Ambernath School Van : अंबरनाथमधील एका शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन जाणा-या स्कूल व्हॅनमधून काही विद्यार्थी पडल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. अचानक भरधाव स्कुल व्हॅनच्या डिक्कीचा दरवाजा उघडला आणि त्यातून दोन विद्यार्थी रस्त्यावर पडले. धक्कादायक बाब म्हणजे स्कुल व्हॅन चालकाच्या हा प्रकार लक्षातही आला नाही. आणि तो तिथून निघून गेला. मात्र मागून येणाऱ्या एका रिक्षाचालकाने हा अपघात पाहून रिक्षा थांबवली. यानंतर गंभीर जखमी झालेल्या या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केलं.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
RSS Sunil Ambekar on Bhasha : भाषेच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्या त्या राज्यांनी आपल्या स्थानिक भाषेतून शिक्षण द्यावं अशी स्पष्ट भूमिका मांडली संघानं मांडली. अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीत सुनील आंबेकर यांनी ही भूमिका मांडली. संघाचं नेहमीचं मत आहे की भारतातील सगळ्या भाषा या राष्ट्रीय भाषा आहेत. प्रत्येक व्यक्तीने आपल्या राज्यातील स्थानिक भाषेतूनच शिक्षण घ्यावं, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमी सांगतो असं सुनील आंबेकर म्हणाले. आपल्या राज्यात लोकं स्थानिक भाषेत बोलतात आणि त्यात शिक्षण घेणं हेच योग्य असल्याची संघाची भूमिका असल्याचं आंबेकर म्हणाले. हे मत संघाने पहिल्यापासून मांडलेलं आहे आणि आजही आम्ही त्यावर ठाम आहोत असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रासारख्या राज्यात भाषेवरून वाद निर्माण होतोय, मात्र सगळ्या भाषा राष्ट्रीय आहेत आणि स्थानिक भाषेला प्राधान्य मिळालंच पाहिजे, असं संघाचं स्पष्ट मत असल्याचं आंबेकर यांनी सांगितलं.
VITS Hotel Issue : संभाजीनगरच्या हॉटेल विट्स प्रकरणावरून विधान परिषदेत जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळाली... विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंत्री संजय शिरसाटांवर गंभीर आरोप केले...तसेच हॉटेलची किंमत निश्चित करणा-या अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी केलीय... तर कोर्टाच्या निर्देशानुसारच ही टेंडर प्रक्रिया करण्यात आल्याचं संजय शिरसाटांनी म्हणत आरोप फेटाळलेत..त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी संबंधित प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीचं आश्वासन दिलंय.
Beed Suicide : सावकारी जाचाला कंटाळून बीडमध्ये एका कापड व्यावसायिकानं आत्महत्या केलीये... राम फटाले असं या व्यावसायीकाचं नाव आहे.. 7 वर्षापूर्वी त्यानं डॉ. लक्ष्मण जाधव या सावकाराकडून अडीच लाख रुपये कर्ज घेतलं होतं.. याची परतफेड देखील 25 हजार रुपये प्रति महिना प्रमाणे करण्यात आली. मात्र पैसे देऊन देखील सावकारी जाच कमी होत नव्हता. तुझ्याकडून वेळेवर पैसे देणे होत नसेल, तर तुझी पत्नी माझ्या घरी आणून सोड.. असे म्हणत सावकाराने मानसिक छळ केला. वेळोवेळी होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून अखेर राम फटाले यांनी चार पानांची सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली.. या प्रकरणी पेठ बीड पोलीस ठाण्यात सावकार डॉ. लक्ष्मण जाधव आणि त्याच्या पत्नीसह एकूण सात जणांवर गुन्हा दाखल असून तिघेजण अटकेत आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी एक पथक रवाना केले आहे. ((यातील सावकार हा भाजपचा पदाधिकारी असल्याची माहिती समोर येतीये..)) जिल्ह्यात महिनाभरापूर्वीच सावकारी जाचाला कंटाळून दोघांनी आत्महत्या केली होती. ही प्रकरण ताजी असतानाच आता आणखी एकाने आत्महत्या केल्याने सावकारीचा प्रश्न समोर आला आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Rohit Pawar On MNS : राज ठाकरे जर मविआसोबत येऊ इच्छित असतील तर त्यांना कॉमन अजेंड्यावर काम करावं लागेल...मनसेला त्यांच्या आक्रमकतेला काहीसा लगाम घालावा लागेल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी SP आमदार रोहित पवारांनी दिलीय...सोबतच आघाडीबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल असंही त्यांनी सांगितलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Sanjay Raut On MNS : मनसेसोबतच्या राजकीय युतीबाबत संजय राऊतांनी मोठं विधान केलंय...आम्ही युतीसाठी पुढे केलेला हात अजूनही कायम असल्याचं त्यांनी म्हटलंय...तसंच शिवसेना UBTची भूमिका सकारात्मक असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केलाय...सोबतच आता कुणी दोघांमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये असंही राऊतानी म्हटलंय...
Beed : बीडच्या केज तालुक्यात एका 9वीत शिकणा-या मुलीचा तरुणानं विनयभंग केलाय.. माझ्याशी बोलली नाहीस तर तुझ्या आईवडिलांना मारेन आणि आत्महत्या करेन अशी धमकी आरोपीनं या मुलीला दिलीये.. निखिल कांबळे असं या आरोपीचं नाव आहे.. गेल्या 15 दिवसांपासून तो या मुलीचा पाठलाग करत होता.. 4 जुलैरोजी त्यानं पीडित मुलीला रस्त्यात गाठलं आणि धमकावलं.. या प्रकरणी जाब विचारण्यासाठी गेलेल्या तिच्या कुटुंबियांनाही त्यानं मारहाण केलीये.. याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी निखील कांबळे याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय.. धक्कादायक म्हणजे, आरोपी निखिल कांबळेचे वडील बाळासाहेब कांबळे याच्या विरोधात देखील दोन दिवसांपूर्वीच एका तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
रेशनिंग दुकानात प्लास्टिक तांदूळ दिला जातो अशी चर्चा असते .पण प्लास्टिक हे तांदाळापेक्षा महाग कसे देणार? विनाकारण काही लोक चर्चा करतात. शिधापत्रिकाद्वारे दिल्या जाणाऱ्या तांदळाची लास्टिक तांदूळ नसतो. रेशन दुकानात भेसळयुक्त तांदूळ दिला जातो? असा प्रश्न विधानसभेत विचारला असता त्यावर अन्न धान्य पुरवठा विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांची माहिती.
Shirdi : आगामी महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सध्या नाशिकमध्ये भाजप आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे...मात्र या इनकमिंग वादात सापडण्याची शक्यता आहे....कारण शिवसेना UBTच्या स्थानिक नेत्यांनी या प्रवेशाबाबत गंभीर आरोप केले आहेत....महायुतीत प्रवेशासाठी पोलिसांचा दबाव असल्याचा गंभीर आरोप शिवसेना UBTने केलाय....पोलीस कारवाईचा धाक दाखवून हे सर्व प्रवेश केले जात असल्याचा आरोप करण्यात आलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Nashik : आगामी महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सध्या नाशिकमध्ये भाजप आणि शिवसेनेत जोरदार इनकमिंग सुरू आहे...मात्र या इनकमिंग वादात सापडण्याची शक्यता आहे....कारण शिवसेना UBTच्या स्थानिक नेत्यांनी या प्रवेशाबाबत गंभीर आरोप केले आहेत....महायुतीत प्रवेशासाठी पोलिसांचा दबाव असल्याचा गंभीर आरोप शिवसेना UBTने केलाय....पोलीस कारवाईचा धाक दाखवून हे सर्व प्रवेश केले जात असल्याचा आरोप करण्यात आलाय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Raigad Palakmantri : रायगडमध्ये पालकमंत्रिपदावरुन महायुतीत वाद पेटलाय. शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरच नाराजी व्यक्त केलीय. थोरवे एवढ्यावर थांबले नाहीत. त्यांनी फडणवीस यांची तुलना उद्धव ठाकरे यांच्याशी केलीय. मविआ काळात उद्धव ठाकरेंनी पालकमंत्रिपद अदिती तटकरेंना दिलं. तसंच आता फडणवीसांनी केल्याची जाहीर नाराजी थोरवेंनी व्यक्त केलीय.. पालकमंत्रिपदावरुन आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस आणि तटकरेंवर टीका करणा-या शिवसेनेनं आता थेट मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष्य केलंय. त्यामुळे आता महायुतीत पालकमंत्रिपदावरुन जुंपण्याची शक्यता आहे..
Kunal Kamra & Sushma Andhare : गेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान कॉमेडियन कुणाल कामरा आणि शिवसेना UBT उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्याच्या कारवाईला जोर आला होता. आता, पावसाळी अधिवेशनात या दोघांविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव मंजूर झाला आहे. कॉमेडियन कुणाल कामराने आपल्या नया भारत या कॉमेडी शोमधून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टिका केली होती. कुणाल कामराने एकनाथ शिंदे यांच्या दाढी, चष्म्यावरुन आणि शिवसेना पक्षातील बंडावरुन केलेले विडंबनात्मक गाणे गायले. कुणाल कामराचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले. तर, दुसरीकडे शिवसेना UBTकडून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. सुषमा अंधारेंनीही व्हिडिओ बनवला होता. त्यामुळे, या दोघांविरुद्ध हक्कभंग दाखल करण्यात आला होता, त्यास मंजुरी देण्यात आली आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
CJI Bhushan Gawai On Marathi : मी स्वतः मराठी माध्यमातून शिकलेला विद्यार्थी आहे. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यामुळे विषयांची समज अधिक पक्की होते असं देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटलंय.. मातृभाषेतील शिक्षणासोबत संस्कारही रुजतात, हेच संस्कार आयुष्यभर साथ देतात, असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.. सरन्यायाधीश भूषण गवई यांनी रविवारी मुंबईतील गिरगाव येथील आपल्या शाळेला भेट दिली. यावेळी वर्गातील बाकावर बसून शाळेतील आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Bank Job : सार्वजनिक बँकांमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणा-यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.... सार्वजनिक क्षेत्रातील बँका त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी आणि बँकांच्या शाखांच्या विस्तारीकरणासाठी चालू आर्थिक वर्षांमध्ये 50000 कर्मचा-यांची भरती करणार असल्याची माहिती आहे... वेगवेगळ्या बँकांकडून मिळालेल्या माहितीनुसार नव्या भरतीमध्ये 21000 पदं अधिका-यांची असतील असं समजतंय... सार्वजनिक क्षेत्रातील 12 बँकांपैकी सर्वात मोठी स्टेट बँक या आर्थिक वर्षामध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर्स सह 20 हजार लोकांची भरती करणार आहे.... या प्रक्रियेपूर्वीच स्टेट बँक ऑफ इंडियानं 505 प्रोफेशनरी ऑफिसर्स तर 13,455 ज्युनिअर असोसिएट्स ची भरती केली आहे....
बातमीचा व्हिडीओ पाहा
Central Government : केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आता पदोन्नतीसाठी डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतचे निर्देश दिले आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांनी आयजीओटी कर्मयोगी पोर्टलद्वारे वार्षिक ऑनलाइन डिजिटल कोर्स पूर्ण करावेत.पंतप्रधानांच्या अखत्यारीतील कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने सर्व कर्मचाऱ्यांना हा कोर्स उत्तीर्ण होणे अनिवार्य केले आहे. ज्याचा त्यांच्या वार्षिक कामगिरी मूल्यांकन अहवालांवर थेट परिणाम होईल.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Pune : पुण्यात तब्बल 26 लाखांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आलेत. कोंढवा भागात अफू बाळगणाऱ्या राजस्थानातील एकाला पोलिसांनी अटक केलीये. त्याच्याकडून 15 लाखांची अफू जप्त केलीये. तर बिबवेवाडीतील एका आरोपीकडून 11 लाखांचं मेफेड्रोन जप्त करण्यात आलंय.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळेल असा अंदाज आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यातील घाट माथ्यावर अत्यंत मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने या परिसरासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केलाय. आज पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.. नागपूर, अमरावती,वर्धा,भंडारा, गोंदिया, चंद्रपूर,गडचिरोलीत हवामान विभागानं ऑरेंज अलर्ट जारी केलाय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Raigad : रायगडच्या मुरूड तालुक्यातील कोरलई इथं खोल समुद्रात एक संशयास्पद बोट आढळून आली. यानंतर सुरक्षा यंत्रणांची धावपळ उडाली आहे. ही बोट पाकिस्तानची असल्याचा संशय व्यक्त होत आहे. या बोटीतून काही व्यक्ती उतरल्याचा संशय असून पोलिसांनी रात्रीच कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं आहे. रात्री ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. रायगड पोलिस, तटरक्षक दल, सीमा शुल्क विभाग, शीघ्र प्रतिसाद दल, स्थानिक गुन्हे शाखा, नौदल, बाँब शोधक आणि नाशक पथक अशा सर्व यंत्रणा पोहोचल्या. संशयास्पद ठिकाणी झाडाझडती सुरू करण्यात आली. कोरलईच्या लाईट हाऊसपासून साधारण दोन नोटिकल मैल अंतरावर ही बोट असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र या सर्व घटने बाबत पोलिस यंत्रणा काहीही बोलायला तयार नाही. जिल्हा प्रशासनानं मौन बाळगलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.