Breaking News LIVE : राज्याच्या राजकारणाला दर दिवशी नवं वळण मिळत असतानाच या परिस्थितीमध्ये विधानसभेचं पावसाळी अधिवेशन गुरुवार, 27 जून 2024 पासून सुरू होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वीचं हे शेवटचं अधिवेशन असल्यामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्य म्हणजे एकाच कार्यकाळात तीन मुख्यमंत्री पाहिललेल्या या विधानसभेच्या अधिवेशनाची या सततच्या बदलांमुळंही बरीच चर्चा.
या अधिवेशनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त निर्णय घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल तर सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न विरोधक करतील हे स्पष्ट आहे. याव्यतिरिक्तही राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाच्या अंदाजापासून ते अगदी इतर सर्व घडामोडींपर्यंतच्या सर्व अपडेट एका क्लिकवर पाहा Breaking News LIVE....
- विधान परिषदेवर पंकजा मुंडे यांची वर्णी लागणार?
- लोकसभेत पराभव झाल्यानंतर मुंडे याचं राजकीय पुनर्वसन करण्याच्या तयारीत भाजप..
- 11 जागांसाठी विधानपरिषदेच्या निवडणुका होणार आहे. त्यात भाजप आपले पाच उमेदवार रिंगणात उतवण्याच्या तयारीत आहे
- OBC आरक्षण आणि पंकजा मुंडे यांचं लोकसभेत झालेलं पराभव या गोष्टी लक्षात घेऊन मुंडे यांना विधानपरिषदेवर उमेदवारी दिली जाऊ शकते...
- आगामी विधानसभा निवडणुकीत डोळ्यासमोर ठेऊन भाजप पंकजा मुंडे यांना देणार संधी - सूत्रांची माहिती
छत्रपती संभाजीनगर एसीबीची अहमदनगरमध्ये कारवाई...
अहमदनगर महापालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांच्या दालनाची एसीबी पथकाकडून झाडाझडती...
एसीबीच्या कारवाईबाबत पाळण्यात येत आहे कमालीची गुप्तता...
मनपा आयुक्तांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्याही घरी झाडाझडती सुरू...
सकाळी सात वाजल्यापासून अहमदनगरमध्ये एसीबीकडून करावाई सुरू...
मनपा आयुक्तांचे शासकीय घराला देखील मारले टाळे...
विधानभवनात फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची लिफ्टमध्ये भेट झाली. याभेटीनंतर फडणवीस उद्धव ठाकरेंना एका ताटात जरी घेऊन जेवले तरी आम्ही आता फडणवीस या नावावर फुली मारलीय. अशी प्रतिक्रिया सुषमा अंधारेंनी दिली. तसेच त्यांनी एका लिफ्टमधून प्रवास केला हा फक्त योगायोग होता. यावरून ते एकत्र आले असा अर्थ होत नाही, असही त्या म्हणाल्या.
सेन्सेक्सचा नवा रेकॉर्ड...पहिल्यांदाच 79 हजाराच्या टप्प्यापार...बँकिंग, टेलिकॉम क्षेत्राची दमदार कामगिरी...तर, निफ्टी 24 हजारावर
जनता खोके सरकारला बाय बाय करणार - उद्धव ठाकरे
घोषणा किती आणि पूर्तता किती ते सांगावं - उद्धव ठाकरे
प्रश्न विचारले की आमच्यावर आरोप करतात - उद्धव ठाकरे
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच हे पावसाळी अधिवेशन सुरु होत असल्याने वादळी होण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वीचं हे शेवटचं अधिवेशन असेल. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवरुन खडाजंगी होण्याची शक्यता आहे. दरम्यान आज पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे आमने-सामने आले होते. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी एकाच लिफ्टने प्रवास केला.
दूध दरासाठी पुन्हा एकदा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.. दुधाला किमान 35 रुपये भाव मिळावा या मागणीसाठी राज्यभर दुध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत. दुध उत्पादकांच्या विविध मागण्यांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 28 जून पासून राज्यभर आंदोलन छेडण्यात येणार आहे.. दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने आंदोलनाची हाक देण्यात आली असून अधिवेशन काळात सरकारच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.
संसदीय कामकाज मंत्री या नात्याने चंद्रकांत पाटील हे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना पुष्पगुच्छ देण्यासाठी आले तेव्हा तिथे उद्धव ठाकरेही होते. यावेळी एकमेकांना बऱ्याच कोपरखळ्या मारल्या. यावेळी सर्वांच्याच नजरा वळल्याचं पाहायला मिळालं. यावेळी अनिल परब यांचं अॅडव्हान्समध्ये अभिनंदन करण्याच्या चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधलं.
विरोधकांचा गोंधळ, पायऱ्यांवरील घोषणाबाजी आणि त्यानंतरचा शोकप्रस्ताव अशा कार्यक्रमानंतर विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला दिवस पूर्ण झाला.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधात आक्रमक असल्याचं पाहायला मिळालं. शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी महाविकास आघाडीचे विधान भवन पायऱ्यांवर आंदोलन केलं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या समोर विरोधकांची आक्रमक घोषणाबाजी. 'शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांची वीजबिल माफ करावी, कृषी मंत्र्यांच्या जिल्ह्यात बळीराजाचा बळी', अशा घोषणा यावेळी विरोधकांनी केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर विरोधकांची जोरदार घोषणाबाजी. शेतकऱ्यांना कर्जमाफी, बिल मुक्ती मिळालीच पाहिजे अशा स्वरूपाच्या जोरदार घोषणाबाजी.
विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केल्याचं पाहायला मिळालं. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, असं लिहिलेले फलक यावेळी विरोधकांच्या हातात पाहायला मिळाले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी हे आंदोलन केलं.
मुख्यमंत्री कोण? यावर भाष्य करणं टाळलं पाहिजे असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर येथे त्यांनी हे वक्तव्य केलं असून, त्यांच्या या वक्तव्यामुळं मुख्यमंत्रीपदावरून मविआमध्ये कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.
सरकार प्रत्येक विषयात अपयशी ठरलं असून, आता सरकारला जाब विचारणार असल्याची माहिती अधिवेशनापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना सतेज पाटील यांनी दिली. यावेळी पेपर लीक प्रकरणी कायदा यावा अशी मागणी करत नीट मधून राज्याला योग्य वाटा मिळत नाही हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला. महायुतीचा मतदार दुरावला असून, कितीही लोकप्रिय घोषणा करा तो परत येणार नाही, या शब्दांत पाटील यांनी निशाणा साधलाय.
ठाणे आणि मिरा-भाईंदर शहराला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी शहरातील बेकायदेशीर पब्ज, बारवर कठोर कारवाई करावी. तसेच शहरातील अमली पदार्थांशी निगडित अवैध बांधकामांवर बुलडोझर फिरवून ती नष्ट करण्यात यावीत, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही शहरांचे महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांना दिले आहेत.
विधानपरिषद निवडणूकीनंतर आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत देखील सरकारच्या हालचाली पाहायला मिळत आहेत. या धर्तीवर महायुतीत राज्यपाल नियुक्त आमदारांच्या निवडीबाबत चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे. 4 जुलैला राज्यपाल नियुक्त आमदारांबाबत सुनावणीची हायकोर्टात पुढील तारीख असून, 12 आमदारांमध्ये भाजप स्वतःसाठी जास्त वाटा घेण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं जात आहे.
पुणे शहरातील अनेक भागांचा वीज पुरवठा आज बंद राहणार आहे. देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी शहरातील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा बंद करण्याचा महावितरणचा निर्णय असून, गुरुवारी सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत अनेक भागांचा वीज पुरवठा बंद असेल. शनिवार पेठ, नारायण पेठ, सिंहगड रोड, एरंडवणे, शिवाजीनगर आणि औंध गावातील वीजपुरवठा दिवसभर खंडीत असेल.
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी वृद्धापकातील प्रकृती अस्वास्थ्याच्या तक्रारीमुळं दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल झाले आहेत. एम्सच्या जरियाट्रिक डिपार्टमेंटमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचं सांगितलं जात आहे.
पुण्याहून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावरील वरंधा घाट, अवजड वाहतुकीकरीता पूर्णपणे बंद..तर हवामान खात्याचा रेड आणि ऑरेंज अलर्ट असताना हलक्या वाहनांसह घाटातील सर्व प्रकारची वाहतूक राहणार बंद. पावसाळ्यात घाटामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन अनेकवेळा अचानक दरडी कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा स्वरुपाच्या घटना घडतात. त्या पार्श्वभूमीवर संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी आणि त्या अनुषंगाने आवश्यक उपाय योजना करण्यासाठी प्रशासनाचा निर्णय, 26 जून ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आदेश लागू असणार आहे.
मुंबई महानगर क्षेत्रातील इयत्ता अकरावीची केंद्रीय प्रवेशाची पहिली प्रवेश यादी गुरुवारी सकाळी 10 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. या यादीत नाव असलेल्या विद्यार्थ्यांना 27 जून सकाळी 10 वाजल्यापासून 1 जुलै सायंकाळी 6 वाजेपर्यंत महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. पहिल्या पसंतीक्रमाच्या महाविद्यालयाच्या यादीत नाव आल्यास विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करणं अपेक्षित आहे.
आजपासून सुरु होणा-या अधिवेशनात पूर्णवेळ उपस्थित राहण्याच्या सूचना, उद्धव ठाकरेंनी आपल्या आमदारांना केल्यात. तसंच ड्रग्ज, होर्डिंग आणि सत्ताधारी आमदारांना अधिकचा निधी यावरुन सरकारला घेरण्याचे आदेश त्यांनी आमदारांना दिलेत. तर शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर दररोज प्रश्न विचारण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या
विधानपरिषदेत 11 पैकी किमान एक जागा पूर्व विदर्भाला द्यावी, अशी मागणी अजित पवार गटाचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनी केलीय. येणा-या काळात पक्ष संघटना वाढवायची असेल तर संविधानिक पद हे पूर्व विदर्भाला दिलं पाहिजे, असं गुजर यांनी सांगितलंय. तसंच मी स्वत: विधान परिषदेसाठी इच्छुक असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं.
विधानसभेच्या अधिवेशनाआधी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले आणि इथंच अधिवेशनातील गोंधळाची पूर्वसूचना मिळाली. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात घवघवीत यश मिळाल्यामुळे मविआचा आत्मविश्वास वाढला. तर अनेक मुद्द्यांवरून सरकारी पक्षांमध्ये असलेला विसंवाद गेले काही दिवस सातत्यानं समोर येतोय. सध्या असलेली विरोधकांची एकी अधिवेशनात कायम ठेवणं हे विरोधकांसमोरील आव्हान असेल तर विसंवादाचा धागा दूर करून एकत्र येणं हे महायुतीसाठी गरजेचं असेल.
Thank you
By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.