Dharashiv : शंभर रुपयांच्या बॉण्डवर दत्तक करार करत, दहा हजार रुपयात मुलाची विक्री केल्याचा प्रकार,धाराशिवच्या मुरूम इथे घडलाय...सोलापुरातील दांपत्याला मुलाची विक्री केल्याचा आरोप चिमुकल्याच्या आजीने केलाय...पहिल्या पतीचं निधन झाल्याने, मुलाची आईने दुसरं लग्न केलं..त्यानंतर मुल दत्तक देण्याचं ठरलं...मात्र सून आणि सावत्र वडिलाने दत्तक करार करत मुलाची विक्री केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केलाय...तर सुनेने नातवंडाला न दिल्याने मुलाच्या वडिलांनी आत्महत्या केल्याचा आजीचा आरोप आहे...दरम्यान मुलगा दत्तक प्रक्रिया बेकायदेशीरपणे झाल्याचं बालकल्याण समितीचा प्राथमिक निष्कर्ष असून, गुन्हा नोंद करण्याच्या सूचना दिल्यात...मुलाला सध्या शिशुगृहात दाखल करण्यात आलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Rohit Pawar : राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत रोहित पवारांचं मोठं विधान...धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळणार-रोहित पवार...काही महिन्यात घड्याळ चिन्ह आम्हाला मिळणार-पवार...'शिंदे, अजितदादा त्यांचे पक्ष भाजपात विलीन करणार'
Ravi Kishan : मराठी-हिंदी भाषा वादावर अभिनेता आणि भाजप खासदार रवि किशन यांनी मराठीतून उत्तर दिलंय.. मी मुंबईकर असून मराठीत चित्रपट केलाय असं रवि किशन यांनी म्हटलंय.. मुंबई मनपा निवडणुकांसाठी हा वाद निर्माण केल्याचा आरोप त्यांनी केलाय..
Thane : ठाण्यातील एक मराठी शाळा अचानक CBSE मध्ये कनव्हर्ट केल्यामुळे पालक संतापले आहेत....तीन दिवसांपासून संबंधित मराठी शाळा बंद ठेवण्यात आली असून, तिथे CBSE चे वर्ग सुरु ठेवल्याने पालक आक्रमक झाले आहेत....मनसेचे ठाणे शहराध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या नेतृत्वात पालक शाळेबाहेर जमले आहेत...पालकांना विश्वासात घ्या आधी गेट खोला नाहीतर तुम्हाला बाहेर येऊन देणार नाही असा इशारा रविंद्र मोरे यांनी दिलाय.
Mumbai-Pune Expressway Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वाहनांचा विचित्र अपघात झाला...एका कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यामुळे तो पुढे चाललेल्या गाडीवर धडकला त्यानंतर मागून येणारी काही वाहने एकमेकांवर धडकली....12 ते 13 वाहनं एकमेकांना धडकल्याची माहिती...अपघातग्रस्त वाहनांमध्ये एका खाजगी बसचाही समावेश...30 ते 35 जण जखमी असून काही गंभीर जखमींना एम जी एम रुग्णालयात हलवलंय....खोपोलीजवळील बोरघाटात अपघात...अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचं काम सुरू
Delhi : संसदरत्न पुरस्कारात महाराष्ट्रातील 7 खासदारानी बाजी मारली आहे...सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, अरविंद सावंत, नरेश म्हस्के, स्मिता वाघ, मेधा कुलकर्णी आणि वर्षा गायकवाड यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे...उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण योगादानासाठी हा पुरस्कार देण्यात येतो...लोकसभा आणि राज्यसभा सचिवालयाच्या आकडेवारीवरुन प्राइम पॉइंट फाउंडेशन या संस्थेकडून हे पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतो...
Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेचा लाभ 14 हजार 298 पुरुषांनी घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहा महिन्यांपर्यंत या लाडक्या पुरुषांना 21 कोटी 44 लाख रुपयांचे वाटपही करण्यात आले. अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली. योजनेच्या लाभार्थीची छाननीत हा प्रकार उघड झाला. ऑगस्ट 2024 मध्ये योजनेचा लाभ द्यायला सुरुवात झाली. लाभार्थीच्या यादीमध्ये 14 हजार 298 पुरुषही घुसले. त्यांना कोणी घुसवले, छाननी कोणी केली आणि महिलांसाठीच्या योजनेवर पुरुषांनी डल्ला मारला कसा, त्यासाठी जबाबदार कोण, असे प्रश्नही आता निर्माण झाले आहेत. सार्वजनिक वितरण प्रणालीत उपलब्ध असलेल्या डेट्याची पडताळणी केली असता, आणखीही गंभीर बाबी समोर आल्या. आता हे 21 कोटी रुपये राज्य सरकार पुन्हा वसूल करणार का असा सवाल विचारला जातोय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Sanjay Raut : महायुती सरकारमधील 75 टक्के मंत्री यूजलेस आहेत... त्यांना आपल्या कामाचं भान नाही अशी घणाघाती टीका संजय राऊतांनी केलीय...तसेच हे सर्व लुटारू, दरोडेखोरांप्रमाणे काम करत असल्याची टीका संजय राऊतांनी केलीय...सोबतच हे सर्व होत असताना मुख्यमंत्री फडणवीस गप्प का असा सवालही राऊतांनी केलाय...
Delhi Rahul Gandhi : काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदींवर हल्लाबोल केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी ही मोठी समस्या नाही.. त्यांचा केवळ दिखावा आहे.. त्यांची प्रतिमा वास्तवापेक्षा फुगवून सांगीतली जाते अशी टीका राहुल गांधी यांनी केलीये...दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये आयोजीत ओबीसींच्या कार्यक्रमात ते बोलत होते..
Amravati CJI Bhushan Gawai : सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यानंतर कोणतेही शासकीय पद घेणार नाही असे वक्तव्य सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना केले. काल ते त्यांच्या दर्यापूर तालुक्यातील मूळगाव असलेल्या दारापूर याठिकाणी गेले तेव्हा त्यांचा पारिवारिक सत्कार सोहळा गावकऱ्यांनी आयोजित केला होता तेव्हा त्यांनी हे विधान केले.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
PM Kisan Nidhi : शेतकरी पीएम-किसान योजनेच्या 20 व्या हप्त्याची वाट पाहत आहेत...असे असताना राज्यात लाभार्थी संख्येत मोठी वाढ झाल्याची माहिती समोर आलीय...लाभार्थी शेतकरी संख्येत चौपट वाढ झाल्याचं समजतंय....महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 21.84 लाभार्थी होते...तर 19 व्या हप्त्यात ही संख्या 93 लाखांवर पोहोचली आहे...कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीतून ही बाब समोर आलीय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Ganesh Murti Price Hike : राज्यात गणेशमूर्ती तयार करण्याची लगबग सुरू आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवरची बंदी उठली. त्यामुळे मूर्तिकार खूश असले तरी यंदा गणेशमूर्तीच्या वाढत्या किमतीची झळ गणेशभक्तांना बसणार आहे. गणेशोत्सव अगदी काही आठवड्यांवर येऊन ठेपला असतानाच, गणेशभक्तांना यंदा महागाईची झळ बसणार आहे. यंदा गणेशमूर्तीच्या किमतीत 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळं उत्सवाच्या तयारीत असलेल्या भक्तांची आर्थिक गणितं कोलमडण्याची शक्यता आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
UPI Transaction : गेल्या काही वर्षांत ऑनलाईन व्यवहाराचं प्रमाण वाढलं आहे. स्मार्टफोनवरून पेमेंट करण्याकडे कल वाढत आहे. यासाठी पेटीएम, फोनपे किंवा जीपेसारखी अनेक अॅप्स सध्या उपलब्ध आहेत. मात्र आता लवकरच यूपीआय व्यवहारांवर शुल्क लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यूपीआयला आर्थिकदृष्ट्या अधिक व्यवहार्य बनवण्याची गरज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी अधोरेखित केली आणि हे डिजिटल व्यवहार कायम पूर्णपणे मोफत राखणे परवडणारे नाही, असेही त्यांनी सूचित केले. पायाभूत सुविधांच्या शाश्वततेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्याचे खर्च चुकते करावेच लागतील. कोणालातरी त्या खर्चाचा भार सहन करावा लागेल, असे ते म्हणाले. यूपीआय व्यवहारांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. दोन वर्षांत, दररोजचे यूपीआय व्यवहारांची संख्या ३१ कोटींवरून ६० कोटींपुढे पोहोचली आहे
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Pune Bhatghar Dam : पुण्यातील भाटघर धरण 92 टक्के भरलं आहे..धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे... त्यामुळे सकाळी 8 वाजता धरणातून विसर्ग सुरू केला जाणार आहे...त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
State Rain Alert : राज्याच्या विविध भागात आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.. पालघर, पुणे घाट, चंद्रपूर, गोंदियात रेड अलर्ट देण्यात आलाय. तर मुंबईसह काही जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.. पालघरमध्ये अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय.. तर दुसरीकडे समुद्राला आज पुन्हा एकदा उधाण येणार आहे. दुपारी 1 वाजून 20 मिनिटांच्या सुमारास समुद्रात 4.67 मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी किनारपट्टी भागात जाऊ नये असं आवाहन प्रशासनानं केलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.