Aditi Tatkare On Ladki Bahin Yojana : 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्या यात तथ्य नसल्याची माहिती महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरेंनी दिलीय.. आलेला डाटा हा मोघम असून त्याची पडताळणी करण्याचं काम सुरू आहे.. पडताळणी झाल्यानंतर अपात्र लाडक्या बहिणींबाबतची खरी माहिती समोर येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय.. तसेच 14 हजार पुरुषांनी योजनेचा लाभ घेतला याची पडताळणी सुरू असल्याचंही अदिती तटकरे म्हणाल्यात..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Nishikant Dubey : लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर सविस्तर चर्चा होत असताना, मध्येच भाषेचा मुद्दा निघाला. झारखंडमधील भाजपचे खासदार निशिकांत दुबे ऑपरेशन सिंदूरवर बोलत होते. त्यावेळी विरोधी पक्षाच्या बाकावरील खासदारांकडून भाषेच्या मुद्द्यावरुन घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे निशिकांत दुबे यांनी भाषण थांबवून काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांना उत्तर दिलं.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
MNS : मनसे कामगार सेनेत प्रथमच महिलांची नियुक्ती...मनसेच्या बैठकीत मोठा निर्णय..विशेषतः महिला कामगारांचे प्रश्न हाताळण्यासाठी मनसे कामगार सेनेच्या कार्यकारिणीत महिलांची विशेष नियुक्ती...सर्वच राजकीय पक्षांच्या कामगांर संघटनांमध्ये पुरुषांची मक्तेदारी असते मात्र आता कामगार सेनेत महिलांचा सहभाग वाढवण्यावर मनसेचा भर...अमित ठाकरेंच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत ही नियुक्ती झाली...अनिषा चव्हाण, पूजा देसाई, सोनाली पाटील आणि स्वागता राजिवडेकर या चार जणींचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आलाय
Daya Naik : एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना सहाययक पोलीस आयुक्तपदी बढती...निवृत्तीच्या दोन दिवस आधी मिळाली बढती..३१ जुलैला दया नायक होणार पोलीस सेवेतून निवृत्त...सध्या दया नायक गुन्हे शाखा 9 चे प्रभारी पोलीस निरीक्षक
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Dharashiv : धाराशिवमध्ये दोन भावांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीय...तलाव परिसरात खेळत असताना पाय घसरून पडल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे... उमरगा तालुक्यातील डाळिंब येथेही घटना घडलीय..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Ajit Pawar & Manikrao Kokate : विधानसभेत ऑनलाईन रमी खेळतानाच्या व्हिडिओमुळे वादात सापडलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली. मंत्रालयात अँटी चेंबरमध्ये अजित पवार आणि कोकाटे यांची तब्बल 45 मिनिटे चर्चा झाली. यावेळी अजित पवारांनी कोकाटे यांना चांगलंच झापल्याची माहिती मिळतेय.. तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय, बोलताना भान ठेवलं पाहिजे अशा शब्दांत अजित पवारांनी कोकाटेंची कानउघडणी केली.. यावर भविष्यात बोलताना काळजी घेईन अशी ग्वाही माणिकराव कोकाटे यांनी अजित पवारांनी दिली.. मात्र अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतर कोकाटे माध्यमांशी काहीही न बोलता निघून गेले.. त्यामुळे कोकाटे यांच्या मौनाचा अर्थ नेमका काय अशा चर्चा सुरु झाल्यात. अजित पवार कोकाटेंचा राजीनामा घेणार का.. कोकाटेंची कृषिमंत्री पदावरुन उचलबांगडी होणार का याकडं लक्ष लागलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
FLAT Rate : मुंबईत गेल्या दोन वर्षांपासून ५० लाख रुपये ते ५ कोटी आणि ५ ते १० कोटी रुपये किमतीच्या घरांच्या विक्रीमध्ये विक्रमी वाढ होताना दिसत आहे. त्याच वेळी दुसरीकडे ज्या घरांची किंमत १० कोटी रुपये आणि त्यापेक्षा अधिक आहे अशा घरांच्या विक्रीचा आलेखही वाढत असल्याचे समोर आलंय. विशेषतः यावर्षी पहिल्या सहा महिन्यांत मुंबईत १० कोटी रुपये आणि त्यापेक्षा अधिक किमतीच्या एकूण १३३५ घरांची विक्री झाली असून, या विक्रीद्वारे तब्बल १४ हजार ७५० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती मिळतेय . एका कंपनीच्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आलीय...गेल्यावर्षीच्या तुलनेत या घरांच्या विक्रीत ११ टक्के वाढ नोंदवण्यात आलीय...वरळी, प्रभादेवी, ताडदेव, मलबार हिल, वांद्रे पश्चिम, अंधेरी, ओशिवरा या भागातील घरांना पसंती मिळतेय...गेल्या 6 महिन्यात 75% नवीन घरांची विक्री झालीय तर रिसेल घरांची विक्री 25% झाल्याचं समोर आलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
IPL Jersey Stolen From BCCI Office : वानखेडे स्टेडियमच्या दुसऱ्या मजल्यावर असलेल्या बीसीसीआयच्या अधिकृत स्टोअरमधून आयपीएल खेळाडूंच्या एकूण 261 जर्सीं चोरीला गेल्यात. त्यांची किंमत सहा लाख 52 हजार रुपये आहे. या प्रकरणी सुरक्षा व्यवस्थापक फारुख असलम खान याच्याविरुद्ध मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर संबंधित पुरावे तपासले जात आहेत. याप्रकरणी इतर आरोपींच्या सहभागाबाबत पोलीस तपास करत आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Uddhav Thackeray & Raj Thackeray : राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या... 22 दिवसात ठाकरे बंधू दोन वेळा एकत्र आले. 5 जुलैला मराठीच्या मुद्यावर ठाकरे बंधू एकत्र आले.. वरळीत तब्बल 20 वर्षांनंतर मराठी विजयी मेळाव्याच्या निमित्तानं उद्धव आणि राज ठाकरे एका मंचावर आले. यानंतर उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले.. 2012 नंतर राज ठाकरे पहिल्यांदाच मातोश्रीवर आले... आता गणेशोत्सवात तिस-यांदा ठाकरे बंधूंच्या भेटीचा योग जुळून येणार अशी चर्चा रंगलीय..
बातमीचा व्हिडीओ पाहा
Ladki Bahin : 14 हजारांवर पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याची बातमी ताजी असतानाच आता 9,526 राज्य सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ उचलल्याची माहिती आहे....तसेच अनेक सेवानिवृत्त महिला कर्मचा-यांच्या खात्यातही 'लाडकी बहीण'चे पंधराशे रुपयेही जमा होत असल्याचं समजतंय...तसेच 65 वर्षे वयावरील 13 हजार 461 महिलांनी दुहेरी योजनेचा लाभ घेतल्याचं समजतंय...या महिलांना इंदिरा गांधी पेन्शन योजनेचा आधीच लाभ मिळत होता...सोबतच आता त्यांनी लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेतल्याचं कळतंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Bala Nandgaonkar And Devendra Fadanvis : उद्धव आणि राज ठाकरे यांच्या मातोश्रीवरील भेटीनंतर आता मनसे नेते बाळा नांदगांवकर मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार असल्याची माहिती मिळतेय.. मनसे नेते बाळा नांदगांवकर दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्यांनी भेटीकरता मुख्यमंत्र्यांकडे वेळही मागितली आहे. नाशिकमधील आदिवासी आश्रम शाळा आणि मुंबईतील कोळीबांधवांच्या प्रश्नांसंदर्भात ही भेट होणार असल्याचं समजतंय. मात्र राज ठाकरेंच्या मातोश्री भेटीनंतर मनसे नेते फडणवीसांची भेट घेत असल्यानं या भेटीत काही राजकीय चर्चा होतेय का पाहणं महत्वाचं आहे. याआधीही ठाकरे बंधुंच्या एकीकरणाची चर्चा जोमात सुरु असतांना अचानकच राज ठाकरेंनी एका हॉटेलमध्ये फडणवीसांची भेट घेतली होती. आताही राज ठाकरेंच्या मातोश्री वारीनंतर ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा जोमात सुरु झाल्यानंतर पुन्हा एकदा मनसे- फडणवीस भेटीच्या बातमीनं भुवया उंचावल्या गेल्यात...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Maharashtra Vegetable Price Falls : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याच्या दरात घसरण झाली आहे... भाजीपाला 15 ते 20 टक्क्यांनी स्वस्त झाल्या आहेत...विशेषतः भेंडी, कारली, वांगी, घेवडा, वटाना, काकडी, फ्लॉवर, शिमला मिरची स्वस्त झाली आहे..दरातील घसरणीमुळे ग्राहकांना दिलासा मिळणार आहे...दरम्यान टोमॅटोच्या दरात मात्र काहीशी वाढ झाली आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला गुजरातमधील वनताराकडे नेत असताना गालबोट लागले आहे. सांतपलेल्या महादेवी हत्तीणीप्रेमिनी पोलिसांना लक्ष करत पोलिसाच्या वाहनांवर दगडफेक केली. यामध्ये पोलिसाच्या वाहनाचे नुकसान झाले आहे. तर परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करुन जमावाला पांगविले. मोठा लढा उभारून देखील सुप्रीम कोर्टाने महादेवी हत्ती संदर्भातील याचिका फेटाळल्यामुळे नांदणी आणि पंचक्रोशी मधील लोकांमध्ये असंतोष होता. त्यातूनही मठाने महादेवी हत्तीणीला सुप्रीम कोर्टाच्या निर्णया प्रमाणे वनताराकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला. पण तत्पूर्वी महादेवीची नांदणी गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी अख्खे गाव आणि पंचक्रोशीमधील नागरीक रस्त्यावर उतरले. यावेळी पोलिसाचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरी देखील संतप्त झालेले नागरीक हत्तीणीची मिरवणूक सुरु असताना मध्येच ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यामुळे पोलीस वारंवार हस्तक्षेप करत होते. इतकंच नव्हे तर ज्या ठिकाणी महादेवी हत्तीणीला वनतारा व्हॅनमध्ये चढवलं जाणार होतं, त्या ठिकाणी जमावबंदी आदेश लावत , नागरिकांनी येवू नये असं आवाहन पोलिसांनी केल. मात्र ज्या ठिकाणी महादेवी हत्तीणी व्हॅन मध्ये चढणार होती त्या ठिकाणी येण्याला लोकांना मनाई करण्यात आल्याने संतापलेल्या जमावाने पोलिसांच्या वाहनांना लक्ष केलं. यामध्ये पोलिसांच्या वाहनांच्या काचा फुटल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीलार्च केला, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. मोठ्या पोलीस बंदोबस्तात महादेवी हत्तीणीला व्हॅनमध्ये चढविले.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरवरुन आजही संसदेत जोरदार घमासान होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दुपारी 12 वाजता लोकसभेत बोलणार असल्याची माहिती मिळतेय.. तर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह राज्यसभेत चर्चेत सहभागी होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदीही आज या चर्चेत सहभागी होणार आहेत. मोदी संध्याकाळी सहा वाजता लोकसभेत बोलणार अशी माहिती समोर आलीय. विरोधकांच्या आरोपांना पंतप्रधान मोदी काय उत्तर देणार याकडं लक्ष लागलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.