Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News Today : LIVE Updates on JULY 11 महत्त्वाच्या ब्रेकिंग न्यूज मराठीमध्ये, महाराष्ट्रातील सर्व घडामोडी पाहा (Maharashtra LIVE News) एका क्लिकवर, मुंबई, पुण्यासह (Mumbai-Pune News) राज्यातील महत्त्वाची शहरं आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे LIVE अपडे्स (Political News) सामाजिक, आर्थिक, आरोग्य, शैक्षणिक आणि क्रीडा (Sports) तसेच इतर अपडेट्स वाचा एक क्लिकवर.

Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर
LIVE Blog
11 July 2025
11 July 2025 18:34 PM

जाहीर बोलण्यामुळं मित्रपक्षांकडूनही त्रास होतो- संजय शिरसाट

 

Sanjay Shirsat : गेल्या काही दिवसांत झालेल्या आरोपांसंदर्भात सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाटांनी महायुतीच्या मित्रपक्षांवरच निशाणा साधलाय. जाहीर बोलण्यामुळं मित्रपक्षांची नाराजी सहन करावी लागत असल्याचा आरोप संजय शिरसाटांनी केलाय. गेल्या काही दिवसांत झालेल्या आरोपांमागं मित्रपक्ष नाहीत ना असा संशय आता शिरसाटांच्या वक्तव्यामुळं घेतला जाऊ लागलाय. जाहीर बोलण्यामुळं थोडा त्रास होत असल्याची कबुलीही शिरसाटांनी दिलीये. टू द पॉईंट कार्यक्रमात संजय शिरसाटांनी ही रोखठोक कबुली दिलीये.

बातमीचा व्हिडीओ पाहा- 

 

11 July 2025 17:37 PM

उद्धव-राज ठाकरे सोबत राहणार नाही - शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती

 

Shankaracharya Swami Avimukteshwaranand : उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले असले तरी ते सोबत राहतील असं वाटत नाही, असं भाकित...शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केलंय. दोन्ही भावांचा स्वभाव वेगवेगळा आहे तसेच त्यांची शैलीही भिन्न असल्याचं शंकराचार्य म्हणालेत.. तसेच मराठी आणि हिंदीवरून सुरू असलेल्या वादावरही शंकराचार्यांनी भाष्य केलंय. तसेच वयाची 75 वर्ष झाल्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचा राजीनामा देतील असा विश्वास शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केलाय.. 

11 July 2025 16:48 PM

ITची नोटीस आलेल्या मंत्र्याचा व्हिडिओ माझ्याकडे- संजय राऊत

 

Sanjay Raut : आयकर विभागाची नोटीस आलेल्या एका मंत्र्याचा व्हिडिओ आपल्याकडे आल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय.. या व्हिडिओत मंत्री पैशांची बॅग घेऊन बसले असून हा व्हिडिओ एका हॉटेलमधील असल्याचं राऊत म्हणालेत..

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

 

11 July 2025 15:28 PM

कॅन्टीन चालक मारहाणप्रकरणी  संजय गायकवाडांवर गुन्हा 

 

Sanjay Gaikwad : संजय गायकवाड यांच्यासह अन्य व्यक्ती विरोधात अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद...संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल...कॅन्टीन चालक मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल

11 July 2025 13:46 PM

रायगडच्या किना-यांवर हजारो अनधिकृत बोटी

Raigad : रायगडच्या कोर्लई समुद्रकिनारी संशयित पाकिस्तानी बोट प्रकरणावर पडदा पडला असला तरी पोलिसांच्या तपासात धक्कादायक बाब उघड झालीये..पोलिसानी राबवलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये रायगडच्या किना-यांवर हजारो अनधिकृत बोटी असल्याचे निष्पन्न झालंय...या बोटींची मत्स्यव्यवसाय विभागाकडे नोंदणीच नसल्याची बाब उघड झालीये..आधीच मासळीचा दुष्काळ, एलईडी, पर्सनेट फिशींगमुळे पारंपारीक मच्छीमार संकटात असताना बेकायदा बोटींचे संकट समोर आलंय...

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11 July 2025 13:15 PM

परभणीत संस्थाचालकाकडून पालकाला बेदम मारहाण, मारहाणीत पालकाचा मृत्यू

Parbhani Crime : परभणीतील हायटेक रेसिडेन्शियल स्कूलच्या संस्थाचालक दाम्पत्याने पालकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडलीय... या मारहाणीत पालक जगन्नाथ हेंडगे यांचा मृत्यू झालाय...मारहाण करणारा संस्थाचालक अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेता असल्याची माहिती आहे....आपली मुलगी निवासी वसतिगृहात राहत नसल्याने टीसी आणि फी परत मागण्यासाठी आलेल्या पालकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे... उखळदमधील 42 वर्षीय जगन्नाथ हेंडगे यांची मुलगी पल्लवी रेसिडेनशियल स्कूलच्या वसतीगृहात राहत होती... पण ती लहान असल्याने आई वडिलांना सोडून राहण्यास तयार नव्हती...त्यामुळे पल्लवीला वडील जगन्नाथराव घरी घेऊन गेले होते, काल जगन्नाथ हेंडगे परत शाळेत येऊन आपल्या मुलीची टीसी आणि ऍडव्हान्स भरलेले पैसे शाळा व्यवस्थापनाकडे परत मागत होते...त्यावेळी त्यांना संस्थाचालक प्रभाकर चव्हाण यांनी मारहाण केल्याची माहिती आहे...संस्थाचालक प्रभाकर चव्हाण राष्ट्रवादीचे नेते असल्याची माहिती आहे... 

बातमी पाहा - 'फी' परत मागितल्याने...; अजित पवारांच्या नेत्याकडून झालेल्या बेदम मारहाणीत पालकाचा मृत्यू

11 July 2025 12:24 PM

रिक्षा-टॅक्सीचालकांच्या मुजोरीला आता लागणार लगाम

Rikshaw & Taxi Complaint : रिक्षा आणि टॅक्सीने प्रवास करायचा म्हटलं तर चालक सातत्याने भाडं नाकारतात. त्यामुळे मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागतो. मुजोर रिक्षा-टॅक्सीचालकांची तक्रार करण्यासाठी परिवहन विभागाने प्रत्येक आरटीओसाठी व्हॉट्सअॅप क्रमांक उपलब्ध करून दिला होता. मात्र मुंबईत चार आरटीओ कार्यालये असल्याने प्रवाशांचा गोंधळ होत होता. मात्र आता मुंबई महानगर प्रदेशासाठी  एकच टोल फ्री क्रमांक देण्यात आलाय त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळतोय.... २६ दिवसांत ९५ तक्रारी आल्या असून, सर्वाधिक तक्रारी जादा भाडे आकारण्याच्या आहेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11 July 2025 12:09 PM

शालेय पोषण आहारातील चॉकलेट, बिस्किटात अळ्या

Dharashiv : शालेय पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या चॉकलेट आणि बिस्किटांमध्ये चक्क जिवंत अळ्या आढळल्याचा संतजनक प्रकार धाराशिव मध्ये उघडकीस आलाय.. एक-दोन नव्हेतर तब्बल पाच शाळांमधील शालेय पोषण आहारामध्ये आळ्या आढळून आल्यात.. उमरगा तालुक्यातील चार तर धाराशिव तालुक्यातील एका शाळेमध्ये मुलांना बिस्किटं आणि चॉकलेट देण्यात आले होते.. त्यात मुलांना अळ्या आढळून आल्या.. या प्रकरणानंतर संतप्त पालकांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार केली.. त्याची दखल घेत जिल्हा परिषदेने संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावलीये.. तसंच जिल्ह्यातील सर्व शाळातील मुख्याध्यापकांना चॉकलेट आणि बिस्किट तपासून घेण्याच्या सूचना दिल्यात..या घटनेमुळे शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार पुन्हा समोर आलाय..

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11 July 2025 11:21 AM
11 July 2025 10:44 AM

अमरावती जिल्ह्याला मुसळधार पावसाचा मोठा फटका 

Amravati Heavy Rain :गेल्या 3 दिवसांत अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसाचा जिल्ह्याला मोठा फटका बसला आहे.... 24 तासात झालेल्या अतिवृष्टी व मुसळधार पावसाने जिल्ह्यातील 550 हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले आहे... तर 441 हेक्टर शेती पूर्णपणे खरडून निघाली आहे... त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून पेरणी करताच संकटात सापडला आहे.... मोर्शी तालुक्यातील हिवरखेड येथे घराची भिंत अंगावर पडल्याने ३ वर्षीय बालक स्वरुप गांजरे याचा मृत्यू तर त्याच कुटुंबातील ३९ वर्षीय महिला रेखा गांजरे या गंभीर जखमी झाल्या आहे.... दरम्यान जिल्ह्यात 55 घरांची पडझड झाली असून गेल्या तीन दिवसापासून अमरावती जिल्ह्यात पावसाची रिपरीप सुरूच आहे

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11 July 2025 09:47 AM

उत्तराखंडमधील पावसाचा चारधाम यात्रेला फटका 

Uttarakhand Heavy Rain : उत्तराखंडमध्ये पाऊस जास्त झाल्याने चारधाम यात्रा संथ गतीने सुरू आहे. पाऊस आणि भूस्खलनाने महामार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे यात्रा मार्गावरील 5 हजारांहून अधिक हॉटेल्स आणि होमस्टे 90 टक्क्यांपर्यंत रिकामेच आहेत.... 10 हजारांहून अधिक टॅक्सींच्या प्रवासाला ब्रेक लागलाय.... टॅक्सी भाडे कमी करूनही पर्यटक येत नाहीत.... उत्तराखंडच्या पर्यटन विभागाच्या मते, गेल्या 68 दिवसांत 38 लाख भाविक चारधाममध्ये पोहोचले.... गेल्या वर्षी हा आकडा 45 लाख होता.... या वेळी मुसळधार पावसामुळे हानी झाली आहे... 21 जणांना जीव गमवावा लागला, 9 जण बेपत्ता आहेत. 80 टक्के रस्ते बंद आहेत... केदार घाटी हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष प्रेम गोस्वामी म्हणाले की, पूर्वी दररोज 20 ते 30 हजार पर्यटक येत होते.... मात्र या आठवड्यात फक्त 9 हजार पर्यटक आले. तीन हजारांहून अधिक हॉटेल्स, रिसॉर्टस, होमस्टे रिकामे पडले आहेत... 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11 July 2025 09:44 AM

नवरा आणि बायकोच्या भांडणात चिमुकल्याचा मृत्यू

Daund Child Death : नवरा बायकोच्या भांडणामध्ये 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील केडगावमध्ये घडलीये... अवधूत मेंगवडे असं मृत चिमुकल्याचं नाव आहे. नवरा बायकोच्या भांडणात निष्पाप मुलाचा जीव गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बायकोने नवऱ्याला मारताना हातातील त्रिशूल हा तिथे असलेल्या चिमुकल्याला लागला आणि त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यामध्ये पती-पत्नीच्या विरोधात सदोष मनुष्यबदाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पती-पत्नीला अटक केलीये.  सचिन मेंगवडे हे केडगावमध्ये राहतात. किरकोळ गोष्टीवरून त्यांचे त्यांची बायको पल्लवी सोबत भांडण सुरू झालं. त्यावेळी पल्लवीने नवरा सचिन याला मारण्यासाठी त्रिशूल उगारला. पण तो त्रिशूल बाजूला उभ्या असलेल्या भाऊजयीच्या कडेवर असणाऱ्या 11 महिन्याच्या बाळाच्या डोक्यात घुसला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. जखमी झालेल्या अवधूत ला उपचाराकरिता रुग्णालयात नेण्यात आले. पण तोपर्यंत अवधूतचा मृत्यू झाला होता.  

बातमी पाहा - नवरा-बायकोच्या भांडणात लेकाचा बळी, दौंड तालुक्यातील धक्कादायक घटना

11 July 2025 09:11 AM

नवी मुंबईत पंजाबमधील ड्रग्ज माफियांना अटक

Navi Mumbai : नवी मुंबईतील ड्रग्ज तस्करी प्रकरणात पंजाबचं कनेक्शन उघडकीस आलंय.. नवी मुंबई पोलिसांनी बेलापूर, आग्रोळी, दिवाळे भागात छापे मारू 7 ड्रग्ज तस्करांना अटक केलीये. त्यांच्याकडून 47 लाखांचं हेरॉईन जप्त करण्यात आलंय.. नवी मुंबईला 'उडता पंजाब' करू पाहणारी ही टोळी शहरात ड्रग्ज वितरण करण्याचे काम करत होती... सीबीडी येथील सी शोअर लॉजमध्ये 4 जुलै रोजी परमजीत सिंग आणि सुखविंदर सिंग यांना अटक केली होती. त्यांच्याकडून 15 लाखांचे हेरॉईन जप्त केलं होतं. त्यांनी सुमारे 30 लाखांचे हेरॉईन विकल्याची माहिती उघड झाली. त्यांची चौकशी केली असता इतर साथिदारांची नवे समोर आली.. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बेलापूर, आग्रोळी, दिवाळे भागात छापे मारुन 7 जणांना अटक केली.. त्यांच्याकडून 47 लाखांचं हेरॉईन जप्त करण्यात आलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा - 

11 July 2025 08:59 AM

जायकवाडी धरण 70 टक्के भरलं

Jaikwadi Dam Water Level : मराठवाड्यासाठी महत्त्वाचं असणारं जायकवाडी धरण तब्बल 70 टक्के भरलं आहे... त्यामुळे पिण्याचा पाण्यासह सिंचनाचा प्रश्न मिटला आहे... जुलैच्या दुस-या आठवड्यातच जायकवाडी 70 टक्के भरल्याने मराठवाड्यातील नागरिक सुखावले आहेत... नाशिकमधून गेल्या महिनाभरात सोडलेल्या पाण्यामुळे जायकवाडीच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे... 

11 July 2025 08:54 AM

धारावीकरांचं पुनर्वसन मिठागरांच्या जागेत

Dharavi Redevelopment : धारावी प्रकल्पातील अपात्र रहिवाशांचे मिठागरांच्या जागेवर पुनर्वसन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाने गुरुवारी योग्य ठरवला.... प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनासाठी मिठागरांची जागा वापरता येणार नाही, असे दर्शविणारी कागदपत्रे सादर केली नसल्याचे अधोरेखित करत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. धारावीतील अपात्र रहिवाशांचे मुलुंड, भांडुप आणि विक्रोळीमधील मिठागरांच्या जागेवर पुनर्वसन करण्याच्या निर्णयाला वकील सागर देवरे यांनी जनहित याचिकेद्वारे आव्हान दिले होते.... मात्र मिठागरांची जमीन केंद्र सरकारच्या मालकीची असून तिचा काही भाग कल्याणकारी प्रकल्पांसाठी राज्य सरकारला हस्तांतरित करण्यात आल्याची केंद्राची भूमिका मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने मान्य केली...

11 July 2025 06:39 AM

चित्रपटाचे ऑनलाइन तिकीट महागणार?

चित्रपटांच्या ऑनलाइन बुकिंगसाठी प्रेक्षकांकडून सेवा कर किंवा सुविधा शुल्क आकारण्यास प्रतिबंध करणारे राज्य सरकारचे 2013 व 2014 मधील दोन निर्णय उच्च न्यायालयाने रद्द केले. त्यामुळे चित्रपटांचे ऑनलाइन तिकीट महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राज्य सरकारचे 4 एप्रिल 2013 व 18 मार्च 2014 मधील निर्णय व्यवसाय करण्याच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारे आहेत, असे निरीक्षण न्या. महेश
सोनक व न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने म्हटले.

TAGS

Latest Marathi BatmyaLatest News In marathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking NewsToday's Breaking Newslatest newsCurrent Breaking Newslatest news todaylive newscurrent newstoday newsbreaking news todayLive News MarathiMumbai Pune Latest NewsNational International Latest NewsEntertainment Latest Newsmaharashtra latest news todayलेटेस्ट मराठी न्यूजमहाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडेमराठी ताज्या बातम्यामराठी ब्रेकिंग न्यूज अपडेटमुंबई पुणे ताज्या बातम्याराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्यामनोरंजन ताज्या बातम्यामहाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूजमराठी न्यूज लाइव्हलाइव्ह न्यूजआजच्या ठळक घडामोडीमराठी बातम्याझी 24 तासमराठी ब्रेकिंग न्यूजताज्या मराठी बातम्यामहाराष्ट्रातील आजच्या बातम्याराजकीयसामाजिकक्रीडाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराज ठाकरेउद्धव ठाकरेशरद पवारमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील लाईव्ह बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्या
Read More