London Plane Crashes : लंडनमध्ये विमान दुर्घटना घडली आहे...सुपर किंग कंपनीचं विमान कोसळलं आहे..लंडन विमानतळावर ही दुर्घटना घडली आहे... उड्डाण करताच विमान कोसळलं आहे
Amruta Fadnavis On Ladki Bahin Yojana : अमृता फडणवीस यांचा लाडके बहिण योजनेवरती मोठे विधान राज्याच्या तिजोरी वरती आर्थिक भार आहेच. मात्र लाडकी बहीण योजना बंद होणार नाही लाडक्या बहिणीसाठी राज्य सरकार आर्थिक भार सहन करायला तयार आहे मध्यंतरी काही फिल्टरेशन करावे लागेल
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Uddhav Thackeray on Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. एक देवाभाऊ आहेत त्यांच्याकडे सर्वकाही आहे तरीही ते फोडाफोडी करतात असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. नाशिकमधील पदाधिकारी देवाभाऊ वाघमारे यांनी मातोश्रीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यावेळी बोलताना उद्धव यांनी हा टोला लगावला.
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Manoj Jarange : राज्य सरकारने 29 ऑगस्टच्या आत आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा मुंबईत मराठे मुंग्यांसारखे दिसतील असा ईशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे.मला भेटायला येणारे प्रत्येक नेते हे आमच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करत आहे.मात्र तरीही मागण्या पूर्ण न झाल्यास यावेळी मुंबईत मराठे हे मुंग्यांसारखे दिसतील असा ईशारा जरांगे यांनी दिला.यावेळी मुंबईत गेल्यानंतर मि तिथे मरेन किंवा आरक्षण घेऊनच परत येईल असा ईशाराही द्यायला जरांगे विसरले नाहीत
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Pravin Gaikwad : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळं फासण्यात आलं...प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असता काळं फासलं...शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांनी काळं फसलं...प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक होते...त्याचबरोबर स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचा देखील राग पदाधिकाऱ्यांच्या मनात होता...यापूर्वी शिवधर्म फाउंडेशन ने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषण देखील केले होते...दरम्यान आज अक्कलकोट मध्ये प्रवीण गायकवाड यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता त्यावेळी त्यांना काळं फासण्यात आलं
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : जनसुरक्षा विधेयकावर विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलंय.. ज्यांनी जनसुरक्षा विधेयकाचं एक अक्षरही वाचला नाही ते लोकं विरोध करत असल्याचा अप्रत्यक्ष निशाणा देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय.. विधेयक वाचलं तर ते कधीच त्याविरोधात बोलणार नसल्याचंही फडणवीस म्हणालेत..
बातमीचा व्हिडीओ पाहा-
Thane : ठाण्यात रिक्षाचालकाची मुजोरी, महिलेसोबत वाद...महिला प्रवासी आणि रिक्षाचालकाची बाचाबाची...वादानंतर रिक्षाचालकानं महिलेवर उगारला हात...वाहतूक विभागाकडून रिक्षाचालकावर कारवाई...मारहाणीची घटना कॅमे-यात कैद
Delhi Accident : दिल्लीच्या वसंत विहार परिसरात ऑडी कारने फुटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडलीये......जखमींवर रुग्णालयात उपचार सुरूये...अपघातास कारणीभूत ठरलेल्या ऑडी कारचा चालक उत्सव शेखर याला पोलिसांनी अटक केलीये...प्राथमिक तपासात चालक नशेच्या अवस्थेत असल्याचे समोर आलं आहे...या घटनेने परिसरात खळबळ उडालीये...पोलिसांकडून अधिक तपास सुरुये...
Manikrao Kokate : राज्यातील अनेक भागात शेतक-यांवर दुबार पेरणीचं संकट आहे... याच पार्श्वभूमीवर पावसाची उघडीप होईपर्यंत पेरण्या थांबवा असं आवाहन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतक-यांना केलंय.. तसंच दुबार पेरणीसाठी बियाणे आणि औषधं उपलब्ध असल्याचंही कोकाटेंनी सांगितलंय..
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Datta Bharne : लाडकी बहीण योजनेमुळे विकास निधी येण्यास विलंब झाल्याची कबुली कॅबिनेट मंत्री दत्ता भरणेंनी दिलीये..लाडक्या बहिणींमुळे विकास निधी येण्यास विलंब होतोय असं विधान दत्ता भरणेंनी इंदापुरातील एका कार्यक्रमात केलंय. तर मंत्री छगन भुजबळांनीही त्यांच्या या वक्तव्याचं समर्थन केलंय.. त्यामुळे लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर भार पडलाय का.. ही योजना सत्ताधा-यांनाच नकोशी झालीये का असा सवाल उपस्थित होतोय.
Chhagan Bhujbal : लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर भार पडत असल्याची कबुली मंत्री छगन भुजबळांनीही दिलीये..लाडकी बहीण योजनेमुळे राज्यावर 45 हजार कोटींचा बोजा पडतोय.. त्याचा फटका हा इतर योजनांना बसत असल्याचं भूजबळ म्हणालेत... सरकारच्या तिजोरीतील ही तूट भरुन काढण्यासाठी सरकार वाईनशॉप लायसन्स सारखे उपाय करत असल्याचा दावा भुजबळांनी केलाय.. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी सरकार लाडक्या भावंना दारुडे बनवण्याचा तर विचार करत नाही ना अशी चर्चा रंगलीये..
Beed Crime : बीडच्या माजलगाव तालुक्यातील लवूळ गावात सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. किरकोळ बाराशे रुपयांच्या वादातून ऊसतोड मुकादम आणि त्याच्या साथीदारांनी एका शेतमजुराचे अपहरण केलं... आणि त्याची सोडवणूक करण्यासाठी गेलेल्या राजाराम सिरसट या सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला लाठ्या-काठ्या, धारदार शस्त्रं, आणि रिव्हॉल्वरचा धाक दाखवत जंगलात नेऊन बेदम मारहाण करण्यात आली. इतकंच नव्हे तर दीड लाख रुपये लुटून त्यांच्या तोंडावर लघुशंका करून अमानुष वर्तनही करण्यात आलंय... मुलगा पोहोचताच आरोपी पळाले, मात्र एक आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आलंय. गंभीर जखमी अवस्थेत राजाराम सिरसट यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. किरकोळ पैशासाठी झालेली ही क्रूर घटना संपूर्ण जिल्ह्याला हादरवून टाकणारी आहे...
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Amravati Murder : अमरावतीच्या रहाटगावात एकाची चाकून भोसकून हत्या करण्यात आलीये...राजकुमार सुंदरराणी असं मृत व्यक्तीचं नाव आहे...ओळखीच्या काही व्यक्तींनी राजकुमारचा खून केल्याची प्राथमिक माहिती असून हत्येचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित झालीये...मृत भावाच्या तक्रारीवरुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलं असून फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरुये...
100 Rs Coin : लवकरच तुमच्या खिशात 100रुपयाचं नाणं येणार आहे.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 सप्टेंबर 2014 रोजी 'मेक इन इंडिया' या उपक्रमाची सुरुवात केली होती. त्याला यंदा 10 वर्षे पूर्ण होत असल्याने त्यानिमित्त 100 रुपयांचे एक विशेष नाणे केंद्र सरकार जारी करणार आहे. हे 100 रुपयांचे विशेष नाणे कोलकाताच्या टाकसाळीमध्ये तयार करण्यात येईल. या नाण्याचे वजन 35 ग्रॅम असून त्यामध्ये 50% चांदी, 40% तांबे, 5% जस्त आणि 5% निकेल यांचे मिश्रण असेल. या नाण्याच्या एका बाजूस मध्यभागी मेक इन इंडियाचे बोधचिन्ह असलेल्या सिंहाची उठावदार प्रतिमा असेल. त्याच्या वरच्या कडेला हिंदीत आणि खालच्या कडेला इंग्रजीत 'मेक इन इंडिया 10वा वर्धापनदिन' असा मजकूर असणार आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Satara : साताऱ्यातील कराड उत्तरचे विद्यमान आमदार मनोज घोरपडे यांनी यावेळीच्या पावसाळी अधिवेशनात बोगस तणनाशकाच्या साठ्या विषयी लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला होता. यानंतर सातारा पोलिसांनी सातारा शहरासह रेवडी वडूज फलटण या ठिकाणी छापे टाकून शेतीसाठी वापरले जाणाऱ्या तणनाशकाचा एकूण साडेबारा लाखांचा मुद्देमाल जप्त केला असून सहा जणांवर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आमदार मनोज घोरपडे यांनी कृषी सेवकांवर कारवाई करण्याऐवजी बनावट औषधे तयार करणाऱ्या कंपनीवर या कारवाई कराव्यात अशी मागणी केली आहे. या बनावट औषधांविषयी आपण शेवटपर्यंत आवाज उठवणार असल्याचे ते म्हणाले
Tamilnadu Train Fire : तमिळनाडूतील वलयापट्टी रेल्वे स्थानकाजवळ डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग लागली. आगीमुळे आकाशात धुराचे लोट दिसत होते... स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.. आणि याबाबत तपास सुरू आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र, रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला असून, काही गाड्या वळवण्यात आल्या आहेत.
ST Mahamandal : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणा-या वारक-यांसाठी एसटी महामंडळाने विशेष बससेवा उपलब्ध करून दिली होती... या माध्यमातून 9 लाख 71 हजार 683 भाविकांनी विठ्ठल दर्शन घेतले, तर या सेवेतून महामंडळाला 35 कोटी 87 लाखांची कमाई झाली आहे....आषाढी यात्रेनिमित्त महामंडळाच्या राज्यातील सर्व 31 विभागांतून 5 हजार 200 पेक्षा अधिक बस सोडण्यात आल्या होत्या.... 3 ते 10 जुलै या कालावधीत बसने एकूण 21 हजार 499 फे-या केल्या... यावर्षीचे उत्पन्न मागील वर्षीच्या उत्पन्नापेक्षा 6 कोटी 96 लाख रुपयांनी अधिक आहे....
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Garlic Price : भाजीपाल्यापाठोपाठ आता लसणाचेही भाव वाढू लागले आहेत...किरकोळ बाजारात आतापर्यंत 150 ते 200 रुपयांना मिळणारा लसूण आता 300 रुपयांवर पोहोचला आहे... आगामी काळात हा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.... तर, सोललेला लसूण ४०० रुपये किलोने मिळत आहे.
बातमीचा व्हिडीओ पाहा -
Wine Shop License : लोकक्षोभामुळे गेली 50 वर्षे मद्यविक्री दुकानांच्या परवान्यांना राज्यात असलेली स्थगिती महसुलात वाढ करण्याच्या उद्देशाने उठविली जाणार असून, नव्याने ३२८ मद्यविक्री दुकानांना परवाने दिले जाणार आहेत.... या धोरणामुळे किरकोळ मद्यविक्री दुकानांमध्ये 19 टक्क्यांनी वाढ होईल.... त्यातच महसूल वाढविण्याच्याच धोरणाचा भाग म्हणून उत्पादन शुल्क विभागाच्या प्रत्येक प्रशासकीय विभागांमध्ये विदेशी मद्यनिर्मितीचा परवाना देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा उत्पादन शुल्कमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे....
बातमीचा व्हिडीओ पाहा -
विकेंड म्हटलं की लोणावळ्याकडे आपोआप पावलं वळतात... सध्या भुशी धरण ओव्हर फ्लो झालं असून टायगर आणि लायन्स पॉईंट येथे देखील पर्यटकांची मोठी गर्दी झालीय, टायगर पॉईंटवर निसर्गाचं अनोखं रूप पहायला पर्यटकांना मिळत आहे, थंडगार हवा, अचानक कोसळणारा पाऊस यामुळे पर्यटकांना काश्मीर ला गेल्याची प्रचीती होतेय, पुणे, मुंबईसह राज्यभरातून हजारो पर्यटक टायगर पॉइंटवर गर्दी करत आहेत आणि या निसर्गाचा सुंदर क्षण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपत आहे,
कोकणात एक आगळीवेगळी स्पर्धा पहायला मिळत आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरु आहे कोकणात भात लावणी केली जात आहे या भात लावणीसाठी नांगरणी ही महत्वाची असते मात्र या नांगणी स्पर्धेचा थरारच कोकणात रंगला आहे. संगमेश्वर तालुक्यातील वाडावेसराड गावातील पावस्करवाडीत ही अनोखी स्पर्धा रंगली आहे. बळीराजा शेतकरी मंडळाच्या वतीनं ही स्पर्धा घेतली गेली आहे. या स्पर्धेत 103 बैलजोड्या सहभागी झाल्या होता.घाटी आणि गावठी अशा दोन गटात ही स्पर्धा घेण्यात आली. ही अनोखी स्पर्धा , बैलांचा थरार पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं लोकांनी इथं गर्दी केली होती..
वीररत्न बाजीप्रभु देशपांडे यांच्या ३६५ व्या पुण्यतिथी निमित्त, त्यांच्या पुण्याच्या भोर तालुक्यातील शिंद या त्यांच्या मुळं गावातील तरुणांकडून अनोख्या पद्धतीने अभिवादन केलं आहे. पुण्यतिथीनिमित्त पावनखिंड कोल्हापूर ते भोर तालुक्यातील शिंद गाव असे 250 किलोमीटर वरून प्राणज्योत आणून केले अभिवादन..
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.