Chakankar on Khewalkar : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन प्रांजल खेवलकरबाबत मोठा गौप्यस्फोट केला. पुणे रेव्ह पार्टी प्रकरणातील आरोपी प्रांजल खेवलकर यांच्या मोबाईलमध्ये अनेक आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सापडल्याचा आरोप, रुपाली चाकणकर यांनी केला. खेवलकरांच्या मोबाईलमध्ये 252 व्हिडिओ, तर 1487 आक्षेपार्ह फोटो आढळल्याचं चाकणकरांनी सांगितलं. तर 19 व्हिडिओ लैंगिक अत्याचाराचे असल्याची माहिती त्यांनी दिली. मुलींना ब्लँकमेलिंग करण्यासाठी या व्हिडिओ आणि फोटोंचा वापर झालाय. तर सिनेमात कामं देतो असं प्रलोभनं दाखवून लैंगिक शोषण केलं गेल्याचा आरोपही त्यांनी केला. खेवलकरसह यातील आरोपींची कसून चौकशी व्हावी, असे निर्देश पोलीस महासंचालकांना दिल्याचं चाकणकरांनी सांगितलं. खेवलकरच्या मोबाईलमधील महिलांच्या फोटोंपैकी काही फोटो त्याच्या मोलकरणीचे असल्याचाही आरोप चाकणकरांनी केलाय. खेवलकरनं शोषण केलेल्या महिलांचा शोध घेतला जात असून हा मानवी तस्करीचा प्रकार असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
HC on Kaburtarkhana : कबुतरांना अन्नपाणी देण्यावर बंदी कायम... मुंबई हायकोर्टाचा कबुतरखान्यांना दणका... अभ्यासासाठी तज्ज्ञाची कमिटी तयार करण्याचे मुंबई हायकोर्टाचे निर्देश.. पुढील सुनावणी 13 ऑगस्टला.. न्यायालयाच्या आदेशाचं पालन करण्याचे निर्देश.
Delhi Uddhav Thacekray : उद्धव ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांच्या दिल्लीतील निवासस्थानी शिवसेनेच्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केलीये. सत्ता हाच मोदी सरकारचा अजेंडा असून त्यांना जनहिताशी काहीही देणंघेणं नाहीये.. तुम्ही संसदेत जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घ्या.. आणि सरकारला सळो की पळो करून सोडा.. अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी खासदारांना स्पष्ट आदेश दिले आहेत..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Farmer : विधानसभा निवडणुकांआधी महायुती सरकारनं शेतक-यांना कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं. मात्र दीड वर्षांनंतरही हे आश्वासन अद्याप पूर्ण करण्यात आलेलं नाही. याच मुद्द्यावरुन बच्चू कडू, विरोधक आणि शेतकरी नेत्यांनी वारंवार सरकारला सवाल केलेत. याच शेतकरी कर्जमाफी संदर्भात आता एक मोठी बातमी समोर आलीय. सर्वेक्षणामुळे शेतकरी कर्जमाफी लांबणीवर जाणार का असा प्रश्न उपस्थित होतेय.. फार्महाऊस बांधणा-या शेतकरी कर्जमाफी नको अशी सरकारची भूमिका आहे. त्यामुळे खरे शेतकरी शोधण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे असं वक्तव्य महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय... या सर्वेक्षणानंतर शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होईल असं बावनकुळेंनी म्हटलंय. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीचा निर्णय सर्वेक्षणामुळे लांबणीवर गेलाय का असा प्रश्न उपस्थित होतोय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Uddhav Thacekray On Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौ-यावर उद्धव ठाकरेंनी टीका केलीय.. शिंदे त्यांच्या मालकांना भेटण्यासाठी दिल्लीत आले असतील असा हल्लाबोल ठाकरेंनी केलाय.. तसंच गद्दारांच्या मताला किंमत देत नसल्याचंही ठाकरेंनी म्हटलंय..
Delhi Uddhav Thackeray : इंडिया आघाडीच्या बैठकीत ठाकरे बंधूंच्या युतीबाबत चर्चा होणार असल्याची चर्चा होती.. याबाबत दिल्ली दौ-यावर असलेल्या उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंशी युतीबाबत वक्तव्य केलंय. युतीबाबत निर्णय घेण्यासाठी आम्ही दोघं खंबीर आहोत असं उद्धव यांनी म्हटलंय. त्यामुळे या निर्णयात तिस-याची गरज नसल्याचंही ठाकरेंनी स्पष्ट केलंय. तसंच इंडिया आघाडीच्या युतीसाठी कुठल्याही अटी शर्ती नसल्याचंही उद्धव यांनी स्पष्ट केलंय..
Nashik : कोव्हिड काळातील तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक, मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यासह संबंधित अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आलेत जिल्हा परिषदेच्या मावळत्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना हे आदेश दिलेत. धक्कादायक म्हणजे जिल्हा रुग्णालयात या माध्यमातून जवळपास ११ कोटींचा घोटाळा झालाय. संबंधित कंपनीने राज्यात अनेक सरकारी रुग्णालयांचे टेंडर मिळविल्याने या घोटाळ्याची व्याप्ती ५० कोटींवर पोहोचण्याची शक्यता आहे. या प्रकारामुळे आरोग्य विभागात खळबळ उडालीय. विशेष म्हणजे जिल्हा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याची पत्नी आणि वडील संबंधित कंपनीचे समभागधारक असल्याचं पुढे आलंय..
Latur : लातूर जिल्ह्यातील ६६ हजार ३७९ लाडक्या बहिणींवर राज्य सरकारने संशय व्यक्त केलाय.. या लाडक्या बहिणींचे वय २१ ते ६५ आहे का ? तसेच एका कुटुंबातील दोघींनाच लाभमिळतो का ? त्यात एक विवाहित आणि एक अविवाहित या दोघींनाच लाभ दिला जातो का ? याची पडताळणी केली जाणार आहे. सरकारच्या या कात्री लावण्याच्या प्रकाराबद्दल महिलांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. लातूर जिल्ह्यातील ५ लाख ६७ हजार ४५९ लाडक्या बहिणींना प्रति महिना पंधराशे रूपये लाभ मिळतो. यातील ६६ हजार ३७९ लाडक्या बहिणी पुन्हा वयाची अट आणि एकाच कुटुंबातील दोन महिलांनाच लाभ मिळतो, याची यादी सरकारने जिल्हाधिकाऱ्यांद्वारे येथील महिला व बालविकास विभागाकडे पडताळणीसाठी पाठवली. महिला व बालविकास विभागाने लातूर जिल्ह्यातील दहा तालुक्यांना याद्या पाठवून पडताळणी करण्यास सांगितले आहे. या पडताळणीत आणखी किती लाडक्या बहिणी अपात्र ठरणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Navi Mumbai : शिवसेना UBTचे उपनेते विठ्ठल मोरे यांनी पदाचा राजीनामा दिल्याने नवी मुंबईत शिवसेना UBTला धक्का बसलाय..माजी खासदार राजन विचारे यांच्यावर टीका करत त्यांनी पदाचा राजीनामा दिलाय...नवी मुंबईतील पदाधिका-यांची नियुक्त विचारात न घेता केल्याने विठ्ठल मोरे नाराज आहेत...विठ्ठल मोरे यांच्या राजीनाम्यानंतर नवी मुंबईतील अनेक पदाधिकारी देखील राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत...निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना UBTचा वाद चव्हाट्यावर आल्याचं दिसून येतंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Gadchiroli : गडचिरोली आरमोरी मार्गावर भीषण अपघात झालाय. भरधाव ट्रकने 6 तरुणांना चिरडलं. पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी हे तरुण मार्गावर धावत होते. त्याचवेळी भरधाव वेगातील ट्रकने तरुणांना चिरडले. काटली-साखरा मार्गावरील झालेल्या घटनेत 4 तरुणांचा मृत्यू झालाय तर 2 तरुण गंभीर जखमी झालेत सध्या गडचिरोली- आरमोरी मार्गावर मोठ्या संख्येत पोलीस कुमक तैनात करण्यात आली असून मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालीय. नागरिकांनी रस्ता रोको सुरू केलाय. फरार ट्रक-चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. या भागातील परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे
Pune : पुण्यात मौजमजेसाठी तब्बल 5 दुचाकी चोरणा-या आरोपीला पोलिसांनी अटक केलीये...सुजल जितेश जगताप असं आरोपीचं नाव आहे...आरोपीने एका अल्पवयीनासोबत मिळून गाड्या चोरल्याची कबुली दिलीये...आरोपीकडून पोलिसांनी पाच दुचाकी जप्त केल्या आहेत...चौकशीत समर्थ, बंडगार्डन आणि कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेले तीन गुन्हे उघडकीस आले आहेत...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Jalana : जालना जिल्ह्यात 70 हजार लाडक्या बहिणींची पडताळणी केली जाणार आहे. अंगणवाडी सेविका करणार घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करून ही पडताळणी केली जाईल.एकाच कुटुंबातील तिसऱ्या आणि चौथ्या महिलेनेही युक्त्या करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे.त्यामुळे राज्य सरकारकडून असा लाभ घेणाऱ्या 70 हजार महिलांची यादी जिल्हा प्रशासनाला पाठवण्यात आली आहे.जिल्ह्यात 4 लाख 64 हजार महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतायत. यापैकी 70 हजार महिलांची पडताळणी केली जाणार आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Yavatmal : यवतमाळ जिल्ह्यात वीज कोसळून पाच वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर तिघे जखमी झाले. वणी तालुक्यातील अडेगाव, पांढरकवडा तालुक्यातील गोपालपूर आणि कृष्णापूर, मारेगाव तालुक्यातील पांढरकवडा पिसगाव आणि यवतमाळ तालुक्यातील रोहटेक शेतशिवारात या घटना घडल्या. येळाबारा येथील एका व्यक्तीच्या १२ शेळ्याही अंगावर वीज पडल्याने मृत्यूमुखी पडल्या
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Delhi Uddhav Thacekray : उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौ-याचा आज दुसरा दिवस आहे. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे देखील दिल्लीत आहेत... काल दिल्लीत त्यांचं स्वागत करण्यात आलंय. उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब शरद पवारांची काल भेट घेतली,.आज इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. त्या बैठकीला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. तसंच 10 वाजता उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे काय बोलतात याकडे लक्ष असणार आहे. रात्री राहुल गांधींच्या स्नेहभोजनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.