Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Breaking News LIVE Updates: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी दीर सुशील हगवणेला जामीन मंजूर

Maharashtra Breaking News LIVE Updates: देशभरासह राज्यभरातील ताज्या घडामोडी जाणून घ्या या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून    

Maharashtra Breaking News LIVE Updates: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी दीर सुशील हगवणेला जामीन मंजूर
LIVE Blog

Maharashtra Breaking News LIVE Updates: मुंब्रा-दिवा रेल्वे स्थानकादरम्यान झालेल्या दुर्घटनेमुळे मुंबईतील प्रवाशांच्या जीवघेण्या प्रवासाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. रेल्वे प्रशासन खडबडून जागं झालं असून, आता नव्या लोकल सेवेत आणल्या जाणार आहे. दुसरीकडे ठाकरे बंधूंमध्ये युती होणार की नाही? याबाबत उत्सुकता शिगेला आहे. दरम्यान राज्यात पावसाने दडी मारली असून, उकाडा प्रचंड वाढला आहे. यामुळे राज्यात नागरिकांना पावसाची प्रतिक्षा लागली आहे. यासह राज्य आणि देशातील सर्व ताज्या घडामोडी जाणून घेऊयात एका क्लिकवर 

 

10 June 2025
10 June 2025 21:06 PM

उल्हासनगरात गाव गुंडांचा हैदोस, तीन जणांवर हल्ला करत 15 गाड्यांची तोडफोड 

उल्हासनगरमध्ये दिवसाढवळ्या गाव गुंडांचा हैदोस पाहायला मिळाला , आशेळे पाडा गणपती मंदिर परिसरात चार ते पाच तरुणांच्या टोळक्यांनी तीन जणांवर हल्ला करत रस्त्यावर उभ्या असलेल्या 15 गाड्यांची तोडफोड करत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला , हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे , या घटने परिसरात भीतीचे वातावरण असून स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर उतरत तीव्र संताप व्यक्त केला , या घटने नंतर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून या पोलीस या तरुणांचा शोध घेत आहेत या घटनेनंतर गुंडांना कायद्याचा धाक राहिला नसल्याचा दिसून येते

10 June 2025 18:52 PM

ॲक्वालाईन (मेट्रो मार्ग 3) च्या  'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' चे मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) ने नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) आणि स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) यांच्या सहकार्याने आज मुंबई मेट्रो मार्ग 3 वर रुपे NCMC कार्ड तयार केले असून या कार्डचे अनावरण आज मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, यांच्या हस्ते पार पडले. या नवीन सुविधेमुळे आता प्रवासी आरे जे.व्ही.एल.आर. ते आचार्य अत्रे चौक दरम्यान NCMC कार्ड वापरून सहज व संपर्करहित प्रवास करू शकतील. यामुळे तिकीट खिडकीवर रांगा टाळता येतील आणि प्रवास अधिक जलद व सुरक्षित होईल.

हे NCMC कार्ड मेट्रो मार्ग 3 सोबतच मार्ग 2अ , 7 आणि मार्ग 1 वर देखील वापरता येईल, त्यामुळे एकसंध व सोयीस्कर प्रवासाचा अनुभव मिळेल. इतर मेट्रो मार्ग व 'चलो बस' सारख्या ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्सने उपलब्ध करून दिलेले NCMC कार्ड्स देखील मेट्रो मार्ग 3 वर वापरता येतील. प्रवाशांना 11 जून 2025 पासून सकाळी 11 वाजल्यापासून ही सेवा उपलब्ध होईल. 

नवीन NCMC कार्ड आरे जे व्ही एल आर ते आचार्य अत्रे चौक दरम्यान कोणत्याही स्थानकावर उपलब्ध आहे व SBI च्या सहभागी शाखांमधुन कार्ड मिळेल. हे कार्ड मोफत दिले जात आहे, मात्र वापरासाठी 100 ते 2000 पर्यंत अनिवार्य टॉप-अप करणे आवश्यक आहे.

“NCMC कार्ड हे इतर वाहतूक सुविधा जसे की बेस्ट बसेस तसेच विविध मेट्रो मार्ग च्या एकत्रीकरण च्या  दृष्टीने व  सावर्जनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्याचा दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा आहे. NPCI व SBI यांच्या सहकार्याने आम्ही मुंबईकरांसाठी एक सुलभ आणि एकत्रित प्रवासाचा अनुभव देण्यासाठी कटिबद्ध आहोत,” असे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका श्रीमती अश्विनी भिडे यांनी सांगितले.

10 June 2025 18:35 PM

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी दीर सुशील हगवणेला जामीन मंजूर

कोथरूड पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात सुशील हगवणे याला पहिल्याच दिवशी जामीन मंजूर झाला आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी दीर सुशील हगवणेला अटक करण्यात आली होती.  वैष्णवीचा पती शशांक हगवणे आणि नणंदेचा मित्र निलेश चव्हाण यांचा ताबा आज वारजे पोलिसांनी घेतला, उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. 

10 June 2025 17:40 PM

राज्यातील धर्मादाय रुग्णालयांसाठी सरकारने नेमली एसआयटी

- सर्व धर्मदाय रुग्णालयात केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य विषयक योजनांची अंमलबजावणी करणार

- तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर मोठी अपडेट

- धर्मादाय रुग्णालयांच्या झाडाझडतीसाठी एक स्वतंत्र अधिकारी नेमण्याचा निर्णय

- धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून होणार अधिकाऱ्याची नेमणूक

- निर्धन रुग्ण निधी खात्याची तपासणीचेही दिले अधिकार

- धर्मदाय रुग्णालयात रुग्णांना उपचार मिळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय

- एसआयटीमध्ये तीन विभागाच्या सदस्यांचा समावेश

- धर्मादाय आयुक्त, वैद्यकीय शिक्षण आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातील सदस्यांचा समावेश

10 June 2025 16:51 PM

'भाजपाचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप,' नितेश राणेंच्या विधानावरुन बैठकीत नाराजी, शिवसेना मंत्री म्हणाले 'बाळासाहेब ठाकरे...'

10 June 2025 16:50 PM

'RCB चे फॅन्स खूप...' बंगळुरू चेंगराचेंगरीवर राहुल द्रविडचं मोठं वक्तव्य

10 June 2025 16:50 PM

Explainer : जूनमध्ये उन्हाचा पारा का वाढतो? वातावरणाने का घेतला यू-टर्न? कारण आत्मचिंतन करायला लावणार?

Temperature Rise: या वर्षी मे महिन्यात उन्हाळा आणि पावासाळा असे दोन्ही ऋतू अनुभवता आळा नाही. पण प्रश्न असा निर्माण होतो की, १० दिवसांत असे काय झाले की मे महिन्यात आल्हाददायक असलेले हवामान जूनमध्ये अचानक तापू लागले. जून महिन्यात उन्हाचा तडाखा जाणवत आहे.

10 June 2025 16:50 PM

'मला जबाबदारीतून मुक्त करा,' जयंत पाटलांनी भाषणातच व्यक्त केली इच्छा; शरद पवार म्हणाले 'तुमची मानसिकता...'

10 June 2025 16:48 PM

IPL पाठोपाठ टीम इंडियानेही हेटाळलं, आता मराठमोळा क्रिकेटर गाजवणार इंग्लंडचं मैदान

10 June 2025 16:48 PM

'राजा माझ्या जवळ येऊ लागलाय, मला आवडत नाहीये,'  सोनमने प्रियकरासह केलेल्या चॅटमधून धक्कादायक खुलासा

10 June 2025 16:33 PM

जुलैमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष 

जुलैमध्ये भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळेल अशी सूत्रांची माहिती आहे. 21 जुलै रोजी संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी भाजपच्या राष्ट्रीय परिषदेची बैठक दिल्लीत बोलावली जाऊ शकते. राष्ट्रीय परिषद भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावाला मान्यता देईल. 21 जून नंतर भाजपच्या 10 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची घोषणा केली जाईल. नवीन राष्ट्रीय अध्यक्षांच्या नावासाठी अनेक नावांचा पॅनल तयार आहे. लवकरच अंतिम निर्णय अपेक्षित आहे.

10 June 2025 16:10 PM

दक्षिण ऑस्ट्रियातील ग्राझ शहरातील गोळीबार, 9 जणांचा मृत्यू

दक्षिण ऑस्ट्रियातील ग्राझ शहरातील एका शाळेत झालेल्या गोळीबारात किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले, असे रॉयटर्सने ग्राझ शहराच्या महापौरांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.

10 June 2025 15:43 PM

महाराष्ट्रात दारू महागली, भारतीय बनावटीच्या विदेशी मद्यावर ( IMFL) दीड टक्याने वाढ

 

मद्यावरील शुल्क वाढीमुळे राज्याच्या तिजोरीत १४ हजार कोटींचा महसूल वाढणार

राज्याच्या महसुलात वाढ करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचा निर्णय

कोणतं मद्य कितीला मिळणार....

१८० मिली मद्य किरकोळ विक्रीची किंमत

देशी मद्य- 80 रुपये
महाराष्ट्र मेड लिकर - १४८ रुपये 
भारतीय बनावटीचे विदेशी मद्य - २०५ रुपये 
विदेशी मद्याचे प्रिमीयम ब्रॅण्ड- ३६० रुपये 

सोबतच सीलबंद विदेशी मध्य विक्री हॉटेल आणि रेस्टॉरंट कराराद्वारे भाडेतत्त्वावरती चालविण्यास मान्यता देण्यात आली आहे. यावर दहा ते पंधरा टक्के अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार

विभागाला बळकटी देण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क  विभागात १२२३ पदे नव्याने भरले जाणार

राज्य उत्पादन शुल्क विभाग अंतर्गत मुंबई शहर आणि उपनगर यासाठी नव्याने विभागीय कार्यालय सुरू करणार

तर मुंबई उपनगर, ठाणे ,पुणे ,नाशिक ,नागपूर आणि अहिल्यानगर या सहा जिल्ह्यांसाठी नव्याने अधीक्षक कार्यालय सुरू होणार

उत्पादन आणि विक्रीसाठी विभागाच्या माध्यमातून एआय आधारित कंट्रोल रूम तयारी केली जाणार

10 June 2025 13:28 PM

मंत्रिमंडळांच्या बैठकीत आज 3 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले

> महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगास वैधानिक दर्जा. आगामी विधिमंडळ अधिवेशनात विधेयक आणणार (सामाजिक न्याय विभाग)

> राज्यातील शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 6,250 रुपयांची वाढ, पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात 10,000 ची वाढ, तर  बी.एस्‍सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही मिळणार 8,000 विद्यावेतन (वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग)

> राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या दृष्टीने उपाय. विविध प्रकारच्या दरांमध्ये सुधारणा (राज्य उत्पादन शुल्क विभाग)

10 June 2025 12:37 PM

पुण्यातील शरद पवार पक्षाच्या वर्धापनदिनाला उपस्थित आमदार आणि खासदार

- आमदार

> रोहित पाटील
> जितेंद्र आव्हाड
> बजरंग सोनवणे
> रोहित पवार
> बापू पठारे
> धैर्यशील मोहिते पाटील 

- खासदार

> अमोल कोल्हे 
> बाळ्या मामा 
> सुप्रिया सुळे
> निलेश लंके

10 June 2025 12:27 PM
10 June 2025 11:28 AM

जयंत पाटील शरद पवारांना देणार मोठा धक्का? पवारांसमोरच म्हणाले, 'आता नव्या...'

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे प्रदेशध्यक्षपदापासून दूर जाण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. 'साहेबांनी आता नव्या चेहऱ्याला संधी द्यावी' असं जयंत पाटलांनी म्हटलं आहे.

 

10 June 2025 11:27 AM

मुंबईत बॉम्ब ब्लास्ट करण्याची धमकी

सुभाष सिंग नावाच्या व्यक्तीने धमकी दिल्याची माहिती.

मुंबईत बॉम्ब ब्लास्ट करण्याची तसेच संदीप गाडे नावाचे व्यक्तीला गोळ्या घालून ठार मारण्याची दिली धमकी

धमकी मिळताच संदीप गाडे यांनी दिली पुणे पोलिसांना माहिती

कोथरूड पोलिसांकडून तपासला सुरुवात

10 June 2025 11:13 AM
10 June 2025 10:42 AM
10 June 2025 10:22 AM
10 June 2025 10:11 AM

ठाणे रेल्वे स्थानकावर छावणीचे स्वरूप; रेल्वे पोलीस, महाराष्ट्र पोलीसच्या तुकड्या तैनात 

रेल्वे पोलीस 150 आणि महाराष्ट्र पोलीस 150 असे एकूण 300 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. रेल्वे प्रशासनाविरोधात आज मनसेचा ठाण्यामध्ये धडक मोर्चा नागरिकांसमवेत सुरु झाला आहे. हा मोर्चा ठाणे गावदेवी ते ठाणे रेल्वे स्थानकादरम्यान असणार आहे. याच पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वे स्थानकाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मोठ्या प्रमाणात सध्या पोलीस बंदोबस्त ठाणे रेल्वे स्थानकात पाहायला मिळतोय.

10 June 2025 09:35 AM

डोंबिवली: गर्दीमुळे दरवाजे लागत नसल्याने एसी लोकल रखडली

डोंबिवली स्थानकामध्ये एसी लोकलमध्ये गर्दी असल्याने ट्रेनचे दरवाजे बंद होत नव्हते. त्यामुळे डोंबिवली रेल्वे स्थानकामध्ये ही लोकल पाच मिनिट उभी होती. बरेच प्रवासी ट्रेन मधून बाहेर उतरल्यानंतर ही ट्रेन रवाना करण्यात आली.

fallbacks

10 June 2025 09:25 AM

मोदी सरकार त्या घरांना देणार 25 कोटी रुपये

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारने जम्मू-काश्मीरमधील सीमावर्ती भागांतील नुकसानग्रस्त घरांना अतिरिक्त भरपाईची घोषणा केली आहे. गृहमंत्री अमित शहांच्या तत्काळ कृतीनंतर 2060 घरांसाठी 25 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आल्याचं गृह मंत्रालयाने जाहीर केलं आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी गोळीबारात नुकसान झालेल्या घरांसाठी विशेष बाब म्हणून निर्णय घेण्यात आला आहे. पूर्णतः नुकसानग्रस्त घरासाठी 2 लाख रुपये, अंशतः नुकसानग्रस्त घरासाठी 1 लाख रुपये अतिरिक्त भरपाई दिली जाणार आहे. पंजाबमधील सीमावर्ती भागांतील घरांनाही मिळणार भरपाईचा लाभ.

10 June 2025 07:41 AM

मोदी सर्वपक्षीय शिष्टमंडळासोबत घेणार बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी संध्याकाळी 7 वाजता ‘लोक कल्याण मार्ग’ निवासस्थानी सर्वपक्षीय शिष्टमंडळांसोबत बैठक घेणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ही शिष्टमंडळे विविध देशांच्या दौऱ्यावर गेलेली होती. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्या कार्यालयाने संबंधित शिष्टमंडळांना या बैठकीसंदर्भात माहिती दिली.

10 June 2025 06:52 AM

हवामान बदल: पुण्यातील लहान मुलांमध्ये अतिसार, जुलाबाचे प्रमाण वाढले

हवामान बदलाच्या परिणामामुळे लहान मुलांमध्ये अतिसार, जुलाबाचे प्रमाण पुण्यात वाढलेले दिसून येत आहे. हवामानातील बदल, दूषित अन्न-पाणी आणि अस्वच्छतेमुळे लहान मुलांमध्ये जुलाब, उलट्या आणि निर्जलीकरणाची प्रकरणे वाढली आहेत. वारंवार जुलाब झाल्यास शरीरातील पाणी कमी होऊन प्रकृती खालावते. तोंड कोरडे पडणे, डोळे खोल जाणे, लघवी कमी होणे ही लक्षणे दिसल्यास तातडीने बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. लहान मुलांमध्ये डिहायड्रेशन लवकर होते, त्यामुळे पालकांनी अधिक दक्षता बाळगावी. वेळेवर उपचार न घेतल्यास रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येऊ शकते. 

10 June 2025 06:49 AM

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी या वर्षापासून नवा निर्णय; दर आठवड्याला होणार स्कूल बस कर्मचाऱ्यांची तपासणी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकारने नव्या शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता राज्यभरातील सर्व शाळांमध्ये बसचालक, सफाई कर्मचारी आणि महिला सेविकांची पार्श्वभूमी तपासली जाणार असून दर आठवड्याला त्यांची मद्यपान आणि औषध चाचणी होणार आहे. या नव्या नियमांनुसार, सकाळी व संध्याकाळी दोन्ही वेळेस चालकांची तपासणी होणार असून, अनधिकृत व्यक्तींना शालेय वाहनांमध्ये प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे. खासगी वाहनांमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या चालकांची माहिती शाळेला देणे आणि पालकांनी ती स्वतःकडे ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. चालकाच्या भूतकाळातील अपघात वा बेपर्वा ड्रायव्हिंगच्या घटना तपासून घेण्याची सूचना शासनाने दिली आहे.

10 June 2025 06:45 AM

पुण्यात घर खरेदी करताय? महारेराचे प्रमाणपत्र तपासायला विसरू नका!

घर खरेदीपूर्वी महारेराचे (महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरण) नोंदणी प्रमाणपत्र तपासणे आता अधिक सोपे आणि आवश्यक झाले आहे. महारेराने नव्या निर्णयानुसार प्रकल्पाच्या प्रमाणपत्रात प्रकल्पाचे क्षेत्र, इमारती, विंग्स, मजले, निवासी व व्यावसायिक युनिट्स यांची माहिती स्पष्टपणे देण्यास सुरुवात केली आहे. ही माहिती आता बुलेट पॉइंट स्वरूपात व जोडलेल्या कागदपत्रांतून मिळणार आहे. ग्राहकांची गुंतवणूक सुरक्षित राहावी, यासाठी ही पारदर्शकता आणण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे. निर्णय तातडीने लागू होणार आहे.

10 June 2025 06:45 AM

पुण्यातही 'भरत मंडपम '

पुण्यातही 'भरत मंडपम' उभारण्यासाठी 30 एकर जागेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. दिल्लीतील 'भरत मंडपम'च्या धर्तीवर पुण्यात आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांसाठी आधुनिक केंद्र उभारण्यात येणार आहे. महापालिकेने विमानतळ परिसरातील 30 एकर जागा निवडून शासनाला प्रस्ताव सादर केला आहे. परिषद, अधिवेशन, व्यापार मेळे यांसाठी हे केंद्र सुसज्ज असेल. दिल्लीतील भरत मंडपममध्ये 2023 मध्ये जी-20 शिखर परिषद झाली होती. 'भरत मंडपम' म्हणजे भारताचे व्यासपीठ, जिथे आधुनिक सुविधा व सांस्कृतिक वैशिष्ट्यांचा संगम आहे. पुणे, मुंबई, नागपूरसह सात शहरांत असे केंद्र उभारण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. 

10 June 2025 06:45 AM

निवृत्ती महाराज महाराजांचा पालखी सोहळा आज रवाना

संतश्रेष्ठ निवृत्ती महाराज महाराजांचा पालखी सोहळा आज रवाना होणार आहे. एकूण 53 दिंड्यांचा सहभाग यामध्ये असेल. आषाढी वारीसाठी सुरू होणारी ही ज्ञानेश्वर माऊलींच्या थोरले बंधूंची तसेच गुरुस्थानी असलेल्या वारकरी संप्रदायाच्या संस्थापकांची ही पालखी असते त्यामुळे याला विशेष असे महत्त्व आहे.

10 June 2025 06:41 AM

महाविकास आघाडीचे कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

पुण्यातील महाविकास आघाडीमधील काही कार्यकर्त्यांचा आज भाजपात प्रवेश होणार आहे. सकाळी अकरा वाजता, भाजप मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडणार आहे.

10 June 2025 06:41 AM

आज प्रहारच्या कार्यकर्त्यांचे मुंडन आंदोलन

बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. आज दुपारी तीन वाजता आंदोलनस्थळी कराळे मास्तर भेट देणार असून आपला पाठिंबा देणार आहे. तसेच दुपारी बारा वाजता चांदूर बाजार तहसील समोर प्रहारचे कार्यकर्ते मुंडन आंदोलन करणार आहेत.

10 June 2025 06:38 AM

11 वाजता मंत्रालयात कॅबिनेट बैठक

सकाळी 11 वाजता मंत्रालयात कॅबिनेट बैठक होईल. मुंब्रामध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनावर चर्चा होण्याची शक्यता आणि पावसामुळे नुकसान झालेल्या शेतक-यांसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.

10 June 2025 06:38 AM

मुख्यमंत्री फडणवीसांची पत्रकार परिषद

आज दुपारी मुख्यमंत्री पत्रकारांशी संवाद साधणार मोदी सरकारला 11 वर्षं पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस पत्रकारांना संबोधित करणार आहे.

10 June 2025 06:31 AM

अजित पवार काय भूमिका मांडणार?

राष्ट्रवादी पक्षाचा 26 वा वर्धापन दिन बालेवाडी येथे साजरा होणार आहे.  आगामी महापालिका निवडणुकीत देखील आम्ही चांगली कामगिरी करू या वर्धापन दिनी पक्षाची पुढील वाटचाल ठरवली जाईल तसेच गुन्हेगार तो गुन्हेगारच , पक्षात अशा विकृताना स्थान दिलं जाणार नाही, या वर्धापन दिनी या विषयावर पक्षाचे स्पष्ट धोरण मांडले जाईल. यावेळी अजित पवार काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

10 June 2025 06:30 AM

पीओपीच्या मूर्ती बनवायला आणि विक्रीला आता बंदी नाही पण विसर्जनाला बंदी

पीओपीच्या मूर्ती बनवायला आणि विक्रीला आता बंदी नसेल. मात्र कोणत्याही परिस्थितीत त्यांचं नैसर्गिक जलस्रोतात विसर्जन होणार नाही असं मुंबई हायकोर्टानं म्हंटलंय. त्यामुळे आता मोठ्या मूर्तीच्या विसर्जनाबाबत राज्य सरकार तोडगा काढणार का याकडे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या नजरा लागल्या आहेत. विसर्जन नाही करणार तर करणार काय? असा प्रश्न कायम राहत आहे. 

10 June 2025 06:30 AM

पुण्यात आज दोन्ही राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळा

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे.  मंगळवारी वर्धापन दिनानिमित्त राज्यातून हजारो कार्यकर्ते येणार आहे. या कार्यक्रमाला शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह सर्व आमदार आणि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. आगामी काळ महानगरपालिका निवडणुकांचा असल्यामुळे शरद पवारांच्या भाषणाकडे सर्व कार्यकर्त्यांचे लक्ष लागलं आहे.

10 June 2025 06:25 AM

नव्या रचनेतील पहिली ट्रेन नोव्हेंबर 2025 पर्यंत

मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर दिल्लीत संध्याकाळी तातडीची बैठक घेण्यात आली. लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. तसंच लोकलमधल्या बंद डब्यात श्वास कोंडू नये यासाठी लोकलची रचनाही बदलली जाणार आहे.  नव्या रचनेतील पहिली ट्रेन नोव्हेंबर 2025 पर्यंत तयार होणार आहे. तिच्या चाचणीनंतर जानेवारी 2026 पासून नवी लोकल सेवेत येणार आहे.

10 June 2025 06:25 AM

आज ठाण्यात मनसेचा धडक मोर्चा

मुंब्रा रेल्वे अपघातानंतर मनसे आक्रमक झाली आहे. रेल्वे प्रशासना विरोधात मनसे ठाणे शहरात धडक मोर्चा काढणार आहे. मनसेने नेते अविनाश जाधव यांच्यासहीत अनेक कार्यकर्ते धडक मोर्चात सहभागी होणार आहेत. ठाणे गावदेवी परिसरातून रेल्वेस्टेशनपर्यंत हा धडक मोर्चा असणार आहे.

10 June 2025 22:13 PM

Live Updates: आज सकाळी ११ वाजता मंत्रालयात कॅबिनेट बैठक होणार आहे

10 June 2025 22:12 PM

Live Updates: उद्योजक संतोष लड्डा दरोडा प्रकरणातील चोरीला गेलेली चांदी जप्त

छत्रपती संभाजीनगर: उद्योजक संतोष लड्डा दरोडा प्रकरणातील चोरीला गेलेली 30 किलो चांदी पोलिसांनी जप्त केली आहे. दरोड्यामध्ये साडेपाच किलो सोने आणि 32 किलो चांदी चोरीला गेली होती. होतो चोरी. चांदी हस्तगत करण्यात पोलिसांना यश मात्र साडेपाच किलो सोनं गेलं कुठं याचं गूढ अजूनही कायम आहे.

10 June 2025 22:08 PM

Live Updates: निलेश चव्हाण आणि शशांक हगवणेचा ताबा  वारजे पोलीस घेणार

निलेश चव्हाणवर कस्पटे कुटुंबियांना बंदुकीचा धाक दाखवून धमकवल्या प्रकरणी तर शशांक हगवणेवर शस्त्र परवाना मिळवताना खोटी कागदपत्र सादर केल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल आहे. न्यायालयात सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाले असून, आज वारजे पोलीस दोघांना तपासासाठी ताब्यात घेणार आहेत. तर सुशील हगवणेला आज दुपारी कोथरूड पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतलं आहे.

10 June 2025 22:06 PM

Live Updates: विदर्भाला उन्हाचा तडाखा

मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या विदर्भात उन्हाचा तडाखा बसला आहे. नागपुरात सोमवारी 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात आठ जिल्ह्यात तापमान 41 अंश पलीकडे गेलं आहे. पावसाच्या धाराच्या प्रतीक्षेत असलेल्या विदर्भात घामाच्या धारा लागल्या आहेत.

TAGS

Latest Marathi BatmyaLatest News In marathiMaharashtra Mumbai Breaking News TodayBreaking NewsToday's Breaking Newslatest newsCurrent Breaking Newslatest news todaylive newscurrent newstoday newsbreaking news todayLive News MarathiMumbai Pune Latest NewsNational International Latest NewsEntertainment Latest Newsmaharashtra latest news todayलेटेस्ट मराठी न्यूजमहाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज टुडेमराठी ताज्या बातम्यामराठी ब्रेकिंग न्यूज अपडेटमुंबई पुणे ताज्या बातम्याराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय ताज्या बातम्यामनोरंजन ताज्या बातम्यामहाराष्ट्राच्या लेटेस्ट न्यूजमराठी न्यूज लाइव्हलाइव्ह न्यूजआजच्या ठळक घडामोडीमराठी बातम्याझी 24 तासमराठी ब्रेकिंग न्यूजताज्या मराठी बातम्यामहाराष्ट्रातील आजच्या बातम्याराजकीयसामाजिकक्रीडाएकनाथ शिंदेदेवेंद्र फडणवीसराज ठाकरेउद्धव ठाकरेशरद पवारमहाराष्ट्र बातम्यामहाराष्ट्रातील लाईव्ह बातम्यामहाराष्ट्रातील ताज्या बातम्यामुंबई लोकल अपघातमुंबई लोकल ट्रेन अपघातmumbara station accidentMumbai Railway Accident
Read More