Tukaram Mundhe : राज्यातील पाच IAS अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्यात.. यामध्ये तुकाराम मुंढे यांची सुद्धा बदली करण्यात आलीये.. असंघटीत कामगार विकास आयुक्त पदावरून तुकाराम मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागात सचिवपदी बदली करण्यात आलीये.. आतापर्यंत तुकाराम मुंढे यांची 23 व्यांदा बदली करण्यात आलीये.. कमी महत्त्वाचा विभाग तुकाराम मुंढेंना देण्यात आल्याची चर्चा सध्या सुरु आहे..
Dharashiv Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांचं मुंबईत आंदोलन होणारेय.. 29 ऑगस्टला होणा-या आंदोलनात कोणतीही चुक झाल्यास त्याची किंमत सरकारला मोजावी लागणार, असा गंभीर इशारा मनोज जरांगेंनी दिलाय. 29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटलांनी धाराशिवमध्ये मराठा समाज बांधवांची बैठक घेतलीये..
ST Bus App : आता 'लाल परी' होणार हायटेक...ओला, उबर, रॅपिडोच्या धर्तीवर एसटीचं अॅप...एसटीचं अॅप विकसित करण्याचा सरकारचा निर्णय....एसटी महामंडळाकडून चालवलं जाणार अॅप...ओला, उबर, रॅपिडोच्या धर्तीवर स्वत:चं ॲप विकसित करण्याचा राज्य सरकारचा निर्णय..--हे ॲप एसटी महामंडळाकडून चालवलं जाणार...एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी महत्त्वाचं पाऊल...परिवहन विभागाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
Bachchu Kadu : कोल्हापूरच्या महादेवी हत्तीला वनतारा अभयारण्यात नेण्यात आल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात येत आहे...यावर प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी तिखट प्रतिक्रिया दिलीये...एवढा शौक आहे तर डुकरे पाळावे..आम्ही दोन हजार डुकरे तुम्हाला देतो...पण आमची महादेवी आम्हाला परत द्या असं बच्चू कडू यांनी म्हटलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Devendra Fadnavis on Kabutar Khana : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महादेवी हत्तीणीच्या बैठकीनंतर मुंबईतील कबूतरखान्याबाबत बैठक घेतली. यावेळी कबुतरखाना प्रकरणातही सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शासनाची तयारी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. हत्तीणी पाठोपाठ कबुतर वाचविण्यासाठीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला. कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं..या बैठकीला अजित पवार, गणेश नाईक, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढाही हजर होते .
Devendra Fadnavis on Mahadevi Elephant : कोल्हापूरमधील नांदणी मठातील महादेवी हत्तीण वनतारातून परतणार का याकडं कोल्हापूरकरांसह सा-यांचं लक्ष लागलंय. कारण मुंबईत मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थिती बैठक पार पडली. या बैठकीत महादेवीला वनतारातून परत आणण्याबात सरकार सकारात्मक असल्याचं समोर आलंय. मठानं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करावी, सरकारही याचिका दाखल करेल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. महादेवी परत आली पाहिजे ही आपल्या सर्वांची इच्छा असल्याचंही फडणवीसांनी म्हटलंय.. महादेवीची निगा राखण्यासाठी राज्य सरकार डॉक्टरांचं पथक नेमणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिलीय..
Umesh Patil : उपमुख्यमंत्री अजितदादांच्या जिल्हाध्यक्षांचा कारनामा...-उमेश पाटलांच्या वाहनावर 'आमदार'चा लोगो...आमदार नसतानाही वाहनावर आमदारकीचा लोगो...उमेश पाटील राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष...वाहनावरील 'आमदार' लोगोची सोलापुरात जोरदार चर्चा...महाराष्ट्रातील 288 विधानसभा सदस्य आणि 78 विधानपरिषद सदस्यांना शासकीय कामासाठी गाडीवर आमदाराचा लोगो लावण्याचा अधिकार...मात्र जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना स्वतःच्या गाडीवर आमदारकीचा लोगो लावून " मला आमदार झाल्यासारखं वाटतंय " असं तरी म्हणायचं नाही ना ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय
Valmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडने दोषमुक्तीसाठी आता मुंबई हायकोर्टात अर्ज केल्याची माहिती आहे... बीड कोर्टाने दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्यानंतर कराडच्या वकिलाने मुंबई हायकोर्टात अपील केल्याची माहिती आहे...
Nashik Onion Scam : नाशिक जिल्ह्यात नाफेडच्या कांदा खरेदी प्रक्रियेत केंद्र सरकारच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा घोटाळे होत आहेत.... गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात तक्रारी पोलिसात गुन्हे दाखल झालेले असताना या वर्षीही बाळासाहेब ठाकरे अटल नावीन्यपूर्ण सहकारी संस्था या अवसायनात गेलेल्या संस्थेकडून खरेदी दाखवली जात आहे... या संस्थेकडून सर्रासपणे कांदा खरेदी सुरू असल्याने जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी यांनी नाफेडला नोटीस बजावली आहे.... इतकेच नाही तर तातडीने कांदा खरेदी थांबविण्याचे निर्देश दिले आहेत.... केंद्र सरकारच्या भाव स्थिरीकरण योजनेंतर्गत नाफेड व एनसीसीएफमार्फत देशभरात तीन लाख टन कांद्याची खरेदी सुरू आहे.... त्याचाच एक भाग म्हणून वेगवेगळ्या संस्थांकडून कांदा खरेदी केली जात आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Vidhan Bhavan Rada : विधानभवन लॉबीतील राडाप्रकरणी अहवाल तयार झाल्याची माहिती समोर आलीय.. चौकशीअंती मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून अहवाल विधीमंडळाकजे सादर करण्यात आल्याची माहिती विधीमंडळ सूत्रांनी झी २४ तासला दिलीय. पावसाळी अधिवेशन काळात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती. य़ाच प्रकरणी अहवाल सादर करण्यात आला असून आता विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेणार याकडं लक्ष लागलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Eknath Shinde : गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली. ठाणे आणि परिसरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिक अतिशय त्रस्त आहेत. सर्व यंत्रणांनी समन्वय साधून हा परिसर कोंडीमुक्त करावा. तसेच, रस्ते तातडीने दुरुस्त करून खड्डे बुजवण्यासाठी उपलब्ध असलेले उत्तम तंत्रज्ञान वापरावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. घोडबंदर मार्गावर पडलेल्या खड्यांमुळे दररोज वाहनचालकांना कोंडीचा त्रास सहन करावा लागतोय... यामुळे नोकरदारांना कामाच्या ठिकाणी वेळेत पोहचता येत नाही. तर विद्यार्थ्यांच्या बसही कोंडीत अडकतात. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ, ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज साट उपस्थित होते. कोपरी, माजिवडा, घोडबंदर रस्ता, गायमुख घाट ते फाऊंटन हॉटेल, शिळफाटा इथला पूर्ण परिसर वाहतूक कोंडी मुक्त करावा, असे निर्देश शिंदे यांनी बैठकीत दिले.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही गरीब व गरजू महिलांसाठी असतानाही 14 हजारांपेक्षा जास्त पुरुषांनीही त्या योजनेचे पैसे लाटल्याचे नुकतेच उघड झाले होते.... या पुरुषांकडून आता ते पैसे वसूल केले जाणार आहेत.... त्यासाठी त्यांना सरकारकडून नोटीस बजावण्यात आली असून एका महिन्यात पैसे परत न केल्यास फौजदारी कारवाईचा इशाराही देण्यात आलाय...लाडक्या भावांनी आतापर्यंत 21 कोटी 44 लाख रुपये लाटल्याची माहिती आहे..
Petrol and diesel prices likely to become cheaper : ओपेक देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन दररोज तब्बल 5.47 लाख बॅरलने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे... त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची उपलब्धता वाढून पेट्रोल, डिझेलसह पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे... रशिया, सौदी अरेबियासह प्रमुख उत्पादक देशांनी सप्टेंबरपासून उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतल्याने भारतासारख्या आयातदार देशांना मोठा फायदा होऊ शकतो.... पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये लवकरच दिलासा मिळू शकतो, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Anandacha Shida : आर्थिक चणचणीमुळे या वर्षी आनंदाचा शिधा नाही...अनेक योजनांचा फटका आंनदाचा शिधेला बसण्याची शक्यता...तर शिवभोजन थाळ्या सुद्धा वाढणार नाहीत , शिवभोजन थाळी चे बजेट सुद्धा करण्यात येतयं कमी...या आधी शिवभोजन थाळी साठी ६० कोटींची तरतूद होती ती आता २० कोटींवर
Devendra Fadnavis : कोल्हापूरमधील नांदणी मठातील हत्तीणी आणि मुंबईतील कबूतर खान्यांबाबतचा वाद सध्या राज्यात सुरु आहे.. त्यावर तोडगा काढण्यासाठी आज बैठक होणार आहे.. कोर्टाच्या निर्णयावर कायदेशीर मत घेणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणालेत..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.