकेला स्थगिती देण्यात आली आहे...सुप्रीम कोर्टाकडून निर्णयाला स्थगिती

24 July 2025 10:32 AM

दौंडमधील कलाकेंद्रातील गोळीबार प्रकरणी 3 जण अटकेत

 

Daud Kalakendra : दौंडमधील कलाकेंद्रातील गोळीबार प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केलीय... बाळासाहेब मांडेकर, गणपत जगताप आणि रघुनाथ आव्हाडला पोलिसांनी अटक केलीय... तर आरोपी चंद्रकांत मारणेचा शोध पोलिसांकडून सुरु आहे... 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

24 July 2025 10:10 AM

शिर्डीच्या साई मंदिराला धमकीचा मेल

 

Shirdi Sai Baba Temple : शिर्डीच्या साई मंदिराला धमकीचा मेल...मंदिर बॉम्बने उडवून देण्याची धमकी...पोलिसांकडून साई मंदिर परिसरात तपास सुरू...साई संस्थानची सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर...दोन महिन्यांत दुस-यांदा धमकीचा मेल...भगवंत मन नावाने साई संस्थानला धमकीचा मेल

24 July 2025 09:28 AM

कांद्याची निर्यात 40 टक्क्यांनी घटली

 

Onion Export Rate : कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी संकटात सापडलाय. कारण आखाती देशात होणारी कांद्याची निर्यात 40 टक्क्यांनी कमी झालीये.. गेल्या दोन वर्षांपासून कांदा निर्यात धोरण सातत्यानं बदलत आहेत. याचा फटका कांदा निर्यातीला बसलाय... जेएनपीए बंदरातून आखातातील सौदी अरेबिया, दुबई, कतारसह श्रीलंका, मलेशिया, सिंगापूर या देशांमध्ये दरमहा २,५०० कंटेनर कांद्याची निर्यात केली जात होती. आता ही निर्यात १००० कंटेनरवर आली आहे. आखाती देशांना आता चीन, पाकिस्तानमधून मिळणारा कांदा प्रति टन १८ हजार ९२० रुपये या दराने मिळत आहे, तर भारतीय कांद्यासाठी प्रति टन २३ हजार २९० रुपये मोजावे लागतात. प्रति टनामागे सुमारे ४ हजार ३०० जादा मोजावे लागत असल्याने कमी दराने मिळणाऱ्या चीन, पाकिस्तानच्या कांद्याची मागणी वाढली आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

24 July 2025 09:14 AM

पुण्यातील सर्व तालुक्यांत लम्पीचा शिरकाव,  906 जनावरांना लम्पीची लागण 

 

Pune : पुणे जिल्ह्यात लम्पी आजारानं पुन्हा डोकं वर काढलंय. पुणे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये लम्पी रोग वेगानं पसरु लागलाय. आतापर्यंत 906 जनावरांना लम्पीची लागण झालीये.. यातील 15 जनावरांचा मृत्यू झाला असून 300 जनावरांवर उपाचर सुरु आहेत.. तर 591 जनावरं औषधोपचारानं बरी झालीत.. शिरूर, आंबेगाव, जुन्नर तालुक्यात या रोगाचा प्रसार सर्वाधिक आहे..संसर्ग झालेल्या गावांपासून 5 किलोमीटरच्या परिसरात जनावरांचं लसीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्यात.. लम्पीचा आजार वेगानं पसरु लागल्यानं शेतक-यांची चिंता वाढलीये.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

24 July 2025 08:31 AM

निशिकांत दुबेंना महिला मराठी खासदारांनी घेरलं

 

Nishikant Dubey :  राज्यातील हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर सुरू झालेल्या वादात विनाकारण उडी घेऊन 'महऱ्हाटी माणसा'ला डिवचणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेंना मराठी खासदारांनी घेरलं. संसद भवनात त्यांना अचानक गाठून घेराव घालत वादग्रस्त विधानांचा जाब विरोधी पक्षांच्या महिला खासदारांनी विचारला. 'जय महाराष्ट्र' च्या घोषणांनी संसद भवनाची लॉबी दणाणून गेली अन् दुबे यांना तेथून चक्क काढता पाय घ्यावा लागला. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज तहकूब झाल्यानंतर वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव, प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या खासदारांनी दुबेंना जाब विचारला. "मराठी लोकांना मारण्याची भाषा कशी करू शकता ? तुम्ही आपटून आपटून कुणाला आणि कसे मारणार? कसली ही तुमची अर्वाच्च भाषा ? तुमचे वागणे-बोलणे योग्य नाही... मराठी भाषकांविरोधातील तुमची ही अरेरावी आम्ही खपवून घेणार नाही" अशा शब्दांत गायकवाड यांनी दुबेंना सुनावले.

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

24 July 2025 08:11 AM

 प्रहारचं आज राज्यभर चक्काजाम आंदोलन

 

Bacchu Kadu : शेतकरी कर्जमाफी, मच्छीमार, मेंढपाळ आणि शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू पुन्हा एकदा आक्रमक झालेत. आज कडू यांच्या प्रहार पक्षाच्या वतीने राज्यभर मोठ्या प्रमाणात चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. अचलपूर, चांदूर बाजार, अमरावती येथील आंदोलन आटपून बच्चू कडू संभाजीनगरसाठी रवाना होणार आहेत. तर जिल्ह्यात सर्व तालुक्यात सकाळी आठ ते दुपारी बारा वाजेपर्यंत प्रहार संघटनेच्या वतीने रस्तारोको आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे कडू यांच्या आजच्या चक्काजाम आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आजचे आंदोलन आटपून बच्चू कडू हे पुनतांबा येथे जाणार अजून शेतकरी संपाची हाक देणार आहेत.. त्यामुळे सरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे...
 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

24 July 2025 07:37 AM

मुंबईत आजपासून 4 दिवस समुद्राला मोठी भरती

 

Mumbai : मुंबईसाठी 4 दिवस धोक्याचे...आजपासून चार दिवस समुद्रात मोठी भरती...26 जुलैला समुद्रात 4.67 मीटर उंच लाटा उसळणार...समुद्रात सर्वात मोठ्या उंच लाटा उसळणार

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

24 July 2025 07:33 AM

ठाणे, मुंबई, पालघरला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट

 

Rain Alert : ठाणे, मुंबई आणि पालघरला आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला रेड अलर्ट जारी केला गेलाय. प्रादेशिक हवामान विभागाकडून मध्य महाराष्ट्रासाठी रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय. तसंच प्रशासनानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

 

TAGS

Latest Marathi BatmyaLatest News In marathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking NewsToday's Breaking Newslatest newsCurrent Breaking Newslatest news todaylive newscurrent newstoday newsbreaking news todayLive News MarathiMumbai Pune Latest NewsNational International Latest NewsEntertainment Latest Newsmaharashtra latest news todayलेटेस्ट मराठी न्यूजमहाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडेमराठी ताज्या बातम्यामराठी ब्रेकिंग न्यूज अपडेटमुंबई पुणे ताज्या बातम्याराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्यामनोरंजन ताज्या बातम्यामहाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूजमराठी न्यूज लाइव्हलाइव्ह न्यूजआजच्या ठळक घडामोडीमराठी बातम्याझी 24 तासमराठी ब्रेकिंग न्यूजताज्या मराठी बातम्यामहाराष्ट्रातील आजच्या बातम्याराजकीयसामाजिकक्रीडाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराज ठाकरेउद्धव ठाकरेशरद पवारमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील लाईव्ह बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्या
Read More