Maharashtra Budget Session 2023 LIVE Updates : विधान परिषदेत विरोधकांचा कांदा प्रश्नावरून गोंधळ झाला आणि हा मुद्दाच दुसऱ्या दिवशी गाजला. विरोधकांचा कांदा व कापूस प्रश्नावरचा स्थगन प्रस्ताव उपसभापती नीलम गोऱ्हेंनी फेटाळला, ज्यामुळं विरोधक आक्रमक भूमिकेत दिसले. विरोधकांच्या गोंधळामुळे परिषद 15 मिनिटांसाठी आणि नंतर 25 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं. पुढे विधान परिषदेचे आजचे कामकाज संपल्याचे जाहीर करत परिषद दिवसभरासाठी स्थगित करण्यात आली. उद्या सकाळी कामकाज सुरू होईल तेव्हा नव्या दिवशी कोणता नवा मुद्दा गाजणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.