Donald Trump : अमेरिकनं भारतावर 25 टक्के टॅरिफ लावलाय.. एक ऑगस्टपासून भारतीय वस्तूंवर 25 टक्के कर आकारला जाणार आहे.. अशी माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलीये.. यानंतर तातडीनं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची पीयूष गोयल यांनी भेट घेतलीये...आयात शुल्क लावणं हे आपल्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. अशी प्रतिक्रिया काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंनी दिलीये...
Mahadev Munde Murder Case : महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मनोज जरांगेंची अंतरवाली सराटीत भेट घेतली. उद्या ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेणार आहेत.त्याआधी त्यांनी अंतरवाली गाठून जरांगे यांची भेट घेतली.उद्या सकाळी 10 वाजता ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन महादेव मुंडे यांच्या हत्येच्या तपासाबाबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावर...शिंदे, उदय सामंतांची विमानतळावर बैठक
Sambhaji Brigade : संभाजी ब्रिगेडच्या दोन संघटना एकत्र येणार....पुरुषोत्तम खेडेकर आणि प्रवीण गायकवाडांच्या संघटना एकत्र येणार....प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांची माहिती...लवकरच अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती...आगामी निवडणुकीसाठी दोन्ही संघटना एकत्र येणार...-प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला झाल्यानंतर दोन्ही संघटना एकत्रित करण्याच्या हालचाली सुरू
Chhagan Bhujbal On Shiv Bhojan Thali : उद्धव ठाकरेंनी सुरु केलेली शिवभोजन थाळी बंद होण्याची शक्यता आहे.. अनेक केंद्रावर गैरव्यव्हार होत असल्याच्या तक्रारी आल्याचं अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळांनी म्हटलंय.. वारंवार गैरव्यव्हार आढळल्यास सदर शिवभोजन थाळी केंद्र बंद करण्याचे निर्देश भुजबळांनी दिलेत.. सध्या या योजनेसाठी २० कोटी रुपयांचे अनुदानाला अजित पवारांकडून मंजूरी देण्यात आलीय.. पुढचा निधी दोन तीन महिन्यांनी मिळू शकेल अशी माहिती आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Shirdi : साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांची हार, प्रसाद आणि फुलांच्या नावाखाली होणारी लूट थांबवण्यासाठी शिर्डी प्रशासनाने कंबर कसलीय. मंदिर परिसरातील सर्व दुकानदारांना आता दरपत्रक (रेटकार्ड) लावणं बंधनकारक करण्यात आले असून, भाविकांना ठराविक दरातच वस्तू मिळणार.शिर्डी नगरपरिषद, साई संस्थान आणि स्थानिक पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पुढाकाराने हा निर्णय घेण्यात आलाय. नगरपरिषद प्रशासनाने दुकानांवर रेटकार्ड लावण्याची मोहीम हाती घेतली असून, यामुळे वस्तूंचे दर पारदर्शक होतील आणि अवाजवी किंमती लावणाऱ्या दुकानदारांवर नियंत्रण ठेवता येईल असा यामागचा हेतू आहे. प्रशासनाच्या या निर्णयाचं सर्वत्र स्वागत होतंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Somanth Suryawanshi : सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी राज्य सरकारला मोठा झटका बसलाय. आता सर्वोच्च न्यायालयानेही मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल उचलून धरत सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचा आदेश कायम ठेवला आहे. हा महायुती सरकारसाठी मोठा झटका मानला जात आहे. त्यामुळे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाशी संबंधित असलेल्या पोलिसांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केल्याप्रकरणी राज्य सरकारही अडचणीत येण्याची शक्यता आहे.
Nashik ED Raid Update : वसई-विरार मनपाचे माजी आयुक्त अनिल पवार यांच्या नाशिकच्या घरातूनही मोठं घबाड हातील लागलंय. पवार यांच्या नाशिकच्या घरातून 1 कोटी 20 लाखांची रोकड जप्त करण्यात आलीये. तसं काही कागदपत्रही ईडीनं ताब्यात घेतलेत..वसई-विरार महापलिकेच्या हद्दीतील बेकायदा बांधकामांना छुपे प्रोत्साहन देण्याच्या प्रकरणात पवार यांच्यावर 'ईडी' ने कारवाई केली असून, पवार यांची चौकशी करतानाच ईडीने त्यांच्या नाशकातील निवासस्थानासह वसई-विरार, मुंबई येथील पवार यांच्या मालकीच्या जागेत छापे टाकण्यात आले आहेत.
Delhi Sanjay Raut : ईडीच्या कारवाईचा फटका शिवसेनेच्या मंत्र्यांना बसणार का अशी चर्चा सुरु झालीय.. कारण वसई विरार महापालिका आयुक्तांवर झालेल्या ईडी कारवाईवरून संजय राऊतांनी मोठा दावा केलाय...अनिलकुमारांवरील कारवाईचे धागेदोरे मंत्री दादा भुसेंपर्यंत जाऊ शकतात असं संजय राऊतांनी म्हटलंय... अनिलकुमार पवारांची नियुक्ती दादा भुसेंच्या आग्रहाखातर झाली असल्याचा दावाही त्यांनी केलाय...
Pune Drugs Seized : पुणे पोलिसांनी गांजा तस्करांना दणका दिलाय. पुण्याच्या वाघोली भागात 1 लाख 83 हजारांचा गांजा जप्त करण्यात आलाय. गांजा विक्रीसाठी आलेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केलीय. आरोपीकडून 9 किलो गांजा जप्त करण्यात आलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Nashik : नाशिकच्या सटाण्यात ईडीनं छापेमारी केलीये..वसई विरार मनपाचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या मालमत्तेवर राज्यभरात कारवाई सुरु आहे.. त्याचा एक भाग म्हणून नाशिकसह सटाण्यातही ईडीनं छापेमारी केलीये. बागलाण तालुक्यात अनिलकुमार यांच्या भावाची मालमत्ता आहे. या मालमत्तेची ईडीकडून चौकशी सुरु आहे. सटाणा तालुक्यात विविध ठिकाणी तसेच नाशिकमध्ये अनिलकुमार पवार तसंच त्यांच्या कुटुंबियांच्या नावे शेत जमीन, फॉर्म हाऊस तसेच प्लॉट असल्याची माहिती मिळतीये.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Raju Shetty : शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी शेतात याल तर याद राखा, असा थेट इशारा स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टींनी दिलाय. नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टींनी सांगली जिल्ह्यातील गावांचा दौरा केला. यावेळी त्यांनी सावळज इथल्या आंदोलनात सहभाग घेतला. हातात टाळ मृदुंग घेऊन राजू शेट्टींनी शक्तीपीठ विरोधात भजन आंदोलनही केलं.
बातमीचा व्हिडीओ पाहा
Amravati : आदिवासी आश्रम शाळेत पाण्याची टाकी कोसळून एका 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत... सुमरती सोमा जामुनकर असे मृत विद्यार्थीनीचे नाव आहे.... अमरावतीच्या अचलपूरमधील वसंतराव नाईक आदिवासी आश्रम शाळेतील ही धक्कादायक घटना आहे.... जखमी विद्यार्थिनींवर अचलपूरमधील खाजगी रुग्णालयात उपचारसुरू आहेत...ही आश्रम शाळा भाजपचे मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार केवलराम काळे यांची असल्याची माहिती आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Bhandara : भंडा-यातील शहपूर परिसरात 307 किलो अफू जप्त करण्यात आलाय. एका हॉटेलमध्ये थांबलेल्या दोन परप्रांतियांकडून 16 पोती अफू पडकण्यात आलाय. हे आरोपी राजस्थान मार्गे भंडा-याच्या दिशेने अफू नेत होते. याप्रकरणी आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांच्याकडून एका वाहनांसह 85 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. तर आरोपींवर मादक द्रव पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार सदर कारवाई करण्यात आलीये.
बातमीचा व्हिडीओ पाहा
ST Mahamandal : गणेशोत्सवाला कोकणात जाणा-या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने यंदा २३ ते २७ ऑगस्टदरम्यान ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचं नियोजन केलंय. २३ ऑगस्टपासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बस स्थानकातून या जादा बस सोडण्यात येणारेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Election Update : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तयारीचा निवडणूक आयोगाकडून आढावा घेण्यात आला. त्यानुसार महापालिका निवडणुकांआधी झेडपी निवडणुकांचा बार उडणार असल्याची शक्यता आहे.. जिल्हा परिषद निवडणुकांनंतर मनपांच्या नियोजनाची शक्यता आयोगाने वर्तविली. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्यांनी घ्याव्या लागतील. स्थानिक स्वराज्य निवडणुका चार महिन्यांत घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने मे 2025 मध्ये निकाल दिला असला तरी साधनांच्या कमतरतेमुळे राज्य निवडणूक आयोगाला तयारी करण्यासाठी जादा कालावधी लागणार आहे. त्यासाठी सप्टेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयात आयोग मुदतवाढ मिळण्याच्या अनुषंगाने अंतरिम अर्ज दाखल करणार असल्याचे मंगळवारी आयोगाने निवडणूक सांगितले.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.