Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Budget 2023 Live Updates: शेतकऱ्यांना मोठा दिलासा तर महिलांसाठी एसटी प्रवासात 50 टक्के सूट

Maharashtra Budget 2023 : राज्यात सध्या सुरु असणारी विकासकामं इथपासून ते अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आकारास आणण्यासोबतच राज्यातील नागरिकांचा विकास हा मुद्दा केंद्रस्थानी ठेवत यंदाचा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. यातून तुम्हाला काय मिळणार? पाहा...   

Maharashtra Budget 2023 Live Updates: शेतकऱ्यांना मोठा दिलासा तर महिलांसाठी एसटी प्रवासात 50 टक्के सूट
LIVE Blog

Maharashtra Budget 2023 : शिंदे-फडणवीस सरकाराच पहिला अर्थसंकल्प अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करत आहेत.  सहा महिन्यांपूर्वी राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार सत्तेत आलं. सत्तेत आल्यानंतर अनेक मोठे निर्णय सरकारकडून घेण्यात आले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला जात असून त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकरी आणि महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत.

 

 

09 March 2023
09 March 2023 15:25 PM

Maharashtra Budget 2023: अन्य विभागांसाठी आर्थिक तरतूद...
- गृह विभाग : 2187 कोटी रुपये
- महसूल विभाग : 434 कोटी रुपये
- वित्त विभाग : 190 कोटी रुपये
- सांस्कृतिक कार्य विभाग : 1085 कोटी रुपये
- मराठी भाषा विभाग : 65 कोटी रुपये
- विधी व न्याय विभाग : 694 कोटी रुपये
- माहिती तंत्रज्ञान व माहिती जनसंपर्क विभाग : 1342 कोटी रुपये
- महाराष्ट्र विधान मंडळ : 500 कोटी रुपये

 

09 March 2023 15:22 PM

Maharashtra Budget 2023: पंचम अमृत : पर्यावरणपूरक विकास
विभागांसाठी तरतूद
- वन विभाग : 2294 कोटी रुपये
- पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग : 224 कोटी रुपये
- उर्जा विभाग : 10,919 कोटी रुपये
पंचम अमृत एकूण : 13,437 कोटी रुपये

09 March 2023 15:22 PM

Maharashtra Budget 2023: चतुर्थ अमृत : रोजगारनिर्मिती,
सक्षम, कुशल-रोजगारक्षम युवा
विभागांसाठी तरतूद
- उद्योग विभाग : 934 कोटी
- वस्त्रोद्योग विभाग : 708 कोटी
- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विकास विभाग : 738 कोटी रुपये
- शालेय शिक्षण विभाग : 2707 कोटी रुपये
- उच्च व तंत्रशिक्षण विभाग : 1920 कोटी रुपये
- वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग : 2355 कोटी रुपये
- क्रीडा विभाग : 491 कोटी रुपये
- पर्यटन विभाग : 1805 कोटी रुपये
चतुर्थ अमृत एकूण : 11,658 कोटी रुपये

09 March 2023 15:21 PM

Maharashtra Budget 2023: तृतीय अमृत : भरीव भांडवली गुंतवणुकीतून
पायाभूत सुविधा विकास
विभागांसाठी तरतूद
- सार्वजनिक बांधकाम विभाग : 19,491 कोटी रुपये
- ग्रामविकास व पंचायतराज विभाग : 8490 कोटी रुपये
- नियोजन व रोजगार हमी योजना विभाग : 10,297 कोटी रुपये
- नगरविकास विभाग : 9725 कोटी रुपये
- परिवहन, बंदरे विभाग : 3746 कोटी रुपये
- सामान्य प्रशासन विभाग : 1310 कोटी रुपये

09 March 2023 15:13 PM

नाचू कीर्तनाचे रंगी...!
आम्ही सारे वारकरी...
 - संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताई निर्मलवारीसाठी : 20 कोटी
- कीर्तनकार, प्रवचनकार, निरुपणकार यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्याचा सन्मान: श्री संत नामदेव महाराज कीर्तनकार सन्मान योजना

09 March 2023 15:12 PM

Maharashtra Budget 2023: नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी, अपराधसिद्धतेत वाढीसाठी....
 - न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळांचे बळकटीकरण
- न्यायवैद्यक विज्ञान महाविद्यालय स्थापन करणार
- 45 ठिकाणी अत्याधुनिक न्यायसहाय्यक मोबाईल युनिट
- मुंबईत सीसीटीव्ही टप्पा-2 राबविणार
- सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सायबर सुरक्षा प्रकल्प
- राज्यात दोन नवीन कारागृह
- देवनार मानखुर्द येथे 500 क्षमतेचे बालसुधार गृह
- 12,793 कोतवालांचे मानधन सरसगट 15 हजार रुपये

 

09 March 2023 15:11 PM

Maharashtra Budget 2023: झाडे झुडे जीव सोईरे पाषाण... पर्यावरणपूरक विकास
 - राज्याचे नेट झिरो उत्सर्जन साध्यतेसाठी उपाययोजना करणार
- 20,000 ग्रामपंचायतीत सौर उर्जा प्रकल्प
- भुसावळ येथे 500 किलोवॅटचा हरित हायड्रोजन प्रकल्प, सौर उर्जेचा वापर करणार
- जायकवाडी नाथसागर जलाशयात तरंगत्या सौरउर्जा पॅनेलद्वारे वीजनिर्मिती
- शैवाळ शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अभ्यासगट
- हरित हायड्रोजन, हरित अमोनिया, सौर, पवन उर्जा क्षेत्रात 75,000 कोटींची गुंतवणूक अपेक्षित
- 15 वर्ष जुनी शासकीय वाहने निष्कासित करणार
- 8 ते 15 वर्षांत खाजगी वाहने निष्कासित केल्यास नवीन वाहनखरेदीसाठी कर सवलत
- एसटी महामंडळात 5150 इलेक्ट्रीक बसेस
- डिझेलवरील 5000 बसेस द्रवरुप नैसर्गिक वायू इंधनावर परावर्तित करणार
- पर्यावरण सेवा योजनेचा 7500 शाळांमध्ये विस्तार
- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 75 तलाव संवर्धनाचा कार्यक्रम
- प्रत्येक जिल्ह्यात धार्मिक व औषधी वृक्षांची अमृत वन उद्यानांची निर्मिती
- ग्रामीण भागात कडूनिंब, वड, उंबर, देशी आंबा, बेल असे पंचायतन
- धार्मिक स्थळाच्या परिसरात देवराई
- औषधी व व्यावसायिक वृक्षांच्या प्रजाती संवर्धनासाठी 50 हायटेक रोपवाटिका
- गोरेवाडा प्राणीसंग्रहालयात आफ्रिकन सफारी, पक्षी उद्यान यावर्षी
- शिवनेरी (जुन्नर) येथे बिबट सफारी

 

09 March 2023 15:08 PM

Maharashtra Budget 2023: सक्षम, कुशल अन् रोजगारक्षम युवाशक्ती
- लॉजिस्टिक पार्क धोरण लवकरच
- नागपूर येथे 1000 एकरावर लॉजिस्टिक हब
- नागपूर, एमएमआर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, रत्नागिरी असे 6 सर्क्युलर इकॉनॉमी पार्क
- वस्त्रोद्योग, खणिकर्म क्षेत्रासाठी नवीन धोरण
- स्टार्टअपसाठी कळंबोली, नवी मुंबई येथे निवासी प्रशिक्षण-संशोधन संस्था
- नवी मुंबईत जेम्स अँड ज्वेलरी पार्क, प्रयोगशाळानिर्मित हिर्‍यांच्या उद्योगाला चालना
- मांघर (महाबळेश्वर)च्या धर्तीवर ‘मधाचे गाव’ हा उपक्रम राज्यभर राबविणार
- 500 ग्रामपंचायतींमध्ये कौशल्य विकास कार्यक्रम, शहरांकडे ओढा थांबणार
- मुंबईतील 200 महापालिका, जि.प.शाळांमध्ये कौशल्य प्रशिक्षण
- 500 आयटीआयची दर्जावाढ/2307 कोटी रुपये
- 75 आयटीआयचे आधुनिकीकरण/610 कोटी रुपये
- 75,000 शासकीय नोकरभरतीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम
- उद्योगांना आवश्यक मनुष्यबळासाठी 10 उत्कृष्टता केंद्रे स्थापन करणार

 

09 March 2023 15:07 PM

Maharashtra Budget 2023: पर्यटनाला चालना...
- प्रत्येक जिल्ह्यातील 500 युवकांना जल, कृषी, कॅराव्हॅन, साहसी पर्यटन तसेच आदरातिथ्य क्षेत्राचे प्रशिक्षण
- पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानाचा नागपूर फुटाळा तलावाच्या धर्तीवर विकास
- 10 पर्यटन स्थळांवर टेंट सिटी उभारणार
- राज्याचा वार्षिक महोत्सव आराखडा तयार. यात शिवजन्मोत्सव शिवनेरी, भगवान बिरसा मुंडा महोत्सव, जव्हार, वीर बाल दिवस महोत्सव नांदेड इत्यादींचा समावेश

09 March 2023 15:06 PM

Maharashtra Budget 2023: राज्यात 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे
 - राज्यात 14 ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे करणार
- सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, अंबरनाथ (ठाणे)
- मानसिक अस्वास्थ आणि व्यसनाधीनतेची वाढती समस्या पाहता जालना, भिवंडी, पुणे, नागपूर येथे नवीन व्यसनमुक्ती केंद्रे

09 March 2023 15:06 PM

Maharashtra Budget 2023: विद्यापीठे/ शैक्षणिक संस्थांना 500 कोटी रुपये अनुदान
 - डेक्कन कॉलेज पदव्युत्तर व संशोधन संस्था, पुणे
- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर
- शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, अमरावती
- कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पुणे
- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर
- डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ
- मुंबई विद्यापीठ
- लक्ष्मी नारायण इन्स्टिट्युट ऑफ टेक्नोलॉजी, नागपूर या संस्थेला अभिमत विद्यापिठाचा दर्जा देऊन
- वरील सर्व संस्थांना 500 कोटी रूपये विशेष अनुदान
- महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ, नागपूरला इमारत बांधकामासाठी निधी देणार

09 March 2023 15:05 PM

मी अमृत कडे वळतो असं जपून म्हणतो अथवा तुम्हाला अमृता वाटायचे…- फडणवीस

09 March 2023 15:03 PM

Maharashtra Budget 2023: शिक्षणसेवकांना भरघोस मानधन, सरासरी 10 हजार रुपयांची वाढ
- प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक : 6000 वरुन 16,000 रुपये
- माध्यमिक शिक्षण सेवक : 8000 वरुन 18,000 रुपये
- उच्च माध्यमिक शिक्षण सेवक : 9000 वरुन 20,000 रुपये
- पीएमश्री शाळा : 816 शाळा/ 5 वर्षांत 1534 कोटी रुपये

09 March 2023 15:02 PM

Maharashtra Budget 2023: विद्यार्थ्यांना काय मिळणार
- विद्यार्थ्यांना आता मिळणार भरीव शिष्यवृत्ती, मोठी वाढ-विद्यार्थ्यांना गणवेशही मोफत
- 5 ते 7 वी : 1000 वरुन 5000 रुपये
- 8 ते 10 वी : 1500 वरुन 7500 रुपये
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणार

 

09 March 2023 14:59 PM

Maharashtra Budget 2023 - मुंबईचा विकास...
 - मुंबईच्या सुशोभिकरणासाठी : 1729 कोटी रुपये
- एमएमआर क्षेत्रात पारसिक हिल्स बोगदा, मीरा-भाईंदर पाणीपुरवठा, मुंबई पारबंदर प्रकल्प, विविध उड्डाणपूल यावर्षी पूर्ण
- ठाणे-वसई खाडी जलवाहतुकीने जोडणार: 424 कोटी रुपये
- गेट वे ऑफ इंडियाजवळ रेडिओ क्लबनजीक प्रवासी जेट्टी, इतर सुविधांचे निर्माण : 162.20 कोटी

09 March 2023 14:59 PM

Maharashtra Budget 2023 - विमानतळांचा विकास...
 - शिर्डी विमानतळावर नवे प्रवासी टर्मिनल: 527 कोटी
- छत्रपती संभाजीनगर विमानतळ भूसंपादनासाठी : 734 कोटी
- नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार
- पुरंदर येथे नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ
- नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी
- बेलोरा (अमरावती), शिवणी (अकोला) येथे विमानतळ विकासाची कामे

09 March 2023 14:58 PM

Maharashtra Budget 2023 - रेल्वे प्रकल्प अन् बसस्थानकांचे आधुनिकीकरण
 - नाशिक-पुणे हायस्पीड रेल्वेला निधी
- सोलापूर-तुळजापूर-धाराशिव ब्रॉडगेज : 84 कि.मी/452 कोटी रुपये
- नांदेड-बिदर, फलटण-पंढरपूर, खामगाव-जालना, वरोरा-चिमूर-कांपा या 4 प्रकल्पांना 50 टक्के राज्यहिस्सा देणार
- सेतूबंधनअंतर्गत राज्य रेल्वेफाटक मुक्त करण्यासाठी 25 नवीन उड्डाणपूल
- 100 बसस्थानकांचे आधुनिकीकरण आणि पुनर्बांधणीसाठी सुमारे 400 कोटी

09 March 2023 14:57 PM

Maharashtra Budget 2023 - मेट्रो प्रकल्प....
- मुंबईत 337 कि.मी. मेट्रोचे जाळे/46 कि.मी. खुला/आणखी 50 कि.मी. यावर्षी खुला
मुंबईतील नवीन प्रकल्प
- मुंबई मेट्रो 10 : गायमुख ते शिवाजी चौक मीरा रोड/9.2 कि.मी/4476 कोटी
- मुंबई मेट्रो 11 : वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/12.77 कि.मी/8739 कोटी रुपये
- मुंबई मेट्रो 12 : कल्याण ते तळोजा/20.75 कि.मी/5865 कोटी रुपये
- नागपूर मेट्रोचा दुसरा टप्पा: 43.80 कि.मी./6708 कोटी
- पुणे मेट्रो : 8313 कोटींची कामे प्रगतीपथावर
- अन्य नवीन प्रकल्प : ठाणे वर्तुळाकार मेट्रो, नाशिक निओ मेट्रो, पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते निगडी कॉरिडॉर आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रो

09 March 2023 14:55 PM

Maharashtra Budget 2023 - आदिवासी पाडे, बंजारा तांडे, धनगर वाड्या-वस्त्यांतील रस्त्यांसाठी 4000 कोटी
 - आदिवासी पाडे रस्त्यांनी जोडण्यासाठी बिरसा मुंडा जोडरस्ते योजना
- बंजारा तांडे रस्त्यांनी जोडण्यासाठी संत सेवालाल महाराज जोडरस्ते योजना
- धनगर वाड्या-वस्त्या जोडण्यासाठी यशवंतराव होळकर जोडरस्ते योजना
- या तिन्ही योजनांसाठी सुमारे 4000 कोटी रुपयांची तरतूद

09 March 2023 14:55 PM

Maharashtra Budget 2023 - रस्त्यांसाठी निधी...
- पुणे रिंगरोडसाठी भरीव निधीची तरतूद
- मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या कामासाठी निधी
- विरार-अलिबाग मार्गासाठी निधीची तरतूद
- रायगड जिल्ह्यातील रेवस ते रेड्डी, सिंधुदुर्ग सागरी महामार्गासाठी निधी
- हायब्रीड अ‍ॅन्युईटीतून 7500 कि.मी.चे रस्ते/90,000 कोटी रुपये
- आशियाई बँक प्रकल्पातून 468 कि.मी.चे रस्ते/4000 कोटी रुपये
- रस्ते व पुलांसाठी 14,225 कोटी रुपये, यातून 10,125 कि.मी.चे कामे, 203 पूल व मोर्‍यांची कामे
- जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग : 4500 कि.मी./3000 कोटी रुपये
- प्रधानमंत्री ग्रामसडक योजना : 6500 कि.मी.
- मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद शेतरस्त्यांसाठी नवी योजना
- सीमावर्ती भागातील गावांमध्ये रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्यासाठी योजना

09 March 2023 14:54 PM

Maharashtra Budget 2023 - रेल्वे अर्थसंकल्पात 13000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीय 
कल्याण-मुरबाड रेल्वे मार्गाला ‌मान्यता
- एसटी स्थानकांचे 100 स्थानकं अत्याधुनिक करण्यात येईल
- दादरमधले बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम एप्रिल 2024 पर्यंत पूर्ण होईल
- एसटी स्थानकांचे 100 स्थानकं अत्याधुनिक करण्यात येईल
- दादरमधले बाबासाहेबांच्या स्मारकाचं काम एप्रिल 2024 पर्यंत पूर्ण होईल

09 March 2023 14:50 PM

Maharashtra Budget 2023 - द्वितीय अमृत : महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास..43,036 कोटी रुपये
विभागांसाठी तरतूद
- महिला व बालविकास विभाग : 2843 कोटी रुपये
- सार्वजनिक आरोग्य विभाग : 3501 कोटी रुपये
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग : 16,494 कोटी रुपये
- इतर मागास बहुजन कल्याण विभाग : 3996 कोटी रुपये
- दिव्यांग कल्याण विभाग : 1416 कोटी रुपये
- आदिवासी विकास विभाग : 12,655 कोटी रुपये
- अल्पसंख्यक विकास विभाग : 743 कोटी रुपये
- गृहनिर्माण विभाग : 1232 कोटी रुपये
- कामगार विभाग : 156 कोटी रुपये

09 March 2023 14:49 PM

Maharashtra Budget 2023 - प्रथम अमृत : शाश्वत शेती-समृद्ध शेतकरी..29,163 कोटी रुपये
विभागांसाठी तरतूद
- कृषी विभाग : 3339 कोटी रुपये
- मदत-पुनर्वसन विभाग : 584 कोटी रुपये
- सहकार व पणन विभाग : 1106 कोटी रुपये
- फलोत्पादन विभाग : 648 कोटी रुपये
- अन्न व नागरी पुरवठा विभाग : 481 कोटी रुपये
- पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय विभाग : 508 कोटी रुपये
- जलसंपदा, लाभक्षेत्र विकास, खारभूमी विभाग : 15,066 कोटी रुपये
- पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग : 3545 कोटी रुपये
- मृद व जलसंधारण विभाग : 3886 कोटी रुपये

09 March 2023 14:48 PM

Maharashtra Budget 2023 - पायाभूत सुविधा...समृद्धी अन् शक्तिपीठ महामार्ग....
 - हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार, सिंदखेडराजा नोड ते शेगावपर्यंत चौपदरी रस्ता
- पवनार (वर्धा) ते पात्रादेवी (सिंधुदुर्ग) महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्ग 86,300 कोटी रुपये (नागपूर-गोवा)
(माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, अंबेजोगाई ही शक्तीपीठे, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही दोन ज्योर्तिलिंग, नांदेड गुरुद्वारा, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर जोडले जाणार)
- या महामार्गाचा हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना लाभ

 

09 March 2023 14:47 PM

Maharashtra Budget 2023 - असंघटित कामगार/कारागिर/टॅक्सी-ऑटोचालक/दिव्यांगांसाठी...
 - 3 कोटी असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ, सामाजिक सुरक्षा, कल्याणकारी योजना राबविणार
- ऑटोरिक्षा व टॅक्सी चालक-मालक कल्याणकारी महामंडळ स्थापन करणार
- माती कारागिरीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, संत शिरोमणी गोरोबा काका महाराष्ट्र मातीकला मंडळाला 25 कोटी
- स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागामार्फत शिक्षण, पुनर्वसन, रोजगाराच्या योजना राबविणार

 

09 March 2023 14:47 PM

Maharashtra Budget 2023 - ‘मोदी आवास घरकुल योजना’
- सर्वांसाठी घरे... यावर्षी 10 लाख घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम
- इतर मागासवर्गीयांसाठी 3 वर्षांत 10 लाख घरांची ‘मोदी आवास घरकुल योजना’
- प्रधानमंत्री आवास योजना: 4 लाख घरे
(2.5 लाख घरे अनुसूचित जाती-जमाती, 1.5 लाख इतर प्रवर्ग)
- रमाई आवास : 1.5 लाख घरे/1800 कोटी रुपये
(किमान 25 हजार घरे मातंग समाजासाठी)
- शबरी, पारधी, आदिम आवास : 1 लाख घरे/1200 कोटी रुपये
- यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत: 50,000 घरे/600 कोटी
(25,000 घरे विमुक्त जाती-भटक्या जमातींसाठी धनगर : 25,000 घरे)
- इतर मागासवर्गियांसाठी नवीन घरकुल योजना : मोदी आवास घरकुल योजना : 3 वर्षांत 10 लाख घरे /12,000 कोटी रुपये
(या योजनेत यावर्षी 3 लाख घरे बांधणार/3600 कोटी रुपये)

09 March 2023 14:46 PM

Maharashtra Budget 2023 - अल्पसंख्यकांसाठी...
- अल्पसंख्यक महिलांच्या आर्थिक विकासासाठी 15 जिल्ह्यात 3000 बचतगटांची निर्मिती
- उच्च शिक्षण घेणार्‍यांना शिष्यवृत्ती: 25,000 वरुन 50,000 रुपये

09 March 2023 14:44 PM

Maharashtra Budget 2023 - आदिवासी शिक्षणासाठी...
- 250 शासकीय आदिवासी आश्रमशाळांना आदर्श आश्रमशाळा करणार
- अनुसूचित जमातीच्या 100 विद्यार्थ्यांना पीएचडीसाठी अधिछात्रवृत्ती

09 March 2023 14:44 PM

Maharashtra Budget 2023 - नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग 
-86  हजार कोटी तरतूद
-मराठवाडा आर्थिक प्रगती करणार

 

09 March 2023 14:41 PM

Maharashtra Budget 2023 - नवीन महामंडळांची स्थापना..भरीव निधी सुद्धा देणार
- असंघटित कामगार : महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ
- लिंगायत तरुणांना रोजगार : जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ
- गुरव समाज : संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ
- रामोशी समाज : राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ
- वडार समाज : पैलवान कै.मारूती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ
- ही महामंडळे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळांतर्गत
- प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा निधी देणार

 

09 March 2023 14:41 PM

Maharashtra Budget 2023 -  PM आवास योजनेंतर्गत ओबीसींसाठी 10 लाख घ
विविध समाजघटकांच्या संस्थांसाठी भरीव निधी बार्टी, सारथी, महाज्योती, अमृत
- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, श्यामराव पेजे आर्थिक विकास महामंडळ, इतर मागासवर्गिय वित्त आणि विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्यक आर्थिक विकास महामंडळांना भरीव निधी देणार
- संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळाला सुद्धा निधी उपलब्ध करून देणार
- छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानवविकास संस्थेचे (सारथी) नाशिक येथे विभागीय कार्यालय, सुसज्ज अभ्यासिका, मुला-मुलींचे वसतीगृह यासाठी 50 कोटी रुपये

09 March 2023 14:39 PM

Maharashtra Budget 2023 - निराधार योजनांमध्ये वाढीव अर्थसहाय्य
 - अंत्योदयाचा विचार
- संजय गांधी निराधार/श्रावणबाळ योजनेत अर्थसहाय्य आता 1000 हून 1500 रुपये
- राज्य सरकार अतिरिक्त 2400 कोटी रुपयांचा भार उचलणार
- प्रत्येक महिन्यात पहिल्याच आठवड्यात नियमित प्रदान

09 March 2023 14:37 PM

Maharashtra Budget 2023 - आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या घोषणा
- महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेत आता 5 लाखांपर्यंत उपचार करता येणार
 - महात्मा ज्योतिराव फुले जनारोग्य योजनेत विमा संरक्षण 1.50 लाखांहून 5 लाख रुपये
- त्यामुळे आता 5 लाख रुपयांपर्यंत उपचार घेता येणार
- नवीन 200 रुग्णालयांचा यात समावेश करणार
- मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचे लाभ 2.50 लाखांहून 4 लाखांपर्यंत
- राज्यभरात 700 स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना

09 March 2023 14:37 PM

Maharashtra Budget 2023 - आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ
 - आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये
- गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये
- अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये
- मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये
- अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये
- अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20,000 पदे भरणार
- अंगणवाड्यांमार्फत घरपोच आहार पुरवठ्यासाठी साखळी व्यवस्थापन प्रणाली

09 March 2023 14:36 PM

Maharashtra Budget 2023 - नोकरदार महिलांसाठी 50 वसतीगृहे
दोन योजना एकत्र करुन ‘शक्तीसदन’ ही नवी योजना
 - शहरी भागात नोकरीसाठी आलेल्या महिलांसाठी केंद्राच्या मदतीने 50 वसतीगृहांची निर्मिती
- अडचणीतील महिलांसाठी, लैंगिक शोषणापासून मुक्त केलेल्या महिलांसाठी, कौटुंबिक समस्याग्रस्त महिलांसाठी स्वाधार आणि उज्वला या दोन योजनांचे एकत्रिकरण करुन केंद्राच्या मदतीने ‘शक्तीसदन’ ही नवीन योजना
- या योजनेत पीडित महिलांना आश्रय, विधी सेवा, आरोग्यसेवा, समुपदेशन इत्यादी सेवा
- या योजनेत 50 नवीन ‘शक्तीसदन’ निर्माण करणार

09 March 2023 14:34 PM

Maharashtra Budget 2023 - राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत
- चौथे सर्वसमावेशक महिला धोरण जाहीर करणार
- महिला बचत गटांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यात बांबू क्लस्टर
- कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापुरी चप्पल क्लस्टर
- मुंबईत महिला युनिटी मॉलची स्थापना
- महिला सुरक्षा, सुविधाजनक प्रवासासाठी महिला केंद्रीत पर्यटन धोरण
- माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानात 4 कोटी महिला-मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार

 

09 March 2023 14:34 PM

Maharashtra Budget 2023 - 20 हजार अंगणवाडी सेविका पदे भरली जाणार
लाडकी लेक मी संतांची, मजवरी कृपा बहुतांची...‘लेक लाडकी’ योजना नव्या स्वरूपात
- मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी’ योजना आता नव्या स्वरूपात
- पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांतील मुलींना लाभ
- जन्मानंतर मुलीला 5000 रुपये
- पहिलीत 4000 रुपये, सहावीत 6000 रुपये
- अकरावीत 8000 रुपये
- मुलगी 18 वर्षांची झाल्यावर 75,000 रुपये
- राज्यात बाळासाहेब ठाकरे नावाने ७०० दवाखाना सुरू केला जाईल - विनामुल्य तपासणी केली जाईल
सारे काही महिलांसाठी...

09 March 2023 14:32 PM

Maharashtra Budget 2023 - लेक लाडकी योजना सुरू
वय 18 झाले मुलीला 75 हजार रूपये मिळणार
नोकरीनिमित्ताने बाहेरुन आलेल्या महिलांसाठी 50 नवे वसतीगृह
महिलांना एसटी बसमध्ये सरसकट ५० टक्के सवलत
अंगणवाडिका सेविका - मानधनात एक हजार रुपयांची वाढ

 

09 March 2023 14:28 PM

Maharashtra Budget 2023 - तापी महापुनर्भरण प्रकल्प, कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प
- पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रासाठी तापी महापुनर्भरण प्रकल्प
- केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार
- कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पांतून धाराशिव, बीड जिल्ह्यांतील 133 गावांना सिंचन लाभ
- या प्रकल्पासाठी 11,626 कोटी रुपयांना सुधारित प्रशासकीय मान्यता

09 March 2023 14:28 PM

Maharashtra Budget 2023 - जलयुक्त शिवार योजना 2 पुन्हा सुरू...
- दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प राज्य निधीतून
- नार-पार, अंबिका, औरंगा, दमणगंगा, वैतरणा, उल्हास नद्यांच्या उपखोर्‍यातील पाणी वापरणार
- मुंबई, गोदावरी खोर्‍यातील तूट भरून काढण्यासाठी पाणी वापरणार
- मराठवाडा तथा उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नगर, जळगावला लाभ
- वैनगंगा खोर्‍यातील वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्पातून नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांना लाभ

09 March 2023 14:26 PM

Maharashtra Budget 2023 - शेतकर्‍यांसाठी ट्रान्सफॉर्मर योजना, प्रलंबित कृषीपंपांना वीजजोडण्या
 - वीज ट्रान्सफॉर्मर नसल्याने पाणी असूनही शेतकर्‍यांची गैरसोय टाळण्यासाठी ट्रान्सफॉर्मर योजना
- मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेत हेक्टरी 75,000 रुपये वार्षिक भाडेपट्टा
- दिवसा वीजपुरवठ्यासाठी 3 वर्षांत 30 टक्के कृषी वीजवाहिन्यांचे सौर उर्जीकरण, 9.50 लाख शेतकर्‍यांना लाभ
- प्रधानमंत्री कुसुम योजनेतून 1.50 लाख सौर कृषीपंप
- प्रलंबित 86,073 कृषीपंप अर्जदारांना तत्काळ वीजजोडणी
- उपसा जलसिंचन योजनेतील शेतकर्‍यांना वीजदर सवलतीची मुदत आता मार्च 2024 पर्यंत

09 March 2023 14:26 PM

Maharashtra Budget 2023 - मासेमार कुटुंबांच्या कल्याणासाठी 50 कोटींचा मत्स्यविकास कोष
- विमा आणि डिझेल अनुदानाचा दिलासा
- प्रकल्पबाधित मासेमारांना नुकसानभरपाईसाठी धोरण राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य
- प्रकल्पामुळे विस्थापित वा तात्पुरत्या प्रभावित मासेमार कुटुंबांना मदत देण्यासाठी प्रकल्पाच्या 2 टक्के वा 50 कोटी रुपयांचा मत्स्यविकास कोष
- मासेमारांना डिझेल अनुदानासाठी यांत्रिक नौकेच्या 120 अश्वशक्तीची अट काढली
- त्यामुळे 85 हजार अधिकच्या मासेमारांना लाभ
- वर्षानुवर्षाचा अनुशेष यावर्षी पूर्णत: दूर करणार
- यासाठी 269 कोटी रुपयांची तरतूद
- पारंपारिक मासेमारी करणार्‍या मासेमार बांधवांसाठी केंद्राच्या मदतीने 5 लाखांचा विमा

09 March 2023 14:25 PM

Maharashtra Budget 2023 - महाराष्ट्र मेंढी, शेळी सहकार...धनगर समाजाला 1000 कोटी रुपये
- विकास महामंडळाची स्थापना करणार
- 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार
- धनगर समाजासाठी 1000 कोटी रुपये
- 22 योजनांचे एकत्रिकरण, मंत्रिमंडळ शक्तीप्रदत्त समितीमार्फत अंमलबजावणी
- महाराष्ट्र मेंढी व शेळी सहकार विकास महामंडळाची स्थापना करणार
- 10 हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणार
- अहमदनगर येथे मुख्यालय असणार
- राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेत मेंढीपालनासाठी भरीव निधी

09 March 2023 14:25 PM

Maharashtra Budget 2023 - गोसेवा, गोसंवर्धन...अहमदनगरला नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय
 
- देशी गोवंशाचे संवर्धन, संगोपन, संरक्षणासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना करणार
- आयोगामार्फत गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना, गोमय मूल्यवर्धन योजना राबविणार
- देशी गोवंशाच्या संवर्धनासाठी भ्रूण बाह्यफलन, प्रत्यारोपण सुविधेत वाढ
- विदर्भ-मराठवाड्यातील 11 जिल्ह्यात दुग्ध विकासाच्या दुसर्‍या टप्प्यासाठी 160 कोटी रुपये
- अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय

09 March 2023 14:24 PM

Maharashtra Budget 2023 - शेतकर्‍यांना अन्नधान्याऐवजी थेट रोखीने आर्थिक मदत!
 - विदर्भ, मराठवाड्यातील 14 आपत्तीग्रस्त जिल्ह्यांना केशरी शिधापत्रिकाधारकांना थेट आर्थिक मदत
- अन्नधान्याऐवजी रोख रक्कम थेट आधार बँक खात्यात
- प्रतिवर्ष, प्रतिशेतकरी 1800 रुपये देणार

09 March 2023 14:23 PM

Maharashtra Budget 2023 - शेतमाल विक्रीसाठी आलेल्या शेतकर्‍यांना निवारा-भोजन
- कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणार्‍या शेतकर्‍यांना सुविधा
- शेतकर्‍यांच्या मुक्कामासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन
- जेवणासाठी शिवभोजन थाळीची उपलब्धता

09 March 2023 14:22 PM

Maharashtra Budget 2023 - नागपुरात कृषी सविधा केंद्र, विदर्भात संत्राप्रक्रिया केंद्र
- नागपुरात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करणार
- अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रसार हा उद्देश
- या केंद्रासाठी 228 कोटी रुपये देणार
- नागपूर जिल्ह्यातील नागपूर, काटोल, कळमेश्वर, अमरावती जिल्ह्यात मोर्शी, बुलढाणा जिल्ह्यात आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रांसाठी 20 कोटी रुपयांची तरतूद

09 March 2023 14:21 PM

Maharashtra Budget 2023 - श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरात स्थापन करणार
 - आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त महाराष्ट्रात ‘श्रीअन्न अभियान’
- 200 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद
- सोलापुरात श्री अन्न उत्कृष्टता केंद्र स्थापन करणार

09 March 2023 14:21 PM

Maharashtra Budget 2023 - नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देणार
- 3 वर्षांत 25 लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रीय शेतीखाली आणणार
- 1000 जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्र स्थापन करणार
- डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशनची व्याप्तीवाढ
- 3 वर्षांत 1000 कोटी रुपये निधी

09 March 2023 14:19 PM

Maharashtra Budget 2023 - गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

- गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आता राज्य सरकारकडून, लाभही 2 लाखांपर्यंत
- गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना यापूर्वी विमा कंपन्यांकडून
- आता गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना
- ही योजना राज्य सरकार राबविणार, त्यामुळे शेतकर्‍यांचा पूर्ण त्रास वाचणार
- अपघातग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबांना पूर्वीच्या 1 लाखाहून आता 2 लाख रुपयांपर्यंत लाभ

09 March 2023 14:18 PM
मागेल त्याला शेततळे’ योजनेचा आता व्यापक विस्तार 
आता मागेल त्याला शेततळे, फळबाग, ठिबक सिंचन, शेततळ्यांचे अस्तरीकरण - मागेल त्याला शेडनेट, हरितगृह, आधुनिक पेरणीयंत्र, कॉटन श्रेडर - या योजनेवर 1000 कोटी रुपये खर्च करणार
 
काजू बोंडूवर प्रक्रिया केंद्र, 'काजू फळ विकास योजना'   
200 कोटी रुपयांच्या भांडवलासह कोकणासाठी काजू बोर्ड - काजू बोंडूपेक्षा प्रक्रिया काजू बोंडूला 7 पट भाव - उत्पन्नवाढीसाठी कोकणात काजू बोंडू प्रक्रिया केंद्र - कोकण, चंदगड तसेच आजरा (कोल्हापूर) येथे काजू फळ विकास योजना - 5 वर्षांसाठी 1325 कोटी रुपयांची तरतूद 
09 March 2023 14:12 PM

Maharashtra Budget 2023 

- 'नमो शेतकरी महासन्मान निधी योजना
- महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता 12000 रुपयांचा सन्माननिधी
- प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकारची भर
- प्रतिशेतकरी, प्रतिवर्ष 6000 रुपये राज्य सरकार देणार
- केंद्राचे 6000 आणि राज्याचे 6000 असे 12,000 रुपये प्रतिवर्ष मिळणार
- 1.15 कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ
- 6900 कोटी रुपयांचा भार राज्य सरकार उचलणार
- पंतप्रधान पिक विमा योजनेसाठी शेतक-यांचे पैसेही आता सरकार भरणार. यासाठी सरकारकडून आर्थिक तरतूद
- महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आता केवळ 1 रुपयांत पीकविमा
- - आधीच्या योजनेत विमाहप्त्याच्या 2 टक्के रक्कम शेतकर्‍यांकडून
- आता शेतकर्‍यांवर कोणताच भार नाही. राज्य सरकार भरणार हप्ता
- शेतकर्‍यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा
- 3312 कोटी रुपये भार राज्य सरकार उचलणार

09 March 2023 14:11 PM

Maharashtra Budget 2023

- मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, संभाजीनगरा येथील उद्यानांचा विकास  

- राज्यातील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 300 कोटी
- शिवकालीन किल्ले संवर्धनासाठी 300 कोटी
- पंचामृत -श्वावत शेती,  महिला ओबीसी मागास वर्ग विकास,  पायाभूत सुविधा, रोजगार निर्मित, पर्यावरण पुरक विकास
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष. या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये
- आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान: 50 कोटी
- मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर येथे शिवचरित्रावरील उद्याने : 250 कोटी रुपये
- शिवनेरी किल्ल्यावर शिवछत्रपतींच्या जीवनचरित्रावर संग्रहालय. शिवकालिन किल्ल्यांचे संवर्धन : 300 कोटी रुपये

09 March 2023 14:10 PM

राज्याच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, राज्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर, एक रुपयात पीक विमा मिळणार

09 March 2023 14:07 PM

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचं हे 350 वं वर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील सुराज्याची निर्मिती करण्यासाठी शासनाची वाटचाल असेल. २ ते ९ जून या कालावधीत शिवराज्याभिषेक महोत्सल आयोजित करण्यात येणार असून त्यासाठी 350 कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात येणार

09 March 2023 14:03 PM

Budget 2023 : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात. अर्थमंत्री फडणवीस आयपॅडवर सादर करतायत अर्थसंकल्प

09 March 2023 12:36 PM

Maharashtra Budget 2023 :  'गुलाबराव यांनी नागालँड येथील विषय काढला. तुन्ही दररोज येऊन खोके खोके करता, आपण जेव्हा दुसऱ्यांना आपण बोटं दाखवतो त्यावेळेस आपल्याकेही चार बोटं असतात. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसरं पाहायचं वाकून…', असा टोला मुख्मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. कसबा हरली तरी भाजपनं तीन राज्य जिंकली असंही ते यावेळी म्हणाले. 

 

09 March 2023 12:28 PM

Maharashtra Budget 2023 :  गुलाबराव पाटील यांचा राष्ट्रवादीला जोरदार टोला.  नांगालँड येथेही 50 खोके एकदम ओके झाले का? असं म्हणत बदलाचे वारे एकदम कसे वाहतात, असा सवाल गुलाबराव पाटील यांनी केला. 

 

09 March 2023 12:20 PM

Maharashtra Budget 2023 : माहिती जनसंपर्क विभागात 500 कोटी भ्रष्टाचारासंदर्भात मुख्मंत्र्यांची मान्यता न घेता सीएमना अवगत केले. यापूर्वी गृहनिर्माण मंत्री यांनी केले होते त्यावेळेस राजीनामा घेतला होता. 2019-20 साली विभागाने मुख्यमंत्र्यांनी परवानगी घेतली नाही. फडणवीस यांच्या सरकारची प्रचार प्रसार जाहीरात केली. त्यानंतर ठाकरे नव्याने सीएम झाले त्यांनी चौकशी आदेश दिले, मुख्य सचिव चौकशी केली. सीएम यांना अवगत केले असा शेरा मारला, तत्कालीन डीजीपीआर  महासंचालक ( ब्रिजेसिंग) विद्यमान सीएम प्रधान सचिव पदावर यांनी अवगत केला शेरा मारून काम केले. घोटाळा यावर पडदा टाकायचे काम सुरू , सीएम पाठीशी घालत आहे. दोषी अधिकारी कारवाई करावी. सीएम याकडे मागणी दोषी अधिकारी तात्काळ आजच कारवाई करा निलंबन करावे, असं अजित पवार सभागृहापुढे म्हणाले. 

09 March 2023 11:55 AM

Maharashtra Budget 2023 :  गुरुवारी दुपारी 1 वाजता राज्य मंत्री मंडळाची कॅबिनेट बैठक होणार आहे. राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी ही बैठत असेल, ज्यानंतर अर्थसंकल्पाला मान्यता मिळणार आहे. 

09 March 2023 11:38 AM

Maharashtra Budget 2023 :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रामक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विरोधाकांवर हल्लाबोल केला. तुमच्या सारखं शेतकरी तोंडाला पाने पुसले नाहीत. आम्ही 12 हजार कोटी रुपये दिले. तुम्ही 50 हजार मदत दिली. शेतकऱ्यांना तुम्ही नाही तर आम्ही मदत दिली. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

09 March 2023 11:28 AM

Maharashtra Budget 2023 :  नाफेडकडून कांदा खरेदी सुरु झालेली नाही, हरभऱ्याची खरेदी सुरु झालेली नाही. असं म्हणत राष्ट्रवादीच्या अजित पवार य़ांनी सत्ताधाऱ्यांना पेचात पकडलं. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं 1 लाख एकर जमिनीचं नुकसान झाले. राज्याच्या प्रमुखांना मला ही माहिती द्यायची असल्याचं अजित पवार यांनी सभागृहात सांगितलं. अजित पवार म्हणाले, सर्व विभाग आकडे आलेत. कांदा खरेदी माहिती देतात पण वास्तव वेगळं आहे.  बळीराजा त्रासलेला आहे.  कांदा, हरभरा खरेदी अद्याप सुरू केली नाही. तातडीनं मदत केली पाहिजे, असंही ते म्हणाले. 

 

 

09 March 2023 11:23 AM

Maharashtra Budget 2023 :  शेतकऱ्यांना आपण वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांच्यापर्यंत आर्थिक मदत नक्की पोहोचेल असा विश्वासाचा शब्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहाला दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून राजकारण नको असं आवाहन त्यांनी विरोधकांना दिलं. हे सरकार शेतकऱ्यांचं आहे, असं म्हणत त्यांनी याच वक्तव्यावर जोर दिला. 

 

09 March 2023 11:18 AM

Maharashtra Budget 2023 :  शेतकऱ्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत गोंधळाचं वातावरण असतानाच अब्दुल सत्तार यांच्या वक्यत्वानं वेधलं लक्ष. 'गारपीट झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्यासाठी आदेश देण्यात आलेले आहेत. आतापर्यंत 39 हजार शेतकऱ्यांचे पंचनामे पंचनामेही झाले आहेत. ज्यानंतर आता शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने मदत पोहोचविली जाणार आहे. गेल्या सहा महिन्यांत शेतकऱ्यांना मदत करण्यात आलेली आहे', अशी माहिती त्यांनी दिली. 

09 March 2023 11:17 AM

Maharashtra Budget 2023 :  विधानसभेच्या आजच्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात झाली त्यावेळी नवनिर्वाचित आमदार अश्विनी जगताप आणि रविंद्र धंगेकर याचा शपथविधी पार पडला. ज्यानंतर लगेचच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून घेरण्यास सुरुवात केली. 

09 March 2023 10:48 AM

Maharashtra Budget 2023 :  सत्ताधाऱ्यांविरोधात विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन. 'विकासकामांना स्थगिती देणाऱ्यांचा धिक्कार असो, विकासकामांची स्थगिती उठवा नाहीतर खुर्च्या खाली करा', अशा घोषणा विरोधक देत आहेत.  

09 March 2023 10:13 AM

Maharashtra Budget 2023 :  देशाच्या विकासदरापेक्षा राज्याचा विकासदर कमी झाला असून, राज्यावरील कर्जाचा बोजाही वाढत आहे असं म्हणत नागरिकांवर याचा ताण येत अल्याची बाब विधानसभेबाहेर छगन भुजबळ यांनी अधोरेखित केली. सध्याचं सरकार अफाट खर्च करत असल्याचं म्हणत गुजरातच्या शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधांशी राज्यातील परिस्थितीशी तुलना केली. 

 

09 March 2023 10:06 AM

Maharashtra Budget 2023 :  'यंदाच्या अर्थसंकलपाकडून अनेक अपेक्षा आहेत, त्यामुळं योग्य असा अर्थसंकल्प मांडला जाईल अशी अपेक्षा करू. हे धडाकेबाज सरकार आहे, फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बजेट सादर करू नका. अनेक अडचणी राज्य समोर आहे त्याकडे लक्ष द्यायला हवे. आज राज्यात जी परस्थिती हे कदाचित सत्ताधाऱ्यांनी अभ्यास केला असावा. हे सरकार 18 तास काम फक्त कागदावर काम करते आहे. त्यातही फक्त मुंबईवर फोकस न करता इतर शहरावर सुधार लक्ष द्या', अशा सूचक शब्दांत रोहित पवार यांनी अर्थसंकल्पाबाबतच्या अपेक्षा व्यक्त करत सत्ताधाऱ्यांचे कान टोचले. 

 

09 March 2023 09:52 AM

Maharashtra Budget 2023 :  राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर ताशेरे. 'राज्यात यांचं सरकार आल्या पासून राज्यात कर्ज वाढलं आहे. सोबतच बेरोजगारीही वाढली आहे', असं म्हणत यंदाच्या निवडणुका समोर ठेवुनच हे बजेट मांडलं जाईल अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली. 

 

09 March 2023 09:09 AM

Maharashtra Budget 2023 :  आगामी निवडणुका लक्षात घेता महत्त्वाच्या किंबहुना शक्य असेल त्या सर्वच आमदारांच्या मतदारसंघातील पायाभूत सुविधा आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी या अर्थसंकल्पामध्ये मोठ्या तरतूदी केल्या जाऊ शकतात. 

09 March 2023 07:55 AM

Maharashtra Budget 2023 : बुधवारी विधानसभेत सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालातून राज्याच्या आर्थिक विकासदरात 6.8 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या राज्यावर 46 हजार कोटी रुपयांच्या कर्ज व्याजाचा बोजा आहे ही बाबही इथं लक्षात घेण्याजोगी. 

09 March 2023 07:01 AM

Maharashtra Budget 2023 : राज्यातील आगामी निवडणुका पाहता यंदाच्या अर्थसंकल्पात मोठ्या शहरांसाठी जास्तीची आर्थिक तरतूद करण्याला सरकार प्राधान्य देऊ शकतं. त्यातही शहर आणि शेतकरी असे दोन्ही महत्त्वाचे घटक केंद्रस्थानी ठेवत संतुलित अर्थसंकल्प सादर करण्यावर फडणवीसांचा भर असेल. 

 

Read More