Rohit Pawar : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केलेत. मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांना फोन टॅप होत असल्याचा संशय असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय. मोबाईल टॅप होत असतील याच भीतीनं अनेक मंत्री आपले मोबाईल बंद ठेवत असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय. रोहित पवारांनी केलेल्या या दाव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात नवी चर्चा सुरु झालीय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
CSN Criminal Lover : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी आहे. प्रेम प्रकरणात झालेल्या वादातून प्रेयसीला तिच्या प्रियकरानं दौलताबाद घाटातून धक्का देऊन खाली पाडलं. यात तरुणीचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन त्यानं स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं. तर तरुणीचा मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Ullu App : केंद्र सरकारनं उल्लू अॅपसह 25 अॅप्सवर बंदी घातलीय... अश्लील जाहिराती आणि कंटेटप्रकरणी केंद्र सरकारकडून ही कारवाई करण्यात आलीय.. या 25 अॅप्सना ब्लॉक करण्याचे निर्देशही केंद्र सरकारनं इंटरनेट प्रोव्हायडर कंपन्यांना दिलेत..
Vasai : वसई पूर्वेच्या नवकार सोसायटीतील इमारतीच्या बाराव्या मजल्यावरून खाली पडून 4 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाला.. दोन दिवसापूर्वी घडलेल्या या दुर्दैवी घटनेचं सीसीटीव्हीची दृश्य समोर आलीत.. आईनं घराबाहेर जाताना या चमुकलीला चप्पल ठेवण्याच्या लाकडी स्टँड वर बसवलं.. इतक्यात याच चिमुकलीचा तोल गेला आणि ती खिडकीतून खाली पडली. हा धक्कादायक प्रकार पाहून कोणाच्याही काळजाचा ठोका चुकल्या शिवाय राहणार नाही.
Sadabhau Khot : कंत्राटदार हर्षल पाटील आत्महत्याप्रकरणी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या राजीनामाची मागणी सत्ताधारी आमदार सदाभाऊ खोत यांनी केलीय.. हर्षल पाटील याच्या आत्महत्येबाबत गुलाबराव पाटलांनी केलेलं विधान बेजबाबदारपणाचे असल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय...जलजीवन मिशन योजनेच्या दीड कोटींच्या थकीत बिलामुळे कंत्राटदार असणाऱ्या सांगलीच्या हर्षल पाटील याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे....त्यावरून पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी हर्षल पाटील हा कंत्राटदार नसल्याचे विधान केलं होतं....आता गुलाबराव पाटलांच्या या विधानावरून सत्ताधारी आमदार असणाऱ्या सदाभाऊ खोत यांनीच गुलाबराव पाटील यांनी राजीनामा द्यावा,अशी मागणी केली आहे....
Nishikant Dubey : मराठी माणसाविरोधात गरळ ओकणारे भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या पत्नी अनामिक गौतम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.... मेडिकल कॉलेजसाठी बँकेतून घेतलेले 100 कोटी रुपयांचे कर्ज थकवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.... या प्रकरणात निशिकांत दुबेंचा समर्थक देवता पांडेय याला अटक करण्यात आली आहे....झारखंड विधानसभेतील विरोधी पक्षनेते बाबुलाल मरांडी यांनी बुधवारी या संदर्भात ट्विट केले. अनामिका गौतम यांच्या विरुद्ध हा ४७ वा गुन्हा आहे, असे मरांडी यांनी 'एक्स' पोस्टमध्ये म्हटले आहे..
Latur : HIVबाधित अल्पवयीन मुलीवर बलात्कार...मुलगी गर्भवती राहिल्याने गर्भपातही केल्याचं समोर...औसा तालुक्यातल्या HIVसंगोपन संस्थेतला प्रकार..ढोकी पोलिसांत पाच जणांविरोधात गुन्हा दाखल...संस्थेतील आणखी काही मुलींवर अत्याचार झाल्याची मलीची तक्रारीत माहिती...ढोकी पोलिसातील गुन्हा औसा पोलिसांमध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू...अद्याप कोणालाही अटक नाही
Kolhapur : 20 दिवसांच्या बाळाला दूध पाजत असताना एका महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे.... हृदयविकाराच्या झटक्याने हा मृत्यू झाला असल्याचा अंदाज डॉक्टरांकडून वर्तवण्यात आला आहे.... शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या महिलेच्या मृत्यूचं कारण समजणार आहे.... कोल्हापूर शहरातील संभाजीनगरमधील ही घटना आहे... पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे... रचना चौगले असं या महिलेचं नाव आहे... आठवडाभरापूर्वीच मोठ्या थाटामाटात बारशाचा कार्यक्रम पार पाडला होता... नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाचे नामकरण पियुषा असं ठेवण्यात आलेलं होत. पण दूध पाजता पाजता एका आईचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे...
School Building Collapses in Rajasthan : राजस्थानमध्ये मुसळधार पावसाचं थैमान..झालवाडमध्ये पावसामुळे शाळेची इमारत कोसळली...अपघातात 5 मुलांचा मृत्यू, 11 गंभीर जखमी...प्रशासनाकडून मदत व बचावकार्य सुरू....30 हून अधिक विद्यार्थी जखमी असल्याची माहिती आहे...
WWE Hulk Hogan : जगप्रसिद्ध रेसलिंग स्टार टेरी बोलिया ज्यांना संपूर्ण जग 'हल्क होगन' या नावाने ओळखतं, त्याचं 71 व्या वर्षी दुःखद निधन झालं. हृदयविकाराच्या झटक्याने हल्क हॉगनचं निधन झाले. 1980 आणि 1990 च्या दशकात हल्क होगन हे नाव केवळ WWE साठी मर्यादित नव्हतं, तर ते एक ‘पॉप कल्चर आयकॉन’ बनलं होतं. त्याच्या दमदार शरीरयष्टी आणि करिष्माई व्यक्तिमत्त्व यामुळे ते प्रत्येक घरात ओळखले जात होते. केवळ WWE च नाही, तर त्यांनी काही हॉलिवूड चित्रपटांतही अभिनय करून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
State Election Commission Big Decision : माहेर सुटले की माहेरचे नावही सुटते म्हणतात... मात्र, राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत महिला उमेदवारांची दोन्ही नावे ईव्हीएमवर येतील अशी व्यवस्था करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवाराचे नाव मतदार यादीमध्ये असणे अनिवार्य असते. उमेदवारी अर्ज सादर करताना महिला उमेदवारांसह इच्छुकांना त्यांचे मतदार यादीमध्ये जे नाव आहे तेच नाव लिहावे लागेल. उमेदवारी अर्ज सादर केलेल्या विवाहित उमेदवारास, मतदार यादीमध्ये व उमेदवारी अर्जामध्ये नमूद असलेल्या नावाखेरीज ईव्हीएमवर इतर नावाचा उल्लेख करण्याची इच्छा असेल तर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेपूर्वी तसा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे करावा लागेल.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Meghana Bordikar : परभणी जिल्ह्यातील जिंतूरच्या भाजप आमदार आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे यांचं नाव लिहिलेल्या ट्रकमधून दारूची अवैध विक्री करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या ट्रकमधून आणलेली दारू अवैध रित्या विकताना पुसद शहर पोलिसांनी 7 जणांना अटक केलीये..हडपसर येथून नागपुरकडे निघालेल्या या ट्रकवर राज्यमंत्री मेघनादिदी साकोरे-बोर्डिकर असं ठळक अक्षरात लिहिण्यात आलंय. हा ट्रक थेट जाण्याऐवजी पुसद मध्ये थांबला होता. ज्यातून विदेशी कंपनीच्या दारूचे बॉक्स उतरवताना पोलिसांना दिसले.. आणि अवैध दारुविक्रीचा पर्दाफाश झाला.. पोलिसांनी या प्रकरणी 7 जणांना अटक करुन 40 लाख 23 हजार रुपयांची दारू, ट्रक, सात मोबाईल, तीन दुचाकी असा एकूण 64 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.. पोलिसांनी पकडलेला ट्रक हा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या चुलतभावाच्या मालकीचा असल्याचे समोर आले आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Maharashtra Politics : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात- सूत्र...ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुका होण्याची शक्यता...तीन टप्प्यांत निवडणुका होणार असल्याची माहिती...जिल्हा परिषद, नगरपालिका आणि नंतर महापालिका निवडणुका होणार असल्याची सूत्रांची माहिती
Mahayuti : मुंबई मनपा वगळता महायुती एकत्र लढणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिलीय.. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुती राज्यभर वेगवेगळं लढणार असल्याची माहिती मिळतेय. ठाणे, पुणे महापालिकेतही महायुती वेगवेगळं लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. मुंबई वगळता भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय....
Chalisgaon : चाळीसगावमध्ये 50 ते 60 कोटींचं ड्रग्ज जप्त...संशयित वाहनातून 39 किलो अँफेटामाईन ड्रग्ज जप्त...महामार्ग पोलिसांची बोढरे फाट्यावर मोठी कारवाई....आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा संबंध असल्याचा संशय
Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच विधानसभा व विधान परिषद या दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपद सप्टेंबर ते डिसेंबर या चार महिन्यांच्या काळात रिक्त राहणार आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सदस्यत्वाची मुदत ऑगस्ट महिनाअखेर संपत आहे. दुसऱ्या बाजूला विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर शिवसेना UBTने दावा करत भास्कर जाधव यांचे नाव निश्चित केले आहे. मात्र त्याबाबत अजून घोषणा झालेली नाही. त्यामुळे डिसेंबरमध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात नागपूर येथेच दोन्ही सभागृहांतील विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय होईल, असे संकेत आहेत.
MNS Meeting : मनसेचं मिशन इलेक्शन...मनसे नेत्यांची आज बैठक...राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थवर बैठकीचं आयोजन...आगामी महानगरपालिका निवडणुकांसंदर्भात बैठकीत रणनिती ठरण्याची शक्यता...सकाळी 10 वाजता बैठकीचं आयोजन
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.