Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा झटपट आढावा

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 27 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूजचा झटपट आढावा
LIVE Blog
27 July 2025
27 July 2025 22:13 PM

रोहित पवार शरीरानं शरद पवारांसोबत- नितेश राणे

 

Nitesh Rane On Rohit Pawar : रोहित पवार शरीरानं शरद पवारांसोबत - नितेश राणे... रोहित पवार मनानं भाजपमध्ये - बंदरेमंत्री नितेश राणे यांचं वक्तव्य... यावर नितेश राणे यांनी आरशात पाहावं असा टोला रोहित पवारांनी लगावला. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

27 July 2025 20:56 PM

'जातीची मीडिया ट्रायल सहन करणार नाही- धनंजय मुंडे

 

 

Dhananjay Munde : माझ्या राजकीय जीवनात जे झालं, ते मी स्वीकारेन...माझ्यावर टीका करा, पण आरोप माझ्या जातीपर्यंत येऊ नये, असं विधान धनंजय मुंडे यांनी केलंय...कालपर्यंत मला शिव्या दिल्या जात होत्या, आज माझ्या हातून सत्कार होतोय..त्याला चमत्कार म्हणतात, नियती म्हणतात असंही मुंडे म्हणाले...वंजारी समाजाच्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते...माझ्यावर टीका करताना माझी जात, माझा जिल्हा बदनाम केला असं मुंडे म्हणाले...यावेळी वंजारी समाजासमोर बोलताना मुंडे भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं....

27 July 2025 17:55 PM

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी 7 आरोपींना पोलीस कोठडी

 

Pune Rave Party Case : पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी 7 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी

 

 

27 July 2025 17:35 PM

राज ठाकरे आल्यानं कित्येक पटीनं आनंद- उद्धव ठाकरे

 

Uddhav Thackeray on Raj Thackeray : राज ठाकरे वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आल्यानं कित्येक पटीनं आनंद झाला अशी भावना, उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. आपला आनंद द्विगुणित झाला आहे. ज्या घरात एकत्र आलो तिथे आम्ही एकत्र भेटलो यामुळे आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया उद्धव यांनी राज भेटीवर दिली. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

27 July 2025 16:29 PM

ठाकरे बंधू एकत्र येणं हा त्यांच्या घरातील प्रश्न- अजित पवार

 

Ajit Pawar On Uddhav-Raj Thackeray : ठाकरे बंधूंची भेट हा त्यांच्या घरातला प्रश्न आहे... दोघं स्वतंत्र विचाराचे आहेत.. काय करावं हे त्यांनी ठरवाव अशी प्रतिक्रीया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलीये.. दोन भाऊ जर एकत्र येत असतील तर आनंदच आहे अशी प्रतिक्रीया त्यांनी दिलीये..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

27 July 2025 15:32 PM

2 भाऊ एकत्र येणं म्हणजे 2 विचार एकत्र येणं- भास्कर जाधव

 

Bhaskar Jadhav : मातोश्रीवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत..ही भविष्यातील राजकारणाची नांदी असून दोन भाऊ एकत्र येणं म्हणजे दोन विचार एकत्र येणं असल्याची प्रतिक्रिया शिवसेना UBTचे नेते भास्कर जाधव यांनी दिलीये...

27 July 2025 13:58 PM

राज ठाकरेंनी मातोश्रीवर घेतली उद्धव ठाकरेंची भेट

Raj Thacekray & Uddhav Thacekray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची  भेट घेतली.. उद्धव ठाकरेंचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं राज ठाकरे मातोश्रीवर गेले आणि त्यांनी उद्धव ठाकरेंची  भेट घेऊन त्यांना वाढदवसांच्या शुभेच्छा दिल्या.. राज ठाकरे मातोश्रीवर जाणे हा अनेक अर्थांनी ऐतिहासिक क्षण मानला जातोय.. राज ठाकरे हे शिवसेनेत असताना अनेकदा मातोश्रीवर जायचे. लहानपणापासून ते बाळासाहेब ठाकरेंच्या सोबतच राहिले..त्यांच्याच मुशीत राज ठाकरेंची जडणघडण झाली... मात्र, शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे आणि मातोश्रीची ताटातूट झाली होती. शिवसेना सोडल्यानंतर आणि बाळासाहेबांच्या निधनानंतर राज ठाकरे आज पहिल्यांदाच राज मातोश्रीवर दाखल झाले... शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे हे जेव्हा जेव्हा मातोश्रीवर गेले होते, तेव्हा काहीतरी अपरिहार्य कारण होते. मात्र, आता राज ठाकरे हे पहिल्यांदाच स्वखुशीने मातोश्रीवर गेलेत.. या भेटीमुळे मराठी जनेमध्ये पुन्हा उत्साह संचारलाय.. इतच नाही तर हा महाराष्ट्रातील राजकारणाच्या नव्या अध्यायाचा श्रीगणेशा ठरण्याचीही शक्यता आहे.

बातमी पाहा - उद्धव ठाकरेंचा वाढदिवस, राज ठाकरे शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले मातोश्रीवर!

27 July 2025 13:41 PM

1 ऑगस्टपासून यूपीआय संदर्भात नवीन नियम

UPI Payment : 1 ऑगस्ट 2025 पासून UPI शी संबंधित नवीन नियम लागू होत आहेत. जर तुम्ही Paytm, PhonePe, GPay किंवा इतर कोणत्याही UPI अॅपद्वारे दररोज पेमेंट करत असाल तर हे बदल जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. UPI सिस्टमचे व्यवस्थापन करणाऱ्या NPCI ने नवीन मर्यादा निश्चित केल्या आहेत जेणेकरून सिस्टमवरील दबाव कमी होईल. तसेच ऑनलाईन व्यवहार करताना होणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी नवीन नियम लागू केले आहेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 July 2025 13:38 PM

पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा

Pune : पुण्यातील खराडीतील एका उच्चभ्रू भागात सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकलीये.. या कारवाईत एकनाथ खडसेंच्या जावाई प्राजंल खेवलकरांसह 7 जणांना ताब्यात घेण्यात आलंय... खराडीतील एका फ्लॅटमध्ये हाऊस पार्टीच्या नावानं हे रेव्ह पार्टी सुरु होती....घटना स्थळावरुन पोलिसांनी अमली पदार्थ, मद्य तसंच हुक्का जप्त केलाय...आज पहाटे पोलिसांनी ही कारवाई केलीये.... 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 July 2025 11:52 AM

मी मुख्यमंत्री झालो तर शेतकऱ्यांना अनुदान देणार - हसन मुश्रीफ

Hasan Mushrif : मी मुख्यमंत्री झालो तर प्रामाणिकपणे कर्ज भरणा-या शेतक-यांना 1 लाख रुपये अनुदान देईन असं वक्तव्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलंय. लाडकी बहीण योजनेमुळे कर्जमाफीसाठी अडचणी येत असल्याची अप्रत्यक्ष कबुलीही मुश्रीफांनी दिलीय.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 July 2025 11:28 AM

लाडकी बहीण योजनेसाठी 26.34 लाख महिला अपात्र

Ladki Bahin : राज्य सरकारनं जून महिन्यातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची तसंच अपात्र महिलांची संख्या पहिल्यांदाच जाहीर केलीय.... जून महिन्यात 2 कोटी 25 लाख पात्र लाडकी बहिणींच्या खात्यात पैसे आले.. त्याचवेळी एकूण 26 लाख 34 हजार महिलांना तात्पुरत्या स्वरुपात अपात्र केल्याची माहिती आहे...यात काही लाभार्थ्यांनी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेतल्याचं समोर आलंय. तर काही कुटुंबामध्ये 2 पेक्षा जास्त लाभार्थी असल्याची माहिती आहे....पडताळणीनंतर 26 लाख 34 हजार अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात बंद केलाय... 

बातमीचा व्हिडीओ पाहा 

27 July 2025 11:05 AM

महाड MIDCतील केटामाईन ड्रग्ज प्रकरण, 3 आरोपींना 7 दिवसांची कोठडी

Raigad : रायगडमधील महाड एमआयडीसीतील कंपनीत केटामाईन ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेल्या 3 आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. महाड एमआयडीसी पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी पथकाच्या मदतीने बंद स्थितीत असलेल्या रोहन केमिकल्स कंपनीवर छापा टाकला होता..यामध्ये 89 कोटी रुपयांचे केटामाईन ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं... या प्रकरणात आतापर्यंत तिघांना अटक झाली असून त्यांचा मुख्य सूत्रधार अद्याप फरार आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा -

27 July 2025 10:55 AM

कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला 8 गावांचा विरोध

Kolhpaur : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला 8 गावांनी विरोध केलाय...पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेला ठराव सादर केलाय... कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा पुढचा टप्पा पार पडला असला तरी उचगाव, पाचगाव, सरनोबतवाडी मोरेवाडी, कळंबा, नवे बालिंगा, नवे पाडळी, नवे उजळाईवाडी या गावांनी कोल्हापूर शहरात समाविष्ठ होण्यास नकार दिलाय. या आठही गावांची भूमिका मुख्य कार्यकारी अधिका-यांच्या माध्यमातून पुन्हा महापालिकेला पाठवण्यात येणार आहेत..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 July 2025 10:21 AM

ऐन सणासुदीच्या तोंडावर चणाडाळ महागली

Chana Daal Price Hike : चणाडाळीची आवक घटल्यानं तिचा भाव प्रतिकिलो 80 वरून 120 रुपयांवर पोहोचलाय तर, बेसन पीठाचे दरही 100 वरून 120 रुपये किलो झालेत. आगामी काळात हे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली आहे.... त्यामुळे श्रावणातल्या सणासुदीमध्ये पुरणपोळी शौकिनांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.. बिहार, पश्चिम बंगाल, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि इतर भागांत चणाडाळीची मागणी वाढली आहे.... आगामी सणासुदीचा हंगाम विचारात घेऊन महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांनी चणाडाळीचा साठा करायला सुरुवात केली आहे... सध्या चणाडाळीचा भाव वाढ झाल्याने व्यापारीवर्ग खूश झाला आहे. मात्र, ग्राहकांना नैवेद्यासाठी पुरणपोळी, तसंच वडा, भजी, ढोकळा असे बेसन पीठाचे विविध पदार्थ बनवताना हात आखडता घ्यावा लागणार आहे.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

27 July 2025 09:01 AM

लोणावळा बलात्काराच्या घटनेनं हादरलं

Lonavala Rape : बलात्काराच्या घटनेनं लोणावळा हादरलं... लोणावळ्यातील एका तरुणीचा कारमध्ये बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित तरुणीला लोणावळा परिसरातून जबरदस्तीने कारमध्ये बसवून तिच्यावर अत्याचार करण्यात आले.याबाबत लोणावळा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून, आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे

27 July 2025 08:55 AM

घराला विद्युत तारा बांधून कुटुंब संपवण्याचा प्रयत्न 

Yavatmal : यवतमाळच्या आर्णीत घराला विद्युत तारा बांधून कुटुंब संपवण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडलीय...यामध्ये विजेच्या शॉक लागून एका महिलेचा मृत्यू झाला असून तिचा पती थोडक्यात बचावला आहे...जुन्या वादातून कुटुंबाचा काढण्यासाठी सहा जणांनी हे कृत्य केल्याचं समजतंय...सविता पवार असे मृत महिलेचे नाव आहे... पवार कुटुंब घरी झोपले असताना, आरोपींनी घराभोवती विद्युत तारा बांधल्या... पहाटेच्या सुमारास सविता लघुशंकेसाठी उठल्या होत्या...घराबाहेर पडल्यानंतर चप्पल घालत असतानाच अचानक त्या जागेवर कोसळल्या.... आवाज आल्याने पती मनेश बाहेर आला. त्यालाही जोरदार विजेचा धक्का बसला... आरडाओरडा केल्यानंतर शेजाऱ्यांनी दोघांनाही आर्णी रुग्णालयात हलविले.... तेथे डॉक्टरांनी सविताला वीज तारेचा स्पर्श होऊन मृत्यू झाल्याचे सांगितले... या प्रकरणी मनेश पवार याच्या तक्रारीवरून घाटंजी पोलिसांनी इंदल राठोड, सुदाम चव्हाण, गणेश राठोड, विनोद चव्हाण, राजू जाधव, चेतन चव्हाण या सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलाय....

TAGS

Latest Marathi BatmyaLatest News In marathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking NewsToday's Breaking Newslatest newsCurrent Breaking Newslatest news todaylive newscurrent newstoday newsbreaking news todayLive News MarathiMumbai Pune Latest NewsNational International Latest NewsEntertainment Latest Newsmaharashtra latest news todayलेटेस्ट मराठी न्यूजमहाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडेमराठी ताज्या बातम्यामराठी ब्रेकिंग न्यूज अपडेटमुंबई पुणे ताज्या बातम्याराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्यामनोरंजन ताज्या बातम्यामहाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूजमराठी न्यूज लाइव्हलाइव्ह न्यूजआजच्या ठळक घडामोडीमराठी बातम्याझी 24 तासमराठी ब्रेकिंग न्यूजताज्या मराठी बातम्यामहाराष्ट्रातील आजच्या बातम्याराजकीयसामाजिकक्रीडाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराज ठाकरेउद्धव ठाकरेशरद पवारमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील लाईव्ह बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्या
Read More