Aashish Shelar On Raj Thackeray : लालकृष्ण अडवाणींनी हिंदीला विरोध केला नाही आणि हिंदुत्व सोडलं नाही अशा शब्दांत सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी राज ठाकरेंच्या टीकेला उत्तर दिलंय.. तसंच बॉम्बे स्कॉटिशमधील बॉम्बेला विरोध का केला नाही असा सवालही शेलारांनी विचारलाय..
Aashish Shelar : भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मनसैनिकांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय.. शेलारांनी मनसैनिकांची तुलना थेट पहलगाम दहशतवाद्यांशी केलीय.. दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं तर यांनी भाषा विचारुन मारलं असं शेलार म्हणालेत.. शेलारांच्या वक्तव्याला किशोरी पेडणेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय...पहलगामचे दहशतवादी कुठे गेले, ते तुमचे कोणी होते का असा थेट सवालच पेडणेकरांनी शेलारांना विचारलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Bhandara : भंडा-यात मुख्याध्यापकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडलीय... मारहाणीत मुलाच्या हाताला गंभीर दुखापत झालीय... शाळेतील विटांची भिंत लाथ मारून पाडल्याचा रागातून मुख्याध्यापकाने मुलाला अमानुष मारहाण केलीय.. दरम्यान मारकुट्या मुख्यापकाविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Amravati : अमरावतीच्या मेळघाटात एका 22 दिवसांच्या बाळाच्या पोटावर गरम विळ्यानं चटके देण्यात आलेत.. दहेंद्री गावात हा धक्कादायक प्रकार घडलाय.. या बाळाला पोटफुगीचा त्रास होता.. त्यावर उपचार करण्यासाठी बाळाची आजी आणि एका मांत्रिकाने त्याच्या पोटावर गरम विळ्यानं चकटे दिलेत.. या प्रकरणी आजीसह मांत्रिकावर गुन्हा दाखल करण्यातआलाय.. या घटनेमुळे मेळघाटातील अंधश्रद्धेचा विषय पुन्हा चर्चेत आलाय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Sunil Shukla On Raj Thacekray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे घाबरले आहेत...मारहाणीचे व्हिडिओ काढू नका असं आपलं कार्यकर्त्यांना सांगत आहेत, अशी टीका उत्तर भारतीय विकास सेनेच्या सुनील शुक्ला यांनी केलीय...तसेच हिंदी भाषिकांना माराल तर सोडणार नाही असा थेट इशाराही त्यांनी राज ठाकरेंना दिलाय...दरम्यान काल विजयी मेळाव्यात बोलताना कुणी नाटकं केली तर कानाखाली आवाज काढा....मात्र मारहाणीचा व्हिडिओ काढू नका असा सल्ला राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला होता... त्यावरून उत्तर भारतीय विकास सेनेच्या सुनील शुक्लांनी जोरदार टीका केलीय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Dharashiv Prataprao Jadhav : पुण्यातील एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जय गुजरात म्हटलं आणि त्यावरुन वाद निर्माण झाला.... त्यानंतर त्यांच्या पक्षाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी एक दावा केला. महाराष्ट्र आणि गुजरात हे एकच राज्य असताना मुंबई ही गुजरातची राजधानी होती असा दावा त्यांनी केला.... गुजरात हे आपलेच शेजारी राज्य आहे, ते काही पाकिस्तानात नाही. त्यामुळे त्यावरून राजकारण करु नका असंही ते म्हणाले. धाराशिवमध्ये तुळजभवानीच्या दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना प्रतापराव जाधवांनी हे वक्तव्य केलं....
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Mumbai Cyber Crime : मुंबईत स्वस्तात घरे देण्याचे आमीष दाखवून दीड कोटीची फसवणूक केल्याची घटना घडलीय...कांजूरमार्ग परिसरात 8 लाखांत घर देण्याचं आश्वासन देऊन 16 जणांची फसवणूक करण्यात आलीय...दरम्यान या फसवणूकप्रकरणी भांडूप पोलिसांनी दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.... आरोपींनी आपण मुंबई MMRDAचे अधिकारी असल्याचे सांगितलं असल्याची माहिती आहे... भांडूप पोलिसांनी नीता अंकुश सराईकर आणि लक्ष्मी किशन बांदे या दोन महिलांविरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे....
बातमीचा व्हिडीओ पाहा -
BMC School : मुंबई महापालिकेच्या 200पेक्षा जास्त माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांविना सुरू असल्याची माहिती आहे.... तर अनेक शाळांमध्ये लिपिक, शिपायांची पदेही रिक्त आहेत... मुख्याध्यापकांची पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याची प्रक्रिया सुरू असली, तरी लिपिक आणि शिपाई पदांसाठी राज्य सरकारनेच निर्णय घेणे आवश्यक आहे....
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Prada Dispute In High Court : इटालियन फॅशन ब्रँड प्राडाने कोल्हापुरी चप्पलची नक्कल केल्याच्या आरोप करून त्याविरुद्ध हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.... तसेच, प्राडाने नक्कल केल्याप्रकरणी सार्वजनिकरीत्या माफी मागावी आणि भरपाई द्यावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली आहे. प्राडाने कोल्हापुरी चप्पलची नक्कल करून ‘टो रिंग सैंडल्स’ नावाने उत्पादन बाजारात आणले असून या सँडलची किंमत प्रति जोडी एक लाख रुपये ठेवल्याचा आरोपही यायिकेत केला आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
State Rain Alert : दोन दिवसांपासून राज्यात पावसाच्या जोरदार सरी बसरत आहेत...हीच स्थिती 8 जुलैपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे... घाट परिसरात काही ठिकाणी आज आणि उद्या अतिवृष्टीची शक्यता आहे....पुणे घाट परिसरात रविवार आणि सोमवारी पावसाचा 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे....पश्चिम बंगालच्या गंगेच्या प्रदेशात आणि लगतच्या भागात हवेच्या वरच्या थरात चक्रीय वातावरण निर्माण झाले आहे.... याचाच परिणाम म्हणून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे... दरम्यान मागील दोन दिवसांत ताम्हिणी येथे सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे... तसेच घाटमाथ्यावर अनेक ठिकाणी 100 मिमीपेक्षा अधिक पाऊस पडलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Mankhurd : मुंबईतल्या मानखुर्द येथील महापालिका शाळेत एकाच हॉलमध्ये पहिली ते 8 वी पर्यंतचे वर्ग भरवले जात होते. झी २४ तास ने हा प्रकार समोर आणला होता. त्याची दखल घेत महापालिकेने आहे त्याच हॉलमध्ये लाकडी प्लाय लावून स्वतंत्र खोल्या केल्या आहेत.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.