Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement
LIVE NOW

Maharashtra Political Crisis Updates : सत्तासंघर्षाची सुनावणी आता 14 मार्चला होणार

Maharashtra Political Crisis LIVE Updates : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात आज अखेरची सुनावणी होणार होती. मात्र शिवसेने संघर्ष युक्तिवाद सुरुच राहणार आहे. आता याची सुनावणी होळीनंतर सुरु राहणार आहे.  

Maharashtra Political Crisis Updates :  सत्तासंघर्षाची सुनावणी आता 14 मार्चला होणार
LIVE Blog

Maharashtra Political Crisis LIVE Updates : शिवसेना कोणाची याची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरु आहे. राज्यातल्या सत्तासंघर्षावर आज तिसऱ्या दिवशी सुनावणी झाली. (Maharashtra Politics case) काल शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला. (Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court hearing ) आज सुनावणीचा अखेरचा दिवस होता. मात्र, सुनावणी सुरुच राहणार आहे. (Uddhav Thackeray vs Eknath Shinde) आता ही सुनावणी 14 मार्चला होणार आहे.

02 March 2023
02 March 2023 14:13 PM

Maharashtra Political Crisis LIVE Updates : आम्ही सर्वोच्च न्यायालयात आहोत, निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला मान्य नाहीच, निवडणूक आयोगाने आम्हाला अनेक कागदपत्रे मागितली आम्ही जमा केली. मात्र अचानक दबावाखाली निर्णय दिला असेल तर आयोग्य, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

02 March 2023 13:52 PM

Maharashtra Political Crisis । सत्तासंघर्षाची सुनावणी आता 14 मार्चला 

Maharashtra Political Crisis LIVE Updates : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी होळीच्या सुट्टीनंतर सुरुच राहणार आहे. त्यामुळे आता 14 मार्चला सुनावणी होणार

02 March 2023 13:51 PM

Maharashtra Political Crisis LIVE Updates : दोन स्वतंत्र बैठका आहेत. कृपया एका मीटिंगचे मिनिट्स दुसर्‍यात मिसळून गोंधळ करुन घेऊ नका. जर सरकारला बहुमत गमवावे लागले आणि एक गट येऊन म्हणतो की आमच्याकडे बहुमत आहे, तर शिंदे गटाला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी बोलावून राज्यपालांनी कोणती चूक केली? असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील कौल यांनी केला.

02 March 2023 13:49 PM

Maharashtra Political Crisis LIVE Updates :  सर्व घटना घडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. त्यानंतर बहुमत चाचणी चाचणी घेतली. ठाकरे बहुमत चाचणीला समोरे गेले नाहीत, असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील ॲड हरीश साळवे यांनी केला.

02 March 2023 13:47 PM

Maharashtra Political Crisis LIVE Updates :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फ्लोअर टेस्टला सामोरं जायला पाहीजे होतं. जर फ्लोअर टेस्टला सामोरे गेले असते तर काय झालं असते, असे शिंदे गटाचे वकील ॲड हरीश साळवे यांनी सवाल उपस्थित केला. 

02 March 2023 13:45 PM

 Maharashtra Political Crisis LIVE Updates :  उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतरच सरकार कोसळले. मगच राज्यपालांनी फ्लोअर टेस्ट घ्यायला सांगितले, हरिश साळवे यांचा युक्तिवाद

02 March 2023 11:10 AM

Maharashtra Political Crisis LIVE Updates :  सुप्रीम कोर्टाकडून आम्हाला अपेक्षा आहे. हा निकाल केवळ महाराष्ट्रावर परिणाम करणारा नाही तर लोकशाहीवर परिणाम करणारा असेल आम्हाला अपेक्षा आहे नक्कीच कोर्ट नक्कीच योग्य निकाल देइल आणि उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागेल, असे मत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे. 

02 March 2023 10:22 AM

Maharashtra Political Crisis LIVE Updates :  व्हीप बजावला गेला होता तेंव्हा सुनील प्रभू हेच व्हीप होते. त्याचं व्हीप झुगारला गेला. हा मुद्दा महत्त्वाचा आहे, असे ठाकरे गटाचे अनिल देसाई यांनी म्हटले आहे. 

02 March 2023 10:21 AM

Maharashtra Political Crisis LIVE Updates :  ज्येष्ठ विधिज्ञ तर्क लावत असतात. सरकार पाडणं हा उद्देश होताच.  विभाजन नाही असं म्हणणं हे स्पष्ट करतं. शिंदेंची विसंगती यातून दिसत आहे. इथे अपात्रतेचा दहाव्या अनुसूचीत येते का हा मुद्दा महत्त्वाचा आहे. काही ग्रहातकावर युक्तीवाद त्यांच्याकडून केला गेला, असे ठाकरे गटाचे देसाई म्हणाले. 

02 March 2023 10:20 AM

Maharashtra Political Crisis LIVE Updates : शिंदेकडून विधानं वारंवार बदलली जातेय. महाविकास विरोधात होतो असं म्हणताहेत. याची दखल सर्वोच्च न्यायालय घेईल. विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल, निवडणूक आयोग या तीन्ही संस्था यात आहेत. राज्यपालांची भूमिका आणि निवडणूक आयोगाचा निकालावर आमचे प्रश्न आहेत. विद्यमान अध्यक्षांकडे हे प्रकरण जावे असा युक्तीवाद शिंदेंकडून करण्यात आलाय. यात कशा प्रकारे नियंमांचे उल्लंघन झालंय हे आम्ही दाखवून दिले आहे, असे अनिल देशाई म्हणाले. 

02 March 2023 10:18 AM

Maharashtra Political Crisis LIVE Updates :सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल अशी अपेक्षा आहे. कळीचे मुद्दे आहेत घटनात्मक पेच आहेत. लोकशाहीवरच प्रश्न निर्माण झाले आहेत. आज सुनावणी पूर्ण होत आहे. निकाल आज येईल असं वाटत नाही. लोकशाही मजबूत करण्यासाठी हा निकाल महत्त्वाचा आहे, असे ठाकरे गटाचे  अनिल देसाई म्हणाले. 

02 March 2023 07:52 AM

Maharashtra Political Crisis LIVE Updates : शिवसेना कोणाची याची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरु आहे. राज्यातल्या सत्तासंघर्षावर आज तिसऱ्या दिवशी अंतिम सुनावणी होणार आहे. (Maharashtra Politics case) काल शिंदे आणि ठाकरे गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तीवाद केला. (Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court hearing ) आज सुनावणीचा अखेरचा दिवस आहे. (Uddhav Thackeray vs Eknath Shinde) 

02 March 2023 07:51 AM

Maharashtra Political Crisis LIVE Updates : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात आज अखेरची सुनावणी होणार आहे. आज युक्तिवादाचा अखेरचा दिवस असणार आहे. सध्या शिंदे गटाचा युक्तिवाद सुरु आहे. आज हा युक्तिवाद पूर्ण करावा लागणार आहे. त्यानंतर  सुप्रीम कोर्ट दुपारी चार वाजता निकालाचा दिवसही ठरवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजच्या दिवसाकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे.

Read More