सांगली शहरातल्या जुना बुधगाव रोडवरील वाल्मिकी आवास मध्ये गुन्हेगाराचा निर्घृण खून करण्यात आला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी थरारक पाठलाग करत धारदार हत्याराने डोक्यावर,गळयावर आणि हातावर वार करून निर्घृण खून केला.सौरभ बापू कांबळे,वय 24 रा. वाल्मिकी आवास, असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सौरभ याचा भाऊ देखील पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून सध्या तो कळंबा कारागृहात आहे. हत्येचा घटनेची माहिती मिळताच, सांगली शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून सौरभ याचा काही दिवसांपूर्वी वाल्मिकी आवास मधल्या तरुणांसोबत घोडागाडी पळवण्याच्या कारणातून वाद झाला होता,या वादातूनच त्याची हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज शहर पोलिसांनी व्यक्त केला आहे.दरम्यान, शहरासह जिल्ह्यात दिवसाआड होणाऱ्या खुनाच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावरुन जयंत पाटील पायउतार झाले आहेत. जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आता शशिकांत शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. 15 जुलै रोजी शशिकांत शिंदे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. मला प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त करा अशी मागणी जयंत पाटील यांनी 10 जून रोजी झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिनीच केली होती.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Kolhapur Satej Patil : शक्तिपीठ महामार्गामुळे कोल्हापूर, सांगलीला पुराचा धोका होऊ शकतो... कोल्हापूर शहरातील 25 वॉर्डमध्ये 5 ते 10 फूट पाणी वाढेल अशी भीती काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केलीय...तसेच सरकारने शक्तिपीठ महामार्गाचा फेरविचार करावा अशी मागणीही त्यांनी केलाय... सोबतच शक्तिपीठविरोधात आपलं आंदोलन सुरूच राहणार असल्याचंही सतेज पाटलांनी स्पष्ट केलंय...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Hotel And Restaurant Close : येत्या सोमवारी राज्यातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट बंद राहणार आहेत.. महाराष्ट्रातील परवानाधारक हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगावर राज्य सरकारने अन्यायकारक करवाढ लादल्याचा आरोप करत हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे राज्यातील 20 हजाराहून अधिक हॉटेल आणि रेस्टॉरंट बंद राहतील. या अन्यायकारक कारवाढीमुळे सुमारे दीड लाख कोटींची उलाढाल असलेला हा उद्योग संकटात सापडण्याची शक्यता असल्याचं स्पष्ट मत आहार संघटनेकडून व्यक्त करण्यात आलं.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Raj Thacekray Tweet : युनेस्कोनं दर्जा दिला म्हणून गृहित धरु नका,... निकष नीट न पाळल्यास किल्ल्यांना दिलेला दर्जा जाऊ शकतो अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सरकारचे कान टोचलेत.. तसंच धर्म, जात न पाहता अनधिकृत बांधकामं पाडा असा सल्लाही राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमधून दिलाय...
Pune : मित्राच्या वाढदिवसाला वाजवायला फटाके नसल्याने बंदुकीतून दोन राउंड फायर करत वाढदिवस साजरा केलाय... पुण्याच्या बावधन परिसरातील वृंदावन फार्म हाऊस सुसगाव येथे ही घटना घडली आहे.... दोन राउंड फायर करत मित्रांचा वाढदिवस साजरा केला आहे...बावधनमध्ये कुमार खळदकर याचा वाढदिवस साजरा होत होता, त्यावेळी त्याचा मित्र दिनेश सिंग ज्या ठिकाणी वाढदिवस सुरू होता त्या ठिकाणी आला. त्यानंतर दिनेश सिंग याला या वाढदिवसाला फटाके नसल्याचे समजले, आरोपी दिनेश सिंगने तत्काळ आपली बंदुक काढली आणि त्यातून दोन राउंड फायर करत वाढदिवस साजरा केला.... या प्रकरणी दिनेश सिंग याला बावधन पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Nalasopara Boy Death : मित्रांसोबत बॅडमिंटन खेळताना शॉक लागून एका 15 वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झालाय. मुंबईतील नालासोपा-यात ही घटना घडलीये. सीसीटीव्ही कॅमे-यात ही घटना चित्रित झालीये.. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Prada : इटलीतील 'प्राडा' या कंपनीचे शिष्टमंडळ येत्या आठवड्यात राज्यात चर्चेसाठी येणार आहे... तशी माहिती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी शुक्रवारी दिली.... या भेटीदरम्यान विविध संघटनांसह कोल्हापुरातील कारागिरांचीही भेट घेतली जाणार आहे.... 'प्राडा'ची चप्पल राज्यातील प्रेरित असल्याचे मान्य करत मेक इन इंडिया-कोल्हापूर मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील हस्तकला क्षेत्राशी भागीदारी करण्याबाबत इटलीतील या फॅशन नाममुद्रेने उत्सुकता दर्शवली आहे... 'प्राडा' आणि भारतीय शिष्टमंडळ PRADA प्रतिष्ठित हस्तनिर्मित कोल्हापुरी चपलेपासून यांच्यात शुक्रवारी पार पडलेल्या ऑनलाईन बैठकीत महाराष्ट्र चेंबरने सांस्कृतिक आदान-प्रदान, नाममुद्रा विकास, न्याय व्यापार यावर आधारित मुद्द्यांवर चर्चा केली.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Marathwada Rain : राज्यातील बहुतांश भागात समाधानकारक पाऊस पडला असला तरी मराठवाड्याला मात्र अजूनही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे... नाशिक जिल्ह्याच्या कृपेने जायकवाडी प्रकल्पात 72 टक्के जलसाठा आहे....मात्र मराठवाड्यातील निम्म्यांवर लघु आणि मध्यम प्रकल्पात 25 टक्क्यांपेक्षा कमी पाणी आहे... मराठवाड्यात 11 मोठ्या प्रकल्पांपैकी तीन प्रकल्पात 25 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे... तर तीन प्रकल्पात 50% पेक्षा कमी पाणीसाठा आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Modak Sagar : मुंबईला पाणीपुरवठा करणा-या धरणांपैकी मोडकसागर धरण 100 टक्के भरून वाहू लागले आहे. या धरणाचा एक दरवाजा एक फूट उघडण्यात आलाय. त्यामुळे या धरणातून 1 हजार 22 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय... गेल्या वर्षी हे धरण 25 जुलै रोजी भरले होते. तब्बल 15 दिवस आधी भरलेल्या या धरणापाठोपाठ आता मध्य वैतरणा धरणही भरण्याच्या बेतात आहे. या धरणात 93 टक्के पाणीसाठा आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Yashashri Munde In Politics : भाजपचे दिवगंत नेते गोपीनाथ मुंडे यांची तिसरी कन्याही राजकारणाच्या मैदानात उतरली आहे...यशश्री मुंडे यांनी वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीसाठी उमदेवारी अर्ज भरला आहे... शुक्रवारी उमेदवारी अर्जाच्या शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे...यशश्री मुंडें यांच्यासोबत माजी खासदार प्रीतम मुंडेही बँक निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत... पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्यानंतर मुंडे घराण्यातली तिसरी कन्या यशश्री मुंडे देखील आता निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे... बँकेच्या निवडणुकीनिमित्त पहिल्यांदाच यशश्री मुंडे निवडणुकीच्या रिंगणात पहायला मिळतील....
AHMEDABAD PLANE CRASH UPDATE : अहमदाबाद विमान दुर्घटनेचा 15 पानी अहवाल समोर आलाय.. टेकऑफनंतर दोन्ही इंजिन फेल झाल्यानं ही दुर्घटना घडल्याचं समोर येतंय. उड्डाणावेळी इंधन इंजिनापर्यंत पोहोचलंच नसल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय. दोन्ही इंजिनाचे स्वीच एका सेकंदात बंद झाल्याची माहिती समोर येतेय... फ्यूल स्वीच सुरु झाल्यानं विमान 32 सेकंद हवेत राहिलं आणि त्यानंतर ही दुर्घटना घडल्याचं अहवालातून समोर येतंय.. इंधनपुरवठा ठप्प झाल्यानंतर पायलट आणि सह पायलटचा ऑडिओ संवादही समोर आला आहे. इंधन पुरवठा का बंद केला? असा पायलटनं सह पायलटला प्रश्न विचारला. यावर मी काहीच केलं नाही असं सह पायलटनं प्रत्युत्तर दिले. AAIB अर्थात विमान अपघात अन्वेषण ब्युरोनं हा 15 पानी अहवाल एअऱ इंडियाला सादर केलाय.. त्यामुळे ही दुर्घटना मानवी चूक की तांत्रिक बिघाड? असा सवाल उपस्थित होतोय... फ्यूएल स्वीचेस आपोआप कटऑफ स्थितीत गेले की ती मानवी चूक होती याचा तपासयंत्रणा शोध घेतायत... ब्लॅक बॉक्स डेटा आणि ढिगा-याचा सखोल अभ्यास सुरू आहे. दरम्यान AAIBच्या प्राथमिक अहवालाची दखल घेतो असं ट्विट एअर इंडियानं केलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Bhandara Crime : भंडारा जिल्ह्यातील साकोलीत डॉक्टरनेच अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याची धक्कादायक घटना घडलीय... शहरातील प्रसिद्ध श्याम हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी अल्पवयीन मुलीसोबत डॉक्टरनेच सोनोग्राफीच्या बहाण्याने अश्लील चाळे केल्याचं समोर आलंय... देवेश अग्रवाल असे डॉक्टरचे नाव असून,सदर मुलगी आपल्या आईसोबत उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये आली होती.... डॉक्टर देवेश अग्रवालने आईसह नर्सला बाहेर बसवून रुग्ण मुलीसोबत सोनोग्राफी रूममध्ये तब्बल अर्धा तास अश्लील चाळे केल्याचा असा गंभीर आरोप आहे.... घडलेली घटना पीडितेने आई-वडिलांना सांगितल्यानंतर साकोली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.... आरोपी डॉक्टर फरार असून पोलिस डॉक्टरचा शोध घेत आहेत.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Action Taken If Drinking Alcohol In Public Places : उद्यानं, मैदानं सार्वजनिक ठिकाणी मद्यपान केल्यास कारवाई केली जाणार आहे.. सार्वजनिक ठिकाणी होणारे मद्यपानाचे प्रकार रोखण्यासाठी आमदारांची समिती नेमली जाणार आहे.. या समितीची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात येईल. त्यानंतर सहा महिन्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपानाला मनाई करणारा कायदा केला जाईल.. मंत्रि आशिष शेलारांनी याबाबत माहिती दिलीये.. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी विधानसभेत महाराष्ट्र दारूबंदी सुधारणा अशासकीय विधेयक सादर केले. त्यामधून मुनगंटीवार यांनी सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन होणारे गैरवर्तन टाळण्यासाठी अशा जागी दारू पिण्यास प्रतिबंध करणारा कडक कायदा करावा, अशी मागणी केली होती.. यावेळी मुनगंटीवारांनी सरकारच्या चालढकलपणावर टीकाही केली.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.