Jalgaon : प्रेयसीने लग्नास नकार दिल्याने जळगावच्या अमळनेर तालुक्यातील गांधली इथे तरुणाने नैराश्यातून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. गौरव बोरसे असं या तरुणाचं नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणाने instagram वर व्हिडिओ पोस्ट केल्याचं समोर आवलंय.. प्रेयसी सोबत फोनवर वाद झाला आणि त्यानंतर थोड्यावेळाने तरुणाने इंस्टाग्राम वर व्हिडिओ पोस्ट करून गळफास घेतला, अशी माहिती समोर आलीय... आई तू माझ्या जाण्यानंतर रडू नको , मी तुझी इच्छा पूर्ण करू शकलो नाही, मित्रांनो प्रेम करू नका. आपापल्या अभ्यासात लक्ष ठेवा असं या व्हिडिओत तरुणाने म्हटलंय.. या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Mumbai Underground Metro : भुयारी मेट्रोच्या फायर ऑडिट लवकरच सुरु होणार आहे..आरे ते कफ परेड या भुयारी मेट्रो ३ मार्गिकेवर आचार्य अत्रे चौक ते कफ परेड स्टेशनच्या फायर ऑडिटला सुरुवात झालीये.. सीएसएमटी, विधान भवन आणि कफ परेड या तीन मेट्रो स्थानकांच्या तपासण्या पूर्ण झाल्यात. तर येत्या काही दिवसांत उर्वरित स्थानकांचंही फायर ऑडिट केलं जाणार आहे. त्यासाठी CMRS च्या पथकाला बोलावलं जाणार आहे. MMRC कडून 33.5 किमी लांबीची मेट्रो मार्गिका उभारली जात आहे. त्यावर एकूण 27 स्थानकं असतील. त्यातील आरे ते बीकेसी पहिल्या टप्प्याचा 12.69 किमी लांबीचा मार्ग 7 ऑक्टोबर 2024 पासून प्रवाशांच्या सेवेत आला. बीकेसी ते आचार्य अत्रे चौक स्थानक या दुसऱ्या टप्प्याच्या 9.77 किमी लांबीच्या मार्गाचे 9 मे रोजी लोकार्पण झालं. त्यातून मेट्रो 3च्या आरे ते आचार्य अत्रे चौकदरम्यान 16 स्थानकांवर मेट्रो सेवा सुरू झालीये. तर संपूर्ण मार्ग सेवेत दाखल करण्याच्या अनुषंगानं MMRCनं हालचाली सुरू केल्या आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Supreme court On ED : ईडीने चौकशी केलेल्या प्रकरणांमध्ये दोषसिद्धीचे प्रमाण कमी आहे. ईडी एखाद्या ठकासारखे वागू शकत नाही, या यंत्रणेला कायद्याच्या चौकटीतच काम करावे लागेल, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फटकारले. ईडीच्या प्रतिमेबाबत आम्ही चिंतीत आहोत, असे न्या. सूर्यकांत, न्या. उज्जल भुयान, न्या. एन. कोटिश्वर सिंह यांनी म्हटले आहे. वसूल केलेले २३ हजार कोटी रुपये पीडितांमध्ये वाटले अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणातील जवळपास २३ हजार कोटी रुपये वसूल केले असून, ते आर्थिक फसवणूक झालेल्या पीडितांमध्ये वाटप केल्याची माहिती गुरुवारी केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.