Eknath Shinde meet Amit Shah : महायुतीतले वाद सोडवण्यासाठी लक्ष घाला असं साकडं एकनाथ शिंदेंनी अमित शाहांना घातल्याचं सांगण्यात येतंय. एकनाथ शिंदेंनी काल रात्री तातडीनं दिल्ली गाठली... दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास शिंदेंनी अमित शाहांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी महायुतीतल्या वादांवर लक्ष घालण्याची विनंती केली. गेल्या काही दिवसांपासून महायुतीत सुप्त संघर्ष पाहायला मिळतो... शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघातील विरोधकांना राष्ट्रवादी आणि भाजपात प्रवेश दिला जातोय. एकनाथ शिंदेंचे आणि शिवसेनेचे प्रकल्प थंडबस्त्यात टाकले जातायेत. संजय शिरसाटांसारख्या नेत्यांना पाठवण्यात आलेल्या आयकरच्या नोटीसांसंदर्भात या भेटीत चर्चा झाल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदेंनी आठवडाभरात दोनदा दिल्लीवारी केल्यानं महाराष्ट्रात चर्चा आहेत.
Amit Shah : ''महादेवी' हत्तीणीबाबत केंद्राची सकारात्मक भूमिका...अमित शाहांची शिवसेनेच्या शिष्टमंडळाला ग्वाही
Bhandara : प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिका-यांनी चक्क शासकीय निवास्थानी पोल्ट्री फार्म सुरु केलाय.. भंडा-याच्या दिघोरी मोठी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हा प्रकार उघडकीस आलाय.. या डॉक्टरांनी थोड्या थोडक्या नाही तर तब्बल 50हून अधिक कोंबड्या शासकीय निवसस्थानात पाळल्यात.. डॉ.चंदू वंजारे असे या डॉक्टरांचे नाव आहे.. या कोंबड्यांमुळे परिसरात दुर्गंधी आणि घाणीचं साम्राज्य पसरलंय. कोंबड्यांचे खाद्य आणि त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था सर्वकाही डॉक्टर साहेब जातीने बघतात. एवढच काय तर अंडे उबविण्यासाठी त्यांनी लाईट लावून स्वतंत्र व्यवस्था केलीये.. दरम्यान या प्रकरणी चौकशी करून योग्य कारवाई करणार असल्याचं वरिष्ठ अधिका-यांनी म्हटलंय..
Nashik : नाशिक शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या इयत्ता सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू..- श्रेया किरण कापडी असे मृत विद्यार्थिनीचे नाव...शिक्षकांच्या हि बाब लक्षात येताच तिला खाजगी रुग्णालयात केले होते दाखल...मात्र रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी तपासून केले मृत घोषित...या मुलीला हृदयाशी संबंधित आजार असल्याने तिला हृदयविकाराचा झटका आला असल्याची शक्यता
Bhushan Gagrani : कबुतरखाना आंदोलनानंतरही मनपा निर्णयावर ठाम...'कबुतरखान्यावरील ताडपत्री हटवणार नाही'...मनपा आयुक्त भूषण गगराणींची झी २४ तासला माहिती..कोर्टाचा पुढील आदेश येईपर्यंत कबुतरखाने बंदच
Maharashtra Politics : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दोन्ही विभाग आमनेसामने आलेत.. एकाच पदासाठी एकाच दिवशी या दोन्ही विभांकडून दोन वेगवेगळे आदेश काढण्यात आलेत... बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार बीएमसीच्या दोन अतिरिक्त आयुक्तांवर दिल्यानं गोंधळ निर्माण झालाय.. एकनाथ शिंदेंच्या नगरविकास विभागाच्या आदेशामध्ये अश्विनी जोशी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिल्याचं म्हटलंय तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे असलेल्या सामान्य प्रशासना विभागाच्या आदेशात आशिष शर्मा यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार दिल्याचं म्हटलंय.. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात अधिकारांवरुन सुप्त संघर्ष सुरु असल्याची चर्चा रंगलीये. श्रीनिवास हे बेस्टच्या महाव्यवस्थापक पदावरुन निवृत्त झाल्यानंतर त्या पादाचा अतिरिक्त कार्यभार कुणाकडे द्यायचा यावरुन फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात जुंपल्याचं बोलं जातंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Yavatmal Crime : आजीला मारहाण केल्याच्या रागातून नातवाने गावगुंडाचा खून केलाय.. यवतमाळच्या वाघाडी इंथं ही घटना घडलीये... मया उर्फ महेश कोल्हेकर असं मृत गुंडाचं नाव आहे. त्याच्यावर खुनाचा एक गुन्हा दाखल होता.. त्याच्या गुंडागिरी मुळे गावात त्याची दहशत होती.. उमेश शिरभाते याच्या आजीला त्यानं मारहाण केली. तसंच रोशन राऊत यालाही मारलं.. याचा राग मनात ठेऊन उमेश आणि रोशन या दोघांनी मयावर धारदार शस्त्राने हल्ला केला.. याता मयाचा जागीच मृत्यू झाला... दरम्यान ग्रामीण पोलिसांनी दोन्ही मारेक-यांना अटक केलीये..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Pune : पुणे महापालिकेच्या आयुक्तांच्या बंगल्यातून लाखोंचं साहित्य गायब झालंय... यामध्ये एसी झुंबर, टीव्ही, अॅक्वागार्ड यासह लाखो रुपयांच्या साहित्याचा समावेशा आहे.. मॉडेल कॉलनी इथं आयुक्तांचा हा बंगला आहे.. विशेष म्हणजे या बंगल्याला कडक सुरक्षा असते.. मात्र तरिही बंगल्यातील वस्तू कशा गायब झाल्या याबाबत प्रश्न उपस्थित होतोय.. दरम्यान प्रशासनानं 20 लाखांच्या नव्या साहित्यांच्या खरेदीची प्रक्रियाही सुरु केलीये.. याप्रकरणी अद्याप पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलेली नाहीये..
Dadar : मुंबईतील दादरच्या कबुतरखान्याजवळ राडा...ताडपत्री आंदोलकांनी हटवली...कबुतरखान्याजवळ मोठा पोलीस बंदोबस्त
RBI : रिझर्व्ह बँकेचं पतधोरण जाहीर...रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही..रेपो रेट 5.50 कायम
Bhayandar : भाईंदरमध्ये परप्रांतिय गुंडांची उच्छाद घातलाय.. भाईंदरच्या राई गावात एका परप्रांतीय गुंडांनी भूमिपुत्रांवर तलवारीनं वार केलेत.. इथल्या स्थानिकांना 7 ते 8 परप्रांतीय गुंड मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. यात एका गुंडानं भूमिपुत्रावर थेट तलवारीनं वार केलेत.. या स्थानिक व्यक्ती गंभीर झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दरम्यान मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.. आरोपींना अटक करा , योग्य कारवाई न झाल्यास पुन्हा मराठी मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे..
बातमीच व्हिडीओ पाहा-
Pune : २७ ऑगस्टपासून सुरू होणा-या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील आठ प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात येणारेय.. १५ दिवसांत हे रस्ते चकाचक करण्याच्या सूचना देण्यात आल्यात. यात
केळकर रोड, कुमठेकररोड, लक्ष्मीरोड, शिवाजीरोड, बाजीरावरोड, नेहरू रोड, टिळकरोड आणि शास्त्रीरोडची पाहणी होणारेय. खड्डे बुजवणे, पॅचवर्क, ड्रेनेज, झाकण दुरुस्ती आणि धोकादायक झाडांच्या फांद्या हटवण्याचं काम केलं जाणार आहे. नागरिकांना गैरसोय होऊ नये यासाठी रोज पाहणी करून कामं मार्गी लावण्याचे आदेश देण्यात आलेत. तसंच गणेशोत्सवासाठी महापालिकेने नियमावली जाहीर केली असून, नव्याने समाविष्ट गावांतील गणेश मंडळांना यंदा रीतसर परवाना घ्यावा लागणार आहे. तसंच मंडपाच्या उंचीवर, मार्ग मोकळा ठेवण्यावर आणि पर्यावरणपूरक मूर्ती वापरण्यावर भर देण्यात आलाय. उत्सवानंतर तीन दिवसांत मंडप हटवणे व रस्ते पूर्ववत करणे बंधनकारक आहे.
Tukaram Mundhe : अत्यंत कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून ओळख असलेल्या प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली झाली आहे. दिव्यांग कल्याण विभागात ते आता काम पाहणार आहेत. सध्या असंघटीत कामगार विभागात विकास आयुक्त म्हणून ते काम पाहत होते. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागानं त्यांच्या बदलीचा आदेश काढला आहे. तात्काळ प्रभावानं नव्या नियुक्तीच्या ठिकाणी कार्यभार स्विकारण्याची सूचना देखील त्यांना करण्यात आली आहे.
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आजपासून तीन दिवसांच्या दिल्ली दौ-यावर जाणार आहेत. एकीकडे मनसे-शिवसेना युतीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे ठाकरेंची दिल्लीवारही चर्चेत आहे. आज दिल्लीत पोहोचल्यानंतर उद्धव ठाकरे शरद पवारांची भेट घेतील. त्यानंतर रात्री पक्षाच्या खासदारांसोबत उद्धव ठाकरे बैठक घेतील. त्यानंतर उद्या उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या बैठकीत राहुल गांधी आणि इतर नेत्यांची भेट घेतील,. उद्या सकाळी 10 वाजता उद्धव ठाकरेंची दिल्लीत पत्रकार परिषद होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच बिगुल वाजणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून निवडणुकांची रणनीती आखायला सुरुवात केली आहे. मात्र, विधानसभा निवडणुकांच्या निकालापासून एकही बैठक न झालेल्या इंडिया आघाडीची उद्या बैठक होतेय. या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहतील. त्यानंतर राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरेंना स्नेहभोजनाचंही निमंत्रण दिलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Eknath Shinde : एकीकडे उद्धव ठाकरे दिल्लीत येत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दिल्ली दौ-यावर आहेत. शिंदे काल रात्रीच दिल्लीत दाखल झालेत. गेल्या आठवड्यातही एकनाथ शिंदे दोन दिवसांसाठी दिल्लीला गेले होते. त्यामुळे शिंदेंच्या आठवडाभरात दुस-या दिल्लीवारीमुळे उलटसुलट चर्चा सुरु झाल्यात.. या दिल्ली दौ-यात शिंदे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीये.. आज दोन्ही नेत्यांची भेट होणार असल्याची माहिती आहे.. तसंच उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीपूर्वी, शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे खासदारांसोबत बैठक घेण्याची शक्यता आहे. या दिल्ली दौ-यात शिंदे कुणाच्या गाठीभेटी घेणार याकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय..
Bacchu Kadu : प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. आज सकाळी 9 वाजता बच्चू कडू राज ठाकरे यांची शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेणार आहेत. आगामी आंदोलनासंदर्भात बच्चू कडू आज राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. विशेष म्हणजे या आधी बच्चू कडूंच्या कर्जमाफीच्या आंदोलनाला राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.