Raj Thackeray on Varsha Gaikwad : राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाडांचं कौतुक...निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं कौतुक...मराठी वाघिणींना दाखवला दुबेंना हिसका... राज ठाकरेंनी वर्षा गायकवाडांना लिहिलं पत्र...राज ठाकरेंनी कॉंग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचं कौतुक केलं
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Rajnath Singh : ऑपरेशन सिंदूर यशस्वी- राजनाथ सिंह...पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त'...धर्मविचारून गोळ्या मारल्यानं पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना धडा शिकवला...1962च्या युद्धानंतर किती नुकसान झालं हे कधी सत्ताधा-यांना विचारलं नाही..1971 युद्धानंतर आम्ही सरकारचं अभिनंदन केलं...परीक्षेचा निकाल विचारा, पेन तुटला की आहे विचारू नका असा टोला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधकांना विचारलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Pune Kharadi Rave Party Case : पुण्यातील खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट्स समोर येतेय....सात पैकी 2 जणांनी अल्कोहोल घेतल्याचं अहवातून समोर आलंय...प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव यांनी अल्कोहोल घेतल्याचं अहवालातून समोर..-दोघांनी मद्यपान केल्याच प्रथमिक वैद्यकिय तपासणीत आढळून आलय...ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांकडे सुपूर्द...ड्रग्ज प्रकरणी 7 जणांना घेतलं होतं ताब्यात...पुण्यातील ससून रुग्णालयात आरोपींची वैद्यकीय तपासणी...सर्व आरोपींचे रक्ताचे व लघवीचे नमुने फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले आहेत...
Women's World Cup Chess : बुद्धिबळ वर्ल्डकपमध्ये दिव्या देशमुख विजयी झाली आहे....दुसऱ्या ट्राई-ब्रेक राउंडमध्ये नोंदवला विजय...ग्रँडमास्टर दिव्या देशमुख ठरली विश्वविजयी
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Jammu-Kashmir Terrorist : जम्मू-काश्मीरमध्ये सैन्याचं 'ऑपरेशन महादेव'....3 दहशतवाद्यांना कंठस्नान-सूत्र...-3 पैकी 2 दहशतवादी पहलगाम हल्ल्यातले-सूत्र....पहलगाम हल्ल्यातला दहशतवादी सुलेमानला कंठस्नान....श्रीनगरच्या जंगलात दहशतवादी-सुरक्षारक्षकांमध्ये चकमक
Sangali : कोयना धरण आणि चांदोली धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गमुळे सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झालीय.सांगलीतील आयर्विन पूल इथल्या कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 25 फुटांवर पोहचली आहे.एका दिवसात तब्बल 6 फुटाने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली.त्यामुळे कृष्णा नदी दुथडी भरून वाहत असून कृष्णा नदीवरील 5 बंधारे पाण्याखाली गेलेत....तर दुसऱ्या बाजूला शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच आहे.त्यामुळे धरण 85% इतकं भरलंय.धरणातुन साडे तेरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात करण्यात येतोय, त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ झाली असून अनेक ठिकाणी वारणा नदी पात्रा बाहेर पडलीय,तर नद्यांच्या पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता,कृष्णा आणि वारणा नदी काठच्या गावांना सतर्कतेचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Sambhajinagar : छत्रपती संभाजी नगरच्या सातारा परिसरातील महिलेला मारहाण प्रकरणात आरोपी लंके दांपत्याला पोलिसांनी अखेर अटक केली आहे, त्यांच्या शोधासाठी दहा पथक लावण्यात आली होती. पोलिसांचा त्यांना शोधण्याचा कसोशीने प्रयत्न सुरू होता. अखेर संभाजी नगर जिल्ह्यात ग्रामीण भागात हे कुटुंब लपून बसले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. आज त्यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे.. शिकवणीत मुलींचा वादातून लंके कुटुंबीयांनी शिंदे कुटुंबातील महिलेला अमानुष मारहाण केली होती या मारहाणी ची माहिती पुढ आल्यानंतर लंके कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता...
Mahayuti 'Plan B' : ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीविरोधात महायुतीचा प्लान बी समोर आलाय.. ठाकरेंच्या युतीविरोधात महायुतीचे नो रिस्क धोरण असल्याची माहिती समोर आलीय.. मतांची फाटाफूट टाळण्यासाठी महायुतीने प्लान तयार केलाय.. ज्या ठिकाणी वाद असतील ते वाद येत्या महिन्याभरात मिटवून निवडणुकीच्या तयारीला महायुती सुरुवात करणार असल्याचं बोललं जातंय.. मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डची जबाबदारी महायुतील्या आमदारांकडे देणार असल्याचं कळतंय.. कोकणी मतदारांसाठी महायुतीचं गणेशोत्सवावर नजर आहे. गणेशोत्सवासाठी मोफत ट्रेन्स, एसटी सोडल्या जाणार आहेत. तसंच गोविंदा पथक, गणेशोत्सव मंडळांना जोडण्याचा महायुतीचा मनसुबा आहे..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Rohini Khadse X Post : पुण्यातील खराडीतील एका उच्चभ्रू भागात सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली.. या कारवाईत एकनाथ खडसेंच्या जावाई प्राजंल खेवलकरांसह 7 जणांना ताब्यात घेण्यात आलं. या प्रकरणी खेवलकर यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया समोर आलीय. 'कायदा आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास असल्याचं रोहिणी खडसेंनी म्हटलंय.. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं, योग्य वेळी सत्य बाहेर येईल असं रोहिणी खडसेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस असल्यामुळे जवळपास सर्वच धरणे शंभर टक्के भरले आहेत. राधानगरी धरण देखील 100% भरला असून त्यातून विसर्ग सुरू आहे. याचा परिणाम म्हणून नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. पंचगंगा नदीचे पाणी यंदाच्या पावसाळ्यात चौथ्यांदा पात्रा बाहेर पडले आहे. पण पहिल्यांदाच हे पाणीशहरातील गायकवाड पुतळ्याजवळ आले आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 35 फूट 8 इंचावर पोहोचले असून पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट इतकी आहे. पंचगंगा नदीची धोका पातळी 43 फूट इतकी आहे. जिल्ह्यातील 57 बंधारे पाण्याखाली गेली आहेत
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Dhananjay Munde : त्या दोनशे दिवसांत दोनदा मरता मरता वाचलो अशी भावनिक प्रतिक्रिया माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलीय.. धनंजय मुंडे चुकलाय तर त्याला कधीच माफ करू नका. परंतु कोणताही विषय धनंजय मुंडेंच्या जातीपर्यंत नसावा असंही मुंडेंनी म्हटलंय.. वंजारी समाजाचे राज्यस्तरीय अधिवेशन आणि विचारमंथन मेळाव्याचे आयोजन ठाण्यात आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी मुंडेंनी ही भावना व्यक्त केलीय.. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी समोर आल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र धनंजय मुंडे संतोष देशमुख हत्या प्रकरणावर झालेल्या आरोपावर आता धनंजय मुंडे यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या आहेत..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
SCERT : SCERTने इयत्ता तिसरी ते दहावी या इयत्तांसाठीचा शालेय शिक्षण अभ्यासक्रमाचा प्रस्तावित मसुदा जाहीर केला. यामध्ये शालेय शिक्षण विभागाने तिसरी भाषा हद्दपार केली आहे. या मसुद्यावर आता एससीईआरटीने शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, अभ्यासक, पालक, अधिकारी, संघटना आणि समाजातील इतर घटकांना आपले अभिप्राय देण्याचे आवाहन केले. SCERTने जाहीर केलेल्या २०२५च्या प्रस्तावित मसुद्यात मराठी, इंग्रजीसह २० विषयांचा समावेश आहे. त्याशिवाय व्यावसायिक शिक्षण, समाजातील व्यक्ती, सभोवतालचे जग, संरक्षणशास्त्र, अर्थशास्त्र अशा विषयांचाही समावेश आहे. इयत्ता सहावीपासून व्यावसायिक शिक्षण या स्वतंत्र विषयाचा अभ्यासक्रमही तयार करण्यात आला आहे. एससीईआरटीच्या या आराखड्यात सध्याच्या अभ्यासक्रमात अनेक बदल प्रस्तावित आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Shahapur : ठाण्याच्या शहापूर तालुक्यातील अस्नोली गावातील तळेपाडा इथं मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे.... जन्मदात्या आईनेचं पोटच्या तीन मुलींना जेवणातून विष देऊन जीव घेतलाय... मुलींना सांभाळण्याचा कंटाळा आणि त्यांच्या संगोपनाचा खर्च परवडत नसल्याने आईने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समजतंय...आरोपी आई संध्या भेरेला पोलिसांनी अटक केली असून तिला कोर्टाने 5 दिवसांची कोठडी सुनावलीय...या घटनेमुळे शहापूर तालुक्यातून नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे....
बातमी पाहा - Crime News : काळजात धस्स करणारी घटना; तीन अल्पवयीन मुलींसोबत आईचं पाशवी कृत्य
Mumbai Ganpati Mandal : राज्य सरकारने नुकताच गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला, मात्र खड्डे झाल्यास सार्वजनिक मंडळांना १५ हजार दंड आकारण्याचे मुंबई महापालिकेने जाहीर केले आहे. पालिकेचा हा पवित्रा मंडळांसाठी जाचक असून, दंड रद्द करण्याची मागणी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी केली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची प्रतिनिधीत्व करणाऱ्या बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची बैठक शनिवारी दादर येथे पार पडली. या बैठकीत खड्यांसाठी दंड रद्द करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती पालिका आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे निश्चित करण्यात आले. उंच गणेशमूर्ती सोबत मंडपात छोट्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. या मूर्ती मोठ्या मूर्तीसोबत विसर्जन करण्याची मुभा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.