Central Election Commission : ईव्हीएममध्ये कुठलीही छेडछाड शक्य नाही...मुख्य निवडणूक आयुक्तांच्या सूचनेनंतर आयोगाने केली तपासणी...बॅलेट व कंट्रोल युनिटसह व्हीव्हीपॅट स्लिपची केली तपासणी...तिन्ही प्रकारात कुठलीही तफावत आढळली नाही...ठाणे, रायगड, पुणे, यवतमाळ, नाशिक, कोल्हापूर, बीड मधील यंत्रांची तपासणी...केंद्रीय निवडणूक आयोगानं आरोपांवर दिलं स्पष्टीकऱण
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Raju Shetti On Nandani Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीसाठी राजू शेट्टी मैदानात उतरत आहेत....एक रविवार महादेवी हत्तीणीसाठी अशी मोहीम राजू शेट्टी काढणार आहेत... महादेवी हत्तीणीसाठी राजू शेट्टी पदयात्रा काढणार आहेत....नांदणी गाव ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी पदयात्रा ते काढणार आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Chandrashekhar Bawankule : राज्यातील आदिवासीबहुल 8 जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण लागू करण्यात आलं आहे....SEBC प्रवर्गाला 10 टक्के आरक्षण लागू करण्यात आलं आहे...महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीनं हा निर्णय घेतलाय....राज्य सरकारने आदिवासीबहुल 8 जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय गट-क आणि गट-ड संवर्गातील पदांसाठी सुधारित आरक्षण आणि बिंदूनामावली निश्चित केली आहे. याबाबतचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने जारी करण्यात आला आहे.
Pune : पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणात प्रांजल खेवलकरसह इतर 4 आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. त्यानंतर पुणे पोलिसांनी विशेष न्यायालयात अपील केलं. पोलिसांनी विशेष न्यायालयाकडे खेवलकर आणि इतर 4 आरोपींच्या पोलीस कोठडीची पुन्हा मागणी केली. त्यानंतर आरोपींना पुन्हा विशेष न्यायालयात हजर करण्यात आलं. मात्र विशेष न्यायालयाने देखील पुणे पोलीसांची मागणी फेटाळली आणि सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय दिला.
पुणे ड्रग्जप्रकरणी दोन्ही न्यायालयांनी पुणे पोलिसांची मागणी फेटाळली.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Datta Bharne : माणिकराव कोकाटे यांना विधीमंडळात रमी खेळणं भोवण्याची शक्यता आहे.. माणिकराव कोकाटेचं खातं बदलण्यात येणार असल्याची माहिती आहे.. कोकाटेंचं कृषी खातं दत्तात्रय भरणे यांना मिळणार असल्याची माहिती सुद्धा सूत्रांनी दिलीये.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती आहे.. खातेबदलाबाबत अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्याची सुद्धा माहिती आहे..
Mahadev Munde Murder Case : महादेव मुंडे हत्या प्रकरणात SIT गठीत.. पंकज कुमावतांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन...तात्काळ एसआयटी गठीत करण्याचे आदेश...पंकज कुमावतांच्या अध्यक्षतेखालील समितीत संतोष साबळे आणि एपीआय सपकाळ या अधिका-यांचा समावेश...ज्ञानेश्वरी मुंडेंच्या मागणीवरून एसआयटी गठीत करण्याचे पोलीस महासंचालकांचे आदेश
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंचं खातं बदललं जाणार -सूत्रांची माहिती....अजितदादा आणि फडणवीसांच्या बैठकीत निर्णय - सूत्र...कोकाटेंचं मंत्रिपद कायम मात्र खातं बदलणार -सूत्र...कोकाटेंच्या खातेबदलाचा निर्णय फडणवीसांचा - सूत्र
Keshav Upadhye : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालानंतर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेवर टीकेची झोड उठवलीये.. काँग्रेसचे हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचे कारस्थान या निकालाने हाणून पाडल्याचं ते म्हणालेत. काँग्रेसनं हिंदू समाजाची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केलीये. तर मतांसाठी काँग्रेसनं राष्ट्रीयत्व विकल्याची टीका भाजप नेते किरीट सोमय्यांनी केलीये.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Keshav Upadhye : मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालानंतर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी काँग्रेवर टीकेची झोड उठवलीये.. काँग्रेसचे हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचे कारस्थान या निकालाने हाणून पाडल्याचं ते म्हणालेत. काँग्रेसनं हिंदू समाजाची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केलीये. तर मतांसाठी काँग्रेसनं राष्ट्रीयत्व विकल्याची टीका भाजप नेते किरीट सोमय्यांनी केलीये.
Malegaon Pidit : मालेगाव स्फोटातील पीडित निकालाविरोधात हायकोर्टात जाणार आहेत...आरोपींची निर्दोष सुटकेच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान देणार आहेत...दरम्यान NIA कोर्टाने केवळ संशयाच्या आधारावर कुणालाही दोषी ठरवू शकत नाही असं सांगत 7 जणांची निर्दोष मुक्तता केलीय...याच निकालाला स्फोटातील पीडित हायकोर्टात आव्हान देणार आहेत...
Malegaon : तब्बल 17 वर्षांनंतर मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली. एनआयए न्यायालयाने हा मोठा निकाल दिलाय. केवळ संशयाच्या आधारावर आरोपींना दोषी ठरवू शकत नाही. ठोस पुराव्यांअभावी सगळ्या आरोपींची न्यायालयाने निर्दोष सुटका केली, असं न्यायालयाकडून सांगण्यात आलं. मालेगावमध्ये 29 सप्टेंबर 2008 साली भीषण बॉम्बस्फोट झाला होता...भिक्खू चौकात झालेल्या या स्फोटात 6 निरपराध नागरिकांचे प्राण गेले. तर 100 हून अधिक जण गंभीर जखमी झाले होते. बॉम्बस्फोटाच्या या घटनेनंतर अनेक कुटुंबं उध्वस्त झाली होती. याप्रकरणी मुंबईच्या एनआयए कोर्टाने आज निकाल दिला. यावेळी बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली.
बातमी पाहा - मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता, NIA न्यायालयाचा मोठा निर्णय
Chandrashekhar Bawankule : राज्यातील 2011पर्यंतची अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णया सरकारने घेतला आहे. त्यानुसार विशेष मोहिमेद्वारे सरकारी जमिनीवरील 500 चौरस फुटांपर्यंतची निवासी अतिक्रमणे मोफत नियमित करण्यात येणार असून, उर्वरित अतिक्रमणे बाजारमूल्यानुसार दंड आकारून नियमित करण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी केलीये.. राज्यातील सुमारे 30 लाख अतिक्रमणांना याचा लाभ होणार आहे....प्रधानमंत्री आवास योजनेत 30 लाख घरांचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आलंय... हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सरकारी जमिनीवरील 100 चौरस फुटांपर्यंतची निवासी प्रतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.. तसंच सिंधी समाजातील 5 लाख विस्थापितांनाही प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय घेण्यात आलाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Bhiwandi : भिवंडीत रस्त्यावरील खड्ड्यामुळे एका 18 वर्षाच्या तरुणाचा बळी गेलाय.. भिवंडी-वाडा मार्गावर बाईकवरुन घरी येताना दोन तरुणांचा अपघात झाला होता.. खड्ड्यात बाईक स्लीप झाल्यां दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले होते.. यातील एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.. त्यांतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेह ठेवलेली रुग्णवाहिका रस्त्यावर उभी करुन रास्तारोको आंदोलन केलं.. आणि याप्रकरणी संबंधित ठेकेदार आणि अधिका-यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.. यामुळे या भागात काही काळ तणाव निर्माण झाला होता.. दरम्यान पोलिसांनी ठेकेदार आणि अधिका-यांविरोधात गुन्हा दाखल केला.. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
BEED : बीडमध्ये पुन्हा गावगुंडांची दहशत सुरुच आहे.. बीडमध्ये चार जणांच्या एका टोळक्यानं एका तरुणाच्या हाताची बोटं छाटलीत.. कोयता आणि सत्तूरनं धमकावत या तरुणाला मारहाण करण्यात आली होती. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला होता. याचा जाब विचारण्यासाठी गेलेलेल्या तरुणाला पुन्हा या टोळक्यानं मारहाण केली.. तसंच त्याच्या हाताची बोटं छाटली.. या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडालीये.. दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून यातील एका आरोपीला अटक केलीये..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Mumbai Airport Ganja Seized : मुंबई विमानतळावरून 8 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आलंय...बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून तब्बल दोन किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे...तर गांजा तस्करीप्रकरणी ४ प्रवाशांना अटक करण्यात आलीय..
CBSE-ICSE Board : सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये गणपतीच्या सुट्टीबाबत संभ्रम अजूनही कायम आहे... त्यामुळे पालक आणि कर्मचा-यांच्या गावाला जाण्याचा नियोजनात अडचणी निर्माण झाल्या आहेत...पालक, शिक्षकांबरोबरच आता स्कूल बस चालकांकडूनही राज्यमंडळाच्या शाळांप्रमाणे इतर मंडळाच्या शाळांनीही सुट्टी द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे....सुट्ट्यांबाबतच्या संभ्रमामुळे शाळेतील विद्यार्थी व कर्मचा-यांना गणेशोत्सवासाठी गावाला जाण्याची अडचण निर्माण झाली आहे....महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचा सण असलेल्या गणेशोत्सवासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गावाला जातात... त्यामुळे राज्यमंडळाकडून शाळांना पाच दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात येते... मात्र मुंबईसह राज्यात असलेल्या असलेल्या सीबीएसई, आयसीएसईसह अन्य मंडळाच्या शाळांमध्ये मात्र गणेशोत्सवासाठी फक्त गणेश चतुर्थी व अनंत चतुर्दशीची म्हणजेच आगमन व विसर्जनाची सुट्टी दिली जाते....
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Nagpur : शालार्थ आयडी घोटाळ्यात गठीत ‘एसआयटी’ने विद्यमान प्राथमिक शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे व माध्यमिक शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांना अटक केली आहे. पोलिसांनी या दोघांच्याही चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. राज्यस्तरीय एसआयटी गठीत झाल्यानंतरची ही पहिली मोठी कारवाई आहे.दोन्ही अधिकाऱ्यांनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी ही वेतन प्रक्रिया राबविली. त्या माध्यमातून त्यांनी तीनच वर्षांत राज्य शासनाची शंभर कोटींहून अधिकची फसवणूक केली असल्याची बाब चौकशीतून समोर आल्याची माहिती मिळत आहे
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Mumbai : मुंबईत मालाड पूर्व इथल्या गोकुळधाम परिसरात संतापजनक घटना घडलीय.. एका खासगी शिकवणीत तिसरीत शिकणाऱ्या चिमुरड्याला खराब हस्ताक्षरामुळे मेणबत्तीचे चटके दिल्याची घटना घडलीय.. 8 वर्षीय मुलाला शिक्षिकेनं ही अमानुष शिक्षा दिलीय.. या घटेनवर विद्यार्थ्याच्या पालकांनी संताप व्यक्त केलाय. या प्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात सदर शिक्षिका विरोधक तक्रार दिली असून पोलिसांकडून गुन्हा दाखल करून कारवाई सुरू झाली आहे.आरोपी शिक्षिकेचे नाव राजश्री राठोड असल्याचे पोलिसांनी सांगितले असून पुढील चौकशी करत असल्याचे स्पष्ट केले
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Kailash Gorantyal : मराठवाड्यात भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिलाय...जालन्यातील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटयाल आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गोरंटयाल यांचा पक्षप्रवेश होणार आहे...गोरंट्याल यांच्यासह अनेक पदाधिकारीही प्रवेश करणार असल्याची माहिती आहे...जालन्यातून शेकडो समर्थकांसह गोरंट्याल मुंबईकडे रवाना झाले आहेत... आगामी महापालिका निवडणुकीत जालना महापालिका निवडणूक भाजपने स्वबळावर लढवण्याचा आग्रह वरिष्ठांकडे धरणार असल्याचं गोरंटयाल म्हणालेत... भाजपने महापालिका निवडणुक स्वबळावर लढवावी हे माझं वैयक्तिक मत असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.